India's got latent - चला निषेध नोंदवूया.

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 February, 2025 - 14:16

India's got latent - चला निषेध नोंदवूया.

India's got latent अश्या नावाचा एक कार्यक्रम येतो.
कुठे येतो कल्पना नाही. पण फेसबूक, इन्स्टा, युट्यूब वर शॉर्ट आणि रिल्स स्वरूपात याचे व्हिडिओ मुबलक बघावयास मिळतात.

Latent या शब्दाचा अर्थ काय मला माहीत नाही. मी आधी ते टॅलेंट समजूनच याचे काही एपिसोड बघितले. एक दोन फनी वाटले म्हणून अजून काही एपिसोड बघितले तसे वरचेवर दिसू लागले. आणि हळूहळू त्यांचा ठेवणीतील 18+ स्टॉक समोर येऊ लागला. मग मात्र मी न बघण्याची काळजी घेऊ लागलो कारण मोबाईल मुलांच्या हातात सुद्धा जातो.
तरीही अध्येमध्ये याचे व्हिडिओ नजरेस पडायचेच. आणि रिल बघने हे असे व्यसन आहे की जे समोर येईल ते झोप उडवून बघितले जाते.

गेल्या आठवड्यात मात्र हादरवून टाकणारे व्हिडिओ नजरेस पडले. मुले मुली एकत्र बसले आहेत आणि एकमेकांची खेचणे म्हणजे रोस्ट करणे या नावाखाली काहीही अश्लील शब्दफेक चालू आहे. म्हटले हे तर फार वाया गेलेले प्रकरण आहे. दूर राहिलेलेच चांगले.

आणि आज त्यांनी काहीतरी मोठे कांड केले, अश्लील टिप्पणीचा कळस गाठला ज्या बद्दल दिलगिरी व्यक्त करताना दिसले.

बातमी काय हे शोधले तर खरेच किळस वाटावे आणि युवा पिढीची चिंता वाटावी असे एकेक व्हिडिओ समोर आले.

चिंता यासाठी वाटली कारण ज्याने आज हे कांड केले त्या Ranveer Allahbadi याला नरेंद्र मोदींच्या हस्ते National creater award असा पुरस्कार मिळाला आहे.

चिंता यासाठी वाटली कारण हा शो जो चालवतो तो समय रैना नावाचा मुलगा अमिताभच्या कौन बनेगा करोडपती कार्यक्रमात आला होता आणि अमिताभ त्याच्या विनोद बुद्धीचे कौतुक करतl होता.

चिंता यासाठी वाटली कारण ही मुले एकीकडे आदर्श म्हणून समोर आणली जात आहेत तर तेच दुसरीकडे चुकीचा आदर्श ठेवत आहेत.

कोण बनेगा करोडपतीमध्ये या समय रैना सोबत एक तन्मय भट म्हणून मुलगा आलेला. जर मी चुकत नसेल तर यालाच मी कित्येक वर्षांपूर्वी एआयबी रोस्ट या कार्यक्रमात रणवीर सिंग, अर्जुन कपूर, करन जोहर या बॉलीवूड कलाकारांसोबत अश्लीलतेची निचतम पातळी गाठताना पाहिले होते.

आज India's got latent ची बातमी पाहिल्यावर तो कार्यक्रम आठवला कारण मी त्यावेळी देखील मायबोलीवर धागा काढला होता. आणि धक्का तेव्हा बसलेला जेव्हा काही लोकं त्या कार्यक्रमाचे कौतुक करत होते, तर कित्येक जण आपल्याला काय त्याचे म्हणत होते. उलट रुचत नाही तर आपण असले कार्यक्रम बघू नये हा उपाय सुचवत होते.

तो धागा इथे बघू शकता.
https://www.maayboli.com/node/52596

आज पुन्हा मायबोलीवर धागा काढला कारण आज "आपल्याला काय त्याचे?" म्हणावे अशी परिस्थिती उरली नाहीये. आज कॉलेज जाणारया प्रत्येक मुलाकडे मोबाईल असतो तर शाळेत जाणाऱ्या मुलांचे सुद्धा इंस्टाग्राम अकाऊंट असते. आणि त्यांनाही हे व्हिडिओ कुठल्याही सेन्सॉरशिपशिवाय बघायला उपलब्ध असतात.

मुळात लहान मुलांनीच काय पुरेशी अक्कल न आलेल्या कुठल्याही तरुणांनी असे व्हिडिओ बघू नयेत असे वाटते.
सोशल मीडियावर सर्रास दिसणाऱ्या या कंटेंटवर काही निर्बंध असावेत असे वाटते.
म्हणून आज संधी मिळाली आहे तर निषेध नोंदवतो!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जन्मताक्षणी मी आईला विचारलं
माते माझा जन्म श्लील की अश्लील
माता म्हणाली बाळा श्लील रे श्लील
मग मी धर्ममार्तंडांना म्हणालो
मार्तंडहो माझा जन्म श्लील की अश्लील
ते एकरवानं उद्गारले
अश्लील अश्लील
श्री चित्रगुप्त यांची पोस्ट मिसळपाव वरून.

१) जर मी स्वतःच एखाद्या वाह्यात गोष्टीचा प्रसार करत आहे असे जर तुम्ही म्हणत असाल तर सर्वप्रथम तुमचे अभिनंदन की तुम्ही ती गोष्ट वाह्यात आहे हे प्रामाणिकपणे मान्य केले.

२) त्या लिंक वर काय आहे हे मी नमूद केले आहे. म्हणजे लोकांकडे न बघण्याचा पर्याय आहे. पण मला तर तो पर्याय सुद्धा नाही मिळाला. कारण मी स्टँडअप कॉमेडी व्हिडिओ बघतो. ते सुद्धा कुठल्या पॉर्न साईटवर नाही तर फेसबुकवर बघतो. तरीही मला असले व्हिडिओ दिसू लागले. थोडक्यात असे व्हिडिओ पसरणे, पसरवणे, एखाद्याला इच्छा नसताना त्याच्या समोर येणे हे चूक आहे हे सुद्धा इथे मान्य झाले आहे.

ह्यात काय चूक? तुम्हाला वाह्यात वाटणारे कंटेन्ट पसरावे अगर न पसरावे हा सर्वस्वी तुमचा निर्णय नाहीचे. अलगोरिथम तुमच्या एकट्याच्या आवडीनिवडीला केटर का करतील? मला पण ऍनिमल हा सिनेमा अजिबात म्हणजे अजिबात आवडला नाही. त्यातले डायलॉग मला अत्यंत खराब वाटले. त्यातले अनेक प्रसंग आणि संकल्पना हिंसक प्रवृत्ती वाढवणाऱ्या वाटल्या. तेच कबीर सिंग सिनेमाचे. पण मला आवडले नाही म्हणजे ते येऊच नये असे कुठे असते?

सरांनी नेहमीच्या प्रमाणे गिरे तो भी टांग उपर पवित्रा घेतला आहे

सर अजिबात बेव सिरीज, सिनेमे बघत नसावेत असं दिसतंय

ॲनिमल adult movie होता.
सेन्सर बोर्डाने त्याला adult सर्टिफिकेट न देता पास केले असते तर ते चूक झाले असते की बरोबर?

कापूसकोंड्याच्या गोष्टीनंतर तेवढी रोचक गोष्ट आपल्या साहित्यात कुणीच लिहिली नाही. वेळ जात तसेल तर दुसरे काहीतरी लोकांना आता हवे आहे. कुणीतरी मनावर घेऊन दुसरी तशी रोचक गोष्ट लिहावी अशी मी या ठिकाणी विनंती करतो.

सर अजिबात बेव सिरीज, सिनेमे बघत नसावेत असं दिसतंय
>>>>>

कमी बघतो.
पण येस, पंचायत पाहिली आहे.
कोटा फॅक्टरी पाहिली आहे.
मामला लीगल है सुद्धा बघितली होती.
सर्व आवडल्या..
के ड्रामा छान असतात.. मुद्दाम बघत नाही पण बायको लावते तेव्हा बघणे होते. त्यामुळे नावे सांगता येणार नाही पण सगळ्याच छान असतात.

मोराल … चांगल्या कलाकृतीसाठी अश्लीलता गरजेची नसते.

वेब सिरीज चांगली व्हायला अश्लीलता गरजेची नाही.
..

डिमांड तसा सप्लाय.

तुम्ही जे मागणी कराल ते तुम्हाला मिळेल.
छावा चित्रपट चर्चेवर तेच सांगत होतो. लोकांना वीर पुरुष नाचताना खटकले नाही, तर ते तसेच दाखवणार. पण तेच आवाज उठवला तर बघा ते गाणे चित्रपटातून कट झाले.
आई बहिण बापाचा उद्धार करणाऱ्या घाणेरड्या जोक्सला नाही म्हणा ते सुद्धा नाहीसे होतील बघा.. निदान ते तुमच्या फेसबुक फीड मधून तरी नाहीसे होतील. इतर ठिकाणी ज्यांना आवडेल त्यांना खुशाल बघू द्या..

: )

अश्लीलता या शब्दाची स्थलकालव्यक्तीनिरपेक्ष व्याख्या करता येणे अशक्य आहे. एकाला अश्लील वाटणारे दुसर्‍याला वाटेलच असे नाही. मग रेघ कुठे ओढणार ? आणी enforce कशी करणार ? मीही यू ट्यूब वर कॉमेडी पहतो, मला हास्य जत्रा , हवा येऊ द्या वगैरे दिसतात. भाऊ कदम यांचे नऊ वरी साडी नेसून केलेले 'शांताबाई' मला प्रामाणिक पणे अश्लील वाटते. पण मी स्किप करून पुढे जातो. निषेध, एफ आय आर , वगैरे जरूरीचे नाही.

तुमचीच दोन वाक्ये

१) एकाला अश्लील वाटणारे दुसर्‍याला वाटेलच असे नाही

२) पण मी स्किप करून पुढे जातो. निषेध, एफ आय आर , वगैरे जरूरीचे नाही.

यावरून पुढे आता असा विचार करून पहा.

३) एखाद्याला निषेध करावासा वाटेल दुसऱ्याला वाटेलच असे नाही.

तुम्हाला निषेध करावासा वाटत नसेल तुमची मर्जी. इतरांना करू द्या. त्याच्या निषेधाचा हक्क का मारत आहात?

क्रिकेटपटूंबद्दलचे दुहेरी मानदंड पहा.

कॉफी विथ करण मध्ये सेक्सिस्ट वक्तव्ये केली म्हणून हार्दिक पांड्या आणि के एल राहुल यांना निलंबित केले आणि दंड ठोठावला. हे मैदानाबाहेरचे म्हणाल तर प्रेक्षकांना मधले बोट दाखवले म्हणून विराट कोहलीला सामना खेळण्याच्या मोबदल्यातील ५०% रक्कम दंड म्हणून लावली.
मात्र रोहित शर्मा मैदानात आपल्या सहखेळाडूंना माँ xx दूंगा सबका असं ऐकवलं. त्याबद्दल काही नाही. खेळाचं मैदान हे त्या खेळाडूंसाठी कामाची जागा - वर्क प्लेस आहे.

हरभजन सिंगने अँड्र्य सिमंडसला आईवरून शिवी दिली. ऑस्ट्रेलियन्सनी त्याचं मंकीगेट केलं. पण सचिनने सुद्धा हरभजन जे बोलला ते उत्तर भारतात सामान्य आहे, असं म्हटलं.

भरत, क्रिकेटचा वेगळा धागा काढूया का?
त्या दिवशी क्रिकेट धाग्यावर तुम्ही रोहीत शर्मा बद्दल जी बॉडी शेमिंग कॉमेंट केली त्याबद्दल सुद्धा मला निषेध नोंदवण्याचा आहे.

>>> , क्रिकेटचा वेगळा धागा काढूया का?

धागे भागीदारीत काढण्याची सोय उपलब्ध झाल्याचे माहीत नव्हते.

>>> बॉडी शेमिंग

अरे? हे वाचले नाही.

बॉडी शेमिंग
अरे? हे वाचले नाही.
>>>>>>

शर्माजींची पी आर कंपनी शर्माजींच्या गोबर्‍या गालांचे गालगुच्चे घ्यायला आणि थुलथुलीत पोटाला चिमटे काढायला तिकिटं लावून पैसे कमवू शकतील
>>>>>

अशी पोस्ट होती त्यांची..
शर्मा माझा आवडता आहे आणि त्यांचा कदाचित नावडता आहे म्हणून वर देखील संबंध नसताना मुद्दाम त्याला टारगेट करून पोस्ट येत आहेत.

आता यावर सुद्धा तोच मुद्दा आणतील - मित्रांच्या ग्रूप मध्ये जो जाडा असतो त्याची याहून घाण शब्दात खेचली जाते वगैरे वगैरे...
पण सॉरी. हे समर्थन मान्य नाही.

हा विषय खूप संवेदनशील आहे आणि यावर चर्चा करणे सर्व मंचांमध्ये अत्यंत महत्त्वाचे आणि गरजेचे होते. ऋन्मेष ने हा विषय या मंचावर लिहिण्यासाठी निवडला, याबद्दल मी त्याचे आभार मानतो.

पाहा, तुम्ही हे ट्विटरवर लिहू शकता.
तुम्ही हे फेसबुकवर लिहू शकता.
तुम्ही हे वर्तमानपत्रांत लिहू शकता.

मला खात्री आहे की समय रैना मायबोलीवर आहे. तो नक्की इथे आहे.
मलाही खात्री आहे की रणवीर अहलुवालिया देखील मायबोलीवर आहे.

आता त्यांनी हे वाचले आहे, त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की त्यांना आता याची जाणीव होईल. ते कधीही असं पुन्हा करणार नाहीत. मला पूर्ण विश्वास आहे की ते हा धागा वाचत आहेत.

Rmd तुमच्याकडे आष्ट्याचा कसा काय? पुण्याहून लांब आहे ते. >>> कोण जाणे बै म्हातारा तिकडून का आला! शाळेतल्या कोणाकडे तरी आला असेल Proud

पुन्हा एकदा सांगतो:

फेसबुक इंस्टा youtube तुम्हाला तेच कंटेंट दाखवतात जे तुम्ही आधी पाहिलं असेल. किती तो कांगावा?

आता तर थेट सुप्रीम कोर्टातही सुनावणी सुरू झाली व जजेस मी रणवीर ला 'खडे बोल' सुनावले.
हा हंत हंत, ३७० सारखा अत्यंत महत्वाचा खटला अजून सुनावणीलाही आलेला नाही. उमर खालीदच्या बेलचीही सुनावणी झाली नाही, पण या फडतूस विषयावर मात्र सुप्रीम कोर्ट, तीन तीन मुख्यमंत्री, तीन राज्याचे पोलीस, मेडिया अगदी २४ बाय ७ राबताहेत.

सोमीवर वाचलेले दोन शेरे आवडले.
१ चीन डीपसीक, फिफ्थ जनरेशन फायटर प्लेन , बुलेट ट्रेन वगैरे करतोय व आपण गेले आठ दिवस एका कॉमेडियन ने केलेल्या जोक साठी छाती पिटत आहोत.
२ इतका संताप रोड वरील खड्डे, प्रदुषण, लाचलुचपत वगैरे बाबत दाखवला असता तर ?

माझा प्रतिसाद १४४ वा, आजकाल या नंबर ला फार महत्व आले आहे Happy

विकु तुम्ही “स्वतःच्या देशात कॉन्झर्वेटिव्ह आणि दुसर्‍याच्या देशात लिबरल कॅटेगरीत” आलात त्याबद्दल अभिनन्दन.

इतका संताप रोड वरील खड्डे, प्रदुषण, लाचलुचपत वगैरे बाबत दाखवला असता तर ????

विकु - तुम्ही विचारलेल्या प्रश्नात ग्लॅमर आहे का? यात ग्लॅमर असतं तर सरांनी नक्की धागा काढला असता
यांना सतत काहीतरी विषय चघळायला हवा असतो, जितका वादग्रस्त सनसनाटी तितका उत्तम

..

१. चीन डीपसीक, फिफ्थ जनरेशन फायटर प्लेन , बुलेट ट्रेन वगैरे करतोय व आपण गेले आठ दिवस एका कॉमेडियन ने केलेल्या जोक साठी छाती पिटत आहोत.

२. मायबोलीवर चिकवा धाग्यावर चित्रपटांना नावे ठेवत आहोत.

३. चित्रपटाचा शेवट मला असा नाही तर तसाच हवा होता यावर गहन चर्चा करत आहोत.

४. क्रिकेटच्या धाग्यावर चॅम्पियन ट्रॉफी कोण जिंकणार याची चिंता करत आहोत.

५. खाऊगल्ली धाग्यावर आज काय खाल्ले याचे कौतुकाने फोटो शेअर करत आहोत.

६. राजकारणाच्या धाग्यावर एकमेकांवर शाब्दिक चिखल फेक करत आहोत.

७. कथा कविता गझला फुकट मिळताहेत म्हणून वाचण्यात आणि लिहिण्यात मग्न आहोत.

८. वेबसिरीज, मालिका, पिक्चर, शॉर्ट फिल्म, रिपीट मोडवर गाणी, मुलाखती आणि काय काय टीव्ही मोबाईलवर जे मिळेल ते बघण्यात आणि नंतर इथे ते लिहून चार लोकांना सांगण्यात वेळ वाया घालवत आहोत..

९. अरे हो दारू.. ती राहिलीच. स्वतःही प्राशन करत आहोत आणि इतरांनाही उद्युक्त करत आहोत.

१० . ........ अजून प्रामाणिकपणे भर टाका लोकहो... आज देशाची जी अवस्था आहे त्याला आपण सारेच जबाबदार आहोत. पुढे या आणि जबाबदारी घ्या.

सर 11 वा मुद्दा राहिला

अश्लील आणि वादग्रस्त व्हिडिओ ची लिंक मायबोलीवर शेअर करून इतरांना बघायला उद्युक्त करत आहोत

ओके
पोस्ट संपादित करायची वेळ संपली. नवीन लिहून त्यात हा मुद्दा घेतो

Pages