India's got latent - चला निषेध नोंदवूया.
India's got latent अश्या नावाचा एक कार्यक्रम येतो.
कुठे येतो कल्पना नाही. पण फेसबूक, इन्स्टा, युट्यूब वर शॉर्ट आणि रिल्स स्वरूपात याचे व्हिडिओ मुबलक बघावयास मिळतात.
Latent या शब्दाचा अर्थ काय मला माहीत नाही. मी आधी ते टॅलेंट समजूनच याचे काही एपिसोड बघितले. एक दोन फनी वाटले म्हणून अजून काही एपिसोड बघितले तसे वरचेवर दिसू लागले. आणि हळूहळू त्यांचा ठेवणीतील 18+ स्टॉक समोर येऊ लागला. मग मात्र मी न बघण्याची काळजी घेऊ लागलो कारण मोबाईल मुलांच्या हातात सुद्धा जातो.
तरीही अध्येमध्ये याचे व्हिडिओ नजरेस पडायचेच. आणि रिल बघने हे असे व्यसन आहे की जे समोर येईल ते झोप उडवून बघितले जाते.
गेल्या आठवड्यात मात्र हादरवून टाकणारे व्हिडिओ नजरेस पडले. मुले मुली एकत्र बसले आहेत आणि एकमेकांची खेचणे म्हणजे रोस्ट करणे या नावाखाली काहीही अश्लील शब्दफेक चालू आहे. म्हटले हे तर फार वाया गेलेले प्रकरण आहे. दूर राहिलेलेच चांगले.
आणि आज त्यांनी काहीतरी मोठे कांड केले, अश्लील टिप्पणीचा कळस गाठला ज्या बद्दल दिलगिरी व्यक्त करताना दिसले.
बातमी काय हे शोधले तर खरेच किळस वाटावे आणि युवा पिढीची चिंता वाटावी असे एकेक व्हिडिओ समोर आले.
चिंता यासाठी वाटली कारण ज्याने आज हे कांड केले त्या Ranveer Allahbadi याला नरेंद्र मोदींच्या हस्ते National creater award असा पुरस्कार मिळाला आहे.
चिंता यासाठी वाटली कारण हा शो जो चालवतो तो समय रैना नावाचा मुलगा अमिताभच्या कौन बनेगा करोडपती कार्यक्रमात आला होता आणि अमिताभ त्याच्या विनोद बुद्धीचे कौतुक करतl होता.
चिंता यासाठी वाटली कारण ही मुले एकीकडे आदर्श म्हणून समोर आणली जात आहेत तर तेच दुसरीकडे चुकीचा आदर्श ठेवत आहेत.
कोण बनेगा करोडपतीमध्ये या समय रैना सोबत एक तन्मय भट म्हणून मुलगा आलेला. जर मी चुकत नसेल तर यालाच मी कित्येक वर्षांपूर्वी एआयबी रोस्ट या कार्यक्रमात रणवीर सिंग, अर्जुन कपूर, करन जोहर या बॉलीवूड कलाकारांसोबत अश्लीलतेची निचतम पातळी गाठताना पाहिले होते.
आज India's got latent ची बातमी पाहिल्यावर तो कार्यक्रम आठवला कारण मी त्यावेळी देखील मायबोलीवर धागा काढला होता. आणि धक्का तेव्हा बसलेला जेव्हा काही लोकं त्या कार्यक्रमाचे कौतुक करत होते, तर कित्येक जण आपल्याला काय त्याचे म्हणत होते. उलट रुचत नाही तर आपण असले कार्यक्रम बघू नये हा उपाय सुचवत होते.
तो धागा इथे बघू शकता.
https://www.maayboli.com/node/52596
आज पुन्हा मायबोलीवर धागा काढला कारण आज "आपल्याला काय त्याचे?" म्हणावे अशी परिस्थिती उरली नाहीये. आज कॉलेज जाणारया प्रत्येक मुलाकडे मोबाईल असतो तर शाळेत जाणाऱ्या मुलांचे सुद्धा इंस्टाग्राम अकाऊंट असते. आणि त्यांनाही हे व्हिडिओ कुठल्याही सेन्सॉरशिपशिवाय बघायला उपलब्ध असतात.
मुळात लहान मुलांनीच काय पुरेशी अक्कल न आलेल्या कुठल्याही तरुणांनी असे व्हिडिओ बघू नयेत असे वाटते.
सोशल मीडियावर सर्रास दिसणाऱ्या या कंटेंटवर काही निर्बंध असावेत असे वाटते.
म्हणून आज संधी मिळाली आहे तर निषेध नोंदवतो!
सर, चँपियन्स कप सुरू झाला.
सर, चँपियन्स कप सुरू झाला. शर्माजींना तुमची गरज आहे. तिथे अधिक लक्ष द्या. बीअर बायसेप्सकडे कोर्ट आणि पोलिस बघून घेतील.
अगदीच वेळ जात नसेल, तर तो समय रैना परदेशात दडून बसलाय- त्याला बेड्या ठोकून आणि साखळ्या घालून परत आणण्यासाठी काहीतरी करा.
बाकी तुमच्या नवा धागा काढतो, नवी पोस्ट लिहितो, या धमक्यांना आता कोणी घाबरत नाही. काहीतरी नवं करा.
..
..
१. चीन डीपसीक, फिफ्थ जनरेशन फायटर प्लेन , बुलेट ट्रेन वगैरे करतोय व आपण गेले आठ दिवस एका कॉमेडियन ने केलेल्या जोक साठी छाती पिटत आहोत. अश्लील आणि वादग्रस्त व्हिडिओ ची लिंक मायबोलीवर शेअर करून इतरांना बघायला उद्युक्त करत आहोत.
२. मायबोलीवर चिकवा धाग्यावर चित्रपटांना नावे ठेवत आहोत.
३. चित्रपटाचा शेवट मला असा नाही तर तसाच हवा होता यावर गहन चर्चा करत आहोत.
४. क्रिकेटच्या धाग्यावर चॅम्पियन ट्रॉफी कोण जिंकणार याची चिंता करत आहोत.
५. खाऊगल्ली धाग्यावर आज काय खाल्ले याचे कौतुकाने फोटो शेअर करत आहोत.
६. राजकारणाच्या धाग्यावर एकमेकांवर शाब्दिक चिखल फेक करत आहोत.
७. कथा कविता गझला फुकट मिळताहेत म्हणून वाचण्यात आणि लिहिण्यात मग्न आहोत.
८. वेबसिरीज, मालिका, पिक्चर, शॉर्ट फिल्म, रिपीट मोडवर गाणी, मुलाखती आणि काय काय टीव्ही मोबाईलवर जे मिळेल ते बघण्यात आणि नंतर इथे ते लिहून चार लोकांना सांगण्यात वेळ वाया घालवत आहोत..
९. अरे हो दारू.. ती राहिलीच. स्वतःही प्राशन करत आहोत आणि इतरांनाही उद्युक्त करत आहोत.
१० . ........ अजून प्रामाणिकपणे भर टाका लोकहो... आज देशाची जी अवस्था आहे त्याला आपण सारेच जबाबदार आहोत. फक्त ऋन्मेऽऽष चे धागे नाही. पुढे या आणि जबाबदारी घ्या..
बाकी तुमच्या नवा धागा काढतो,
बाकी तुमच्या नवा धागा काढतो, नवी पोस्ट लिहितो, या धमक्यांना आता कोणी घाबरत नाही.
>>>>
ज्याच्या मनात चांदणे असते त्याच्यासाठी धमकी
चर्चाप्रेमींसाठी आनंदाची बातमी
देशाच्या अवस्थेपेक्षा निदान
देशाच्या अवस्थेपेक्षा निदान आपण आज ज्या व्यवस्थेंत आहोत, त्यापैकी एक म्हणजे - मायबोली, तिच्या आजच्या अवस्थेला मुख्यत्वे कोण जबाबदार आहेत यावर उहापोह झाला तर आणखी उकृष्ट चिखलफेक पहायला मिळेल असे वाटते. 🍿
लैंगिकता या विषयावर र.धों.
लैंगिकता या विषयावर र.धों. कर्वे यांनी आपले आयुष्य खर्च केले.
रधोंवर ‘अश्लीलतेच्या’ कायद्याखाली खटला भरण्यात आला तो ‘व्यभिचाराचा प्रश्न’ याचं विषयाशी संबंधित आहे. अजित दळवींचे समाजस्वाथ्य हे नाटक त्यावरच आहे.
अश्लील म्हणजे नेमकं काय? याची कोणतीही व्याख्या उपलब्ध नाही. एखादी गोष्ट मला अश्लील वाटू शकते ती दुसऱ्याला वाटणार नाही! तेव्हा अश्लीलता हा केवळ आरोप करणाऱ्याच्या मनाचा गुण आहे वस्तू, चित्र किंवा शब्दाचा नाही.
समाजस्वास्थ्य नाटक जरुर पाहा. हे रणवीर प्रकरणातील प्रतिक्रिया पाहिल्या कि त्याची आठवण येते. चित्राचा कॅनवास बदलला की चित्राचे आकलन ही बदलते. कुठल्या कॅनवास वर आपण ते चित्र आरोपीत करतो त्यावर ते अवलंबून आहे
अश्लीलता हा केवळ आरोप
अश्लीलता हा केवळ आरोप करणाऱ्याच्या मनाचा गुण आहे वस्तू, चित्र किंवा शब्दाचा नाही.
>>>>
ओके म्हणजे मी मागच्या पानावर शेअर केले ते व्हिडिओ अश्लील नव्हतेच मुळात.
उगाच काही जण मी अश्लीलतेचा प्रचार करत आहे असा आरोप माझ्यावर करत आहे.
खरी अश्लीलता त्यांच्या मनात आहे.
खरी अश्लीलता त्यांच्या मनात
खरी अश्लीलता त्यांच्या मनात आहे.>>>जर हेच रणवीर इलाहाबादीने सुप्रीम कोर्ट च्या जजला सांगितले असते तर? की खरी अश्लीलता तुमच्या च्या मनात आहे...
>>> उगाच काही जण मी
>>> उगाच काही जण मी अश्लीलतेचा प्रचार करत आहे असा आरोप माझ्यावर करत आहे.
यात तुम्ही मला गृहीत धरले नसेल असे गृहीत धरत आहे.
मी जे लिहिले होते ते 'अश्या अंदाजाने' लिहिले होते की ते बहुधा मायबोलीवर देणे येथील नियमावलीनुसार गैर ठरेल
एखादी गोष्ट मला अश्लील वाटू
एखादी गोष्ट मला अश्लील वाटू शकते ती दुसऱ्याला वाटणार नाही!>> ह्या वरून मला कुसुमाग्रजांची 'कल्पनेच्या तिरावर ' ही खूप वर्षांपूर्वी वाचलेली कादंबरी आठवली.
ती वाचलेली माझ्या शिवाय दुसरं कुणी सापडलं नाही मला. इथे आहे का कुणी?
ओके म्हणजे मी मागच्या पानावर
ओके म्हणजे मी मागच्या पानावर शेअर केले ते व्हिडिओ अश्लील नव्हतेच मुळात.
उगाच काही जण मी अश्लीलतेचा प्रचार करत आहे असा आरोप माझ्यावर करत आहे.
खरी अश्लीलता त्यांच्या मनात आहे. <<
किती शब्दांचे खेळ, उलट सुलट कोलांट्या उड्या आणि युक्तिवाद.. केवळ मी बोलतो/लिहितो ते सगळंच बरोबर आहे हे फक्त स्वतःलाच पटवण्यासाठी..
आता हे व्हिडीओ अश्लील नव्हते हे खरोखरंच स्वतःला पटलं असंल तर मग धागाच स्वतःहून डिलीट करणे योग्य.
कारण लेखातला मूळ मुद्दा निदान लेखकापुरता उरलाच नाहीये.
खरं तर इग्नोर करायला हवं.
खरं तर इग्नोर करायला हवं.
पण मी एका साईटचं नाव लिहील्याबरोबर त्या साईटवर सॉफ्ट पॉर्न कथा असतात ही अनावश्यक माहिती का पुरवली त्याचा कबुलीजबाब मिळाला. आभार.
यात तुम्ही मला गृहीत धरले
यात तुम्ही मला गृहीत धरले नसेल असे गृहीत धरत आहे.
>>>
अर्थात नाही.
काही नेहमीचे आवडीचे सभासद आहे माझे. थोड्या वेळाने धागा संपतो आणि आमच्या गप्पा सुरू होतात. त्या राहू देतो. त्या निमित्ताने धागा वर येतो आणि काही नवीन वाचक वाचतात. नवीन मुद्दा घेऊन येतात.
आता हे व्हिडीओ अश्लील नव्हते
आता हे व्हिडीओ अश्लील नव्हते हे खरोखरंच स्वतःला पटलं असंल तर मग धागाच स्वतःहून डिलीट करणे योग्य.
>>>>
बिलकुल पटले नाहीये. ते उपरोधाने लिहिले आहे.
लोकांचे दोन्ही तोंडाने बोलणे दाखवायला.
म्हणजे या धाग्याची गरज नव्हती म्हणताना त्यात काय इतके अश्लील नव्हते म्हणायचे.
आणि मी त्याच लिंक शेअर केल्या तर कसल्या अश्लील लिंक शेअर केल्या म्हणायचे.
माझ्या मते तो प्रकार अश्लील असभ्य वाह्यातच आहे.
ज्यांना तो वाटत नाही त्यांच्या मताचा सुद्धा आदर आहे.
पण ज्यांना वाटते त्यांना ते दिसू नये इतकी साधी अपेक्षा आहे.
ह्या वरून मला कुसुमाग्रजांची
ह्या वरून मला कुसुमाग्रजांची 'कल्पनेच्या तिरावर ' ही खूप वर्षांपूर्वी वाचलेली कादंबरी आठवली.>>>>> हो मी वाचली होती. माझ्याकडे आहे ती! लई भारी कल्पना आहे
@प्रकाश घाटपांडे,
@प्रकाश घाटपांडे,
तुम्ही पहिले भेटलात ही कादंबरी वाचणारे.
चीन डीपसीक, फिफ्थ जनरेशन
चीन डीपसीक, फिफ्थ जनरेशन फायटर प्लेन , बुलेट ट्रेन वगैरे करतोय व आपण गेले आठ दिवस एका कॉमेडियन ने केलेल्या जोक साठी छाती पिटत आहोत.
वरील वाक्यात 'आपण' हे 'आपण मायबोलीकर' नसून 'आपण भारतीय' अभिप्रेत होते. इथे नवा धागा उघडून चर्चा, अगदी काथ्याकूट करायलाही हरकत नाही. फार फार तर माबोची बँडविड्थड, स्पेस वाया जाईल. पण सुप्रीम कोर्ट, पोलीस, मंत्री ई ई आपली सारी कामे सोडून याच्याच मागे लागतात हे चूक आहे. आता तर त्याच्या आईबाबांनाही धमक्या येत आहेत, त्याचा पसपोर्ट जप्त केला गेला आहे. धन्य!
हो, हे सगळे चूक आहे.
हो, हे सगळे चूक आहे.
याची गरज नव्हती.
सुप्रीम कोर्ट नक्की कशाच्या
सुप्रीम कोर्ट नक्की कशाच्या आधारावर केस बोर्डवर घेत माहिती नाही. ज्या गोष्टी मिडिया मध्ये गाजत आहेत त्यांना लगेच प्रेफरन्स मिळतो. सलमान खानलाही लगेच जमीन मिळाला होता.
बरोबर इथे उमर खालिदच्या
बरोबर इथे उमर खालिदच्या जामीन अर्जांची टाइमलाइन दिली आहे. सर्वोच्च न्यायालयात ६ एप्रिल २०२३ ते १४ फेब्रुवारी २०२४ एवढ्या काळात एकही सुनावणी झाली नाही.
"We are in fact proud of the
"We have no regrets of being jailed in this particular case. We are in fact proud of the fact that we have been booked under sedition,” proclaimed activist Umar Khalid.
न्यायालयात ६ एप्रिल २०२३ ते १४ फेब्रुवारी २०२४ एवढ्या काळात एकही सुनावणी झाली नाही. >> सुनावणी झाली नाही, ही पण अभिमानाची गोष्ट असेल, कशाला दुःखी व्हायचे आपण?
न्यायालयासाठी नक्कीच
न्यायालयासाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट असेल.
आताही निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीबद्दलची केस घ्यायला वेळ नाही असं सांगितलं न्यायालयाने.
महाराष्ट्र पक्ष फूट प्रकरणात तर विक्रम करतील.
बीअर बायसेप्स प्रकरणाबद्दल
In a 1994 interview, Bradbury
In a 1994 interview, Bradbury cited political correctness as an allegory for the censorship in the book, calling it "the real enemy these days" and labeling it as "thought control and freedom of speech control".
Fahrenheit 451
https://en.wikipedia.org/wiki/Fahrenheit_451
खजुराओ कामसूत्र वासूनाका माहीमची खाडी सखाराम बाईंडर ओसाडवाडीचे देव
बचके रहना तुम भाईलोग. जमाना खराब है.
ते अभिजातवरच्या प्रेमाच्या
ते अभिजातवरच्या प्रेमाच्या (की अभिजातमुळे प्रेमाच्या) धाग्याचं काय झालं रे?
धागे-धागे करत महावस्त्र होईल पण तरी तुला पुरतं पडायचं नाही. सांभाळ.
अरे तिथे मगाशी उदय यांनी आठवण
अरे तिथे मगाशी उदय यांनी आठवण केली.. म्हटले त्यांना हा विकेंड नक्की
बापरे ओसडवाडी चे देव पुस्तक
बापरे ओसडवाडी चे देव पुस्तक आत्ता आलं असतं लोकांनी जाळपोळच केली असती
आधी पुस्तकाची मग लेखकाची
वाह काय मस्त आठवण काढली
वाह काय मस्त आठवण काढली
ओसाडवाडीचे देव धमाल होते..
विनोद असा हवा.. निखळ
हो पण तो आता निखळपणे घेतला
हो पण तो आता निखळपणे घेतला गेला नसता
धार्मिक भावना दुखावल्या म्हणून मोर्चे निघाले असते
लेखकावर पोलीस तक्रार, घरच्यांना धमक्यांचे फोन, सोशल मीडियावर शिविगाळ, जात काढली गेली असती
हो,
हो,
हल्ली निखळ विनोद निखळपणे घेतले जात नाही आणि बीभत्स विनोदाला सपोर्ट दाखवला जातो. सगळेच उलटे झाले आहे.
जर त्या पुस्तकावर उगाच भावना दुखावून मोर्चा निघाला असता तर माझा धागा त्यातील निखळ विनोदाला सपोर्ट करत त्या मोर्चाच्या विरोधात असता.
अहो पण त्या पुस्तकात हिंदू
अहो पण त्या पुस्तकात हिंदू देवांची टवाळी करण्यात आली आहे, ते तुम्हाला चालले असते का? मग माझ्या भावनांचे काय? हे लोक असेच करतात नेहमी. त्यांना येशू वा मेहमूद याची टिंगल करायची हिंमत नाही. हिंदू बिचारे ऐकून घेतात... इत्यादि.
खरं तर शर्माजींना
खरं तर शर्माजींना क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर रैनाजींचा शो हा एक उत्तम करियर ऑप्शन होता. त्यांच्यासारख्या शिव्या आणि लैंगिक कृतींचे उल्लेख दुसरं कोणीही करू शकणार नाही. वातावरण बदलेपर्यंत त्यांनी निवृत्त होऊच नये. आता चँपियन्स चषक जिंकला की पुढल्या वर्ल्डकपची तयारी. निवृत्तीचा अजिबात विचार करू नये.
Pages