किसर उदित हाशमी

Submitted by च्रप्स on 4 February, 2025 - 12:56

काही दिवसांपूर्वी मी पुरुष आणि महिलांमधील दुहेरी निकषांवर एक लेख लिहिला होता. त्यात काही महिला एका भारतीय अभिनेत्याच्या आंघोळीबद्दल बोलत होत्या. त्या सीनची त्या आतुरतेने वाट पाहत होत्या, आणि त्यांच्या चर्चेत हे अगदी सहज आणि सामान्य मानलं जात होतं. तिथे काही पुरुषही होते, जे त्या स्त्री आयडी मध्ये भाव वाढावा म्हणून आणखी लिंका देत होते...

आता उदितच्या प्रसंगाकडे पाहूया. सध्या एक व्हिडिओ व्हायरल आहे—त्यात एक महिला उदितच्या गालावर चुम्मा करते, आणि त्यानंतर उदित वळून तिच्या ओठांवर चुम्मा करतो. जर नीट पाहिलं, तर ही गोष्ट त्या महिलेनेच सुरू केली. तिने आधी उदितच्या गालावर चुम्मा दिलं, आणि मग उदित वळून तिला चुम्मा देण्याचा प्रयत्न करतो, आणि तिच्या ओठांवर चुम्मा होतो.

आता विचार करा—हा प्रसंग जर एखाद्या महिला गायकासोबत घडला असता, तर? एखादा पुरुष चाहत्यानं तिला गालावर चुम्मा दिला असता, तर त्याला समाजाने सहज स्वीकारलं असतं का?

व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतं की त्या महिलेनेच आधी उदितच्या गालावर जबरदस्तीने चुम्मा दिला. त्यानंतरच तो वळून तिला चुम्मा करतो.

यात उदितची काही चूक आहे का? त्याने चाहत्यांना चुम्मा देणं योग्य आहे का? Thoughts ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो तो प्रतिसाद च्रप्स यांच्या साठी होता तू मध्ये तडमडलास

>> च्रप्स हा ऋन्मेषचाच डू आयडी आहे हे ठाउक नाही का तुम्हाला???

च्रप्स हा ऋन्मेषचाच डू आयडी आहे. >>>> तसं असेल तर ठीक आहे . नाहीतरी ऋन्मेश ठराविक काळाने स्वतःचे सगळे आयडी डिक्लेयर करत असतो हाही असेल तर करेलच, तितका प्रामाणिक आहे.

Pages