माझा उपास
मी धार्मिक पुरती बाई साधी भोळी
मी उपास करते सात्विक दोन्ही वेळी
मी धरला परवा उपास दिवसा पुरता
भोवला तरीही काय करू भगवंता?
घेतला सकाळी साय दुधाचा पेला
सोबती चवीला खजूर मी तळलेला
चाखले साखरी लाडू राजगिऱ्याचे
त्यावरी कुरकुरे काप दोन केळींचे
थापली गोलशी थालिपिठेही मोठी
रांधली बटाटा भाजी नाश्त्यासाठी
मग चहा छानसा केला उपवासाला
तोंडात टाकण्या दाणे मुखशुद्धीला
परतली बशीभर साबूदाणा खिचडी
सोबती दुपारी दही काकडी पचडी
लावण्यास तोंडी पापड छोटे तळले
वाटीत जरासे गोड रताळे केळे
पिशवीत घेतली उपवासाची चिक्की
भजनाला गेले धार्मिक मी हो पक्की!
आवाज फुटेना सूर कसा लागेना?
मग आग्रह झाला चहा जरासा घ्या ना !
आटपली भजने दर्शन सुध्दा झाले
वाटेत मला ना सायंतारा दिसले
दाण्याची चटणी खूप वाढली त्यांनी
जी उरली थोडी दोन वड्यांना पुरुनी
घेतले अजुन मग दोन वडे मागून
पानात उरवणे अन्नाचा अपमान
पोचले घरी तर जीव घाबरा झाला
लिंबाचे सरबत उपाय घरचा केला
रात्रीस असटशी भगर शिजवली थोडी
वाटीत बाजूला श्रीखंडाची गोडी
अन् पुऱ्या छानश्या सोबत शिंगाड्याच्या
भाजला शिरा मी तुपात राजगिऱ्याचा
करण्यास मोकळे पाय जरा मी गेले
बाहेर बुध्याच्या मलई बर्फिस भुलले
कोरडा घसाही पडला माझा जेव्हा
घेतले सुगंधी दूध ग्लासभर तेव्हा
पित्ताने माझे डोके रात्री चढले
डोळ्याला नाही डोळा पुरते पिडले
मग कालवला मी दूध दह्याशी भात
उपवास मोडला झोप लागली शांत
डॉ. रोहिणी चंद्रात्रे वाघमारे
अहाहा!! किती सुंदर
>>>.भोवला तरीही काय करू भगवंता?
किती मिष्किल आहात
एकच कविता २ दा पोस्ट झाली.
एकच कविता २ दा पोस्ट झाली.
म्हणून इथे दुसरी टाकली सामो.
होय रोहीणी
होय रोहीणी
रोहीणी उपास की उपवास असे
रोहीणी उपास की उपवास असे शीर्षक का दिलयस? (तू म्हणते आहे. आवडत नसल्यास सांगावे )
एकादशी दुप्पट खाशी सुद्धा चालेल.
अर्थात नो फोर्स. जस्ट एक सूचना.
माझा उपास हेच खरे तर होते
माझा उपास हेच खरे तर होते कवितेचे नाव..
आता तेच ठेवले आहे.
माझा खरा उपास ( खाऊन पिऊन)
हसत डोळे मीच्कवणारी बाहुली..
हां आता योग्य आहे नाव.
हां आता योग्य आहे नाव.
(No subject)
>>>एकादशी दुप्पट खाशी>>>+१
>>>एकादशी दुप्पट खाशी>>>+१
मी उपवास म्हणजे अन्नात बदल समजतो.
छान वात्रटिका...
खतरनाक! ही कविता फारच आवडली.
खतरनाक! ही कविता फारच आवडली.
मस्त एकदम.
मस्त एकदम.
मस्त कविता. छान गेयता आहे.
मस्त कविता.
छान गेयता आहे.
छान!
छान!
अनेकदा फसलेले उपासाचे प्रयत्न आठवले
छान
छान
उपास धमाल घडलाय. असा कडक उपास
.
उपास धमाल घडलाय. असा कडक उपास
उपास धमाल घडलाय.
असा कडक उपास करायला जमेल असे वाटतेय 😄
वाह वाह
वाह वाह
जमली आहे
सायंतारा आणि बुधा म्हणजे उपासकर्ता नाशिककर आहे का?
पिंचिकर नाही हे कळालं नाहीतर माझंच वर्णन असे वाटले होते
उत्तम कविता! नावाला फार महत्व
उत्तम कविता! नावाला फार महत्व असते आपल्याकडे! ही कविता विंदा, पाडगावकर, वगैरेंनी लिहिली असती तर दशकानुदशके गाजली असती.
(शेवटचे लघु अक्षर गुरू म्हणून उच्चारण्याचा आग्रह निदान अलीकडच्या कवींनी टाळणे बरे)
सुंदर वृत्त हाताळणी व मजेशीर कविता!
सगळ्यांचे खूप खूप आभार.
सगळ्यांचे खूप खूप आभार.
सायंतारा आणि बुधा.. म्हणजे नाशिक बरोबर ओळखले..
एकादशी उपास केला आणि सायंताराचे वडे खाल्ले नाही तर तो उपास फाऊल पकडला जातो नाशिक गावात.
भारी
भारी
खूपच भारी आहे ही कविता.
खूपच भारी आहे ही कविता.
मस्तच, आवडली खूप. गेयता आहे.
मस्त! नाशिककर आहात तुम्ही?
मस्त!
नाशिककर आहात तुम्ही?
छान.
छान.
हाहाहा सहीच. मी एकादशी
हाहाहा सहीच. मी एकादशी दुप्पट खाशी गटातली.
होय sharmilar मी नाशिककर पण
होय sharmilar मी नाशिककर पण आता मुंबईकर
मस्त
मस्त तोंडाला पाणी सुटलं (पोटभर जेवण झालेलं असून!)
#उत्तम कविता! नावाला फार
#उत्तम कविता! नावाला फार महत्व असते आपल्याकडे! ही कविता विंदा, पाडगावकर, वगैरेंनी लिहिली असती तर दशकानुदशके गाजली असती.
खूप खूप आभार बेफिकीर. मी तुम्हाला माझ्याच मागील कवितेसाठी विपु केले आहे. तुम्ही मला फार थोर कवींच्या पंक्तीत नेऊन ठेवले की हो..
तुम्ही दिलेली लघु गुरूची सूचना पाळण्याचा प्रयत्न निश्चित करेन.
पण मला एक लक्षात आले.
माझ्या सीरियस दुःखी कवितांपेक्षा साध्यासुध्या पण आनंदी कवितेला जास्त प्रतिसाद मिळालेत.
मस्त जमलीये
मस्त झालीये
ही कविता म्हणजे तर रुचकर
ही कविता म्हणजे तर रुचकर मेजवानी आहे!