चिनीमातीची भांडी - क्रॉकरी

Submitted by ऋतुराज. on 10 January, 2025 - 10:57

आपल्याकडे चहाचे कप, बश्या, प्लेट, वाडगे, चटण्या-लोणच्याच्या बरण्या अशी मोजकी चिनीमातीची भांडी असतातच. पण त्यात खूप वैविध्य असते. काही जणांकडे तर खूप सुंदर कलेक्शन असते.
तर चिनीमातीची भांडी - क्रॉकरी या विषयावर चर्चा करण्यासाठी हा धागा. शीर्षक चिनीमातीची भांडी असे असले तरी इथे तुम्ही माती, चिनीमाती, काच, बोनचायना, क्रिस्टल, रंगीत क्रिस्टल अश्या क्रॉकरीची चर्चा करू शकता आणि तुमच्याकडे असणाऱ्या क्रॉकरीचे फोटो टाकू शकता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>>>>>ही माझ्याकडची एक सिरॅमिकची ओवल सर्विंग प्लेट. मी यात सहसा तळलेले आयटेम्स सर्व करते. माझी अतिशय आवडीची प्लेट आहे.
पिवळसर रंग खूपच छान आहे प्लेट.

सामो मग सुंदर आहे मी पण मग चा फोटो टाकायला आले होते
हा माझा मग IMG_20250125_073000.jpg

यात सध्या मी ग्रीन टी पिते जी मला अजिबात आवडत नाही त्यातल्या त्यात ही वाघबकरीची हनी अँड लेमन बरी लागते . नाहीतर ग्रीन टी पिणे एक सजा आहे सजा.
मगाच्या मापा एवढा चहा फक्त खारी बटरं असली की प्यायला जातो

तुमच्या मित्राची चॉइस उच्च आहे.+1
हा आमच्याकडे गंगटोक वरून भेट आलेला Tea Mug with infuser. आमीपन हा वापरत नाही शो पुरता आहे.

IMG_20250125_121026.jpg
इंफुजर शब्द बघून पाहिलं गूगल केलं Lol मला खरच माहीत नव्हता हा शब्द.
( Infuser म्हणजे काहीतरी उकळत्या द्रव्यात भिजवणे किंवा इन्फ्युज करणे. इन्फ्युज करण्याच्या प्रक्रियेतून तयार होणाऱ्या द्रवालाही इन्फ्युजन म्हणतात. -- माझ्यासारखी इंग्लिश ची बोंब असणाऱ्या मराठी मिडीयम च्या लोकांसाठी)

वा ऋतुराज, सुरेख आहे तो मग.

सिमरन... हो गंगटोकला हे असे मग्ज मिळतात. मी तिथून बरेच आणले होते लोकांना भेट द्यायला. आता घरी दोनच उरलेत झाकणंही नाहीत. पण तुला झब्बु देते.

IMG_20250125_130520_(1080_x_1080_pixel).jpgIMG_20250125_130422_(1080_x_1080_pixel).jpg

Infuser कलेक्शन सुंदर !

जे डिप डिप वाला चहा पितात त्यांनी रोज वापरात आणायला हरकत नाही Happy

अनिंद्य यांच्या पास्ता प्लेट्सना झब्बु.

या प्लेट्स खूप जुन्या आहेत. पूर्वी मुंबईत माटुंग्याला Magnet नावाचं सुपर मार्केट होतं. तिथे मिळाल्या होत्या. बॉर्डरला ग्रे रंगावर जे गोल आहेत ते अगदी फिकट गुलबट रंगाचे आहेत.

IMG_20250125_135918_(1080_x_1080_pixel).jpgIMG_20250125_135924_(1080_x_1080_pixel).jpg

सिमरन,
तुमचा infuser कप सुंदर आहे, ब्राईट रंग.
इंफुजर शब्द बघून पाहिलं गूगल केलं Lol मला खरच माहीत नव्हता हा शब्द.>>>>> मलाही माहीत नव्हते. आधी गुगलले मग खरडले.
इथे उच्च अभिरुची Lol जपण्यासाठी तो शब्द शोधला. नाहीतर आम्हीही त्याला चहाचा कपच म्हणत असू. Biggrin
माझ्यासारखी इंग्लिश ची बोंब असणाऱ्या मराठी मिडीयम च्या लोकांसाठी>>>>> मी ही ह्यातलाच. मला आप्ल म्हणा Lol

मामी,
कप आणि प्लेट सुंदर. बॉर्डर डिझाईन मस्त.

मराठी- इंग्रजी मिडियमचा इश्यू नाही हो.

कप बशी आणि क्रोकरी वगैरे आपल्याकडे बाहेरूनच आलेत. आपले नेटिव्ह मातीचे कुल्लड / पानांचे द्रोण. मग पुढे धातूची भांडी. म्हणून की काय अनेक वस्तुंना योग्य मराठी नावें अजूनही नाहीत.

रच्याकने आदल्या पीढीतील कित्येक लोक धातूच्या भांड्यातच चहा पीत होते. चीनी माती/ (बोन)चायना/ ग्लास, क्रिस्टल बदनाम होते. बोन चायना नावामुळे ह्या सर्वातच हाडांचा चुरा असतो, वस्तू अपवित्र असतात हे अगदी ठाम मत होते.

कप बशी आणि क्रोकरी वगैरे आपल्याकडे बाहेरूनच आलेत. आपले नेटिव्ह मातीचे कुल्लड / पानांचे द्रोण. मग पुढे धातूची भांडी. म्हणून की काय अनेक वस्तुंना योग्य मराठी नावें अजूनही नाहीत.>>>>>> अगदी बरोबर....

अनिंद्य, सांबार-रैस वाला बोल मस्तच. तुमच्या विरोधी पक्षाची चॉइस चांगली आहे - उदा. तुम्ही स्वतः ! आता त्या बोलला चांगलं म्हणायचं का वाईट ते ठरवा :). (रच्याकने सांबार-रैस याच्यापुढे काही सुचूच कसं शकतं ? सांबार-रैस हा इतर काही न सुचल्यामुळे बनवण्याचा पदार्थ नाही. इतरत्र द्यायचा प्रतिसाद इथेच दिला - आळस दुसरं काय) वाढणी पण जबरदस्त आहे त्या दोन पदार्थांची.

मंद हळवासा वगैरे पण वाटतंय का >>> वाटतोय की. पण मग असा विचार केला की वाढलेल्या पदार्थाला विसंगत वाटेल. म्हणजे शुद्ध देशी खणखणीत (झणझणीत असंलच पाहिजे असं नाही म्हणून खणखणीत शब्द वापरलाय) चवीचे सांबार आणि मंद हळवासा बोल हे विरोधी होतील.

@ ऋतुराज - तो infuser cup कसा वापरायचा? मध्ये जाळी असलेला infuser cup बघितला आहे - पण यात तशी जाळी नसावी.

IMG-20240928-WA0005.jpg
अनिंद्य आणि मामी च्या पास्ता प्लेट्स ना माझा झब्बू. माझ्या अगदी प्लेन काळ्या पोर्सेलीन च्या प्लेट आहेत. खूप जुन्या नाहीत,6-7 वर्षे झाली असतील पण वापर मात्र खूप होतो. पास्ता, नूडल्स, भात आणि ग्रेव्ही, रगडा पॅटीस, पोहे अश्या बऱ्याच पदार्थाना वापाल्या जातात या प्लेट.

छान आहे सेट. फोटो मस्त काढलाय. त्या दृष्टीभ्रमाच्या फोटोसारखा आलाय. बघत राहिलं तर बोल उलटे दिसायला लागतीलही.

बोल्स मस्त व तो पिचरही छान.
मुनिया पक्षी असतो ना त्याच्या गळ्यावरती ते ठिपके असतात Happy तसा आहे तो उजवीकडचा शेवटचा बोल. मला आवडला आणि तो रिंगांचा, डावीकडुन दुसराही.

मामी तुझ्याकडचं ते पोपटी-निळं पिंपळपानच मला फार फार आवडलं गं. हॅन्ड मेड व युनिक वाटतय.

>>>> बॉर्डरला ग्रे रंगावर जे गोल आहेत ते अगदी फिकट गुलबट रंगाचे आहेत.
गुलाबी-करडे मस्त असते कॉम्बो.
तसेच अफाट आवडणारे अजुन एक कॉम्बो म्हणजे - चंदेरी व करडे.

इथे फक्त स्वयंपाकघरात वापरायच्या वस्तूंचेच फोटो हवेत असं नसेल तर माझ्याकडे २ सुंदर कुंड्या आहेत त्यांचा फोटो टाकते.

अजून एक किटली आहे . तिला विसरले होते. तिचा आज फोटो टाकते नक्की.

वरच्या सगळ्या वस्तू खूप सुंदर आहेत.

धन्यवाद अनिंद्य, सामो.

मामी तुझ्याकडचं ते पोपटी-निळं पिंपळपानच मला फार फार आवडलं गं. >> कमळपान. हो, त्याचा चांगला फोटो अजून टाकायचा आहे मला. उद्या टाकते. हो हॅन्डमेडच आहे. फार क्युट आहेत ती पानं.

इथे फक्त स्वयंपाकघरात वापरायच्या वस्तूंचेच फोटो हवेत असं नसेल तर माझ्याकडे २ सुंदर कुंड्या आहेत त्यांचा फोटो टाकते. >>> टाक टाक रमड. मोअर द मेरियर.

Pages