India's got latent - चला निषेध नोंदवूया.
India's got latent अश्या नावाचा एक कार्यक्रम येतो.
कुठे येतो कल्पना नाही. पण फेसबूक, इन्स्टा, युट्यूब वर शॉर्ट आणि रिल्स स्वरूपात याचे व्हिडिओ मुबलक बघावयास मिळतात.
Latent या शब्दाचा अर्थ काय मला माहीत नाही. मी आधी ते टॅलेंट समजूनच याचे काही एपिसोड बघितले. एक दोन फनी वाटले म्हणून अजून काही एपिसोड बघितले तसे वरचेवर दिसू लागले. आणि हळूहळू त्यांचा ठेवणीतील 18+ स्टॉक समोर येऊ लागला. मग मात्र मी न बघण्याची काळजी घेऊ लागलो कारण मोबाईल मुलांच्या हातात सुद्धा जातो.
तरीही अध्येमध्ये याचे व्हिडिओ नजरेस पडायचेच. आणि रिल बघने हे असे व्यसन आहे की जे समोर येईल ते झोप उडवून बघितले जाते.
गेल्या आठवड्यात मात्र हादरवून टाकणारे व्हिडिओ नजरेस पडले. मुले मुली एकत्र बसले आहेत आणि एकमेकांची खेचणे म्हणजे रोस्ट करणे या नावाखाली काहीही अश्लील शब्दफेक चालू आहे. म्हटले हे तर फार वाया गेलेले प्रकरण आहे. दूर राहिलेलेच चांगले.
आणि आज त्यांनी काहीतरी मोठे कांड केले, अश्लील टिप्पणीचा कळस गाठला ज्या बद्दल दिलगिरी व्यक्त करताना दिसले.
बातमी काय हे शोधले तर खरेच किळस वाटावे आणि युवा पिढीची चिंता वाटावी असे एकेक व्हिडिओ समोर आले.
चिंता यासाठी वाटली कारण ज्याने आज हे कांड केले त्या Ranveer Allahbadi याला नरेंद्र मोदींच्या हस्ते National creater award असा पुरस्कार मिळाला आहे.
चिंता यासाठी वाटली कारण हा शो जो चालवतो तो समय रैना नावाचा मुलगा अमिताभच्या कौन बनेगा करोडपती कार्यक्रमात आला होता आणि अमिताभ त्याच्या विनोद बुद्धीचे कौतुक करतl होता.
चिंता यासाठी वाटली कारण ही मुले एकीकडे आदर्श म्हणून समोर आणली जात आहेत तर तेच दुसरीकडे चुकीचा आदर्श ठेवत आहेत.
कोण बनेगा करोडपतीमध्ये या समय रैना सोबत एक तन्मय भट म्हणून मुलगा आलेला. जर मी चुकत नसेल तर यालाच मी कित्येक वर्षांपूर्वी एआयबी रोस्ट या कार्यक्रमात रणवीर सिंग, अर्जुन कपूर, करन जोहर या बॉलीवूड कलाकारांसोबत अश्लीलतेची निचतम पातळी गाठताना पाहिले होते.
आज India's got latent ची बातमी पाहिल्यावर तो कार्यक्रम आठवला कारण मी त्यावेळी देखील मायबोलीवर धागा काढला होता. आणि धक्का तेव्हा बसलेला जेव्हा काही लोकं त्या कार्यक्रमाचे कौतुक करत होते, तर कित्येक जण आपल्याला काय त्याचे म्हणत होते. उलट रुचत नाही तर आपण असले कार्यक्रम बघू नये हा उपाय सुचवत होते.
तो धागा इथे बघू शकता.
https://www.maayboli.com/node/52596
आज पुन्हा मायबोलीवर धागा काढला कारण आज "आपल्याला काय त्याचे?" म्हणावे अशी परिस्थिती उरली नाहीये. आज कॉलेज जाणारया प्रत्येक मुलाकडे मोबाईल असतो तर शाळेत जाणाऱ्या मुलांचे सुद्धा इंस्टाग्राम अकाऊंट असते. आणि त्यांनाही हे व्हिडिओ कुठल्याही सेन्सॉरशिपशिवाय बघायला उपलब्ध असतात.
मुळात लहान मुलांनीच काय पुरेशी अक्कल न आलेल्या कुठल्याही तरुणांनी असे व्हिडिओ बघू नयेत असे वाटते.
सोशल मीडियावर सर्रास दिसणाऱ्या या कंटेंटवर काही निर्बंध असावेत असे वाटते.
म्हणून आज संधी मिळाली आहे तर निषेध नोंदवतो!
व्हिडिओची लिंक दे की!
व्हिडिओची लिंक दे की!
काहीही आहे. इग्नोर करा आणि पुढे चला. त्यात काय इतकी चर्चा करायची! इट इज व्हॉट इट इज! इंटरनेट आहे, सगळे प्रकार असायचेच. जास्त हवा देऊ नका.
काही मजेचं असेल तर लिंक द्या. उगा डोकी भडकवायला माबोबाह्य खूप जागा आहेत. असं आपलं मला वाटतं.
असा काही शो आहे हे
असा काही शो आहे हे पहिल्यांदाच समजलं. ही नावं पण आधी कधीच ऐकलेली नाहीत.
रणविर अलाहबादिया कडून ती
रणविर अलाहबादिया कडून ती कॉमेन्ट आल्याने लोकाना जास्त आश्चर्य( आणी राग )वाटलय...त्याचा एरवीचा कटेट्,मुलाखती चान्गल्या आहेत, बोलण वागण पण एकदम आब राखुन वैगरे...बाकी असा काही प्रोग्रॅम आहे हे ही कॉन्ट्रोव्ह्रर्सी झाल्यावरच कळल...
रणविरने स्वत;च्या पायावर मात्र धोन्डा पाडून घेतलाय हे मात्र नक्किच!!
छान लिहिलं आहे, समायोचित धागा
छान लिहिलं आहे, समायोचित धागा
आजकाल निगेटीव पब्लिसिटी इज अ
आजकाल निगेटीव पब्लिसिटी इज अ वे टू कॅच अटेन्शन ! असा प्रकार आहे.
सगळे पैशाच्या जोरावर साधु बनलेले लोकं किंवा रण्वीर सारखी मुलं किती दिवस दिखावा किंवा मुखवटा टिकवणार.
आता, आपल्या मुलांनी कसं वागवं/ असावं हे आपल्या हातात आहे.
आमच्या काळी ( म्हणजे ८० साली तरी हो आता असेच वय झालेय) हॉस्टेल मध्ये बाहेरून आलेल्या ( नॉर्थ जास्त) मुलं-मुली २-३ बाटल्या बीअरच्या अश्याच ढोसून उलट्या करत. आणि हि सर्व अगदी, बंदिस्त व कडक शिस्त घरातून आलेल्या, मारून मुटकून वाढलेल्या.
आणि आम्ही त्यांच्यापुढे बावळट(असे त्यांना वाटे) बघत असो.
तेव्हा, सगळं अनादी काळापासून चाललय. आता सोमामुळे कळतय. बाकी काही नाही. रेव पार्ट्या , न्युड पार्ट्या , ड्रींक्स पार्ट्या, स्वॅपींग पार्टी सगळं चालतं की.
तुम्हाला कुठे जायचय हे तुम्ही ठरवा असं आहे.
तसाही तो रणवीर मला फेक वाटतच
तसाही तो रणवीर मला फेक वाटतच होता. प्रत्येक मुलाखतीत मी अगदी भोळा श्याम असे भाव ठेवून बोलणारा. त्याची आधीची कर्मकहाणी काहीशी ह्याच मार्गावर होती. ओल्ड हॅबिट्स ... दुसरे काही नाही. लोकांना इतकं आश्चर्य का वाटतय ह्याचं मला आश्चर्य वाटतय आता.
त्याच्यासाठे धागे काढून उगाच उत काढा कशाला?
यु जस्ट नो हॉउ प्रेटेन्न्शईअस समवन इज.
इथेच नुकत्याच एका लेखात
इथेच नुकत्याच एका लेखात वाचलेल्या 'रेड हेरिंग' चे हे एक उत्तम उदाहरण आहे.
कुंभ मध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत नक्की किती जण गेले हेही अजून कळले नाही, मणीपूर सारखे इतरही अनेक ज्वलंत प्रश्न असताना असले विषय उकरून शिमगा करा असा जणू आदेशच नोइडा चॅनेल्स ना आला असावा. आवर्जून बघून निषेध करावा असे काही नाही शोमध्ये, दुर्लक्ष करणे उत्तम.
आता तर दोनेक राज्यात एफ आय आर झाली आहे, जणू चोरी, बलात्कार, खून, वगैरे सारे गुन्हे संपले व रामराज्य आले म्हणून पोलिसांसाठी असली दुष्काळी कामे काढण्यात येत आहेत ?
तरुण असताना आपण जे विषय आणि
तरुण असताना आपण जे विषय आणि भाषा मित्रांमध्ये वापरत होतो तेच ह्या कार्यक्रमात दिसून येते. ह्या कार्यक्रमातील तरुण मुलींची भाषा आणि आविर्भाव मुलांपेक्षा आम्ही कमी नाहीत हे दाखवतात. तरुण मुलींचे खाजगीतले विश्व माहीत नसल्याने धक्का बसला. बाकी फार काळजी करण्यासारखे काहीही नाही , तरुण वयात निचरा होताना ह्या गोष्टी होतच असतात.
अरे वा,आला का धागा….
अरे वा,आला का धागा….
मी हा शो नियमितपणे पाहतो. या शो साठी समय रैनाच्या चॅनलचे subscription पण घेतले आहे. ज्या एपिसोडवरून एवढा वादंग झाला तो मी आल्या दिवशीच पाहिला होता.रणवीरचा तो जोक मलाही नाही आवडला पण त्यावरून एवढा हंगामा, FIR होईल असे वाटले नव्हते.
समय रैना सध्या त्याच्या डार्क ह्युमर, स्पॅान्टॅनिअस जोक्स मुळेच फेमस आहे. भारतात जरा ते रिस्कीच आहे. मागच्याच आठवड्यात मला वाटले होते की असे जोक्स करता करता कधी तरी वहावत जाऊन हा कुठेतरी फसायची शक्यता आहे. पण तो स्वतःच्या जोकमुळे न फसता दुसऱ्याच्या जोक मुळे फसला….
तो जोक त्याने editing मधे उडवायला हवा होता. आशिष सोलंकीच्या शो मधे समय रैना ने कुशा कपिलावर केलेले जोक्स म्यूट करायचा शहाणपणा सोलंकीने दाखवला होता.
भारतात अशा जोक्समुळे काय होऊ शकते याचे भान त्यांना असायला हवे.
जोक चांगला नव्हताच पण आता जे काही चालू आहे तो पण वेडेपणा आहे….
त्यात ते नेहमीचे भारतीय संस्कृती, परंपरा, मुलांवरचे संस्कार, तुम्ही घरात असे शो बघू शकता का, घरात असे बोलता का वगैरे प्रकरण मला फारच बालिश वाटते. मुले घराबाहेर अनेक अश्लील जोक्स, शिव्या ऐकत असतात. पण ते घरात बोलायचे नाही हे त्यांना कळते.
आजच्या कळात तुम्ही मुलांना जगापासून isolated ठेऊ शकत नाही. त्यांना भल्याबुऱ्याची जाण देणे, तारतम्य शिकवणे हे पालकांचे काम आहे. मुलांच्या स्क्रिन टाईममधे ते काय पहात आहेत याला पालक जबाबदार आहेत, रणवीर आणि समय नाही.
असे व्हिडिओ पाहून कोणी बिघडते असे मला वाटत नाही. मुलांना नेटचा भरपूर ॲक्सेस आहे. त्याच्या फायद्यांसोबत तोटे पण येणारच आहेत. ते कसे हॅंडल करायचे याचे तारतम्य पालकांनी मुलांना शिकवायचे आहे.
Atrangi - bang on. In fact I
Atrangi - bang on. In fact I was expecting this thread from Runmesh. Maayboi is becoming so predictable.
आग्या यांची पोस्ट आणि अतरंगी
आग्या यांची पोस्ट आणि अतरंगी यांचे शेवटले दोन परिच्छेद यांना मम.
एक फालतु जोक, त्यासाठी गल्लोगल्ली निषेध मोहिमा काढण्याची गरज नाही.
असा काही शो आहे हे
असा काही शो आहे हे पहिल्यांदाच समजलं. >>> अगदी अगदी.
मला व्यक्तिशः खूप ताण येतो
मला व्यक्तिशः खूप ताण येतो आजकाल अश्या प्रकारांचा. म्हणजे मणिपूर, मस्साजोग, एका जिल्ह्यात अफगाणिस्तानहुन वाईट कायदा सुव्यवस्था, शेतीसाहित्यातला कृषिमंत्र्याने केलेला घोटाळा, रोज होणारे शेकडो बलात्कार, मुंबईतच मराठी माणसांवर होणारे हल्ले/ वाळीत टाकण्याचे प्रकार, बेड्या ठोकून आणलेले परदेशस्थ भारतीय, भयंकर वाढलेली महागाई, तुरीचे कापसाचे उतरलेले दर, या आणि अनेक किरकोळ विषयांपुढं कोण कुठला रणवीर आणि त्याची फालतू कमेंटवर मायबोलीवर धागा निघतो हे म्हणजे खूपच थोर आहे
असा काही शो आहे हे
असा काही शो आहे हे पहिल्यांदाच समजलं. >>+१
धागा काढण्यात काय चुकीचे आहे?
धागा काढण्यात काय चुकीचे आहे? सगळीकडे एखाद्या विषयावर चर्चा होत असेल तर माबोवर का नको ? निदान त्यामुळे येथील वयस्कर लोकांना कळेल की आपण तरुणांच्या भावविश्वात विनाकारण डोकावून बघू नये, भले खिडकी उघडी असली तरी.
रणवीर हा फक्त बिअर बायसेप्स
रणवीर हा फक्त बिअर बायसेप्स असल्यापासून मी त्याचे चॅनेल पहिले आहे . हा आधी पुरुषांची ग्रूमिंग वर व्हिडीओ बनवत असे. त्यामुळे त्याची खरी मर्यादा काय आहे हे तेव्हाच लक्षात आले होते . हळूहळू त्याने ट्रॅक बदलला व सध्या जे चालते त्यावर विडिओ बनवायला सुरवात केली . मग त्यात भोळसट चेहरा करून आपण किती स्पिरिच्युअल आहोत हे दाखवायला लागल्यावर भोळ्या जनतेला तो कोणीतरी ग्रेट वाटायला लागला . त्यात रणवीरचे काही चुकीचे नाही म्हणा . कारण कोणालाही पुढे जायचे असकल्यास तो जे पिकते आणि विकते तेच दाखवणार . पण लोकांना तो कोणीतरी महान आहे असे वाटणे आणि सोशल मीडियावर जे दिसते ते खरे नसते हे कसे काय कळले नाही ह्याचे आश्चर्य वाटते. तन्मय भटचा एक सध्या फिरत आहे तो बघा. त्यात त्याने रणवीरला स्पष्ट म्हटले आहे कि तू व्युज साठीच सर्व करतोस.
https://x.com/thetruthin/status/1888968315948892473
बाकी अतरंगी यांच्या पोस्टला अनुमोदन. शिवाय त्याच्या विरुद्ध चाललेल्या गदारोळामुळे इतर प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी त्याला बळीचा बकरा बनवला असल्याची शक्यता वाटते .
IYKYK
IYKYK

आ_रती ने केलेल्या रणवीर च्या
आ_रती ने केलेल्या रणवीर च्या वर्णनाशी सहमत. सुरूवातीला मला त्याचं कौतुक वाटलं होतं, पण नंतर जेव्हा नाटकीपणा आणि ओढून ताणून दाखवलेला अभ्यासूपणा जाणवायला लागला, तेव्हापासून त्याचे पॉडकास्ट बघणं बंद केलं.
कितीही म्हटलं तरी इनर सर्कल मध्ये बोलताना सुद्धा कितीवेळा पालकांचा उल्लेख करून बोललं जातं? इथे तर तुम्ही सोशल मिडियावर लाइव्ह बोलताय. कुठे काय बोलावं पेक्षा कुठे काय बोलू नये, हे समजलं पाहिजे. हे म्हणजे, मी कसा कूल, मी कसा बोल्ड असलं काही तरी दाखवायच्या नादात रणवीर घसरला, दुसरं काही नाही.
सध्याच्या भारतीय संस्कृतीने भारावलेल्या वातावरणात ह्याने स्वतः जाऊन कुऱ्हाडीच्या पात्यावर पाय मारला आहे, त्याला बळीचा बकरा बनवला नाही तरच नवल!
तसाही तो रणवीर मला फेक वाटतच
तसाही तो रणवीर मला फेक वाटतच होता. प्रत्येक मुलाखतीत मी अगदी भोळा श्याम असे भाव ठेवून बोलणारा. >> मला तर तो वेड पांघरून पेडगावला चाललाय असेच वाटायचे, त्याच्या चेहऱ्यावरचं खोडकर, निर्लज्ज हसू जाणवून देत असे की हा मुद्दाम नज (हळुवार पणे) करून समोरच्याला ढकलायला बघत असतो. एकंदरीत सध्या ठरवून केलेला वाद आणि अजाणतेपणे होणारे वाद यातील सीमारेषा धूसर झाली आहे.
त्याने विनोद हा माझा फोर्टे
त्याने विनोद हा माझा फोर्टे नाही असं म्हणून सारवासारव केलीय. त्याला वाटतंय की मुलाखत घेणे हा त्याचा फोर्टे आहे.

मुद्दाम नज (हळुवार पणे) करून
मुद्दाम नज (हळुवार पणे) करून समोरच्याला ढकलायला बघत असतो >>> असं अचूक शब्दात मला नसतं जमलं. ( तो कार्यक्रम नाही पाहिलेला).
कितीही म्हटलं तरी इनर सर्कल
कितीही म्हटलं तरी इनर सर्कल मध्ये बोलताना सुद्धा कितीवेळा पालकांचा उल्लेख करून बोललं जातं? इथे तर तुम्ही सोशल मिडियावर लाइव्ह बोलताय. कुठे काय बोलावं पेक्षा कुठे काय बोलू नये, हे समजलं पाहिजे.>>>>
खरे आहे.
मी आजपर्यंत ईतक्या आगाऊ मुलांसोबत फिरलो, वावरलो.
भारतातले, परदेशातले अनेक स्टॅंड अप कॅामेडी सेट्स पाहिले. रोस्ट पण बघितले पण ईतका वाईट्ट जोक(चा प्रयत्न) पहिल्यांदाच ऐकला.
त्याने विनोद हा माझा फोर्टे
त्याने विनोद हा माझा फोर्टे नाही असं म्हणून सारवासारव केलीय. त्याला वाटतंय की मुलाखत घेणे हा त्याचा फोर्टे आहे. Lol Lol>>>>
मला व्यक्तिशः खूप ताण येतो
मला व्यक्तिशः खूप ताण येतो आजकाल अश्या प्रकारांचा. म्हणजे मणिपूर, मस्साजोग, एका जिल्ह्यात अफगाणिस्तानहुन वाईट कायदा सुव्यवस्था, शेतीसाहित्यातला कृषिमंत्र्याने केलेला घोटाळा, रोज होणारे शेकडो बलात्कार, मुंबईतच मराठी माणसांवर होणारे हल्ले/ वाळीत टाकण्याचे प्रकार, बेड्या ठोकून आणलेले परदेशस्थ भारतीय, भयंकर वाढलेली महागाई, तुरीचे कापसाचे उतरलेले दर, या आणि अनेक किरकोळ विषयांपुढं कोण कुठला रणवीर आणि त्याची फालतू कमेंटवर मायबोलीवर धागा निघतो हे म्हणजे खूपच थोर आहे
चला ह्या निमित्ताने का होईना
गल्ली चुकली.
त्याला वाटतंय की मुलाखत घेणे
त्याला वाटतंय की मुलाखत घेणे हा त्याचा फोर्टे आहे>>
एक मात्र झालं, रणवीरने इतर लॅटंट लोकांना कंटेंट दिला.
आता 'किती खालची पातळी ', ' काय ते संस्कार ' अशा व्हिडिओचं पीक येईल.
नेमका काय गोंधळ झालाय हेच
नेमका काय गोंधळ झालाय हेच माहीत नाही.
मी ख7प फॉलो करून पाहिलेले नाहीये.
ह्या शो चे काही अर्धवट एपिसोड पाहिलेत. आवडले होते.
वेगवेगळे लोकं, वेगवेगळे टॅलेंट येते , त्यात जोक्स रोस्टिंग असा फॉरमॅट आहे.
हे लक्षात आलं. Youtube वर पाहिलेले.
कॉलेज मध्ये ( हल्ली 8 वी नंतरच्या मुलांमधे असलेली भाषा ) आणि वातावरण casual असते.
सेन्सॉरशिप नाहीये.
कोणत्या जोक ने राडा झालाय?
रणवीर च्या तोंडून असा जोक न येता राखी सावंतच्या तोंडून असा जोक असता तर चालले असते का?
असो.
आधी तो एपिसोड आणि जोक काय ते बघून येतो.
AIB रोस्ट हा भारतात अशा प्रकारचा कार्यक्रम प्रथमच होता.
त्यात नेहमी सेन्सॉरशिप मध्ये असलेल्या लोकांना विना सेन्सॉरशिप मध्ये पाहून लोकांना जास्त धक्का बसला असेल.
असे वाटतेय.
त्यानंतर कित्येक स्टॅण्डअप कॉमेडी मध्ये लोकांनी ह्यापेक्षा जास्त प्रमाणात भाषा वापरली असणार आहे.
सोळंकी सारख्या क्लीन कॉमेडी मनुष्यास not so clean फॉरमॅट करून पहावा वाटलाय.
त्याचाही एक शो आहे युट्युबवर.
हळूहळू ठेवणीतले...? पण
हळूहळू ठेवणीतले...? पण सुरुवातीपासूनच roasting हाच फॉरमॅट आहे शो चा आणि तसं बरेच ठिकाणी नमूद आहे, सुरुवातीला पण सांगितलाय ..
असो ..paid subscription घेऊन काही पाहिलं नाही पण available असलेले काही एपीसोड पाहिलेत.. काही roast sunny आहेत काही अगदीच बोअर..आणि हे तर अतिशय खालच्या पातळीवर च होतं..
रणबीरचा प्रश्न हा foreign show मधून चोरलेला होता चक्क.. काय फालतुगिरी आहे.. उगाच तिथे ऐकून , आपलं सगळं विसरून काहीही बडबड करायची.. insta reels वर लहान reels येतायत जे टीनएजर्स ना बघता येतील.. त्यामुळे थोडी चिंता आहे.
मान्य आहे की पोरं याहून जास्त बघून बिघडतात पण त्यात ही भर.. म्हणून काळजी वाटते असे shows इझी accessible असेल की.
अतरंगी, झंपी.. सहमत!!
इंस्टाग्राम, फेसबुकवर
इंस्टाग्राम, फेसबुकवर स्तनपानाचे व्हिडिओ सध्या सर्रास दिसतात. कोण असे व्हिडिओ तयार करत असतील? नवरा बायकोच ना? अविवाहित तरुणांचे सोडा, ह्या लग्न झालेल्या जोडप्यांना लाज वाटत नाही का? त्यावर मिडिया का आक्षेप घेत नाही?
रणवीर चा प्रश्न कळाला
रणवीर चा प्रश्न कळाला
व्हिडीओ पाहिला नाही.
मात्र तो अतिशय चुकीचा आहे इतके कळालं.
Context काहीही असला तरी फारच पातळी सोडून जोक इतपत कळालं.
Pages