India's got latent - चला निषेध नोंदवूया.
India's got latent अश्या नावाचा एक कार्यक्रम येतो.
कुठे येतो कल्पना नाही. पण फेसबूक, इन्स्टा, युट्यूब वर शॉर्ट आणि रिल्स स्वरूपात याचे व्हिडिओ मुबलक बघावयास मिळतात.
Latent या शब्दाचा अर्थ काय मला माहीत नाही. मी आधी ते टॅलेंट समजूनच याचे काही एपिसोड बघितले. एक दोन फनी वाटले म्हणून अजून काही एपिसोड बघितले तसे वरचेवर दिसू लागले. आणि हळूहळू त्यांचा ठेवणीतील 18+ स्टॉक समोर येऊ लागला. मग मात्र मी न बघण्याची काळजी घेऊ लागलो कारण मोबाईल मुलांच्या हातात सुद्धा जातो.
तरीही अध्येमध्ये याचे व्हिडिओ नजरेस पडायचेच. आणि रिल बघने हे असे व्यसन आहे की जे समोर येईल ते झोप उडवून बघितले जाते.
गेल्या आठवड्यात मात्र हादरवून टाकणारे व्हिडिओ नजरेस पडले. मुले मुली एकत्र बसले आहेत आणि एकमेकांची खेचणे म्हणजे रोस्ट करणे या नावाखाली काहीही अश्लील शब्दफेक चालू आहे. म्हटले हे तर फार वाया गेलेले प्रकरण आहे. दूर राहिलेलेच चांगले.
आणि आज त्यांनी काहीतरी मोठे कांड केले, अश्लील टिप्पणीचा कळस गाठला ज्या बद्दल दिलगिरी व्यक्त करताना दिसले.
बातमी काय हे शोधले तर खरेच किळस वाटावे आणि युवा पिढीची चिंता वाटावी असे एकेक व्हिडिओ समोर आले.
चिंता यासाठी वाटली कारण ज्याने आज हे कांड केले त्या Ranveer Allahbadi याला नरेंद्र मोदींच्या हस्ते National creater award असा पुरस्कार मिळाला आहे.
चिंता यासाठी वाटली कारण हा शो जो चालवतो तो समय रैना नावाचा मुलगा अमिताभच्या कौन बनेगा करोडपती कार्यक्रमात आला होता आणि अमिताभ त्याच्या विनोद बुद्धीचे कौतुक करतl होता.
चिंता यासाठी वाटली कारण ही मुले एकीकडे आदर्श म्हणून समोर आणली जात आहेत तर तेच दुसरीकडे चुकीचा आदर्श ठेवत आहेत.
कोण बनेगा करोडपतीमध्ये या समय रैना सोबत एक तन्मय भट म्हणून मुलगा आलेला. जर मी चुकत नसेल तर यालाच मी कित्येक वर्षांपूर्वी एआयबी रोस्ट या कार्यक्रमात रणवीर सिंग, अर्जुन कपूर, करन जोहर या बॉलीवूड कलाकारांसोबत अश्लीलतेची निचतम पातळी गाठताना पाहिले होते.
आज India's got latent ची बातमी पाहिल्यावर तो कार्यक्रम आठवला कारण मी त्यावेळी देखील मायबोलीवर धागा काढला होता. आणि धक्का तेव्हा बसलेला जेव्हा काही लोकं त्या कार्यक्रमाचे कौतुक करत होते, तर कित्येक जण आपल्याला काय त्याचे म्हणत होते. उलट रुचत नाही तर आपण असले कार्यक्रम बघू नये हा उपाय सुचवत होते.
तो धागा इथे बघू शकता.
https://www.maayboli.com/node/52596
आज पुन्हा मायबोलीवर धागा काढला कारण आज "आपल्याला काय त्याचे?" म्हणावे अशी परिस्थिती उरली नाहीये. आज कॉलेज जाणारया प्रत्येक मुलाकडे मोबाईल असतो तर शाळेत जाणाऱ्या मुलांचे सुद्धा इंस्टाग्राम अकाऊंट असते. आणि त्यांनाही हे व्हिडिओ कुठल्याही सेन्सॉरशिपशिवाय बघायला उपलब्ध असतात.
मुळात लहान मुलांनीच काय पुरेशी अक्कल न आलेल्या कुठल्याही तरुणांनी असे व्हिडिओ बघू नयेत असे वाटते.
सोशल मीडियावर सर्रास दिसणाऱ्या या कंटेंटवर काही निर्बंध असावेत असे वाटते.
म्हणून आज संधी मिळाली आहे तर निषेध नोंदवतो!
काही प्रतिसाद पाहून असे वाटते
काही प्रतिसाद पाहून असे वाटते त्यांनी तो व्हिडिओ पाहिला नाही.
किंवा तेवढाच एक व्हिडिओ बघून ती एकच भूल वाटत आहे.
किंवा रोस्टिंग म्हणजे नुसती शिवीगाळ, खेचणे इतकेच वाटत आहे जे त्यांच्यामते नाक्यावरची मुले सुद्धा करतात.
थोड्यावेळाने काही व्हिडिओ लिंक शोधून देतो..
ते महिला आयोगाने या तिघांना
ते महिला आयोगाने या तिघांना काही नोटीस बजावली की नाही????
की त्यांच्या लॉजिक नुसार एखाद्या मुलीला / महिलेला 'टिकली लाव' असे म्हटल्याने महिलेचा अपमान होतो पण महिलांच्या लैंगिक अवयवावर टिप्पणी केल्याने महिलांचा अपमान होत नाही, असे काही आहे का?
>> "आपल्याला काय त्याचे?"
>> "आपल्याला काय त्याचे?" म्हणावे अशी परिस्थिती उरली नाहीये
म्हणजे नक्की काय. हा भाग मी पहिला आहे. ते कमेंट चूक आणि अस्थायी आहेच पण इतका गदारोळ करण्याइतपत त्यात नक्कीच काही नव्हते. इंटरनेट अथांग महासागर आहे ज्यावर सर्व प्रकारचे कन्टेन्ट उपलब्ध आहे. शो मधले कमेंट PG वाटावे असे कन्टेन्ट हाताच्या बोटावर इंटरनेट उपलब्ध झाल्यापासून आहे. वयात आलेली मुलमुली हा कन्टेन्ट बघत नसतील अशी भाबडी समज असणारे पालक ग्रेटच म्हणावे लागतील. तेही जाऊ दे, आपले वयात येण्याचे दिवस आठवावे. जर का आज आपण त्यातल्या त्यात बर्या मार्गावर असू तर ही पिढी देखील एवेन्चुली येईलच बर्या मार्गावर.
त्या शोचा फॉर्मॅटच शिव्या रोस्ट किंवा कमरेखालचे विनोद हा आहे. त्यानी आस्था चॅनेल वर तो शो दाखवलेला नाहीय. उलट इतका गदारोळ करून जे लोक हा शो इतरवेळी पाहणार नाहीत त्यांनी देखील पाहून शोचे व्युज आणि परिणामी समय रैना चा रेवेन्यू देखील वाढवला आहे. त्या समय रैना ने केबीसी मध्ये येउन शिव्या दिल्या नाहीत कारण केबीसी चा फॉरमॅट वेगळा आहे. तिकडे देखील त्याचे रेखा वद्दलचे कमेंट अस्थायी होते. ते प्रदर्शित न करण्याचा ऑप्शान चॅनेल कडे होता पण त्यांनी तसे केले नाही. ती क्लिप देखील पुन्हा पुन्हा पाहून इतर वेळी न पाहणार्या लोकांनी तो एपिसोड पाहिला असेल आणि केबीसीचे व्युज वाढवले असतील. शेवटी सगळा बिजनेस आहे.
थोडक्यात आता अशी परिस्थिती आलेली आहे की आपल्या आवडीनुसार अमाप कन्टेन्ट ऑनलाइन उपलब्ध आहे. त्यानुसार तो पाहावा आणि तुम्हाला न आवडणारा कन्टेन्ट दुसरा पाहतो म्हणून त्याला जज करू नये.
https://x.com/SachinGuptaUP
https://x.com/SachinGuptaUP/status/1889575426529333332
रणवीर अल्लाहबादिया गिरफ्तार हो। उसके आतंकी कनेक्शन की जांच हो। सारी प्रॉपर्टी सरकार जब्त करे। PM मोदी अपने द्वारा दिया गया सम्मान वापस लें। महाराष्ट्र पुलिस इसका एनकाउंटर करे"
– वेद नागर, राष्ट्रीय गोरक्षा दल के अध्यक्ष
ट्वीटमध्ये हे बोलतानाचा व्हिडु पण आहे.
जयश्रीराम.
ज्या वाह्यात कमेंट वरून वाद
ज्या वाह्यात कमेंट वरून वाद झाला ते सर्वांना माहीत असेलच.
हे काही इतर व्हिडिओ आहेत.
फेसबुकवरचे आहेत. दिसतात का बघा?
१८+ आहेत. आपल्या जबाबदारी वर बघा.
हे यासाठी शेअर करत आहे की कशासाठी चर्चा चालू आहे ते सर्वांना माहीत राहील. मग चर्चा पुढे नेता येईल. अन्यथा इथे कोणी साप साप म्हणून रशशी धोपटत आहे असे कोणाला वाटू नये.
कार्यक्रमाचा दर्जा दाखवणारे इतर व्हिडिओ.
https://www.facebook.com/share/r/1BN4c6Bhv4/
.
https://www.facebook.com/share/r/18i3jp5dFi/
.
https://www.facebook.com/share/r/1A7VefXGQx/
.
https://www.facebook.com/share/r/15k6hZpgeg/
.
https://www.facebook.com/share/r/15PTJLEFFW/
तिकडे देखील त्याचे रेखा
तिकडे देखील त्याचे रेखा वद्दलचे कमेंट अस्थायी होते. ते प्रदर्शित न करण्याचा ऑप्शान चॅनेल कडे होता पण त्यांनी तसे केले नाही. >> This is AI generated. It was not in episode. I watched that complete episode
युट्यूबवर जाऊन अशा दर्जा
युट्यूबवर जाऊन अशा दर्जा नसलेल्या व्हिडिओत घालवायला वेळ मिळायला हवा. कित्ती तरी चॅनेल्स आहेत.
संगीत, साहसी खेळ, बागबगिचा, रेसिपीज, शिलाई, सौंदर्य साधना या विषयावर उपयुक्त / दर्जेदार कंटेंटस देणारे हजारोंनी नाही तर लाखोंनी युट्यूबर्स आहेत. यातल्या कित्येकांना चांगला कंटेट देऊनही व्हूज मिळत नसल्याने चॅनल बंद करावा लागला आहे.
काही काही जणांना चिकाटीने चार, पाच, आठ तर एखाद दुसऱ्याला बारा वर्षांनी व्हूज मिळायला सुरुवात झाली आहे.
या पार्श्वभूमीवर अल्पावधीत लोकप्रिय होणाऱ्या या चॅनेल्सच्या मागे सेलेब्रिटी /शक्तीशाली लोक / पक्ष / संघटना / धर्म / जात / भाषा - प्रांतवादी गट असतात असे निरीक्षण आहे. त्यांचा कंटेट पण तसाच भडक / आक्रस्ताळी / एकांगी / चटपटीत इत्यादी इत्यादी असतो.
एखाद्या विषयाचा कंटाळा आला तर दुसरा चांगला विषय काही दिवस फॉलो करावा. यु ट्युब लगेच त्या विषयावरचे अनेक व्हिडीओज फीड मधे दाखवते.
हे कसे होते ही माहिती देणारे पण असंख्य व्हिडिओज आहेत. ते सुद्धा एक पाहिला कि दुसरा हजर असे येत राहतात.
हा सगळा अनुभव आहे. त्यामुळे अशा कार्यक्रमांना फॉलो करणाऱ्यांचा युट्यूब फीड कुठल्या कंटेंटसने भरला असेल हे इमॅजिन करायचीही गरज नाही.
धाग्यावर लिंक्स देणे हे आता मायबोलीच्या पॉलिसीत बसू लागले असेल तर स्वागत. दोनेक वर्षांपूर्वी प्रोफाईलवर अन्य वेबसाईटचा उल्लेख करणे ही जाहीरात ठरत होती.
पाहिले ते व्हिडीओ, असले शो
पाहिले ते व्हिडीओ, असले शो जाहीर प्रक्षेपण करून केले जातात आणि वर तू म्हटले आहेस तसे या मुलांना आदर्शही समजले जात असेल तर हे वाह्यातपणाच्याही पार पलीकडचे आहे.
ऋन्मेष,
ऋन्मेष,
माझ्या अंदाजानुसार या लिंक्स delete केलेल्या बऱ्या!
बाकी, ज्याचे त्याचे स्वातंत्र्य!
=====
बाकी, फारच भुक्कड माणसे दिसतात ही! हसू तर येतच नाही, कीवही येत नाही, या प्रोग्रॅमवर थुंकावेसेही वाटले नाही
तसंच पाहिजे त्या रणवीरला
तसंच पाहिजे त्या रणवीरला सारखं भुतं आत्मा करत होता ना,आता कळेल त्याला जगात सगळ्यात वाईट ही माणसं असतात भुतं नाही.
निषेध
बेफिकीर राहू द्या ते व्हिडिओ.
बेफिकीर राहू द्या ते व्हिडिओ.
इथे आत येऊन कोणी मुद्दाम बघणार नाही. ज्याला धाग्याच्या चर्चेत रस आहे तेच बघणार आणि त्यांना कशावर चर्चा आहे त्याची तीव्रता नेमकी समजायला हवी.
या प्रश्नाचे उत्तर दुर्लक्ष करा इतके सोपे असते तर धागा काढला नसता. कारण हल्ली मोजकेच काढतो. पण ही समस्या जवळची आणि रिलेट होणारी वाटली कारण मी स्वतः देखील एक पालक आहे. इथले बहुतांश जण असतील.
आम्ही या कार्यक्रमाचे नावच ऐकले नव्हते असेही काही जण असतील इथे. पण तुमच्या मुलांनी कदाचित ते ऐकले असेल आणि अश्या शॉर्ट रीळ पाहिल्या असतील.
तर या धाग्यामुळे मी एका वाह्यात गोष्टीला प्रसिद्धी देऊन ती तुमच्या पर्यंत पोहोचवत नसून तुमची मुले हे बघत तर नाही ना आणि त्यामुळे बिघडणार तर नाही ना याची काळजी घ्या हे तुम्हाला सांगतोय.
आम्ही पोरांना चांगली शिस्त आणि संस्कार लावतो तर आम्हाला त्याची भिती नाही या भ्रमात राहू नका. मुले संगतीने बिघडतात. संधी मिळाली की बिघडतात. ती का त्यांना सहजपणे उपलब्ध करून द्यावी. ते देखील अजाणता वयात.
आणि हो, लेखातले श्री नरेंद्र मोदी आणि अमिताभ यांचे उल्लेख खरे आहेत. त्यामुळे हे असे करणारी व्यक्ती राखी सावंत प्रमाणे बदनाम आहे असेही म्हणू शकत नाही. हे एक चिंतेचे कारण आहे. कारण यात मुले influence व्हायची शक्यता वाढते.
मुळात हे एखाद्या पॉर्न साईट वर चालले असते तरी प्रश्न नव्हता. पण शॉर्ट रीळ माध्यमातून हे insta, facebook, you tube असे सगळीकडे फोफावले आहे जे आपल्या पेक्षा जास्त आपली मुले वापरतात.
मग जर सिनेमामध्ये सेन्सॉरशिप येऊ शकते तर या माध्यमात सुद्धा ती असणे गरजेचे नाही का??
किमान तिथे १८+ असा निकष तरी असतो, त्या खालच्या मुलांना थिएटर मध्ये सोडत नाही. इथे तर काहीच नाही..
जर काही लोकांना हे आवडत असेल तर मला त्यांच्या आवडीवर गदा आणायची नाही किंवा त्यावरून त्यांना जज करायचे नाही पण यावर सेन्सॉरशिप असावी ही माफक अपेक्षा असण्यात काय चुकले. किंबहुना ती असती तर मला सुद्धा हे दिसले नसते.
आमच्या जुन्या सोसायटीच्या
आमच्या जुन्या सोसायटीच्या व्हॉटस अॅप ग्रुपवर नवीन चेअरमनने लोकांना शिकवण्या सुरू केल्या. सुरुवातीला लोक दुर्लक्ष करायचे.
पण जेव्हा त्यांनी मुलांचं संगोपन कसं करायचं, पालकत्व वगैरेवर रोज मेसेजेस टाकायला सुरुवात केली तेव्हा एकाने निषेध नोंदविला. त्यातून वाद झाले. त्याचं पर्यावसान कडाक्याच्या भांडणात झाले. चेअरमन म्हणणं होतं कि वाईट काय "शिकवतोय?"
मुलांचं संगोपन हा खासगी विषय आहे. प्रत्येक जण आपल्या मुलांवर संस्कार करायला समर्थ आहे असा विश्वास आणि आदर बाळगणे हा व्यवहार आहे.
बाकि ज्याची त्याची मर्जी.
जर काही लोकांना हे आवडत असेल
जर काही लोकांना हे आवडत असेल तर मला त्यांच्या आवडीवर गदा आणायची नाही किंवा त्यावरून त्यांना जज करायचे नाही पण यावर सेन्सॉरशिप असावी ही माफक अपेक्षा असण्यात काय चुकले. किंबहुना ती असती तर मला सुद्धा हे दिसले नसते. >>> +१११११
एखादी गोष्ट चुकीची आहे तर तिला चुक म्हणण्यात काहीच गैर नाही. आजच जर अशाप्रकारच्या कंटेंटवर निर्बंध लावले नाहीत तर उद्या यांचा धुमाकूळ होण्यास वेळ लागणार नाही. माबो पब्लिक जरा सभ्य कॅटेगरीत मोडते असे मला वाटते. म्हणजे अरे ला कारे करायचे नाही, दुर्लक्ष करायचे, आपल्या मुलांनी असे विडीयो बघू नयेत असे संस्कार करावेत वैगरे वैगरे. पण खरच हे शक्य आहे का??
ऋ म्हणतोय तसे मुले संगतीने बिघडतात. संधी मिळाली की बिघडतात आणि फक्त मुलेच नाही तर मोठेही बिघडतात.
कालचीच गोष्ट, माझा मुलगा ७ वर्षे, मुलगी १४ वर्षे. दोघे मोबाईल वर गेम खेळत होते. त्यामध्ये आणखीही खेळाडू (गेम मधले कंप्युटराईज्ड) होते. तर त्यातील एकाने माझ्या लेकाला गेममध्ये गोळी मारली तर लेकाने त्याला भोxxके शिवी दिली. लेकीने लगेच कंप्लेंट केली की याने शिवी दिली. त्यालाही कळले की आपण चुकीचे वागलो त्यामुळे त्याची आधीच रडारड सुरु झाली. (संस्कार :हाहा:) आता आम्ही घरात तर शिव्या देत नाही आणि कधी चुकून नवर्याने दिली तरी मराठी शिव्या देईल. त्याला विचारला असता समजले की युट्युब वर एकजण गेम शो चालवतो आणि त्याला कोणी मारले की तो ही शिवी देतो. तर तात्पर्य हेच की आपण घरात कितीही शिस्त लावा, संस्कार करा, या असल्या विडीयोजचे दुष्परीणाम होतातच.
तिकडे देखील त्याचे रेखा
तिकडे देखील त्याचे रेखा वद्दलचे कमेंट अस्थायी होते. ते प्रदर्शित न करण्याचा ऑप्शान चॅनेल कडे होता
->>> AI is dangerous… मी लवकरच एक धागा काढणार आहे... एक आर्टिकल यावर मी इंग्रजीत लिहिले आहे आधीच...
अरे पण त्याने माफी मागितली
अरे पण त्याने माफी मागितली आहे ना? संपवा ना विषय.
भर लोकसभेत एक खासदार दुसर्याला कटुवा म्हणतो, एक श्रीमंत मुलगा पोर्शे ने दोघाना उडवतो, त्याला बेल मिळते, वर आपली जप्त केलेली गाडी परत द्या असा अर्जही करतात माता पिता, कुंभ मध्ये चेंगर चेंगरी झाली असे टीव्ही वर सांगणारी एक मुलगी गायबच होते, अशा अनेक घटना असताना एखाद्या कॉमेडियन ने केलेल्या विधानावर 'बारा इलाके की पुलीस' का मागे लागलिये ? टीव्ही वर २४ तास का किंचाळताय ? इथेही धागा लेखक टी आर पी ची सुपारी घेतल्याप्रमाणे ' या पहा इतर काही लिंक्स ' असे म्हणून लिंक्स का देताहेत ? मी एखाद्या पोर्न साईट वर गेलो तर यापेक्षाही दर्जाहीन व्हिडिओज नक्की मिळतील. तारतम्य महत्वाचे.
विकु >>सहमत,
विकु >>सहमत,
A rape every 16 minutes हे रेपिस्ट काय हे विडीओ बघितल्या मुळे झाले की काय?
विकु: अगदी माझा मुद्दा..
विकु: अगदी माझा मुद्दा..
जगात किंबहुना महाराष्ट्रात काय चाललंय याच्याशी काहीच देणंघेणं नाही.. मुख्य मुद्द्यांवर कुणी काही बोलू नये (भुंकू नये) म्हणून कुणी news channels, social media काहीतरी हाडुक देतात चघळायला, आणि आपली माणसे चवीने लिंक देऊन देऊन चघळत बसतात!
तुमचा पाल्य शिव्या देतोय की आणि काही करतोय यात इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा तुमचे संगोपन कमी पडतेय हे लक्षात घ्या.
कुतुहुल शमवणे, शिव्या ऐकल्या की तिथेच त्यांचा अर्थ समजावणे, हे असे बोलायला माझी हरकत नाही, पण तुझ्या बुद्धीला हे पटते आहे का हे विचारणे, असे अनेक पर्याय उपलब्ध असताना आपण पाल्याकडून त्या माहितीचा, शिव्यांचा स्रोत फक्त हिरावून घेतला तर साहजिक तो ते दुसऱ्या कोणत्याही मार्गाने ती माहिती शिव्या ऐकणारच आहे. परंपरेनुसार आज जे नवे पालक आहेत ते आपल्याच पालकांनी अवलंबलेला मार्ग स्वीकारत जातात, बदल घडत नाहीच.
आता आपले आदर्श धगलेखक:
आधीचे काही धागे आणि प्रतिसाद वाचले असतील या धागालेखकाचे तर ते कोणत्याही प्रकारे उत्तम संस्कारी बाळाचे गुणदर्शन करणारे वाटले का?
आई-बहिणीवरून शिव्या, आणि
आई-बहिणीवरून शिव्या, आणि अश्लील visual content चा जिथे तिथे सडा पडलेला असताना रणवीरच्या बोलण्यावरून इतका गहजब करण्यासारखे काय आहे ? beerbiceps आणि रणवीर चांगलं - वाईट, आवडणे - नावडणे वैयक्तिक. पण एकूण लोकांनी जगबुडी आल्यासारख्या प्रतिक्रिया दिल्यात त्याचे नवल वाटते. रणवीरला नावे ठेवताना अगदी चांगल्या लोकांनीही इतकी घाण भाषा वापरली आहे की मूळचा आरोप त्यांनाही तितकाच लागू आहे. कोणी रणवीरच्या बाजूने बोललं आहे का ?
सर तुम्ही तो शाखाचा जवान का
सर तुम्ही तो शाखाचा जवान का काय तो पिक्चर डोक्यावर घेतला होतात. त्यातले ते पदुकोनचे तोकड्या ड्रेसमधले गाणं?
वासुनाका वाचले नसेल तर जरूर वाचा. त्याची विजय तेंडूलकरांनी केलेली चिकित्सा वाचा एकदा. पाहिजे तर मी लिंक देतो.
सर, तुम्ही वस्त्रहरण नाटक पाहिलंय का? मराठी प्रेक्षकांनी मिटक्या मारत मारत पाहिले. सुपरहिट.
तुम्ही तामाशा तर पहिला नसणार. बघा काघीतरी.
आवरा हा डबल स्टँडर्डपणा.
Sammy Raina deleted all
Sammy Raina deleted all videos of India Got Latent from YouTube. Runmesh cha Vijay aso
रणवीर किंवा समय रैना (याचे
रणवीर किंवा समय रैना (याचे खरे तर मी काहीच पाहिलेले नाही पण अंदाज आहे ) यांचे कन्टेन्ट आवडत नाही तर सरळ ब्लॉक करा. आताही भरपूर टीका करा पण एफआयआर वगैरे जरा जास्तच झाले. रणवीरला ह्या मधून वर यायला वेळ लागेल असे वाटते . पण काही सांगू शकत नाही . कारण तो काही पॉवरफुल लोकांच्या जवळ आहे .
रणवीर व समय दोघांच्या करिअर
रणवीर व समय दोघांच्या करिअर वर याचा मोठा परिणाम होणार आहे. समयचे भविष्य उज्वल वाटत होते पण या चुकीतून परत सगळे उभे करणे अवघड जाणार असे वाटत आहे. समयचा फॅन बेस मोठा आहे पण brand sponsorship, corporate shows, overall distribution वर परिणाम होईलच.
AIB च्या sexual harassment तक्रारींनंतर त्या सगळ्यांचे पण असेच झाले होते. तन्मय भटचे करिअर आता बरे चालले आहे. बाकी सगळे त्यामानाने फार दिसत नाहीत.
लोकांची स्मरणशक्ती कमी आणि
लोकांची स्मरणशक्ती कमी आणि क्षमाशक्ती प्रचंड असते. बस अशा लोकांनी जरावेळ शांत बसुन मग राष्ट्राभिमान उचंबळवणारे काहीतरी प्रदर्शित केले की काम फत्ते.
--
बाकी आता त्या पोरांना सोडून द्यावे, उगाच धोपटत बसू नये. म्हणजे वरचे होण्याची गरज नाही. आपापल्या क्षमते व टॅलंटनुसार जे करायचे ते करतील.
खर्या मुद्द्यांवर लक्ष जाऊ
खर्या मुद्द्यांवर लक्ष जाऊ नये म्हणून केलेल्या क्लृप्त्या आहेत. त्याला सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सही हातभार लावतात.
खर्या मुद्द्यांवर बोलायचं म्हणजे राजकारणावर बोलावं लागेल. ते तर फार घाण, त्याबद्दल बोलणारेही घाण.
--
बीअर बायसेप्सच्या ज्या काही क्लिप्स समोर आल्या, त्यावरून तो अत्यंत फेक , खरा उथळ पण खूप गहन बोलत असल्याचा आव आणणारा असाच वाटला. त्यामुळे ज्यांना ऐकायची इच्छा आहे, अशा कोणी व्यक्ती त्याच्या पॉडकास्टवर आल्या तरी ते पाहिलं नाही.
---
राहुल ईश्वरने लगेच या लोकांना लेफ्ट, अल्ट्रा लिबरल ठरवलं. अशा माणसाला मोदी निर्मित पहिला पुरस्कार मिळाला असता का, याचा विचारही न करता भक्तमंडळाने माना डोलावल्या.
समय रैना म्हणतो

आणि आता यांच्या मुळावर कोण उठलंय?
अर्थात वापरा आणि फेकून द्या हे धोरणच आहे.
मडकी तपासून घ्या.
मडकी तपासून घ्या.
लेख चांगला आहे.
लेख चांगला आहे.
लेख चांगला आहे.>.......सहमत.
लेख चांगला आहे.>.......सहमत.
भरत यांनी शेअर केलेला लेख
भरत यांनी शेअर केलेला लेख चांगला आहे आणि असे असू शकतेच. राजकारण हल्ली सगळीकडे पसरले आहे.
पण प्रश्न रणवीरने त्या एका शो मध्ये काय केले इतकाच नसून असे शो इतक्या उघड प्रसारित व्हावेत का हा आहे.
रणवीर याच्या एका एपिसोड मध्ये गेला आणि कांड झाले. पण इतर एपिसोड मध्ये सुद्धा असाच फॉरमॅट आणि असेच विनोद(!) होतेच.
अरे पण त्याने माफी मागितली
अरे पण त्याने माफी मागितली आहे ना? संपवा ना विषय.
>>>>
गल्लत ईथेच होत आहे. इथे कोणीही त्या रणवीरच्या विरोधात नाही. की काही वैयक्तिक आकस नाही. जे तो कधी चुकतो आणि आम्ही त्याला कधी झोडपतो याची वाट बघत होतो. किंबहुना त्याच्याबद्दल काहीच माहीत नव्हते, तो या कार्यक्रमात गेस्ट आला होता. इथे आक्षेप आहे तो कंटेंटबद्दल. आणि तो तसाच राहणार असेल किंबहुना फेसबुक इन्स्टा माध्यमातून इतक्याच सहजपणे लहान मुलांच्या हाती यापुढेही लागणार असेल तर हा विषय कसा संपवू? त्याच्या माफीचे काय करू? त्याच्यावर रागच नाही. झाल्यास सहानुभूतीच आहे जे एक युवा मुलगा ज्यात पोटेन्शिअल आहे काही चांगले करण्याचे तो चुकीच्या मार्गाला लागला आहे.
या प्रकरणानंतर वाल्या कोळीचा वाल्मिकी झाला तर खरेच आनंद होईल. या निषेधाचा विजय तो असेल.
धागा लेखक टी आर पी ची सुपारी
धागा लेखक टी आर पी ची सुपारी घेतल्याप्रमाणे ' या पहा इतर काही लिंक्स ' असे म्हणून लिंक्स का देताहेत ? मी एखाद्या पोर्न साईट वर गेलो तर यापेक्षाही दर्जाहीन व्हिडिओज नक्की मिळतील. तारतम्य महत्वाचे.
>>>>>>>
यू सेड इट डूड, यू सेड इट!
तुम्ही माझाच मुद्दा ठळक ठळक केलात!
मायबोलीवरील एका धाग्यात प्रतिसादाच्या गर्दीत जिथे जुने जाणते प्रगल्भ वाचकच एन्ट्री मारू शकतात अशांच्या नजरेला पडतील त्या जागी या व्हिडिओच्या लिंक असून सुद्धा तुम्हाला चिंता वाटली...
तर विचार करा हेच व्हिडिओ उद्या लहान मुलाना फेसबुक इन्स्टा स्क्रोल करताना दिसत असतील तर मी त्यावर चिंता व्यक्त करू नये का??
याचे उत्तर तुम्हाला सुद्धा माहीत आहे. ही पोस्ट हा धागा वाचणाऱ्या सर्वांना माहीत आहे.
Pages