डबल स्टँडर्ड्स- ऑब्जेक्टिफायिंग मेन vs वुमन

Submitted by च्रप्स on 12 January, 2025 - 14:37

आजकाल मायबोलीकर वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करतात, काही सहजगत्या तर काही गंभीरपणे विचार करण्यास लावणाऱ्या. असाच एक धागा ( मराठी चित्रपट) वाचताना लक्षात आलं की काही महिला काही मराठी पुरुष अभिनेत्याच्या सिनेमातील शॉवर सीनबद्दल चर्चा करत होत्या, आणि त्याबद्दल अधिक पाहण्याची इच्छा व्यक्त करत होत्या. त्याच धाग्यावर पुढे एका पुरुषानेही अशा प्रकारच्या दृश्यांबद्दल टिप्पणी केली होती- की हा अमुक अमुक चित्रपट मधे अजून एक सिन आहे त्या अभिनेत्याच्या अंघोळीचा… मनात सहज प्रश्न आला—ही कामुकता (sexualization) आहे का? आणि जर आहे, तर ती फक्त महिलांबद्दल बोलली गेल्यावरच कामुकतेची व्याख्या होते का?

कल्पना करा की हीच परिस्थिती उलट असेल. पुरुष लोक एका अभिनेत्रीच्या शॉवर सीनबद्दल चर्चा करत असतील आणि तो पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हणत असतील. तेव्हा आपण काय म्हणू? समाजात अशा प्रकारचं वागणं सामान्य समजलं जातं का?

कामुकता ही आपल्या समाजात दोन वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिली जाते. जर पुरुषांनी अशा प्रकारचं वर्तन केलं, तर त्यावर लगेच टीका होते. त्यांना “भोगवादी” (objectifying) म्हटलं जातं. पण जर महिलांनी असं केलं, तर त्याला तितकंसं गांभीर्याने घेतलं जात नाही. इनफॅक्ट तिथे पुरुष आयडी देखील अंघोळ क्लब वगैरे म्हणतोय…

हे बरोबर आहे का???

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आयडी उडवायला लागेल >>> तुम्ही अ‍ॅडमिन / वेबमास्टर आहात का ?
असाल तर मी माझा आयडी उडवायची विनंती केलेली आहे.
नियम पाळून हे दुसरीकडे वाचून करमणूक झाली.

<<पुरूष सत्ता स्त्री चं दमन करत आलेली आहे. पुरूष सत्तेच्या इतक्या गोष्टी अंगवळणी पडलेल्या असतात कि पुरूषाला आपण सत्ता गाजवतो हेच कळत नाही. >> बरोबर आहे, आणि स्त्री-पुरुष व्यतिरिक्त इतर प्रकारे दमन होत असेल तिथेही हे दिसुन येते.

<<स्त्रियांनी मर्यादा पाळली कि संस्कृती जपली जाते. पुरूषाने नाही पाळली तरी त्याचं कौतुकच होतं.>> हे सर्रासपणे सुरू असते आमच्या कॉलेज व्हॉट्सऍप ग्रुपवर.

<<आम्हीही तेव्हढेच व्हिक्टीम आहोत असा कांगावा करणारी ही मानसिकता दोन्ही कडचा अन्याय समानच आहे हेच दाखवण्याच्या प्रयत्नात असते.>> सहमत आणि हे सुद्धा सर्वच प्रकारच्या दमनाबद्दल लागु होईल. दमन होत असलेल्या वर्गातील कुणाकडुन आलेले अत्यल्प प्रमाणातील उलट वैयक्तिक अनुभव वा इतरत्र आढळणारे तसे उदाहरण घेऊन आपण आणि/किंवा आपला वर्गही तेवढाच व्हिक्टिम असल्याचा कांगावा केला जातो.

स्त्री-पुरुष संबंध विषयात पुरुषांच्याही काही genuine समस्या असणार, पण हा लेख त्याबद्दल अजिबात वाटत नाही. कुठेतरी दिसला अपवादात्मक मुद्दा आणि पाडला लेख असे मला वाटले.

<<<"पुरुषांनी अशा प्रकारचं वर्तन केलं, तर त्यावर लगेच टीका होते. त्यांना “भोगवादी” (objectifying) म्हटलं जातं. पण जर महिलांनी असं केलं, तर त्याला तितकंसं गांभीर्याने घेतलं जात नाही." >> मी मेनीवर्ल्ड थिअरीप्रमाणे कुठल्यातरी वेगळ्याच भारतात रहातो की काय? कारण मला तर चक्क या उलट दिसते.

स्त्री-पुरुष संबंध विषयात पुरुषांच्याही काही genuine समस्या असणार, पण...... पण त्यांच्यावर होणारा अन्याय हा क्वांटीफिबल कॉंटेक्स्ट्स मध्ये नगण्य असल्याने (असे व्हिक्टीम मायनॉरिटी ने असल्याने) त्याला कुणी अन्याय म्हणत असेल किंबहुना असा अन्याय अस्तित्वात आहे असे जरी कुणी म्हणत असेल तर तो कांगावा करत आहे असे खुशाल समजावे, हाच तुमच्या म्हणण्याचा रोख दिसतो.... देव करो नी कधी तुम्ही त्या अन्यायग्रस्त मायनॉरिटीत न जावो नाहीतर स्वतःच्या औषधाची चव तुम्हाला वेळप्रसंगी किती कडवट असते याचा प्रत्यय नक्कीच येईल.

>>पुरूषांवर एव्हढा अन्याय होतो का ? काय टक्केवारी असेल ? लैंगिक शोषणाचे बळी पुरूष होतात अशी स्त्री सत्ता स्थापन झालीय का ?>>
लैंगिक शोषणाचे बळी पुरुष होत नाहीत किंवा झालेच तर तो अपवाद हा एक फार मोठा गैरसमज आहे. लैंगिक शोषणाचे बळी कुणीही होऊ शकते. पुरुषांच्या बाबतीत शोषण होते तेव्हा रिपोर्ट करण्याचे प्रमाण खूप कमी आहे कारण पुन्हा समाजाचे कंडिशनिंग. या बद्दल जेवढी जागरुतता वाढीस लागेल तेवढे अधिक प्रमाणात गुन्हे रिपोर्ट होतील. मुलांचे/पुरुषांचे इतर पुरुषांकडून शोषण होते आणि कंसेंटचा मुद्दा लक्षात घेतला तर मायनर मुलांचे स्त्री कडूनही शोषण होते फक्त ते शोषण आहे हे त्या वयात मुलांना लक्षात येत नाही, जेव्हा लक्षात येते तेव्हा 'आपण पुरुष आहोत', कोण विश्वास ठेवेल असा विचार करुन गप्प रहाणे होते. मात्र मानसिक घाव रहातातच. बरेचदा तेव्हाची शोषक व्यक्ती नंतरही उजळ माथ्याने कौटुंबिक समारंभात, समाजात वावरताना दिसते, नाईलाजाने वरवरचे का होईना बोलणे चालणे ठेवावे लागते तेव्हा फार मानसिक त्रास होतो.
आपल्या लैंगिक इच्छा व्यक्त करण्याचा हक्क, हेल्दी फ्लर्टिंग वगैरे मान्य केले तरी दुसर्‍या व्यक्तीला आपल्या वावरामुळे अनकंफर्टेबल करायचा अधिकार कुणालाच नाही, ना स्रीला ना पुरुषाला ना इतर जेंडर मायनॉरिटीजना आणि कामाच्या ठिकाणी तर नाहीच नाही.

इथे पुन्हा एकदा सर्व पालकांना कळकळीची विनंती - तुमची मुलगी किंवा मुलगा एखाद्या व्यक्तीला टाळायचा प्रयत्न करत असेल, त्या व्यक्तीबद्दल नाराजी व्यक्त करत असेल तर प्लीज सजग व्हा. उगाच अरे तुझा काका आहे/दादा आहे/ताई आहे/ माझी बेस्ट फ्रेंड आहे म्हणत मुलांवर न कळत अन्याय करु नका. अगदी ३-४ वर्षाचे मूल असो वा १४-१५ वर्षांचे, त्यांचा 'नाही' म्हणायचा अधिकार अबाधित ठेवा.

आपल्या लैंगिक इच्छा व्यक्त करण्याचा हक्क, हेल्दी फ्लर्टिंग वगैरे मान्य केले तरी दुसर्‍या व्यक्तीला आपल्या वावरामुळे अनकंफर्टेबल करायचा अधिकार कुणालाच नाही, ना स्रीला ना पुरुषाला ना इतर जेंडर मायनॉरिटीजना आणि कामाच्या ठिकाणी तर नाहीच नाही.>>> अतिशय सहमत.

इथे पुन्हा एकदा सर्व पालकांना कळकळीची विनंती - तुमची मुलगी किंवा मुलगा एखाद्या व्यक्तीला टाळायचा प्रयत्न करत असेल, त्या व्यक्तीबद्दल नाराजी व्यक्त करत असेल तर प्लीज सजग व्हा. उगाच अरे तुझा काका आहे/दादा आहे/ताई आहे/ माझी बेस्ट फ्रेंड आहे म्हणत मुलांवर न कळत अन्याय करु नका. अगदी ३-४ वर्षाचे मूल असो वा १४-१५ वर्षांचे, त्यांचा 'नाही' म्हणायचा अधिकार अबाधित ठेवा.
>>> + 1

स्वाती +७८६

अश्या केस घडण्याबाबत स्त्री-पुरुष टक्केवारी यात मोठा फरक असणे हे स्वाभाविक आहे. पण एका वर्गाला तुमच्याकडे असे अपवादानेच घडते असे म्हणून टाळू लागलो तर तो फरक चुकीच्या पद्धतीने कमी व्हायला सुरुवात होईल.

>>>>>>पण एका वर्गाला तुमच्याकडे असे अपवादानेच घडते असे म्हणून टाळू लागलो तर तो फरक चुकीच्या पद्धतीने कमी व्हायला सुरुवात होईल.
वाक्य मार्मिक आहे.

Submitted by स्वाती२ on 19 January, 2025 - 19:40 >>> मुलांचे शोषण हा वेगळा इश्यू आहे ना ?

रानभुली,
मुलगा/पुरुष यांचे शोषण होत नाही असा एक गैरसमज आहे आणि मुलांचे शोषण हा वेगळा इश्यू नाही. कारण शोषणाची सुरुवात अल्पवयात होवून पुढेही ते शोषण सुरुच रहाणे होवू शकते. शोषण करणारी व्यक्ती ही बरेचदा रिपीट ऑफेंडर असते. वेळेत रिपोर्ट केले गेले तर बरेच भावी विक्टिम्स वाचतात. त्या शिवाय लैंगिक शोषणाचेही एक चक्र असते, पिडीत व्यक्तीच्या मदतीनेच नविन सावज शोधणे ते पिडीत व्यक्तीच अब्युझर होणे असे अनेक यात पैलू येतात.
लैंगिक शोषण हे कुठल्याही वयोगटातील व्यक्तीचे होवू शकते, शोषण करणारी व्यक्ती ही कुणीही असू शकते हे मान्य केले तरच त्या दृष्टीने सुरक्षिततेचा विचार केला जाणार.

मुळात कामाच्या ठिकाणी प्रोफेशनलच रहावे नेहमी. मग कितीही गहरी मैत्री असो, ती बाहेरच ठेवावी.
दुसरे म्हणजे, सेक्शुअली ऑब्जे़टीफाय कोणालाच करु नये.
म्हणनूच मला, पुष्पा २ आवडला नाही.
तसेच कोणीतरी फुलवंती धाग्यावर , गश्मीर महजनीची अंघोळ वगैरे म्हटले होते ते ही चुकीचेच होते. मी तो माठ वगैरे अभिनयात म्हटलेले. बाकी आजकाल कुठल्याहे मूवीज, सीरेज भयाण वाटतात भाषा एकुन.
सत्यपरीस्थिती दाखवतोच्या नावाने बोकाळलेपणाच आहे.
तसेच ते, जवान मूवीत दिपीकाचा नाच आणि कपडे किंवा तमन्ना भाटियाचे नाच..( हे. मा. व्य.म.)

मला अजुन एक शंका आहे. हार्मलेस ऑब्जेक्टिफिकेशन असे काही असू शकते का? उदा अ‍ॅक्टर/ अ‍ॅक्ट्रेस यांच्या संदर्भात. त्यांचा स्वभाव आणि अन्य डीप गोष्टी कोण पहाणार? वरवर जे दिसते ते असते त्यांची इमेज व ग्लॅमर मग त्याला भुलून काही हार्मलेस कमेन्टस टाकणे हा गुन्हा आहे का?
कॉन्टेक्स्ट सोडून पराचा कावळा होतोय का?

पराचा कावळा होतोय का?>>>> माझ्या मते पराचा कावळा कधीच झालाय, पण फक्त याच बाबतीत नाही तर सर्वच बाबतीत.  आपण सर्वजण कमालीचे ओव्हर सेन्सिटिव्ह झालोय, नव्हे ओव्हर द  इयर्स तसं आपल्याला कंडिशन्ड केलं गेलंय, प्रत्येक बाबीत पॉलिटिकली करेक्ट असलचं पाहिजे हा अट्टाहास शिगेला पोहचलायं, आणि आता हे बदलणं अशक्य आहे.(माझ्याबद्दल बोलायचं झालं तर माझ्या मते यामध्ये विविध वेस्टेड इन्टेरेस्टस, एजंडे, विविध स्तरांवर कार्यरत असलेले प्रोपागंडाज अशा विविध पदरांची असलेली कल्पना यामुळे मला माझे स्वतःचे बायस बाजूला ठेवून सध्यातरी ग्रॉसली सरसकट हे चूक की बरोबर यावर भाष्य नाही करता येत नाही आहे हे वास्तव जाणवलं आहे, त्यामुळे मला ही ते योग्यच वाटतं. ) याबाबत उदाहरणच द्यायचं झाल  Mind your language! ही ७० च्या दशकातली सिरीज तुम्ही  पाहिलीत तर  प्रत्येक संस्कृती/ धर्म भिन्न असतो आणि त्यातील न्यूनांवर/वर्मांवर बोट ठेवून विनोद निर्मिती करणारी त्यासारखी कोणतीही कलाकृती जर आजघडीला निर्माण झाली तर कोणता हलकल्लोळ माजेल याची कल्पना आपण करू शकतो. त्यामुळे जर तुम्हाला तसं  वागायचं तर सर्वांच्याच बाबतीत तसे वागा...यात कोणतेही डबल स्टँडर्ड्स/ भेदभाव नकोत ही मागणी मूळ धरतेय तर त्यात मला वैयक्तिकरीत्या काही वावगे वाटत नाही. 

>>>>>>>>>प्रत्येक बाबीत पॉलिटिकली करेक्ट असलचं पाहिजे हा अट्टाहास शिगेला पोहचलायं
फाविदडि, पॉलिटिकली करेक्ट असणे याचा अट्टाहास शिगेस पोचलाय हे खरे आहे आणि हेही खरे आहे की प्रत्येक जण अ‍ॅग्रेसिव्ह झालेला आहे. आता हे इन्टरनेट ट्रोलिंग मुळे झालय की ओरडून ओरडून न्युझ (न्युझन्स) दाखविणार्‍या चॅनल्स्मुळे झालय माहीत नाही. पण आपल्या अजेंड्याविरुद्ध खरंही कोणी ऐकून घेत नाही. आपलं तेच खरं. तुम्ही माझ्या बरोबर नसाल तर तुम्ही शत्रू आहात अशी मानसिकता केव्हाच झालेली आहे. प्रत्येक इश्यु बायपोलर.
मग आपल्याविरोधात जरा खुट्ट झालं की संयम सोडणे, पराचा कावळा करुन समोरच्या पार्टीला त्राहि माम करुन सोडणे असे नवनवोन्मेषशालिनी असे कार्यक्रम तीन्ही त्रिकाळ साजरे होतात.
>>>>>>त्यासारखी कोणतीही कलाकृती जर आजघडीला निर्माण झाली तर कोणता हलकल्लोळ माजेल याची कल्पना आपण करू शकतो.
बरोबर! कलाकार, स्टँड अप्स सगळेच लोक, वकिलांचा ताफा बाळगत असणार या घडीला.
>>>>>यात कोणतेही डबल स्टँडर्ड्स/ भेदभाव नकोत ही मागणी मूळ धरतेय तर त्यात मला वैयक्तिकरीत्या काही वावगे वाटत नाही.
करेक्ट वाईट काहीच नाही.

तुमच्या मुद्द्याहून (पॉलिटिकल करेक्ट्नेस) माझा मुद्दा (अननेसेसरी अ‍ॅग्रेशन) थोडा वेगळा आहे पण मला वाटतं दोहोत काहीतरी सेतू आहे Happy आय कॅनॉट पुट माय फिंगर ऑन दो!

मुळात कामाच्या ठिकाणी प्रोफेशनलच रहावे नेहमी. मग कितीही गहरी मैत्री असो, ती बाहेरच ठेवावी.
>>> + १ अत्यंत मोलाचा सल्ला आहे…

कामाच्या ठिकाणी नेहमी व्यावसायिक राहावे. कितीही चांगली किंवा गहिरी मैत्री असली तरी ती वैयक्तिक स्तरावर ठेवावी आणि कामाच्या वातावरणात तिचा परिणाम होऊ देऊ नये. कामाच्या ठिकाणी व्यावसायिकता कायम राखल्यास कामाचा दर्जा सुधारतो आणि गैरसमज किंवा संघर्ष टाळता येतो.

कॉन्टेक्स्ट सोडून पराचा कावळा होतोय का?>>> मला तसच वाटत आहे. आयटम नंबर मधे ही बिभत्स & ग्रेसफुली सेक्सी असे २ पॅटर्न्स असतात. ऑबजेक्टिफिकेशन हे निदान स्क्रीन कलाकारांचे तरी होणारच. ते दिसण्यावर मेहनत च तेवढी घेतात. आपापले मत द्यायला कसले आलेय डोंबलाचे डबल स्टँडर्ड्स? काय च्या काय.

मुळात कामाच्या ठिकाणी प्रोफेशनलच रहावे नेहमी. मग कितीही गहरी मैत्री असो, ती बाहेरच ठेवावी.>>> एग्जॅक्टली. आता तर व्हॉट्सॅप ला फिचर आलय की डीपी पण न दिसेल असा ठेवू शकतो, स्टेटस तर आधीपासूनच झाकून होते. मला तरी कलिग्स नी माझा डीपी/स्टेटस बघून मनात पण कॉमेण्ट केलेली चालणार नाही. सोशल वर ही अ‍ॅड करण्याची सक्ती नाही. माझ्या ऑफिसात ९८% लोकल लोक आहेत, त्यांना ह्यात वावगे वाटत नाही. पण मैत्रिण भारतीय कंपनीत आहे, तिची बॉस तिला "आजकाल स्टेटस नाही दिसत तुझा, हाईड केलास की काय" अशा प्रकारे बोलते. Uhoh

म्हणून मी कुणाशी ही मुख्यत्वे एसएमएस वरच टेक्सच्युअल संभाषण करतो.....लोक ही मोजकचं  संभाषण ठेवतात, अर्जंट किंवा जास्त बोलायचं असल्यास कॉल वर बोलणं होतं,  फाईल शेअरिंग साठी मेल आहेच. उगाच ऐऱ्या-गैऱ्यांच्या प्रायव्हसीच्या नखर्यांची आपण दाखल घेण्याचा, आणि कुणी आपल्यात डोकावण्याचा प्रश्नच उद्भवत नाही मग ( माझ्या अनुभवाने लोक या ऍप्रोच वर जास्त इरिटेट होतात )...व्हाट्सअँप फक्त इनर सर्कल मधल्या लोकांसाठी, विदआउट प्रायव्हसी फिल्ट्रेशन.

माझ्या प्रोफाईल वरचा मजकुर घेऊन च्रप्स उर्फ झंपू दामले या आयडीने दुसऱ्यांदा दुसऱ्या कथेवर गोंधळ सुरु केला आहे. त्यांना इथला एक मनोरुग्ण आयडी साथ देत आहे. च्रप्स हे झंपू असतील तर गेल्या वेळी जे ट्रोलिंग केले त्यासाठी त्यांची जागा त्यांच्या मनोरुग्ण साथीदार आयडीला जिथे ठेवायला हवे त्या शेजारची असायला हवी. अशा क्रिमिनल माईंडच्या आयडीला मी उत्तर देऊ शकत नाही.
याबाबत वेमा काय करणार?

आपण दुसर्‍याच्या कथेवर जाऊन यथेच्छ गोंधळ घालणे, त्या आयडीच संयम सुटेपर्यंत ट्रोल करत राहणे, त्या आयडीची बाजू सोडा पण सूचक पद्धतीने दिलेले प्रतिसाद डिलिट करणे हे कसे शक्य आहे? आपण ट्रोलिंग करून त्या आयडीला मात्र विषयांतर नको म्हणून मानभावीपणे प्रतिसाद देणे कसे शक्य होते? कारण वेमा तत्काळ प्रतिसाद उडवत असतात. असे ट्रोलिंग इतर वेबसाईट वर या हलकट आयड्यांना शक्य आहे का? तिथले प्रशासक चालू देतील का?

माझा आयडी उडवावा म्हणून तीन वर्षे विनंती केलेली आहे. तुम्हाला खटकत असेल तर आयडी उडवा. आयडी उडण्यासाठी काही लोक जे करतात तेच करणे कःपल्सरी होत चालले आहे का?

सर्वात आधी माझी चूक काय आहे हे वेमांनी त्यांच्या known आयडीने सर्व मायबोलीकरांना सांगावे. म्हणजे हे ट्रोलिंग चालू देणे जस्टिफाईड आहे का हे कळेल.

सांगता येत नसेल तर राहू द्या. पण मग इतर ट्रोल आयडींवर कारवाई होते ना? या क्रिमिनल आयडीला का संरक्षण आहे हे सांगावे.

माझ्या प्रोफाईल वरचा मजकुर घेऊन च्रप्स उर्फ झंपू दामले या आयडीने दुसऱ्यांदा दुसऱ्या कथेवर गोंधळ सुरु केला आहे.
>>>???

नक्की काय प्रॉब्लेम आहे?

वेबमास्टर, तुम्ही हा तुमचा क्रिमिनल आयडी उडवला तरी it's too late. मला माझे लिखाण असले आयडी असलेल्या तुमच्या वेबसाईट वर नको.
कायदेशीर पाऊल उचलायला लागू नये ही विनंती.

2022 साली याच ट्रोलिंग ला कंटाळून मी कथा पूर्ण न करण्याचे ठरवले होते. माझ्या प्रोफाईलच्या "माझ्याबद्दल" या खासगी सदरात तसे लिहिले होते. तिथून कॉपी करून झंपू दामले उर्फ च्रप्स उर्मट भाषेत बोलत होते. ते मायबोलीच्या वतीने विचारत आहेत का हे मी वेमांना विचारले होते. यांचे ट्रोलिंग पाहून मायबोलीकरांनी सपोर्ट केला होता. मायबोलीकरांचे हे ऋण कधीच फिटणार नाहीत.

ज्यांनी सपोर्ट केला त्यांच्या बद्दल या झंपू ने या भाषेत लिहिले होते. ज्यांनी हे ट्रोलिंग होताना सपोर्ट केला नाही त्यांच्या बद्दल काहीच म्हणणे नाही. पण अशांना फॉलो करणे बंद करणे माझ्या हातात आहे. मग त्यांनी थयथयाट करू नये. फॉलो करण्याची सक्ती नाही. त्यांच्या साठी झंपू उर्फ च्रप्स जास्त महत्वाचे असतील.

हा आयडी अशा लोकांच्या मनोरंजनासाठी ट्रोलिंग करतो का? याने कुणाची करमणूक होते?

च्रप्स म्हणतात कि मी कथा पूर्ण करा म्हटले हे चुकले का?
हे झंपू दामले म्हणत होते हे वर लिहिले आहे. पुन्हा पुन्हा तेच विचारणे ही केशवकुल, च्रप्स आणि झंपू दामले या आयड्यांची समान पद्धत आहे. ही सायबर गुन्हेगारांची पद्धत असते. मुद्दाम समजले नसल्याचा आव आणून पॅनिक करून स्कॅम करण्याची ही पद्धत असते. च्रप्स यांचे विनोद या पद्धतीचे असतात. अर्थात क्रिमिनल लोकांचे मनोरंजन नॉर्मल लोकांपेक्षा वेगळेच असते.

Screenshot_20250121_121812_Chrome_0.jpg

केशवकुल हे पण वेमांच्या विपूत जाऊन तेच करत आहेत.
वेमा आणि Admin यांच्या कडे 2022 आणि आधी दिलेले स्क्रीनशॉट आहेत. संपूर्ण मायबोलीने ते पुन्हा एकदा पाहिले असतील. तरीही केशवकुल ज्या पद्धतीने उर्मटपणा करत आहेत तो झंपू, च्रप्स आणि फिल्मी या आयड्यांमधे कॉमन आहे.

केशवकुल माझ्या विपूत आले. खोटारडेपणा केला. माझ्याच विपूत दिलेले उत्तर कॉपी करून वेमांच्या विपूत लिहीले.
आता ते प्रभुदेसाई असताना इतके सायकिक असतील हे माहीत नव्हते. त्या वेळी त्यांना सपोर्ट केला होता. ते माझ्या कथेवर जुने प्रतिसाद कॉपी करून टाकत आहेत.

या आयडीबद्दल एका स्त्री आयडीने अनेक तक्रारी केल्या होत्या. त्या वेळी दोन्ही बाजू माहिती नसल्याने आणि प्रभुदेसाई त्यांना दुरूत्तरे करत नसल्याने सॉफ्ट कॉर्नर होता. तसेच अनेकदा त्यांना प्रतिसाद नसल्याने ते लिखाण उडवत. तसे करू नये यासाठी त्यांना सपोर्ट केला होता. तर त्यांनी ब्लॉगची लिंक दिली. हे चालते.

मी यांच्या ट्रोलिंग ला कंटाळून अन्य ठिकाणी कथा पूर्ण करीन असे माझ्या प्रोफाईल ला यापैकी कुणाचेही नाव न घेता लिहिले तर चालत नाही. थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.

यापेक्षा किरकोळ गोष्टीत वेमा प्रॉम्प्ट आणि कडक कारवाई करताना दिसतात. दोन वर्षांपूर्वी हे झाले नंतर मायबोलीवर काहीच लिहिले नाही.

दरम्यान झंपू आणि प्रभुदेसाई आपल्या कर्माने गेले. ते मला ट्रोल केले म्हणून काही गेलेले नाहीत. ते गेल्यावर आता पुन्हा मायबोलीवर लिहायला सुरुवात केली तर च्रप्स आणि केशवकुल यांनी ट्रोलिंग सुरू केले आहे.

आयडी जपण्यासाठी भेकडपणा करण्याची मला गरज नाही. कुणाच्या बापाची भीती आहे का? आयडी उडू नये म्हणून इथल्या जगावेगळ्या नियमात राहून वगैरे सल्ले देणाऱ्यांनी ते आपल्या कडे ठेवा. इथे काय रामशास्त्री बसलेत का? कसले नियम आणि किती आणि कुणी पाळायचे?

या हलकटांचे काय? यांना कुठले नियम आहेत?

वेमांना आवाहन केले तर च्रप्स का उत्तर देतात?
वेमांनी येऊन सांगावे कि ते ट्रोलिंग नियमाप्रमाणे होते. किंवा माझा गुन्हा जाहीर करा ज्या मुळे ट्रोलिंग ला सपोर्ट केला.
या वेळी ज्या नीच पद्धतीने ट्रोलिंग होईल त्याला सडेतोड उत्तर मिळेल.

काही दिवसांपूर्वी सूरज चव्हाण या ट्रोलने अंजली दमानिया यांच्या वर ज्या पद्धतीने आरोप केले तीच पद्धत च्रप्स, केशवकुल, फिल्मी या आयड्यांची आहे. सूरज चव्हाण हे पुण्यातील रॅश ड्रायव्हिंग केस मधल्या आरोपींच्या बाजूने अंजली दमानिया यांना ट्रोल करत होते.

इथे तर झंपू, च्रप्स, फिल्मी, केशवकुल यापैकी कुणाचेही नाव २०२२ साली घेतले नव्हते. मग यांनी ट्रोलिंग का केले?
कदाचित त्या वेळी सूरज चव्हाण ज्या पक्षाचे आहेत त्यावर मी टीका केली होती. हे कारण असू शकेल.

नसेल तर २०२२ च्या आधी यांनी ट्रोलिंग का केले?

Pages