किसर उदित हाशमी

Submitted by च्रप्स on 4 February, 2025 - 12:56

काही दिवसांपूर्वी मी पुरुष आणि महिलांमधील दुहेरी निकषांवर एक लेख लिहिला होता. त्यात काही महिला एका भारतीय अभिनेत्याच्या आंघोळीबद्दल बोलत होत्या. त्या सीनची त्या आतुरतेने वाट पाहत होत्या, आणि त्यांच्या चर्चेत हे अगदी सहज आणि सामान्य मानलं जात होतं. तिथे काही पुरुषही होते, जे त्या स्त्री आयडी मध्ये भाव वाढावा म्हणून आणखी लिंका देत होते...

आता उदितच्या प्रसंगाकडे पाहूया. सध्या एक व्हिडिओ व्हायरल आहे—त्यात एक महिला उदितच्या गालावर चुम्मा करते, आणि त्यानंतर उदित वळून तिच्या ओठांवर चुम्मा करतो. जर नीट पाहिलं, तर ही गोष्ट त्या महिलेनेच सुरू केली. तिने आधी उदितच्या गालावर चुम्मा दिलं, आणि मग उदित वळून तिला चुम्मा देण्याचा प्रयत्न करतो, आणि तिच्या ओठांवर चुम्मा होतो.

आता विचार करा—हा प्रसंग जर एखाद्या महिला गायकासोबत घडला असता, तर? एखादा पुरुष चाहत्यानं तिला गालावर चुम्मा दिला असता, तर त्याला समाजाने सहज स्वीकारलं असतं का?

व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतं की त्या महिलेनेच आधी उदितच्या गालावर जबरदस्तीने चुम्मा दिला. त्यानंतरच तो वळून तिला चुम्मा करतो.

यात उदितची काही चूक आहे का? त्याने चाहत्यांना चुम्मा देणं योग्य आहे का? Thoughts ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळा वाह्यात प्रकार आहे.
उदितने सुद्धा आधी परवानगी न घेता हे बरेचदा केले आहे तर आता त्याच्याशी सुद्धा हे झाले आहे आणि मग तो हावरटसारखा तुटून पडला आहे. कोणाला काही पडले नाहीये तर सोडून द्या. काळ सोकावेल तर सोकावू द्या. मुळात कोणी भेटले तर हात मिळवायचे सोडून गालाला गाल लावतात तोच प्रकार मला नेहमी विचित्र वाटतो. तर कधी आपण मध्यमवर्गीय घरात जन्म घेतला याचे वाईट सुद्धा वाटते.

तुम्ही दिलेल्या उदाहरणात जो प्रसंग आहे, तो एका सार्वजनिक संदर्भात असलेला आहे—तिथे एक महिला आणि एक पुरुष (उदित) यांच्यातील चुम्बनाच्या आदानप्रदानाचा विषय आहे. हे चुम्बन एक रॅपिड रिलेशनशिप किंवा हळुवार प्रेमाची नोंद म्हणून घेतले जाऊ शकते, पण त्याच्या सखोल विश्लेषणाची आवश्यकता आहे. अशा प्रसंगाचे समाजावर कसे परिणाम होतात आणि ते काय दर्शवतात, हे महत्त्वाचे आहे.

समाजातील लिंग आधारित भेदभाव आणि विविध संस्कृतींतील अपेक्षा लक्षात घेतल्यास, प्रत्येक कृत्य आणि त्याचे परिणाम वेगवेगळ्या संदर्भात वेगवेगळ्या पद्धतीने ओळखले जातात. पुरुष आणि महिलांसाठी सार्वजनिक स्थळी किंवा कलेच्या क्षेत्रात अशा प्रकारच्या घटनेसाठी वेगवेगळे दृष्टिकोन असू शकतात.

### 1. **पुरुष आणि महिला यांच्यातील सार्वजनिक शारीरिक संपर्काचा समाजातील भेदभाव:**
पुरुष आणि महिलांच्या सार्वजनिक शारीरिक संपर्काबद्दल समाजातील दृषटिकोन अनेकदा भिन्न असतो. एक पुरुष, जो ख्यातनाम गायक किंवा कलाकार आहे, त्याने आपल्या चाहत्यांपासून गालावर चुम्मा घेतला तर त्याला समाजाच्या विविध गटांमध्ये वेगवेगळी प्रतिक्रिया मिळू शकतात. महिलांसाठी हा प्रसंग अनेकदा नकारात्मक रूपात, म्हणजेच त्या महिला समोर आलेल्या पुरुषाच्या कृतीत "शक्ती वापरण्याचे" किंवा "स्वतंत्र इच्छाशक्तीचा अभाव" असा अर्थ काढला जातो.

### 2. **चुम्बनाची अनुमती आणि सशक्त सहमती:**
महत्वाचं म्हणजे, चुम्बनाच्या या कृत्याला दोन्ही व्यक्तींची सहमती असावी लागते. जर महिला गायकासोबत घडलेल्या प्रसंगाच्या संदर्भात विचार केला, आणि एखादा पुरुष चाहत्यानं गालावर चुम्मा दिला, तर तिच्या प्रतिक्रियेनुसार हे प्रकट होईल की तिची सहमती आहे की नाही. पुरुष आणि महिला यांच्यात हे असं एका संवेदनशील किमान नीतिमानतेच्या दृष्टीकोनातून पाहिले जातं. महिलांना त्यांच्या इच्छेशिवाय कधीच अशा प्रकारच्या शारीरिक संपर्कास सामोरे जाऊ देणं समाजाच्या चांगल्या मानसिकतेशी जुळत नाही.

### 3. **समाजाची मानसिकता:**
समाजाच्या दृषटिकोनानुसार पुरुषांकडून अशा प्रकारची कृती काही प्रमाणात जास्त स्वीकारली जाते, पण महिलांकडून एक पुरुष चुकून, एखाद्या चाहता किंवा गायकाने अशी कृती केली, तर त्याचे सुसंस्कृततेच्या परिघात किंवा महिलांच्या अधिकारांच्या संदर्भात कसे मांडले जाईल, यावर चर्चा होईल. पुरुषांकडून महिलांवर शारीरिक कृत्ये, विशेषत: सार्वजनिक ठिकाणी, हे बहुधा "कला", "प्रेम", किंवा "आदर" म्हणून वर्णन केले जातात. मात्र, हे महिलांच्या बाबतीत अशा परिस्थितीत जास्त दृषटिकोन बदलू शकतात. जर तो पुरुष तिच्यावर दबाव आणत असेल किंवा तिला अप्रत्याशितपणे अशा प्रकारे संपर्क करत असेल, तर त्याला समाज निंदा करेल.

### 4. **हक्क आणि ताण-तणाव:**
एक पुरुष जबाबदार गायक किंवा प्रसिद्ध व्यक्ती म्हणून आपल्या चाहत्यांशी इमोशनल, कलेच्या किंवा सामाजिक भावनांच्या आधारे कनेक्ट करत असतो. असं कृत्य जर महिलेकडून घडलं, तर अनेकदा ते सौम्य आणि स्त्रीत्त्वाचे प्रतीक मानलं जातं. परंतु, जर महिलेला अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी तिच्या इच्छेचा आदर न करता शारीरिक संपर्क सामोरे जाऊ लागला, तर त्या महिलेला समाजाच्या धोरणात्मक नियमांच्या अंतर्गत एक अधिक योग्य ती प्रतिसाद मिळवायला हवं. तिचे अधिकार आणि स्वत:च्या नियंत्रणाचे अधिकार महत्त्वाचे आहेत.

त्याने कन्सेंट शिवाय असं करणं चुकीचंच आहे...
>>> बरोबर... पण त्या फॅन मुलीने देखील कुठे कन्सेंट घेतला होता उदित ची पप्पी घेण्या अगोदर...

उदीतचे जुने विडिओज दिसताहेत ज्यात त्याने अलका याद्निक व श्रेयाच्या गालावर किस केलेले दिसतेय. श्रेयाची प्रतिक्रिया पाहुन तिला आवडले नसल्याचे स्पष्ट दिसतेय पण कित्येकदा ओळखीच्या लोकांत व वय्/हुद्दा पाहुन दुर्लक्षित केले जाते
तसे बहुतेक तिचे तेव्हा झाले.

हा नवा विडिओही पाहिला. त्या मुलीने सुरवात केली, उदीतही गालावर किस करायला गेला पण तिने चेहरा परत त्याच्याकडे वळवल्यामुळे तो ओठांवर गेला आणि मग त्याने व्यवस्थित परत किस केला ज्यात त्याने चांस मारला हे स्पष्ट होते.

मागे रिचर्ड Gere नेही शिल्पा शेट्टीवर असाच चांस मारलेला. men will be men.

च्रप्सशी सहमत. एखाद्या तरुण स्त्री सेलेब्रिटीने असे केले असते तर ती ट्रोल झाली नसती. वृद्ध सेलेब्रिटीने तरुण मुलासोबत केले असते तर नक्कीच ट्रोल झाली असती.

आमच्या ऑफिसात असाच एक प्रसंग घडला होता ज्यात एका स्त्री सहकार्‍याचा एका पुरुष सहकार्‍याला चुकीचा स्पर्श चुकुन झाला. हे सगळ्यांसमोर झाले . ऑफिसात वातावरण खेळीमेळीचे होते, तिने लगेच सॉरी म्हटले. तो पुरुष लगेच म्हणाला की आम्ही असे केले की समोरुन चप्पल निघते, तुम्ही असे केले की आम्ही मात्र थँक्यु म्हणायचे. Happy

तो पुरुष लगेच म्हणाला की आम्ही असे केले की समोरुन चप्पल निघते, तुम्ही असे केले की आम्ही मात्र थँक्यु म्हणायचे. >> Well said.

गंमत म्हणजे याच प्रतिसादात men will be men हा टोमणा पण मारला आहे. पद्मिनी कोल्हापुरे आणि प्रिन्स चार्ल्सचा प्रसंग बहुधा विस्मृतीत गेला असावा.

प्रतिसादांतही डबल स्टँडर्ड्स दिसताहेत.

उदित हाशमी हे नाव कधी ऐकलं नव्हतं. शोधल्यावर हे कोणाबद्दल चाललंय ते कळलं.

पद्मिनी कोल्हापुरेने प्रिन्स चार्ल्सवर चान्स मारला होता.

साहिल साराभाईला त्याच्या आईची एक मैत्रीण - म्हणजे तो तिला मावशीच म्हणायचा - तो पौगंडावस्थेत आला तरी किस करायचे. नक्की आठवत नाही, पण बहुतेक ओठांवर.

बाय द वे, उदित नारायणला एका वेळी दोन बायका आहेत ना? त्याला कायद्याने काही शिक्षाबिक्षा झाली नाही का?

मागे दोन लग्नांबाबत सोलापूर न्यायालयाने एक निर्णय दिल्याचे आठवते. सोलापूरच्या कुणी दोन बायका केल्या, ते व्हायरल झालं आणि मग कुणीतरी त्याबद्दल तक्रार केली. तेव्हा न्यायालयाने हा दखलपात्र गुन्हा नाही असे सांगुन त्यावर कारवाई करण्यास नकार दिला.
म्हणजे पीडित व्यक्तीने तक्रार केली तरच कारवाई.

---
उच्च न्यायालयाने नव्हे, सोलापूर न्यायाल्याने.
बातमी

म्हणजे पीडित व्यक्तीने तक्रार केली तरच कारवाई.
>>>>
ज्याचे लग्न जुळत नसेल ती व्यक्ती पीडित धरली जाऊन तक्रार करू शकते का? या दोन बायकोवाल्या पुरुषांमुळे माझ्या वाटणीची बायको गेली..

त्याच्या वाटणीची बायको पळवून घेऊन गेला असेल आणि तिची पण तक्रार असेल तर ती व्यक्ती पीडित घरली जाऊ शकेल.
काही राज्यांनी युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू केलेला आहे. काही राज्यात एकाच महीलेच २-३ भावांबरोबर लग्न करण्याचीही प्रथा होती.

ज्याच्या बायकोची वाटणी गेली त्यानेसुद्धा त्या दोन बायकांसोबत किंवा त्यातल्या एकीसोबत लग्न करावे. दोन बायका चालतात, तर दोन नवरेही चालायला हवेत.

उदित नारायण, मनोज बाजपेयी या यु पि/बिहारी बाबुंची इथे येण्याआधी तिकडेच लग्ने झालेली होती. इकडे येऊन ते शहरी स्मार्ट झाले पण तिकडचे कुटुंब होते तसेच राहिले. इकडचे स्मार्ट कुटुंब भेटल्यावर नवा संसार मांडला. तिकडचा पण सुरु असेल कदाचित.

बालविवाह होत असेल तर तक्रार नसली तरी पोलिस हस्तक्षेप करुन विवाह बंद करतात्/करायचे हक्क आहेत. पहिला विवाह कायद्याने संपला नसताना दुसरा केला तर जोवर तक्रार नाही तोवर हस्तक्षेप करायचा अधिकार पोलिसांना नाही/नसावा.

https://hindi.news18.com/news/entertainment/bollywood-when-singer-udit-n...
उदित नारायणची पहिली बायको महिला आयोगाकडे गेली होती. पोलिससुद्धा आले होते. बातमीत लग्नाचं जे वर्ष दिलंय त्यावरून तो बालविवाह वाटत नाही.

धर्मेंद्रचं पण बिचार्‍याचं असंच झालं. त्याला तर तिसरी , चौथी बायको करावी असंही वाटू लागलं, असं फिल्मी मॅगॅझिन्स छापायची.

आणि लोक अमीर, सैफ यांच्या नावाने बोटं मोडतात. त्यांनी तर पहिल्या पत्नीपासून रीतसर वेगळं होऊन मग दुसरं लग्न केलं. इथेही डबल स्टँडर्ड्स.

मौजा ही मौजा.

त्याला तर तिसरी , चौथी बायको करावी असंही वाटू लागलं, असं फिल्मी मॅगॅझिन्स छापायची.
>>>

याला गॉसिप म्हणतात Happy

आणि लोक अमीर, सैफ यांच्या नावाने बोटं मोडतात. त्यांनी तर पहिल्या पत्नीपासून रीतसर वेगळं होऊन मग दुसरं लग्न केलं.
>>>

म्हणून शाहरूख ग्रेट आहे
आणि भारतीय महिलांचा आवडता आहे Happy

विषयांतर नको प्लिज... धागा उदित बद्धल आहे... उदित ची तुलना शाहरुख बरोबर नको.. माया मेमसाब सोडला तर ऑन स्क्रीन शाहरुख ने कोणाला किस केलेले माहित नाही...

माया मेमसाब सोडला तर ऑन स्क्रीन शाहरुख ने कोणाला किस केलेले माहित नाही...>>>>कटरीना ला कीस केले आहे जब तक है जान या चित्रपटामध्ये.

चुम्बनाची अनुमती आणि सशक्त सहमती

>> AI कॅरॅक्टर्सचे इंस्टाग्राम / युट्यूब प्रोफाईल असतात हे माहीत होते. मायबोलीवर सुद्धा आयडी आहे हे आज कळले.

ते कतरीनाने केले होते>>>> अगदी बरोबर आहे तुझं शाहरूख चा यात काहीच सहभाग नाहीये म्हणजे हा किस वॅलिडच ठरत नाही.

माणसं सहजासहजी चुका मान्य करत नाहीत Ai करतो का ?

शाहरुख ने पहिलं किस केलंय. जब तक है जान पाहिला नाहीस का ?कसला शाखा फॅन रे तू नीट बघ ट्रेन स्टेशनवरचा सीन 48 मिनिटाला, तो किस एकतर्फी की दूतर्फी ते बघून ठरव. आणि नेटफ्लिक्स वर शोधू नकोस नाहीये प्राइम वर बघ. तुझ्यामुळे जब तक है जान परत बघावा लागला आणखी काय काय बघावं लागणार आहे ...!

जब तक है जान पाहिला नाहीस का?
>>>
पूर्ण नाही पाहिला. तुकड्यात पाहिला आहे.

मुळात शाहरूख kiss करत नाही हा दावा माझा नव्हता.
किंबहुना किस करण्यात काही गैर नाही.
मी सुद्धा करतो Happy

हा दावा माझा नव्हता >>>> हो तो प्रतिसाद च्रप्स यांच्या साठी होता तू मध्ये तडमडलास . आणि तुकड्या तुकड्या मध्ये पाहून काय उपयोग पूर्ण चित्रपट किस वरच होता, किस केलं की शाहरुख मरणार नाय केलं तर शाखा ला अजून सहन करा.

Pages