Submitted by ऋतुराज. on 10 January, 2025 - 10:57
आपल्याकडे चहाचे कप, बश्या, प्लेट, वाडगे, चटण्या-लोणच्याच्या बरण्या अशी मोजकी चिनीमातीची भांडी असतातच. पण त्यात खूप वैविध्य असते. काही जणांकडे तर खूप सुंदर कलेक्शन असते.
तर चिनीमातीची भांडी - क्रॉकरी या विषयावर चर्चा करण्यासाठी हा धागा. शीर्षक चिनीमातीची भांडी असे असले तरी इथे तुम्ही माती, चिनीमाती, काच, बोनचायना, क्रिस्टल, रंगीत क्रिस्टल अश्या क्रॉकरीची चर्चा करू शकता आणि तुमच्याकडे असणाऱ्या क्रॉकरीचे फोटो टाकू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>>>>कभी हम क्रॉकरीको देखते
>>>>>कभी हम क्रॉकरीको देखते रहे, कभी गुलाबजाम को. Happy
क्या बात है!!
तू हजरजबाबी राहून इतरांना फक्त कॉम्प्लेक्स देण्याचे शुभ कार्य करत जा
धन्यवाद .अस्मिता तुझेही
धन्यवाद .
अस्मिता तुझेही पदार्थ भारी असतात बघितलेत खाऊगल्लीत .तुझीही क्रॉकरी येउदे इथे पदार्थासाहित.
सौदामिनी कप छान फोटो सगळेच
सिरॅमिकच्या वस्तूंचा नाद फार छान येतो.…+1
एकसे बढकर एक कलेक्शन होत आहे
एकसे बढकर एक
कलेक्शन होत आहे
… मेलामाईन प्लास्टिक, सोन्या
… मेलामाईन प्लास्टिक, सोन्या चांदी ची भांडी आली…
हे न झाल्यास बेस्ट.
चीनीमाती, काच, बोनचायना, क्रिस्टल, रंगीत क्रिस्टल.. एक जादुई दुनिया आहे. त्यात मेलामाईन प्लास्टिक विजोड वाटेल आणि सोने-चांदी show offish.
एनी वे, बहुमताने ठरवा.
.. काचेच्या क्रोकरी चं हेच
.. काचेच्या क्रोकरी चं हेच वैशिष्ट्य आहे की ती कितीही जुनी असली तरी प्रत्येक वेळी नवीन वाटते.…
बरोब्बर !
धुरकट होतात हो काचेचे ग्लास.
धुरकट होतात हो काचेचे ग्लास. पण मला वाटतं हलक्या दर्ज्याचे धुरकटत असावेत.
का पण तुम्ही लोक असा त्रास
का पण तुम्ही लोक असा त्रास देता पदार्थ दाखवून? मुद्दाम ना?
थांबा, मला फारसा शौक नसला तरी शोधून शोधून एखादा तरी झब्बू टाकतेच 1-2 दिवसांत.
>>>>>>थांबा, मला फारसा शौक
>>>>>>थांबा, मला फारसा शौक नसला तरी
हाहाहा
माझ्या कडे काही नाहीये पण मी शोधणारे
मस्त धागा!
मस्त धागा!
अल्पना , तू स्वतः बनवलेला ट्रे फार आवडला. मामी कडचे कमळाचे पानही सुरेख आहे.
… धुरकट होतात काचेचे ग्लास…
… धुरकट होतात काचेचे ग्लास…
चांगल्या काचेच्या वस्तू अनेक वर्ष बिनबोभाट वापरता येतात. स्वानुभव !
मासल्यासाठी घरातले फोटो डकवले तर सोबत कप/ग्लास/प्लेटस् चे वय आणि kiss count लिहिणारच आहे.
आतापर्यंत मला विशेष आवडलेले :
आतापर्यंत मला विशेष आवडलेले :
किल्ली यांचा चहाचा ग्लास. Ceramic मधे हे with external grooves डिझाइन म्हणजे ग्रेट. ग्लास आतून स्मूद आहे म्हणजे क्लीनिंगला सोपे. कलरही फार सुंदर !
मामी यांची प्लेट - ग्लेझ आणि गडद रंग असूनही delicate दिसतेय. फिनिश फार छान.
सिमरन यांचे फालूदा ग्लासेस ; timeless,evergreen design. मी अशा टॉल ग्लासेस मधे Mexican salad, कोशिंबिर टाईप डिशेश पण सर्व करतो कधी कधी. जस्ट फॉर येडचापगिरी
अल्पना यांची सेरेमिक कढई- for the sheer uniqueness of the product. Organic and long lasting ! आता तिचा कान तुटलाय तर अल्पना recycle- repurpose किंवा craft करतील बहुतेक. Best !
ऋुतुराज यांची मूळ लेखात दिसणारी बरणी, सुंदर आकार आणि ग्लेझ.
(No subject)
मस्त धागा आहे. ही पाहू का ती असं झालंय.
माझे काही नमुने. बरेचसे खाऊगल्लीत येऊन गेलेत.
यम्मी
यम्मी
माझेमन सुंदर संग्रह आहे
हिरव्या पानातल्या इडल्या किती cute आहेत
चीनीमाती, काच, बोनचायना,
चीनीमाती, काच, बोनचायना, क्रिस्टल, रंगीत क्रिस्टल.. एक जादुई दुनिया आहे. त्यात मेलामाईन प्लास्टिक विजोड वाटेल>>>>>> +११११११११
माझेमन वॉव! एक से बढकर एक.
माझेमन वॉव! एक से बढकर एक.
@ माझेमन सुंदर संग्रह आहे
@ माझेमन सुंदर संग्रह आहे
+ 1
१ ली आणि ९ वी (श्रीखंड असलेली) जास्त आवडली.
👌
मला ४ आणि ११.
मला ४ आणि ११.
लाल रंग आव्डीचा. आणि काळ्ञा प्लेटवरचे ते नाजूक नक्षीकाम फार सुंदर वाटले.
------------
अनिंद्य ९ वी पेस्टल जेड प्लेट मस्तच आहे.
थॅंक यू लोकहो
थॅंक यू लोकहो
श्रीखंड डिश माझीही फेव्हरीट अनिंद्य.
सामो ती फुलाची नक्षी असलेली डिश डार्क ग्रीन आहे. फोटोत काळी वाटतेय…
माझे मन मस्तच कलेक्शन .. आणि
माझे मन मस्तच कलेक्शन .. आणि त्यातील पदार्थ सुद्धा रंगसंगतीत बसले आहेत.
सिरॅमिकच्या वस्तूंचा नाद फार
सिरॅमिकच्या वस्तूंचा नाद फार छान येतो.>>>> मामी, खरंय.
तुमची प्लेट कम कोस्टर आवडलं. सुंदर रंग.
सिमरन, तुमच्याकडचे फालुदा ग्लास मस्तच.
चीनीमाती, काच, बोनचायना, क्रिस्टल, रंगीत क्रिस्टल.. एक जादुई दुनिया आहे. त्यात मेलामाईन प्लास्टिक विजोड वाटेल आणि सोने-चांदी show offish.>>>>> सहमत. इथे शक्यतो नकोच.
@माझेमन,
सुंदर कलेक्शन.
पदार्थ आणि क्रॉकरी, दोन्ही एक से बढकर एक.
मला ३, ९ आणि ११ जास्त आवडल्या.
प्रज्ञा९, तुमचे कलेक्शन पण नक्की टाका.
@अनिंद्य, तुमच्या फोटोच्या प्रतिक्षेत
छान धागा. टेराकोटाचे सगळेच
छान धागा. टेराकोटाचे सगळेच फोटो आवडले. वारली पेंटिंगचा बाऊल मस्त. सौदामिनी कप नाव आवडलं. हा माझा आवडता कप.
छान कप मेघना
छान कप मेघना
सौदामिनी कप हे नामकरण वाडेकरांनी केले आहे
मला सॉलिड, overtly masculine
मला सॉलिड, overtly masculine डिझाइन्स जास्त आवडतात क्रोकरी मधे. ह्या नाजूक Italian summer theme च्या प्लेटस् अपवाद आहेत.
माझ्याच प्रतिसादात कुठेतरी आधी लिहिले होते की या प्लेट्सची वयं झालीत आता. १२ वर्षांपूर्वी एकूण १८ जणी नांदायला आल्या होत्या. पाठराखण म्हणून तितक्याच त्यांच्या मोठ्या बहिणी, छोटे आणि मोठे बोल, सर्विंग पॉट्स असे सर्व. बड़ा परिवार, सुखी परिवार होता.
मग जीवन के आँधी-तूफान सोसून बिछड़े सभी बारी बारी होता होता आता ५ जणी उरल्या आहेत.
पोक्त असून, टक्केटोणपे खाऊनही रूप मात्र राखून आहेत. माझ्या फोटोत खूपदा बघून बोअर झालाच असाल 😄
मला ही नाजूक फुलाफुलांची
मला ही नाजूक फुलाफुलांची नक्षी फार आवडते.
मेघनाचा कपही सुंदर.
हे एक full tea service कुटुंब
हे एक full tea service कुटुंब होते, कप, केटली, दूध आणि साखरेचे पॉट्स वगैरे. फुल गर्विष्ठ आणि माजोरडे.
आता त्यातील वीरगती प्राप्त झालेल्यांची संख्या जास्त झाली आहे. चमक मात्र नव्यांना लाजवेल अशी.
या कपांचे मोठे कान आवडतात. शूर्पकर्ण.
Kiss Count = in excess of 2000 ❤️
Server plate - साधे, नो फस
Server plate - साधे, नो फस डिझाइन. ह्या सर्वरचे नाव Macho Man ठेवले आहे
Hardworking Blue collar
Hardworking Blue collar workers : मला ह्या प्लेट्सचा घाट फार देखणा आणि border चा रंग जरा हटके वाटतो. म्हणून फेव्ह.
>>>>>>Hardworking Blue collar
>>>>>>Hardworking Blue collar workers
हाहाहा मस्त कल्पक उपमा.
एका मैत्रिणीने स्वतः बनवून
एका मैत्रिणीने स्वतः बनवून गिफ्ट केलेले कप -
Champagne Glasses.
Champagne Glasses.
My Clear Favs !
* * *
नाज़ुक से इस जाम में नाज़ुक से फ़साने हैं
Pages