चिनीमातीची भांडी - क्रॉकरी

Submitted by ऋतुराज. on 10 January, 2025 - 10:57

आपल्याकडे चहाचे कप, बश्या, प्लेट, वाडगे, चटण्या-लोणच्याच्या बरण्या अशी मोजकी चिनीमातीची भांडी असतातच. पण त्यात खूप वैविध्य असते. काही जणांकडे तर खूप सुंदर कलेक्शन असते.
तर चिनीमातीची भांडी - क्रॉकरी या विषयावर चर्चा करण्यासाठी हा धागा. शीर्षक चिनीमातीची भांडी असे असले तरी इथे तुम्ही माती, चिनीमाती, काच, बोनचायना, क्रिस्टल, रंगीत क्रिस्टल अश्या क्रॉकरीची चर्चा करू शकता आणि तुमच्याकडे असणाऱ्या क्रॉकरीचे फोटो टाकू शकता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रमड किटली अतिशय सुंदर आहे.

सामो, तुझ्या प्लेट्सदेखिल सुरेख दिसतायत.

सिरॅमिकमधे काळा रंग फारच दिमाखदार दिसतोय.

@ ऋतुराज - तो infuser cup कसा वापरायचा? मध्ये जाळी असलेला infuser cup बघितला आहे - पण यात तशी जाळी नसावी.>>>>> माधव, त्यातपण जाळी आहे. फोटो काढताना जाळी काढून टाकला आहे.

अल्पना,
प्लेन काळी पोर्सेलीन प्लेट, त्यातील रंगीबेरंगी पदार्थ, वाढणी .....एकदम भारी आहे.

अनिंद्य,
पांढरे पोर्सेलीन सूप बोल्स अगदी elegant आहेत. त्यात पडलेल्या सावलीमध्ये वेगळीच ग्रे पांढरी डिझाईन झाली आहे.

मामी,
जार आणि निळे बोल मस्तच.

सामो
अष्टकोनी बोल आणि प्लेट...सुंदर.

माझ्याकडे २ सुंदर कुंड्या आहेत त्यांचा फोटो टाकते. >>> टाक टाक रमड.

इथलं सगळं ढापू का>>>>> किल्ली, मी आहे लायनित आधीच Lol

रमड, खूप सुंदर आहे किटली.
त्या लिझीकी कडे होती का अशी/ अशापैकी?

थँक्यू सगळ्यांना Happy
माझ्याकडच्या कुंड्यांचे फोटो टाकते आहे -

Screenshot_20250127_080751_Gallery.jpg

सजावटीच्या वस्तू चालणार असल्यामुळे माझ्याकडे अजून एखाददुसरा आयटम निघण्याची शक्यता आहे Happy

कुंड्या सुंदर आहेत, पण रिकाम्या का ?

एकूणच पांढरा + निळा हे सर्वाधिक पसंती लाभणारे कलर कॉम्बो दिसतेय.

वाह. मस्त आहेत कुंड्या.

पांढरा + निळा हे सर्वाधिक पसंती लाभणारे कलर कॉम्बो दिसतेय. >>>> खरंय आणि सिरॅमिकवरचा निळा रंग अगदी लखलखता दिसतो.

कुंड्या सुंदर आहेत, पण रिकाम्या का ? >>> झाडं आणायची आहेत अजून Happy त्यांच्यात कुठली झाडं चांगली दिसतील असा विचार चालू आहे Proud

रमड, कुंड्या खूपच सुंदर आहेत.

एकेकाळी ब्लू पॉटरी खूप मौल्यवान समजली जायची कारण तेंव्हा निळा रंग बनवणे खूप कठीण होते. आता तशी परिस्थीती नाही पण तरी ब्लू पॉटरी रॉयलच वाटते.

त्यांच्यात कुठली झाडं चांगली दिसतील असा विचार चालू आहे. >>> Succulents, Jade plant मस्त दिसतील.

Succulents, Jade plant मस्त दिसतील.
+१

किंवा Aglaonema किंवा white Aralia सारखी पांढऱ्या पानांची (पांढऱ्या पायाची नव्हे Happy ) रोपे रंगसंगतीला छान दिसतील.


.

धन्यवाद लोक्स! Happy खूप छान छान सजेशन्स आली आहेत झाडांसाठी. चेक करते. जेड एक आहे आत्ता. सो दुसरं काहीतरी लावेन.

अनिंद्य , फुलांचा सडा चांगला असला तरी ती एकाबाजूची फुलं जास्त छान दिसत होती Happy

सामो , काय क्यूट बोल! Happy

अनिंद्य, फुलांच्या सड्याची प्लेट आवडली.
रमड, कुंड्या मस्त आहेत. हिरव्या पांनाची सगळीच झाडे छान दिसतील.
Jade plant, Aglaonema>>>> +१
मनीप्लांट फ्लूरोसेन्ट रंगाच्या पांनाचा पण छान दिसेल.
सामो , क्यूट बोल!

Screenshot_20250129-105626_Gallery.jpg
वर जो काचेचा glass आहे... त्याच set मधला हा jar आहे...अजून बरेच आहेत..नंतर टाकेन...

मोक्षू
काचेचा जार, ग्लास आणि ते चमच्याच स्टँड आवडलं

हे माझ्याकडचे शॉट ग्लासेस पण हे तुर्कीश कॉफीसाठी जास्त छान वाटतील. जरा मोठे असते तर पियुषसाठी.
shot glasses.jpg

आणि या करेलच्या प्लेट्स. अश्या पावभाजी स्टाईल चायना प्लेट्स फार कमी मिळतात. या घेतल्या तेव्हा मॅचिंग बोल्सचा एक्सट्रा सेट घ्यायला हवा होता. आता हे डिझाईन मिळत नाही.
corelle plate.jpg

काळ्या प्लेट्स, केटल, काळे बोल्स, आयकियाचे बोल्स आवडले. मी ते बोल्स घेणार होते पण काही कारणाने राहून गेले. आता परत ईच्छा होतेय.
केटलमधून चहा सर्व्ह करणे मला अजूनही उच्चभ्रु वगैरे वाटते. पण तसला चहा घरात कुणी पिणार नाही.

शॉट ग्लासेस ❤
मी यात कैरी किंवा आवळ्याचे पन्हे सर्व केले असते. कडांना पिंक सॉल्ट किंवा salt crystals + लाल मिरची पावडर लावून.

चमच्याचे स्टँड = नॉव्हेल डिजाइन !

… केटलमधून चहा सर्व्ह करणे मला अजूनही उच्चभ्रु वगैरे वाटते. पण तसला चहा घरात कुणी पिणार नाही.…

सेम. गार होतो म्हणे चहा. उकळता गरम चहा बशीत घालून फुर्र ssss असा आवाज न करता शिष्टसंमत सिपिंग करत “घरात” चहा पिण्यात काही राम नाही ह्याबद्दल दुर्मिळ असे एकमत आहे आमच्या घरात Lol

माझेमन
शॉट ग्लासेस भारीच आहेत.
ती प्लेट पण मस्त. अशा दिसत नाहीत आता.

मी यात कैरी किंवा आवळ्याचे पन्हे सर्व केले असते. कडांना पिंक सॉल्ट किंवा salt crystals + लाल मिरची पावडर लावून.>>>>> आवडली आयडिया

उकळता गरम चहा बशीत घालून फुर्र ssss असा आवाज न करता शिष्टसंमत सिपिंग करत “घरात” चहा पिण्यात काही राम नाही ह्याबद्दल दुर्मिळ असे एकमत आहे आमच्या घरात>>>> same here Lol

मोक्षुचा स्ट्रॉबेरी बोल, रंगेबिरंगी कुल्हड विशेष आवडले.

माझेमनचे शॉट्सचा क्यूट आहेत. खड्ड्यांच्या कोरेल डिशेस पहिल्यांदाच पाहतेय. मस्त आहेत.

Green Hearts चखना सर्वर.

एकदम दिलपसंद !

35f4f4db-5538-46a9-9ec8-98edd1a2b6b7.jpeg

५ वर्षांपूर्वी मैत्रिणीकडून रिटर्न गिफ़्ट म्हणून आलाय.

पोर्सोलिन + good quality लाकडी हथ्था असे कॉंबो सहसा मिळत नाही म्हणून याचे लाडकोड जास्त. Happy

Soft paste porcelain असावा कारण विशेष नाद नाही येत याचा.

आतल्या खाद्यपदार्थांनी लक्ष विचलित होऊ नये म्हणून रिकाम्या सर्वरचा फोटो काढलाय, बाकी काही नाही Happy

Pages