आजकाल मायबोलीकर वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करतात, काही सहजगत्या तर काही गंभीरपणे विचार करण्यास लावणाऱ्या. असाच एक धागा ( मराठी चित्रपट) वाचताना लक्षात आलं की काही महिला काही मराठी पुरुष अभिनेत्याच्या सिनेमातील शॉवर सीनबद्दल चर्चा करत होत्या, आणि त्याबद्दल अधिक पाहण्याची इच्छा व्यक्त करत होत्या. त्याच धाग्यावर पुढे एका पुरुषानेही अशा प्रकारच्या दृश्यांबद्दल टिप्पणी केली होती- की हा अमुक अमुक चित्रपट मधे अजून एक सिन आहे त्या अभिनेत्याच्या अंघोळीचा… मनात सहज प्रश्न आला—ही कामुकता (sexualization) आहे का? आणि जर आहे, तर ती फक्त महिलांबद्दल बोलली गेल्यावरच कामुकतेची व्याख्या होते का?
कल्पना करा की हीच परिस्थिती उलट असेल. पुरुष लोक एका अभिनेत्रीच्या शॉवर सीनबद्दल चर्चा करत असतील आणि तो पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हणत असतील. तेव्हा आपण काय म्हणू? समाजात अशा प्रकारचं वागणं सामान्य समजलं जातं का?
कामुकता ही आपल्या समाजात दोन वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिली जाते. जर पुरुषांनी अशा प्रकारचं वर्तन केलं, तर त्यावर लगेच टीका होते. त्यांना “भोगवादी” (objectifying) म्हटलं जातं. पण जर महिलांनी असं केलं, तर त्याला तितकंसं गांभीर्याने घेतलं जात नाही. इनफॅक्ट तिथे पुरुष आयडी देखील अंघोळ क्लब वगैरे म्हणतोय…
हे बरोबर आहे का???
मुद्दा तसा बरोबर आहे.
मुद्दा तसा बरोबर आहे.
ऑफिसमध्ये एक महिला कलीग मला अभ्या हाक मारून बिनधास्त माझ्या खांद्यावर हात ठेवून माझ्याशी बोलते. ती काही माझी तशीच खास मैत्रीण नाही. पण याला हे चालेल असे तिनेच गृहीत धरले आहे. मला actually पहिल्यांदा जेव्हा तिने हे केले तेव्हा ऑकवर्ड वाटले. पण मी त्यावेळी माझा चेहरा आणि बॉडीलँग्वेज नॉर्मल ठेवले. नंतर याची सवय झाली.
तेव्हा माझ्या मनात देखील विचार आलेला की असे एखाद्या पुरुषाने स्वतःच ठरवले तर ते मान्य होईल का? अर्थात बिलकुल नाही.
आता यात सुद्धा अजून एक गंमत अशी की जर मी तिला सांगितले असते की मला असा स्पर्श करू नकोस, मला आवडत नाही. आणि त्यावर ती म्हणाली असती की मी तुला त्या हेतूने हात लावला असे वाटते काय तुला? मी तुझ्यावर चान्स मारते असे म्हणायचे आहे का तुला? तर पुन्हा माझीच बोलती बंद झाली असती.
अजून एक महिला कलीग आहे. ती म्हटले तर तशी चांगली मैत्रीण आहे. माझ्याशी कामाचे बोलतानाही बरेचदा मला लाडीकपणे राजा बोलते. उदाहरणार्थ, अरे राजा नाही होणार ते..
अश्या संभाषणात माझ्याही तोंडून त्याच फ्लो मध्ये अग राणी तू ट्राय तर कर असे येता येता राहते. तोंडावर आलेले शब्द मी मागे घेतो कारण ती जरी तशी बोलली तरी मी तसे बोललेले तिला रूचले नाही तर उगाच लफडा होईल अशी भीती वाटते.
गंमत इथेच संपत नाही. एकदा कुठल्या तरी फंक्शन दिवशी तीच मुलगी साडी घालून आली होती आणि एकाने त्यावर तिला चांगली कॉमेंट दिलेली. Looking fabulous वगैरे काहीतरी कॉमेंट होती जी तिला रुचली नव्हती. आम्हाला लंच ब्रेकमध्ये ती हे तक्रारीच्या सुरात सांगत होती.
आता त्याच्या कॉमेंटचा टोन काय होता, त्या दोघांचे आपसात किती घनिष्ट वैयक्तिक संबंध होते नव्हते याची आम्हाला काही कल्पना नाही. त्यामुळे आम्ही कुठलीही प्रतिक्रिया न देता शांतपणे तिचे ऐकून घेतले. पण नंतर इतर पुरुषांची चर्चा झाली की यापुढे उगाच कोणाला कॉम्प्लिमेंट द्यायच्या भानगडीत पडायचे नाही.
अरे हो, अजून एक भारी गंमत ऐका. आमच्या इथे महिलांचा एक ग्रूप पुरुषांना त्यांच्या लूक्स वरून पॉइंट देतो. आवेश असा असतो की आपण कश्या मॉडर्न आणि कूल आहोत हे दाखवणे हे कळून येते.
पुरुषांनी असे पॉइंट दिले तर काय राडा होईल कल्पना करू शकतोच.
त्यामुळे म्हटले तर तुमचा मुद्दा तसा बरोबर आहे. तशीच समानता नाहीये यात.
पण या सगळ्यात एवढाच विचार करून चालत नाही. जर एखादी मुलगी माझ्याशी मोकळेपणाने वागत असली तरी त्यात काही गैर हेतू नाही हे एक पुरुष म्हणून मलाही जाणवत असते. किंबहुना कोणीतरी आपल्याशी असे विश्वासाने मोकळेपणाने वागते हे चांगले देखील वाटतेच.
आपण मोकळेपणाने वागावे आणि समोरच्याने त्याचा गैर अर्थ काढू नये ही खरे तर आज स्वत:च्या पायावर उभे राहायला घराबाहेर पडणाऱ्या स्त्रियांची गरज आहे. त्यामुळे अश्या केसेसमध्ये घाईत काही निष्कर्ष काढू नये.
शक्य तिथे सपोर्ट करावा आणि त्याचवेळी एक पुरुष म्हणून आपल्या मर्यादा सांभाळाव्यात हेच उत्तम!
काल तिकडे अंघोळ कंपू वगैरे
काल तिकडे अंघोळ कंपू वगैरे पोस्ट टाकताना (आश्चर्यकारकरीत्या) समहौ मला इथे अशी चर्चा होणार असे गट फिलिंग आले होते.
मलाही माझ्याच कमेंट्स टाकताना अश्या कमेंट्स इथे एखाद्या पुरुष आयडीने टाकल्या तर ते तितकेसे नीट स्वीकारले जाणार नाही हेही जाणवले होते.
तरी अश्या एखाद् दुसऱ्या ठिकाणी टाकलेल्या पोस्ट्स मुळे लगेच ऑब्जेक्टिफिकेशन होईल असे वाटले नाही. आणि होईल असे वाटले तर ते आधीपासून सिनेमात चालू झाले आहे. "रॉकी और रानी की.." मध्ये रणवीर च्या एन्ट्री चा शॉट योगायोगाने तसा झाला आहे असे कोणी म्हणाले तर ते फारच हास्यास्पद विधान होईल.
तरी अश्या एखाद् दुसऱ्या
तरी अश्या एखाद् दुसऱ्या ठिकाणी टाकलेल्या पोस्ट्स मुळे लगेच ऑब्जेक्टिफिकेशन होईल असे वाटले नाही. आणि होईल असे वाटले तर ते आधीपासून सिनेमात चालू झाले आहे.>>> इथे मुळात धाग्याचं शिर्षक चुकलेले आहे.... समाजात खुल्या रितीने होणाऱ्या स्त्रीया वा पुरुषांच्या ऑब्जेक्टिफिकेशन बाबत एकूणच समाज ( फक्त विक्टीम जेंडर नाही ) डबल स्टॅंडर्ड आहे का?? खरा प्रश्न असा हवा होता.....आणि माझ्यामते त्याचे उत्तर निर्विवादपणे हो असेच आहे.
मलाही माझ्याच कमेंट्स टाकताना
मलाही माझ्याच कमेंट्स टाकताना अश्या कमेंट्स इथे एखाद्या पुरुष आयडीने टाकल्या तर ते तितकेसे नीट स्वीकारले जाणार नाही हेही जाणवले होते.
>>>>>
पुरुषांनी पुरुषांच्या आंघोळीचे आणि नग्नतेचं केलेले कौतुक आणि रस ग्रहण खुल्या मनाने स्विकारावे इतका आपला समाज प्रगल्भ झाला नाही अजून हे खरेच आहे.
कायदा असून सुद्धा आजही याला अनैसर्गिक समजले जाते.
मी शाहरुख खान बद्दल लिहिताना बदाम बदाम बदाम लिहितो ते सुद्धा काहीना रुचले नाही आणि वैयक्तिक मेसेजवर चौकशी झाली आहे.
ऋन्मेऽऽष : तुमची
ऋन्मेऽऽष : तुमची प्रतिक्रिया आवडली आणि पटली सुद्धा. बायका या त्यांच्या comfort नुसार कोणाची चेष्टा गंमतीत घ्यायची की सिरियसली घ्यायची हे ठरवतात या मताचा मी आहे. जर एखादा माणूस त्यांच्या comfort झोन मध्ये असेल तर त्याचे अश्लिल बोलणे ही या गंमतीत घेतात पण या झोनमध्ये नसलेल्या दुसर्या माणसाच्या साधे बोलण्याचा पण बाऊ करतात. ऑफीसमध्ये हा प्रकार ३-४ वेळा पाहिला आहे.
योगी ९०० >> स्त्री असून
योगी ९०० >> स्त्री असून बऱ्याच अंशी सहमत.
ते म्हणतात ना.. " हिरो आणि व्हीलन मध्ये कधीकधी फक्त हिरॉईन चा आवडता आणि नावडता इतकाच फरक असतो. बाकी दोघे सेमच असतात ".
पियू +११
पियू +११
ऑब्जेक्टिफिकेशन स्त्री-पुरुष
ऑब्जेक्टिफिकेशन स्त्री-पुरुष कुणाचेच होवू नये. पण तसे घडत नाही. स्त्रीयांचे पूर्वीपासून होत होते कारण मार्केट. आता पुरुषांचेही होवू लागले आहे , कारण पुन्हा त्याला मार्केट आहे असे वाटणे. हे नाकारणे आपल्याच हातात आहे. कुल-मॉडर्न म्हणजे नक्की काय हे प्रत्येकाने स्वतःच प्रामाणिकपणे तपासून बघायची गरज आहे. व्यक्ती स्त्री आहे म्हणजे दुटप्पी वर्तन चालवून घ्यावे असे नक्कीच नाही. कामाच्या ठिकाणी योग्य मर्यादा सर्वांनीच पाळायला हव्यात. मैत्रीपूर्ण संबंध असणे आणि त्यात मर्यादा पाळणे हे खरे तर अजिबात कठीण नसते.
कामाच्या ठिकाणी मोकळेपणाने वागणे, आणि त्यातून गैरसमज होवू नये ही अपेक्षा हे फार ढिसाळ आहे. कोवर्करच्या खांद्यावर हात ठेवून बोलणे यात बिनधास्त काही नाही, हे पर्सनल स्पेसमधे येणे झाले.
>>आता यात सुद्धा अजून एक गंमत अशी की जर मी तिला सांगितले असते की मला असा स्पर्श करू नकोस, मला आवडत नाही. आणि त्यावर ती म्हणाली असती की मी तुला त्या हेतूने हात लावला असे वाटते काय तुला? मी तुझ्यावर चान्स मारते असे म्हणायचे आहे का तुला? तर पुन्हा माझीच बोलती बंद झाली असती.
>>तुमच्या बॉडी लँग्वेजमधून तुम्ही असे करणे आवडत नाही हे दाखवू शकताच. नुसता अलगद खांदा हलवून मागे सरकले तरी मेसेज जातो. यावर पुन्हा फालतू बडबड झाल्यास बोलती का बंद व्हावी? केवळ स्त्री आहे म्हणून? रिपोर्ट करता येइल ना? कामाच्या ठिकाणी कंफरटेबल वाटणे वाटणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. कुठल्या हेतूने वगैरे पुढली गोष्ट, मुळात दुसर्याच्या पर्सनल स्पेसचा आदर करणे एवढे कठीण आहे का?
योगी ९०० >> स्त्री असून
योगी ९०० >> स्त्री असून बऱ्याच अंशी सहमत.
ते म्हणतात ना.. " हिरो आणि व्हीलन मध्ये कधीकधी फक्त हिरॉईन चा आवडता आणि नावडता इतकाच फरक असतो. बाकी दोघे सेमच असतात ".
@पियू धन्यवाद. पण समस्त स्त्रीया असे करतात ह्या मताचा मी नाही जरी मी अश्या प्रकारची उदाहरणे पाहिली तरी... काही पुरूषही असे करत असतील पण शक्यतो बर्याचश्या पुरूषांना आवडती व नावडती असे कोणी नसते. त्यांना कुठल्याही बाईने काहीही कॉमेंट (जर ती अपमानास्पद नसेल तर) चालते.
डोक्यात एवढी **** चालू असते
.
डोक्यात एवढी **** चालू असते
डोक्यात एवढी **** चालू असते सर्वच बाबतीत की एखाद्या/एखादीने पार एकुलत्या एक sexual organ ला टच बीच केला गर्दीत तर ते नोटदेखील होत नाही, आणि नोट झालं तरी चुकून झालं असेल समजून पुढच्याच सेकंदाला आगे बढो होऊन जाते.
मला वाटतं की पुरुष आणि स्त्री यात मूलभूत फरक sexual समजल्या जाणाऱ्या अवयवाचा आहे. जसे की स्त्रियांना sexual अवयवअंतर्गत छाती योनी आणि नितंब हे अवयव येतात, त्यात एक्सटेंडेड म्हणून पाठ पोट मांड्याही येतात.
तर पुरुषाला फक्त शिश्न आणि नितंब हे अवयव. जोवर हे दोन झाकले आहेत तोवर भारतीय पुरुष लाज सोडून वागतोय/ objectionable अंगप्रदर्शन करतोय असेही समजले जात नाही. आता असं की जोवर पुरुष स्त्रीच्या स्तन आणि नितम्ब मांड्या वगैरे बद्दल टिप्पणी करत नाही तोवर ती objectionable ठरत नाही. त्याच न्यायाने स्त्री जोवर पुरुषाच्या लिंगाबद्दल बोलत नाही तोवर पुरुषांनाही वाईट वाटू नये..
पुरुष जसे स्त्रियांसोबत गर्दीत किंवा चारचौघात वागतात तश्या स्त्रिया वागू लागल्या तर हेच पुरुष जीव देतील!
हिरो आणि व्हीलन मध्ये कधीकधी
हिरो आणि व्हीलन मध्ये कधीकधी फक्त हिरॉईन चा आवडता आणि नावडता इतकाच फरक असतो. बाकी दोघे सेमच असतात >>> स्पॉट ऑन.
स्वाती सहमत आहे.
स्वाती सहमत आहे.
बॉडी लँग्वेजमधून दाखवू शकलो असतो.
पण अचानक झाल्याने ते सुचले नसावे. कदाचित पुरुष यासाठी तयार नसतात जसे साधारणपणे स्त्रिया असतात.
यात अजून एक मुद्दा म्हणजे मला ते आवडले नव्हते हे नक्की. पण मला त्याचा तसा त्रास सुद्धा झाला नाही. म्हणजे तिने मला sexually exploit केले वगैरे वाटले नाही. पहिली रिअँक्शन म्हणजे सरप्राईज झालो, तिचा स्पर्श कसा आहे याचा अंदाज लाऊ लागलो. जर तिने खरेच सहज हात ठेवला असेल पण मी माझ्या बॉडी लॅंग्वेज मधून नाराजी दर्शवली आणि अजून कोणी हे पाहिले तर त्याला तिच्याबद्दल काय वाटेल असाही एक विचार क्षणात डोक्यात येऊन गेला असावा.
त्यावेळी विरोध नाही केला त्यामुळे पुढच्या चार महिन्यात अजून चार वेळा झाले. प्रमाण फार कमी आहे. आणि त्यामागच्या भावना हेतू मला अजूनही कळत नाहीयेत. मला अती वाटावे असे तरी होत नाहीये. अन्यथा कोणी माझ्या मनाविरुद्ध काही केले आणि मी शांत राहिलो इतकाही मी बुळा नाहीये.
आणि हो, ती बाई सुंदर आहे. भले मला इंटरेस्ट नसला तरी या फॅक्टरने फरक पडत असावा. सुंदर नसती तर कदाचित माझी रीअँक्शन वेगळी असू शकली असती.
मुळात हा किस्सा मला या धाग्यावर आठवला ते मी यात विक्टिम आहे या अनुषंगाने नाही तर जे माझ्यासोबत मला गृहीत धरून झाले ते एखाद्या पुरुषाने तसे केले तर काय या अनुषंगाने आठवला होता.
पण मला वाटते याचे उत्तर देखील यातच आहे. पुरुषांना काही गोष्टींचा फरक पडत नाही याची कल्पना स्त्रियांना असते म्हणून त्या काही गोष्टी गृहीत धरत असाव्यात.
पियु - तुम्हाला जाणवले तरी..
पियु - तुम्हाला जाणवले तरी.. तेच खूप आहे…
बाकी अंघोळ कंपू बायका आणि त्यांच्यात भाव वाढवण्यासाठी सजेशन देणारे पुरुष आयडी अजून तिथेच आहेत…
>>>>>>बाकी अंघोळ कंपू बायका
>>>>>>बाकी अंघोळ कंपू बायका आणि त्यांच्यात भाव वाढवण्यासाठी सजेशन देणारे पुरुष आयडी अजून तिथेच आहेत…
कुठे जाणार मग ते? आता संपादन थोडीच करता येतं?
तुमच्या धाग्याने त्यांना एपिफनी (साक्षात्कार) झाली असेलही.
कुठे जाणार मग ते? आता संपादन
कुठे जाणार मग ते? आता संपादन थोडीच करता येतं?
तर पुरुषाला फक्त शिश्न आणि
तर पुरुषाला फक्त शिश्न आणि नितंब हे अवयव. जोवर हे दोन झाकले आहेत तोवर भारतीय पुरुष लाज सोडून वागतोय/ objectionable अंगप्रदर्शन करतोय असेही समजले जात नाही. आता असं की जोवर पुरुष स्त्रीच्या स्तन आणि नितम्ब मांड्या वगैरे बद्दल टिप्पणी करत नाही तोवर ती objectionable ठरत नाही. त्याच न्यायाने स्त्री जोवर पुरुषाच्या लिंगाबद्दल बोलत नाही तोवर पुरुषांनाही वाईट वाटू नये..
>> असे नसते - अंघोळ करताना काय माल दिसतो/दिसते असे जेनेरिक स्टेटमेंट असेल तर कसे समजायचे?
हो आहेत डबल स्टँडर्ड्स.
हो आहेत डबल स्टँडर्ड्स. स्त्रिया /(मला) मॉडेलींग रँप वर चालणारा जॉन अब्राहम किंवा मिलिंद सोमण आवडतो, पण मग १% एखादीच बाई अशी असेल जी पुरुषाचे मॉलेस्टेशन करायला जाईल. बस च्या गर्दीत मुद्दाम खेटणारी पण एखादीच असेल. पुरुषांच वखवखलेलं असण्याचं प्रमाण जास्त आहे आणि ते हिम्मत करून मर्यादा ओलांडायला पण जातात. पुढे जाऊन मग ते रेप्/गुन्हे घडून बसतात.
म्हणुन मर्यादा असणं, ते सांभाळणं महत्वाचं.
पण मग १% एखादीच बाई अशी असेल
पण मग १% एखादीच बाई अशी असेल
>>>>
हे प्रमाण समजून घेणे फार महत्त्वाचे असते अश्या प्रकारच्या कुठल्याही चर्चेत.
कायदे आरक्षण सवलती सारे काही या प्रमाणावर आधारीत/अवलंबून असतात.
बरेच पुरुष हे समजून न घेता समानतेचा हट्ट धरतात.
भारतिय पुरुष (सगळे नसतील)
भारतिय पुरुष (सगळे नसतील) गलिच्छ मानसिकतेचे आहेत. गर्दीत लहान मुलींनाही न सोडणारे पण संस्कृतीचे गोडवे गाणारे.
गश्मीर माल आहे असे कुणीही
गश्मीर माल आहे असे कुणीही म्हटलेले नाही कारण (बहुसंख्य) स्त्रिया त्या भाषेत बोलतच नाहीत. पण हां आता तो टॉपलेस आवडतो तर आवडतो. त्यात लपविण्यासारखे काय आहे? दिग्दर्शकाला व कदाचित गश्मीरलाही ते माहीत आहे की जास्त लोक सिनेमा पाहतील.
बाकी डबल स्टँडर्डस आहेत समाजात. पण ते काँटेक्स्ट मध्ये बघा. आशू यांचा मुद्दा लक्षात ठेउन बघा.
बाकी डबल स्टँडर्डस आहेत
बाकी डबल स्टँडर्डस आहेत समाजात. पण ते काँटेक्स्ट मध्ये बघा. >>>कॉन्टेक्स्ट चा मुद्दा नाही पटला, कारण येथे एका व्यक्तीचे ( individual ) वर्तन जज करण्यासाठी व्यक्तिसमूहाच्या वर्तनाचा (stereotype) कॉन्टेक्स्ट वापरला जातोय, खबरदारी म्हणून तो कदाचित उपयोगी ठरू ही शकतो पण निर्णय करताना अन्यायकारक होण्याची शक्यता जास्त. त्यामुळे जरी डबल स्टँडर्ड्स कोणत्याही stertotypical वर्तनाच्या प्रभावामुळे असले तरी ते समर्थनीय नाहीत.
बरोबर फाविदडि, एखादी गोष्ट
बरोबर फाविदडि, एखादी गोष्ट समाजात (नॉर्म) खरे तर अॅबनॉर्म आहे म्हणुन, व्यक्तीस मुभा मिळत नाही. म्हणजे समाजाने गाय मारली तर आम्ही वासरु मारणार टाइप्स.
आपल्या मुद्द्याशी मी सहमत आहे.
एखादी गोष्ट समाजात (नॉर्म)
एखादी गोष्ट समाजात (नॉर्म) खरे तर अॅबनॉर्म आहे म्हणुन, व्यक्तीस मुभा मिळत नाही. म्हणजे समाजाने गाय मारली तर आम्ही वासरु मारणार टाइप्स.>>> मला जे म्हणायच होतं ( समूहाबद्दलचे stertotypical ठोकताळे (context) एखाद्या व्यक्तीची वर्तन जोखताना जसे च्या तसे लावू नयेत) त्याच्या उदाहरणादाखल आपण मुस्लिम = हिंसा ( हे माझं मत नसून सध्या बहूतकरुन आढळणारा मतप्रवाह ) ही stertotypical प्रतिमा पाहू शकतो, पण त्यामुळे प्रत्येक मुसलमानाचे वर्तन आपण कॉंटेक्स्ट धरुन त्याच कॅटॅगीरीत ढकलायला लागलो तर एखाद्या प्रसंगात समायोजित ॲग्रेशन दाखवणाऱ्या मुसलमानाला जो माणूस म्हणून खरोखरीच चांगली व्यक्ती आहे, त्यावरही आपण सहजगत्या अन्याय ( गोंडस भाषेत collateral damage ) करुन जाऊ. प्रत्यक्षात हिंसा करणारे सर्व धर्मांत असतात पण कॉंटेक्स्ट्स च्या प्रभावाखाली आपण जेव्हा निर्णय प्रक्रियेत डबल स्टॅंडर्ड्स आणतो त्याचा जरी stertotypical कॉंटेक्स्ट्स बरोबर असला तरी individual केस मधे तो जसाच्या तसा घेणे अन्यायकारक ठरते.
अवांतर: डॅनियल कानेमन यांच्या थिंकिंग फास्ट ॲंन्ड स्लो या पुस्तकात यावर The Representativeness Heuristic म्हणून एक सुंदर प्रकरण आहे. ( कुणावर अन्याय करण्याव्यतिरिक्तही) निट परिक्षण न केलेल्या stertotypical विचारांच्या प्रभावाखाली आपण कसे वैयक्तिक आयुष्यात देखिल बरेच चुकीचे निर्णय घेतो यावर प्रकाश टाकला आहे.
टीप: वरील उदाहरण फक्त stertotypical कॉंटेक्स्ट्स individual केसेस मधे जसेच्या तसे घेणे कसे अन्यायकारक असू शकते यासाठी दिले आहे. धाग्याच्या चर्चेला कोणतेही वेगळे वळण( धार्मिक) देण्यासाठी नाही, सर्वांकडून हे समजून घेण्याची अपेक्षा.
'थिंकिंग फास्ट ॲंन्ड स्लो' हे
'थिंकिंग फास्ट ॲंन्ड स्लो' हे फार प्रभावी पुस्तक आहे असे ऐकलेले आहे. थॉट लीडरशिप!
मुद्दा पटला.
स्त्रिया त्या भाषेत बोलतच
स्त्रिया त्या भाषेत बोलतच नाहीत. पण हां आता तो टॉपलेस आवडतो तर आवडतो. त्यात लपविण्यासारखे काय आहे?
>>> चेंज टेबल्स - हेच एका एक्ट्रेस बद्धल बोलला कोणी तर काय रियॅक्शन असेल… विचार करा हाच मुद्दा आहे…
कायदे आरक्षण सवलती सारे काही
कायदे आरक्षण सवलती सारे काही या प्रमाणावर आधारीत/अवलंबून असतात. बरेच पुरुष हे समजून न घेता समानतेचा हट्ट धरतात.>>>अवांतर पण निकडीचे- आरक्षण, सवलती याबाबत मला व्यक्तिश: काही आक्षेप नाही (ब्लॅंकेट नियमांबाबत आक्षेप आहे), पण कायद्यांबाबत जरी तो कायदे तसे असल्याबद्दल आक्षेप नाहीये तरी त्यांच्या प्रभावी व तात्काळ अंमलबजावणी बद्दल नक्कीच आहे. जर तुम्ही एखाद्या समुहाला कोणत्याही सामाजिक कारणास्तव झुकते माप देणारे कायदे केलेले आहेत तर अशा आरोपांत, आरोपांची शहानिशा आणि आरोपी व्यक्तीला त्याचे निर्दोशत्व/दोशत्व लवकरात लवकर (फास्ट ट्रॅक) सिद्ध करण्यासाठी लागणारी प्रभावी यंत्रणा कार्यान्वित ठेवणे हे सरकारचे तितकेच आवश्यक कर्तव्य आहे. जेणेकरून skewed कायद्यांच्या मदतीने केलेल्या खोट्या आरोपांमुळे/ खटल्यांच्यामुळे, निरपराध व्यक्तींमधे आणि त्याद्वारे एकूणच त्या समाज घटकात अशा कायद्यांमुळे आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना निर्माण होणार नाही.
मायबोली वयात नाही आली, वय
मायबोली वयात नाही आली, वय सरलं आता.
आता काही होत नाही, नुसतं चावट चावट बोलून मुखसुख घ्यायचं वय झालंय.
आईंग??
हा आयडी पुरूषी वर्चस्वाला
हा आयडी पुरूषी वर्चस्वाला जस्टीफाय करणार्या विकृत मानसिकतेचा आहे.
पुरूष सत्ता स्त्री चं दमन करत आलेली आहे. पुरूष सत्तेच्या इतक्या गोष्टी अंगवळणी पडलेल्या असतात कि पुरूषाला आपण सत्ता गाजवतो हेच कळत नाही. स्त्रियांनी मर्यादा पाळली कि संस्कृती जपली जाते. पुरूषाने नाही पाळली तरी त्याचं कौतुकच होतं. सलामन खान ऐश्वर्याराय मधे बदनामी ऐश्वर्या रायची होते.
स्त्री हा वीकर सेक्शन आहे (हे अनेक स्त्रियांना मान्य नाही, पण पुरूषसत्तेच्या जगात ते असं). वीकर सेक्शनला जेव्हां बरोबरीची संधी दिलीजाते तेव्हा वर्षानुवर्ष जी बंधनं टाकली आहेत ती झुगारून देण्यासाठी प्रोत्साहन देणं गरजेचं असतं. पुरूषसत्तेचा आवड पुरूषार्थ दमन करण्यात नाही तर बरोबरीची संधी देण्यात असतो. स्त्रिया जेव्हां त्यांच्या लैंगिक इच्छा, हेल्दी फर्टिंग अशा भावना व्यक्त करू बघतात तेव्हां त्यासाठी निरोगी वातावरण आहे याचा अहसास करून देणं हे पुरूषांचं काम आहे. नाहीतर अजूनही ते पुरूषसत्तेचेच भारवाहक आहेत.
जेव्हां स्त्रिया अशा पद्धतीने व्यक्त होतात तेव्हां त्याच प्लॅटफॉर्मवर अशे धागे काढणे हे विकृतीचे लक्षण आहे. आमच्यावर पण अन्याय होतो अशा बोंबा ठोकणे हे अशा सत्ताधार्यांचे लक्षण आहे. अपवादाला नियम बनवून बोंबाबोंब करण्यामागे स्त्रिया आवाज उठवतात मग त्यांना पण आरोपीच्या पिंजर्यात उभे करा ही भिकारडी मानसिकता दिसते.
स्त्री च्या जागी अन्य दुर्बल घटक ठेवून बघा. त्या दुर्बल घटकांना टाचेखाली ठेवणारे त्यांच्या सत्तेविरूद्ध आवाज उठवला हा राग मनात धरून एखाद्या अपवादात्मक प्रसंगात कसे आक्रमक होतात हे नवीन नाही. सत्ताधारी वर्गाचा इगो आजच्या जमान्यात दाखवता येत नसल्याने आम्हीही तेव्हढेच व्हिक्टीम आहोत असा कांगावा करणारी ही मानसिकता दोन्ही कडचा अन्याय समानच आहे हेच दाखवण्याच्या प्रयत्नात असते.
याचा जर शास्त्रीय सर्व्हे झाला तर ? पुरूषांवर एव्हढा अन्याय होतो का ? काय टक्केवारी असेल ? लैंगिक शोषणाचे बळी पुरूष होतात अशी स्त्री सत्ता स्थापन झालीय का ? झाली असेल तर मग आवाज उठवला पाहीजे. पण खरंच झाली आहे का ? अपवादाला नियम बनवणे, व्यक्त होऊ पाहणार्या स्त्रियांना लागलीच लक्ष्य बनवणे हे समाजात राहण्याच्या लायकीच्या नसलेल्या व्यक्तीचं लक्षण आहे.
अशा व्यक्तीला नागडे करून चाबकाला मीठ लावून फोडून काढला पाहीजे. हरामखोर असतात असे लोक.
Pages