डबल स्टँडर्ड्स- ऑब्जेक्टिफायिंग मेन vs वुमन

Submitted by च्रप्स on 12 January, 2025 - 14:37

आजकाल मायबोलीकर वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करतात, काही सहजगत्या तर काही गंभीरपणे विचार करण्यास लावणाऱ्या. असाच एक धागा ( मराठी चित्रपट) वाचताना लक्षात आलं की काही महिला काही मराठी पुरुष अभिनेत्याच्या सिनेमातील शॉवर सीनबद्दल चर्चा करत होत्या, आणि त्याबद्दल अधिक पाहण्याची इच्छा व्यक्त करत होत्या. त्याच धाग्यावर पुढे एका पुरुषानेही अशा प्रकारच्या दृश्यांबद्दल टिप्पणी केली होती- की हा अमुक अमुक चित्रपट मधे अजून एक सिन आहे त्या अभिनेत्याच्या अंघोळीचा… मनात सहज प्रश्न आला—ही कामुकता (sexualization) आहे का? आणि जर आहे, तर ती फक्त महिलांबद्दल बोलली गेल्यावरच कामुकतेची व्याख्या होते का?

कल्पना करा की हीच परिस्थिती उलट असेल. पुरुष लोक एका अभिनेत्रीच्या शॉवर सीनबद्दल चर्चा करत असतील आणि तो पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हणत असतील. तेव्हा आपण काय म्हणू? समाजात अशा प्रकारचं वागणं सामान्य समजलं जातं का?

कामुकता ही आपल्या समाजात दोन वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिली जाते. जर पुरुषांनी अशा प्रकारचं वर्तन केलं, तर त्यावर लगेच टीका होते. त्यांना “भोगवादी” (objectifying) म्हटलं जातं. पण जर महिलांनी असं केलं, तर त्याला तितकंसं गांभीर्याने घेतलं जात नाही. इनफॅक्ट तिथे पुरुष आयडी देखील अंघोळ क्लब वगैरे म्हणतोय…

हे बरोबर आहे का???

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे कुठे कितीही हाणामारी होऊ दे.. माझी काय चूक त्यात.. उगाच कोणत्याही आयडी कोणाशीही जोडतात रानभुली…
मधे केशवकुल म्हणजे झंपू म्हणत होत्या.. आता मी वेमा आहे म्हणतात…
माझ्या धाग्याची कशाला वाट लावतायत? कुठे फेडाल ही पापे…

उबो
तुम्ही मला ट्रोल करत आहात. तुमची आणि च्रप्स यांची ट्रोलिंगची शैली सेम टू सेम आहे.
माझे काय ट्रोलिंग झाले याच्याशी तुम्हाला घेणं देणं नाही पण वेमांचे ट्रोलिंग झाले म्हणून तुम्ही उडी घेताय, तुमचा संबंध नसताना. अशा लोकांना इग्नोर करणे अशक्य झाल्यावर उद्धट भाषेतच सांगावे लागते. सरळ भाषेत समजत नसेल त्यांना हीच भाषा कळते.
कुणीही नॉर्मल मनुष्य असता तर तो दोन्हीही बाजू विचारात घेत असतो. एक तर्फी सल्ला देणारे एक तर क्रिमिनिल बॅकग्राऊंडचे असतात किंवा महामूर्ख. अशा दोन्हींनाही मी उत्तर देत नाही.

गेली चार वर्षे याच विचाराने उत्तर दिले नाही पण आता मात्र कळस झाल्याने हे काम हातात घेतलेले आहे. सगळी कामे बाजूला ठेवून अंजली दमानिया यांचा आदर्श घेऊन तडीस जाईपर्यंत प्रकरण लावून धरणार आहे.

मला अमेरिकेतला वकील परवडतो कि नाही याचे फुकट सल्ले देऊ नका. तुम्ही खूप हुषार आहात इतके कि अमेरिकेची राज्यघटना तुमच्याच हुषारीने लिहीली गेली हे मला खरे वाटते. आता भारत सरकारने ज्या वेबसाईट्स आणि टिकटॉक सारखे अ‍ॅप याच्यावर बंदी घातली ती त्या त्या देशाच्या ज्युरीसडिक्शन मधे केस दाखल करून का याचा तपास करा. तुम्ही भयंकर हुषार असल्याने अशक्य नाही ते. पुन्हा ट्रोलिंग करू नका. तुम्हाला कुणी ट्रोल केलेले नाही त्यामुळे समजून घ्या.

च्रप्स झंपू आणि वेमा वेगवेगळे आहेत का ?
या धाग्यावरचे माझे दोन प्रतिसाद न कळवता लगेच कसे डिलीट झाले ? कसे कळले वेमांना ? कसे कळले कुठल्या धाग्यावर क्लिक करायचे ?
वेमा हे च्रप्स या आयडीने जे करत आहेत ते शोभतंय का ?
दोन मिनिटात माझा प्रतिसाद डिलीट कसा काय झाला ? दोन वर्षे कळवूनही माझ्या धाग्यावरचे ट्रोलिंग कसे थांबले नाही ?
पुन्हा विचारणार का वेमा तुम्ही हा प्रश्न ?
कुठल्या आयडीने विचारणार ?

याचा जर शास्त्रीय सर्व्हे झाला तर ? पुरूषांवर एव्हढा अन्याय होतो का ? काय टक्केवारी असेल ? लैंगिक शोषणाचे बळी पुरूष होतात अशी स्त्री सत्ता स्थापन झालीय का ? झाली असेल तर मग आवाज उठवला पाहीजे. पण खरंच झाली आहे का ? अपवादाला नियम बनवणे, व्यक्त होऊ पाहणार्या स्त्रियांना लागलीच लक्ष्य बनवणे हे समाजात राहण्याच्या लायकीच्या नसलेल्या व्यक्तीचं लक्षण आहे.
>>> waah

रानभूली..
तुमची उरलेली कथा कुठे वाचता येईल हेही जेन्युईन वाचकांसाठी तिथे लिहून ठेवा.
मी वाचायला सुरुवातच केली नाही अजून तिथल्या वाचकांची पुढच्या भागासाठीची प्रतीक्षा बघून.
क्लोजर मिळणार असेल तरच वाचेन.
नाहीतर डोक्याला ' वर्तुळ ' लागते.

पियू
दोन वर्षे या ट्रोलिंग मुळे जे जे मी जमा केले होते त्याची संगती कशी लावायची हे डोक्यातून निघून गेलं. आता ते सगळं आठवून लिहीणे खूप अवघड आहे.
नवीन कथा सुचतेय. पण इथलं ट्रोलिंग आणि गेल्या दोन दिवसांत मी सुद्धा जशी वागतेय ते बघून इथे देणं बरोबर होणार नाही.
प्रतिलिपीच्या Admin शी बोलून मग तिथे पोस्ट करीन. लिंक देईनच.
Thank you

रानभुली माझ्या माहितीप्रमाणे आता अडमिन समीर सरवटे आहेत तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे.ते असं का करतील? मी तुमचं सगळं लेखन वाचलं नाही पण एक कथा वाचली आहे .छान लिहीता तुम्ही प्लीज लेखन उडवू नका आणि आयडीही .आयडी उडाला की लेखही शोधता येत नाहीत. तुम्हाला काही ट्रोलिंग त्रास झाला असेल तर दुर्लक्ष करा . तुमचे फॅन्स ही आहेत हे लक्षात घेऊन लेखन उडवू नका ही विनंती.

सामो, तुम्ही मायबोलीवर तशा नवीन आहात. आयडी स्त्री असली म्हणजे आयडीमागची व्यक्तीही स्त्रीच असेल असं नाही.

मूळ लेखातल्या विषयाबद्दल - ज्यांना ओब्जेक्टिफाय केलं जातं त्यांना ते माहीत असतं, हवंही असतं , फक्त चित्रपट मालिकाच कशाला, पर्सनल रील्स आणि फोटोही साक्ष देतील.

आयडी स्त्री असली म्हणजे आयडीमागची व्यक्तीही स्त्रीच असेल असं नाही. >>>ट्रोलिंगचं हे समर्थन आहे का? या संशयाने केलेले अश्लील ट्रोलिंग तुमच्या मते योग्य आहे का? ट्रोलिंग होत असताना तुम्ही कधीही तिकडे प्रतिसाद दिल्याचे आठवत नाही. ज्याची त्याची आवड.

मूळ लेखातल्या विषयाबद्दल - ज्यांना ओब्जेक्टिफाय केलं जातं त्यांना ते माहीत असतं, हवंही असतं>>> भरत तुमच्याकडनं ह्या अशा वाक्याची अपेक्षा नव्हती. सरसकट सगळ्यांनाच हे असं हवं नसतं हो.
छान साडी नेसून नटुन थटुन हळदी कुंकवाला बायका निघाल्या की त्यांना आपण चार चौघात चांगलं दिसावं, असा जेन्युईन भाव असू शकतो. का ओम्या गोम्या ने आपल्याला ओबजेक्टीफाय करावं असं प्रत्येकीला हवय???

भरत यांच्या मी कोट केलेल्या वाक्याशी फक्त मी सहमत आहे. मला इतर मुद्यांमध्ये गुंतवले जाऊ नये ही अपेक्षा व विनंती!

मी ते अभिनेत्यांबद्दल लिहिलं आहे. माझ्या समजुतीनुसार धागाही त्याबद्दलच आहे. मूळ गश्मीरची अंघोळ.
तसंच आधीचं वाक्य फक्त सामो यांच्या प्रतिसादातील विशिष्ट वाक्याबद्दल आहे.

मी ते अभिनेत्यांबद्दल लिहिलं आहे.>> ओके.

माझ्या समजुतीनुसार धागाही त्याबद्दलच आहे. >>> माझी समजूत अशी होती की इन जनरल डबल स्टँडर्ड्स वर बोलणं चालु आहे.

आयडी स्त्री असली म्हणजे आयडीमागची व्यक्तीही स्त्रीच असेल असं नाही. >> स्त्री पुरुष काहीही असन्याशी तरी लेखनाचा जोपर्यंत काही संबंध नाही किंवा काही फरक पडत नसावा त्यांचे लेखन छान आहे जर त्या जेन्यूईन असतील तर त्यांनी जाऊ नये एव्हडीच इच्छा.

सिमरन धन्यवाद. हा कॉमन सेन्स आहे.
मला वेमांना काहीही बोलायचे नव्हते. मी स्वतः कुठल्याही आयडीला अपशब्द वापरला नव्हता. कुणाला ट्रोल केले नव्हते.
तरीपण झंपू, Filmy, यांनी मी कुणी तरी आहे या संशयाने खूप खालच्या थराला जाऊन ट्रोलिंग केले. तरीही वेमांच्या निदर्शनास आणून दिले.

आता या आयड्यांचा प्रताप सप्रमाण मांडला आणि शेलक्या का होईना पण शिव्यांचा वापर केला. त्या या आयडीमागच्या व्यक्तीला लागणारच. ते काही ओरिजिनल आयडी नसणार. कुणीतरी इथे त्यांचा आका असणारच.

तो अस्वस्थ होऊन बाहेर येणे गरजेचे होते. त्याच्या कडून ट्रोलिंगचा निषेध किंवा लिखाणाचे कौतुक अपेक्षित नव्हते. आका बाहेर पडले त्यामुळे सर्व शेलक्या शिव्या मी मागे घेते.
त्या आकाला स्पष्टीकरण देणं बंधनकारक नाही कारण दोन वर्षांपूर्वी सर्व वेमांकडे दिलेलं आहे.

वेमांनी वेळेत कारवाई केली असती तर हे दोन दिवस माझ्या आयुष्यात कधी आले नसते. इथून पुढेही नवे ट्रोल येतीलच. म्हणून इथे परत कधी कथा पोस्ट करणार नाही.

मी Admin चा उल्लेख केला होता तो प्रतिलिपीचा. त्यांना हे सगळं कानावर घालणे गरजेचे आहे नाही तर तिथेही हे ट्रोल्स कंपू येऊन असाच धुडगूस घालतील.

ऐसी अक्षरे चा उल्लेख मुद्दाम केला होता. ते बंद पडले आहे हे इतक्यातच समजले. इथे शहीद झालेले ट्रोल्स तिथे येतात का हे टेस्ट करायला केले होते. आले असते तर बंद पडलेल्या ठिकाणी काय धुडगूस घालायचा तो घातला असता तरी कुणाला काही फरक पडला नसता.

डूख धरणाऱ्या कंपूची वाफ तिथे बाहेर पडली असती.
बाकी चालू द्या.
वेमा माझे इथले लिखाण डिलीट करा.

इतके २५+ प्रतिसाद भरून शिव्याशाप कोणाला होते ही उत्सुकता लागून राहिली आहे Lol

सॉरी तुम्हाला राग आला तर.

असो.. जमल्यास कथा पूर्ण करा. आणि कोणत्याच साईटच्या नादी न लागता गुगलवर स्वतः चा फ्री ब्लॉग बनवून तिथेच पोस्ट करा. तिथला कंटेंट तुम्हाला कधीही ठेवता / उडवता येईल. आणि माझ्या माहितीप्रमाणे तिथे आलेल्या आक्षेपार्ह कमेंट्स सुद्धा उडवता किंवा हाईड करता येतात. रिपोर्ट सुद्धा करता येतात.

मी आका आहे असे इतर कुणाला वाटत असल्यास:

मी तर यांचे काही लेखन आहे का नाही हेही पाहिलेलेसुद्धा नाही, अजूनसुद्धा नाही, त्यामुळे मी ट्रोल करणे शक्य नाही

सरसकट सगळ्यांनाच हे असं हवं नसतं हो.
छान साडी नेसून नटुन थटुन हळदी कुंकवाला बायका निघाल्या की त्यांना आपण चार चौघात चांगलं दिसावं, असा जेन्युईन भाव असू शकतो. का ओम्या गोम्या ने आपल्याला ओबजेक्टीफाय करावं असं प्रत्येकीला हवय???
>>>

+७८६

हळदी कुंकूवाल्या बायकाच का? शॉर्ट स्कर्ट किंवा टाईट जीन्स स्वतःला आवडतो म्हणून घालणाऱ्या मुलीला देखील या सर्वांनी मला बघा आणि पॉइंट द्या हेच हवे आहे हे ठरवायचा हक्क आपल्याला नाही.

इतकेच नाही तर चित्रपटात काम करणाऱया हिरोईनला सुद्धा हे लागू.. त्या सगळ्या तसल्याच असतात असे काही जणांना वाटते. तसे नसते ओ.. उद्या तुमची आमची मुलगी सुद्धा अभिनय क्षेत्रात जाऊ शकते ते काय या विचाराने तिला अडवणार का?

@भरत - एका आय डी च्या मागे स्त्री वा पुरुष कोणीही असू शकते हे खरे आहे.
पण जो त्रागा होता त्याचे स्वरुप मला बायकी वाटले. पुरुष मुद्द्यावरुन गुद्द्यावर येतात. राभु पर्स्युएड करत होत्या. अन्यायाबद्दल थोडं रँटिंग होते. मला स्टाइल स्त्रियांच्या त्राग्यासारखी वाटली.
मी चूकीची असू शकेन.

>>>>>>>का ओम्या गोम्या ने आपल्याला ओबजेक्टीफाय करावं असं प्रत्येकीला हवय???
अगदी खरे आशू.
किंबहुना मी तर पुढे जाउन म्हणेन - स्त्रिया या अनोळखी स्त्रियांकरता नटत असतात. बायकाच एकमेकींचे कपडे, दागिने. मेक अप. डौल अ‍ॅप्रिशिएट करतात. दुसर्‍या व्यक्तीकडुन 'प्रेझेन्टेशन कसे असावे' सतत शिकत असतात. आणि त्या अ‍ॅप्रिसिएशनकरताच सारं करावसं वाटतं.

पुन्हा का सुरू केलं ट्रोलिंग च्रप्स ? काल सांगितलं होतं ना ?
माझं नाव सुद्धा घेऊ नका. अशा ट्रोल्सच्या तोंडून ऐकवत नाही.
पुन्हा माझं नाव घेऊ नका, माझ्या कथेवर येऊ नका, कुठलाही प्रतिसाद देऊ नका.
माझे प्रतिसाद डिलीट करू नका. तुमच्या बिनबुडाच्या धाग्यांना शुभेच्छा !

माझे प्रतिसाद डिलीट करू नका. तुमच्या बिनबुडाच्या धाग्यांना शुभेच्छा !
>>> माझे धागे बिनबुडाचे? Anyways… शुभेच्छा बद्धल धन्यवाद दादा…

एका आय डी च्या मागे स्त्री वा पुरुष कोणीही असू शकते हे खरे आहे. >> बरोबर.
पणे हे कुठल्या कॉण्टेस्ट मधे आहे ? झंपु दामले हे सर्टिफाईड ट्रोल होते. त्यांनी केलेल्या ट्रोलिंगबद्दल एका शब्दानेही मत व्यक्त न करता जर त्यांच्या कृतीला जस्टीफाय करता येत नसेल तर व्हिक्टीम बद्दल संशय पेरा . व्हिक्टीमचे कॅरेक्टर असे असे आहे त्यामुळे ट्रोलिंग जस्टीफाईड होते हे इनडायरेक्ट मेथड ने सांगण्याची राजकारण्यांची ही पद्धत आहे. जर आयडीमागची व्यक्ती ही स्त्री नसून पुरूष असेल ( जे माहिती नाही , सिद्ध केलेलं नाही) तर ट्रोलिंग झाले ते ठीकच. झंपु दामले आणि फिल्मी हे ट्रोल्स असेच आरोप करत होते. याबाबतचे सर्व खुलासे वेमांच्या वहीत आहेत.

या धाग्याच्या विषयात सुद्धा हीच मानसिकता आहे.

माझे धागे बिनबुडाचे? Anyways… शुभेच्छा बद्धल धन्यवाद दादा… >>> हेच ते त्रोलिंग. हेच झंपु दामले, फिल्मी आणि आता आका म्हणत आहेत.
दादाचं नाव सांंगा च्रप्स. आणि कसं काय ठरवलं ते पण कळू द्या.

Pages