India's got latent - चला निषेध नोंदवूया.

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 February, 2025 - 14:16

India's got latent - चला निषेध नोंदवूया.

India's got latent अश्या नावाचा एक कार्यक्रम येतो.
कुठे येतो कल्पना नाही. पण फेसबूक, इन्स्टा, युट्यूब वर शॉर्ट आणि रिल्स स्वरूपात याचे व्हिडिओ मुबलक बघावयास मिळतात.

Latent या शब्दाचा अर्थ काय मला माहीत नाही. मी आधी ते टॅलेंट समजूनच याचे काही एपिसोड बघितले. एक दोन फनी वाटले म्हणून अजून काही एपिसोड बघितले तसे वरचेवर दिसू लागले. आणि हळूहळू त्यांचा ठेवणीतील 18+ स्टॉक समोर येऊ लागला. मग मात्र मी न बघण्याची काळजी घेऊ लागलो कारण मोबाईल मुलांच्या हातात सुद्धा जातो.
तरीही अध्येमध्ये याचे व्हिडिओ नजरेस पडायचेच. आणि रिल बघने हे असे व्यसन आहे की जे समोर येईल ते झोप उडवून बघितले जाते.

गेल्या आठवड्यात मात्र हादरवून टाकणारे व्हिडिओ नजरेस पडले. मुले मुली एकत्र बसले आहेत आणि एकमेकांची खेचणे म्हणजे रोस्ट करणे या नावाखाली काहीही अश्लील शब्दफेक चालू आहे. म्हटले हे तर फार वाया गेलेले प्रकरण आहे. दूर राहिलेलेच चांगले.

आणि आज त्यांनी काहीतरी मोठे कांड केले, अश्लील टिप्पणीचा कळस गाठला ज्या बद्दल दिलगिरी व्यक्त करताना दिसले.

बातमी काय हे शोधले तर खरेच किळस वाटावे आणि युवा पिढीची चिंता वाटावी असे एकेक व्हिडिओ समोर आले.

चिंता यासाठी वाटली कारण ज्याने आज हे कांड केले त्या Ranveer Allahbadi याला नरेंद्र मोदींच्या हस्ते National creater award असा पुरस्कार मिळाला आहे.

चिंता यासाठी वाटली कारण हा शो जो चालवतो तो समय रैना नावाचा मुलगा अमिताभच्या कौन बनेगा करोडपती कार्यक्रमात आला होता आणि अमिताभ त्याच्या विनोद बुद्धीचे कौतुक करतl होता.

चिंता यासाठी वाटली कारण ही मुले एकीकडे आदर्श म्हणून समोर आणली जात आहेत तर तेच दुसरीकडे चुकीचा आदर्श ठेवत आहेत.

कोण बनेगा करोडपतीमध्ये या समय रैना सोबत एक तन्मय भट म्हणून मुलगा आलेला. जर मी चुकत नसेल तर यालाच मी कित्येक वर्षांपूर्वी एआयबी रोस्ट या कार्यक्रमात रणवीर सिंग, अर्जुन कपूर, करन जोहर या बॉलीवूड कलाकारांसोबत अश्लीलतेची निचतम पातळी गाठताना पाहिले होते.

आज India's got latent ची बातमी पाहिल्यावर तो कार्यक्रम आठवला कारण मी त्यावेळी देखील मायबोलीवर धागा काढला होता. आणि धक्का तेव्हा बसलेला जेव्हा काही लोकं त्या कार्यक्रमाचे कौतुक करत होते, तर कित्येक जण आपल्याला काय त्याचे म्हणत होते. उलट रुचत नाही तर आपण असले कार्यक्रम बघू नये हा उपाय सुचवत होते.

तो धागा इथे बघू शकता.
https://www.maayboli.com/node/52596

आज पुन्हा मायबोलीवर धागा काढला कारण आज "आपल्याला काय त्याचे?" म्हणावे अशी परिस्थिती उरली नाहीये. आज कॉलेज जाणारया प्रत्येक मुलाकडे मोबाईल असतो तर शाळेत जाणाऱ्या मुलांचे सुद्धा इंस्टाग्राम अकाऊंट असते. आणि त्यांनाही हे व्हिडिओ कुठल्याही सेन्सॉरशिपशिवाय बघायला उपलब्ध असतात.

मुळात लहान मुलांनीच काय पुरेशी अक्कल न आलेल्या कुठल्याही तरुणांनी असे व्हिडिओ बघू नयेत असे वाटते.
सोशल मीडियावर सर्रास दिसणाऱ्या या कंटेंटवर काही निर्बंध असावेत असे वाटते.
म्हणून आज संधी मिळाली आहे तर निषेध नोंदवतो!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ पोर्न व्हिडिओ

मुले योग्य वयात पॉर्न बघत असतील तर त्यात चिंतेचे काही कारण नाही.
चिंतेचे कारण असते ते समज येण्याआधी बघणे आणि त्यातून अर्धवट माहिती मिळणे, गैरसमज वाढीस लागणे, चुकीच्या फॅन्टसी तयार होणे किंवा न्यूनगंड निर्माण होणे, वगैरे वगैरे..
त्यामुळे त्यांना योग्य त्या वयात लैंगिक शिक्षण द्यावे याची जबाबदारी पालकांची असते ती त्यांनी जरूर उचलावी.

मी यावर स्वतंत्र धागा काढतो.
इथे पॉर्नचा विषय मिक्स करू नका.

@ कुंभमेळा, भ्रष्टाचार, वाढती असहिष्णुता, वाढते अपघात, धनदांडग्यांचा माज, सडके राजकारण, चोरी, लूटमार, बलात्कार, आत्महत्या आणि देशातील इतर कैक समस्या..

मला प्लीज सर्वानुमते प्रायोरिटी ठरवून लिस्ट करून द्या. मी स्वतंत्र धागे काढतो प्रत्येकावर. याआधीही काढले आहेत. मी एकटा देश बदलू शकत नाही याची कल्पना आहे पण जमेल तितके करेनच...

@ माझ्यावर झालेली वैयक्तिक टीका, आणि माझे काढलेले संस्कार!
>>>>>

या धाग्यापुरते इग्नोर करत आहे. पुढे मागे स्वतंत्र धाग्यावर उत्तर द्यायला आवडेल Happy

“लहान मुले” फेसबूक व इन्स्टा वर का आहेत? मोबाईलवर गेम्स का खेळत आहेत?

एवढ्या लहान वयात हातात मोबाईल का आहेत?

अल्गोरिदम म्हणजे काय?

फेसबुक insta youtube तुम्हाला तेच दाखवते ज्या प्रकारचा content तुम्ही बघत असता. शिवाय रैनाचा channel paid आहे जिथे हा शो होता. वट्ट 59 रुपये द्यावे लागतात बघायला

1.What he said was disgusting
2.But that doesn’t explain why Sanghis who used to idolise him have turned viciously against him
3.Is it to manufacture outrage to make it easier to introduce censorship of the web?

वीर संघवी

लहान मुले” फेसबूक व इन्स्टा वर का आहेत?
>>>>

The age limit for Facebook in India is 13 years old

तेरा वर्षांच्या मुलांनी असले व्हिडिओ बघणे मला तरी योग्य वाटत नाही.

इथे कोणाला हे योग्य वाटते का?
प्रामाणिकपणे सांगा... विरोधाला विरोध नको.

भरत यांनी दिलेला मडक्याचा लेख व वीर संघवींची विधाने १००% पटली.
हा कृत्रीम गदारोळ मागच्या दाराने सेन्सॉरशिप आणायचा प्रयत्न तर नव्हे ना ?
( राहूल सोलापूरकर काय बोलले ? आमचे गाववाले पडले ना ते)

आता त्या मुलीच्या मागे लागले सारे चॅनेल वाली गिधाडे ( मागे असेच रिया च्या मागे लागले होते).

BREAKING | In the fallout of YouTuber Ranveer Allahbadia's 'India's Got Latent' issue, Parliament panel on IT may write to Centre on stricter digital laws

अच्छा ! हा प्लॅन होता तर !

तुम्ही लोकांनी कधी अस्सल तमाशा, गण गवळण, बतावणी वगैरे पाहिली नाही का ?

असले पांचट व्हिडिओ पाहून मुलांवर होणारे तथाकथित वाईट संस्कार आणी असलीच भाषा वापरण्यार्‍या लोकांना मिळणारी अमदारकी व पद्मभूषण हे पाहून होणारे संस्कार यातले दुसरे मला १०० पट चिंताजनक वाटते.

>>मी एखाद्या पोर्न साईट वर गेलो तर यापेक्षाही दर्जाहीन व्हिडिओज नक्की मिळतील. तारतम्य महत्वाचे.<<
स्पिकिंग ऑफ तारतम्य. ऋन्म्याने लिंक्स माबोवर दिल्या, जिचा ऑडियंस लिमिटेड आहे. पण बाकि मिडियाने तर "ते" वाक्य इन वर्बेटम/ट्रांस्लेट करुन लिहिलेलं आहे. आता बोला...

The age limit for Facebook in India is 13 years old>>>>

समय रैनाने व्हिडीओ फेसबूकवर टाकला होता का? Insta वर टाकला होता का? मी दोन्हीवर नाही त्यामुळे कल्पना नाही.

Adult content बद्दल युट्यूब ची पॅालिसी काय आहे? १३ वर्षाच्या मुलांनी युट्यूब वापरण्याबद्दल काय पॅालिसी आहे? वाचलीत का?

समय रैनाने व्हिडीओ फेसबूकवर टाकला होता का? Insta वर टाकला होता का?
>>>>>>>

तुम्ही समय रैनाचा बचाव करत आहात. पण मी मुळात समय रैनाला टारगेट करत नसून ज्या साईट मुलांना एक्सेसिबल आहेत तिथे मला हे व्हिडिओ नको आहेत. ही अपेक्षा चुकीची आहे का?
फेसबुकवर व्हिडिओ समय रैनाने स्वतः किंवा त्याच्या टीमने पब्लिसिटीसाठी टाकला की आणखी कोणी उचलून टाकला याची कल्पना नाही. पण ते फेसबुकवर येत आहेत हे चिंतेचे कारण नाही का?

दुसरे म्हणजे मी लेखात लिहिले आहे तसे अश्यांना आदर्श/हिरो बनवले जात आहे ते सुद्धा मला चिंतेचे कारण वाटत आहे. इथे बरेच जण यांचा बचाव करायला येत आहेत पण प्लीज तसे करू नका. आज हे जे करत आहेत ते उद्या आणखीन दहा जण करतील. आणि ते लोक व्हिडिओ डायरेक्ट फेसबुक वर टाकतील कारण फेसबुक वर असे व्हिडिओ चालतात.

> मी लेखात लिहिले आहे तसे अश्यांना आदर्श/हिरो बनवले जात आहे ते सुद्धा मला चिंतेचे कारण वाटत आहे.
कुणी केले आहे ? कैच्याकै

कालच्या सामन्यात एकच धाव झाली. चँपियन्स चषक स्पर्धा सुरू व्हायला अवकाश आहे. तोवर टाइमपास नको का?

आपण सगळे मूर्ख आहोतच आयता टाइमपास करून द्यायला.

अतरंगी तुमची पोस्ट >> समय रैनाने व्हिडीओ फेसबूकवर टाकला होता का? >>> हि मला समय रैनाचा बचाव करायचा प्रयत्न वाटला म्हणून तसे म्हटले. तसे नसेल तर उत्तमच आहे. कारण मी कुठल्या कॉमेडी कलाकाराला नाही तर हे जे वाह्यात प्रकार वाढत आहेत त्याला विरोध करत आहे.

आपल्या काळात आपण टीव्ही बघायचो आता मुले मोबाईल बघतात. फेसबुक १३ वय सुद्धा सोडा, मला ज्युनिअर कॉलेज म्हणजे १६-१८ वर्षे वयाच्या मुलानी सुद्धा हे व्हिडिओ बघणे नको आहे. आणि त्या मुलाना मोबाईल का द्यायचा नाही? आपल्या लहानपणी जर टीव्हीवर अश्या कार्यक्रमांचे प्रक्षेपण सुरू करून टीव्ही बघू नका असे म्हटले असते तर विचार करा आपले बालपण कसे असते?

कुणी केले आहे ? कैच्याकै
>>>>

लेखात दोन उल्लेख आहेत ना..
मोदींनी दिलेला पुरस्कार, अमिताभ कौन बनेगा करोडपती कार्यक्रमात स्पेशल गेस्ट बोलावून कौतुक..
इतर सुद्धा स्तुती सुमनांच्या बातम्या या निमित्ताने वाचनात आल्या. पण शोध घेतले असता तितकी भारी व्यक्तिमत्वे यांची वाटली नाहीत.

पॉर्न बघायला वयाची अट असते? मुलांच्या हातात मोबाईल आहे तर ती आरामात पॉर्न बघू शकतात, असंख्य साईट्स आहेत पॉर्न च्या जिथं कुठेही तुमच्या वयाचा दाखला मागितला जात नाही

सरांना इतकीच काळजी आहे मुलांनी भलते सलते बघू नये तर मुलांच्या हाती मोबाईल देऊ नये, अर्थात तरीही मुले त्याना जे बघायसचं ते बघातातच

सरांचं वय झाल्यामुळे बहुदा त्यांना आता काळजी वाटायला लागली असावी
हे सर्व त्यांनी तरुणपणात अभिव्यक्ती स्वातंत्र्य कसे आवश्यक यावर धागा काढून मांडले असते

थोडक्यात काय सरांनी टीआरपी मिळवला, वर पुन्हा त्या व्हिडिओच्या लिंक देऊन तिथले व्युज पण वाढवले

अश्लील व्हिडिओ चा प्रसार केल्याबद्दल यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते का?

स्पोर्ट्स चॅनेल्स बघायला वयाचं बंधन असतं का? क्रिकेट सामन्यांच्या प्रक्षेपणात खेळाडू मैदानात जे बोलतात ते स्टंप माइक पकडतो आणि प्रेक्षकांनाही ऐकवतो. रोहित शर्मा आपल्या सहखेळाडूंच्या आयाबहिणींच्या जननेंद्रियांचा उल्लेख करतो. ते आपापल्या आईबहिणीसोबत रणवीर बोलला त्या कृती करतात, अशा अर्थाचा सामासिक शब्द वापरतो. किंवा मी तुमच्या सगळ्यांच्या आयांसोबत अमुक एक गोष्ट करेन असं सुनवतो.
ते ऐकणार्‍या सहखेळाडूंना काही वाटत नसेल असं समजू. त्या खेळाडूंच्या आयाबहिणी ते सामने पाहत असतील, तर त्यांना कसं वाटत असेल? घरोघरी टीव्ही वा अन्य उपकरणावर मॅच पाहणार्‍या बापांच्या मुलांच्या कानांवर हे शब्द पडले तर त्यांना प्रश्न पडत असतील का?

रोहित शर्माने असं बोलणं योग्य की अयोग्य? मैदानातल्या इतर १४ जणांना आणि स्टंप माइकवरून प्रेक्षकांना ते ऐकू जातं याची त्याला कल्पना नसेल? की त्याला या शब्दांचे अर्थ माहीत नसतील? नुकताच तो " मैं दो बच्चों का बाप हूं यार" असं एका मुलाखतीत म्हणाला. त्याच्या मुलांनी हे असलं ऐकलेलं त्याला चालतं?

रोहित शर्मावर कायदेशीर कारवाई का नको?

या प्रश्नांच्या उत्तरात मजेदार कोलांट्या उड्या गंभीरपणाचा आव आणत मारल्या जातील. कमॉन! बघायला वाचायला तयार व्हा.

@ आशूचॅम्प
तुम्ही या प्रकाराचे समर्थन करत आहात हे बघून धक्का बसला!
सिनेमात इतिहास चुकीचा दाखवला गेला तर तुम्ही त्याचा निषेध करता आणि इथे निषेध करणाऱ्यांना प्रॉब्लेम असल्यास त्यांनाच उलटे मग तुम्ही बघू नका सुनावत आहात..
आणि माझी पॉर्न संदर्भात पोस्ट वाचा. तो मुद्दा आधीच बाद केला आहे.
असो,
ज्याचे त्याचे मत..............
आपल्या मताचा आदर आहे!

@ भरत,
कोणी ड्रग्स ला विरोध केला तर चहा सुद्धा व्यसन आहे असे सांगण्यासारखा मुद्दा आहे तुमचा.
खेळाडूंनी क्रिकेट खेळताना दिलेल्या शिव्या आणि या वाह्यात प्रकाराची तुलना तुम्ही फक्त नेहमी प्रमाणे माझ्याशी वादाला वाद घालण्यासाठी करत आहात त्यामुळे..........
नो कॉमेंट्स!

रोहितने वापरलेल्या लिंगवाचक आणि लैंगिक कृतीवाचक शब्दांचं एवढंच समर्थन ?

रोहित शर्मा फोनवर बोलताना सुद्धा इतक्या आणि अशाच शिव्या देतो , असे त्यानेच टीव्हीवर सांगितले आहे. त्या शिव्या आणि बीअर बायसेप्सने वापरलेले शब्द यांत काय फरक आहे?

---
वरच्या लेखातली आणि प्रतिसादांतली कळकळ बीअर बायसेप्सच्या पॉडकास्टमधल्या एक्स्प्रेशन्स एवढीच फेक आहे.

भरत>>_+१
पण मी लिहिलेला प्रतिसाद त्या कॅटेगीरीतला नाहीये बरका.

तुम्ही या प्रकाराचे समर्थन करत आहात हे बघून धक्का बसला>>>

सर तुम्ही जास्तीचे वाचता का? हे सगळं बरोब्बर आहे, असंच पाहिजे, किंवा याला विरोध करू नका असं लिहिलेलं एकतरी वाक्य दाखवा मला

मी तुमचा दुटप्पीपणा लिहिलाय की तरुणपणात तुम्ही हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून धागा काढला असतात किंवा कसाही जेणेकरून टीआरपी मिळावा

ज्यांनी तो व्हिडीओ बघितला नाही त्यानाही लिंक देऊन बघायला प्रोत्साहन दिलेत, एकप्रकारे त्याचा प्रसार केलात

आणि हेच तुम्ही दारू च्या धाग्यावर रेसिपी टाकली की विरोध करता

कधी कधी आरशात पण बघत जावा

ओके

वरच्या लेखातली आणि प्रतिसादांतली कळकळ बीअर बायसेप्सच्या पॉडकास्टमधल्या एक्स्प्रेशन्स एवढीच फेक आहे. <<
फक्त वरच्या लेखात..?
सगळ्या ठिकाणी तेच आहे..
खरं तर बीअर बायसेप्स आणि तत्सम सर्व TRP साठीच जे काही करायचं ते करतात. इथे दुसरं काय आहे ?

ओके

निषेध नोंदवा की. फुकट आहे आणि तुमचा हक्क पण आहे.

त्यापुढे fir आणि निर्बंध घालण्याची भाषा मात्र एन्टरटेन होणार नाही.

बाकी मला इतके काही चुकीचे वाटले नाही. अलाहाबादिया अन रैना दोघेही भंपक आहेत असे पूर्वीपासून मत आहे. पण उगाच लहानश्या जोक वरून इतके भोकाड पसरलेले पाहून मजा वाटली.

का?
Fir नोंदवणे आणि सेन्सरशिपची मागणी करणे हा सुद्धा कायद्याने दिलेला हक्क आहे ना?
कायदा हातात घेऊन कोणी त्यांचा शो बंद पाडत आहे का इथे?

जोक साठी fir नोंदवून पोलिसांकडून छळ करणे हा कायद्याने हक्क द्यायलाच नको. पोलिसांनी असल्या भंपक fir नोंदवू नयेत, नोंदवण्याचा हक्कच नसावा.

सध्या कायद्याने fir नोंदवण्याचे हक्क आहेत की नाही?

Fir नोंदवली की पोलीस कसलीही तपासणी न करता नुसता छळ करतात ही पोलिसांची बदनामी आहे.

जोकसाठी "तपासणी" हा छळच आहे. फिजिकल टॉर्चर नसले तरी पोलीस स्टेशनला खेटे घालायला लावणे इत्यादी.

काय डोंबलाची तपासणी करणार म्हणे?

कायद्याने हक्क असला म्हणजे ती गोष्ट चांगली होतं नाही. वाईट कायदे असतात. जोक साठी पोलिसांनी तपास करणे हाच एक जोक आणि छळ आहे.

सेन्सरशिप पण कोणाला इजा होत असेल तर ठीक. इथे कुणाला काय इजा झाली? स्वतः शोधून शोधून लोकं क्लिप बघतात आणि दंगा करतात. खाजवून खरूज नुसता.

Pages