"ए मेरे बचपन .. !" - लहानपणीच्या निरागस समजुती

Submitted by छन्दिफन्दि on 27 November, 2022 - 20:07
bachpan

"बायकांना सुंदर करायचं कार्य भवानी माता करते हे लहानपणी आमच्या मनावर इतकं ठसल होत की त्यानंतर कितीतरी वर्ष सुंदर स्त्री दिसली की हीचा मेकअप वर भवानी मातेनेच केलाय असच वाटायचं." हरी तात्या मधलं हे वाक्य ओठावर हसू तर आणतच पण बालपणीच्या भाबडेपणाची सैरच करून आणत.

ह्या त्यातल्याच काही समजुती !

***

शेजारची आजी "देवाघरी गेली" असं ऐकलं आणि तिला उचलून नेताना बघितलं.

माणूस देवाघरी कसा जातो ह्याच एक चित्र बाल मनात तयार झालं, माणसं त्या व्यक्तीला देवळात घेऊन जातात आणि देवळात ठेवून परत येतात. नंतर रात्री (दुसरा तिसरा कोणी नाही तर एकमेव) मारुतीबाप्पा येऊन हातावरून (जसा द्रोणगिरी पर्वत नेला होता तसा) देवाघरी घेऊन जातो.

***

नाटकामध्ये जेव्हा एखादं पात्र म्हणतं " चहा घेऊन येते.." तेव्हा वाटायच आत (विंगेत) एकदम मस्तपैकी स्वयंपाक घर आहे, तिकडेच चहा बनवून घेऊन येतात. पण तरी प्रश्न असेच " ह्यांचा चहा इतक्या पटकन कसा बनतो?

***

मराठी हिंदी सिनेमे बघून तर पक्की ठाम समजूत होती, प्रेमात पडलं की गाणी गायची, नव्हे नव्हे फुला- झाडाभोवती नाच पण करायचा.

एका मामाचा प्रेम विवाह ठरला, म्हणजे त्याने तसं जाहीर केलं. मग पहिला महत्वाचा पडलेला प्रश्न "हा मामा आणि होणारी मामी कोणत्या बरं बागेत नाच करत असतील, कुठलं गाणं म्हणत असतील ? "

***

" चलो भागके शादी करते है!" हा हिंदी सिनेमातला डायलॉग ऐकून तर पाठ झालेला. कोणी पळून जाऊन लग्न केलं म्हणजे बॅगा आधीच भरून ठेवलेल्या असतात. आणि अक्षरशः त्या भरलेल्या बॅगा घेऊन दोघं(आपापल्या घरून) पळत सुटतात आणि पळताना लग्न करतात अशी एक आपली भाबडी समजूत.

***

सुहाग रातचा सिन बघुन तर पक्की खात्री होती की

लाल साडीचा घुंगट उचलला आणि लाईट बंद केला की थोड्या दिवसांनी बाळ होत/ येतं.

***

ह्या वाचताना तुम्हाला पण नक्कीच तुमच्या लहानपणच्या भाबड्या समजुती आठवल्या असतील आणि हसू आवरले नसेल तर नक्की शेअर करा .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कसोटी क्रिकेट मध्ये 'भारताने रबर जिंकले' अशा बातम्या यायच्या त्यावेळी आम्ही चर्चा करत असू.
'ते सोन्याचं खोडरबर असतय बे ! जिंकलेल्या टीम ला मिळतय बे !'
( सोलापुरी टोन मध्ये वाचावे)

क्रिकेटमध्ये 'बळी' या शब्दाचा अर्थ सुद्धा नीट कळत नसे, असे अजूनही कोणास आठवते का? कारण ठार मारण्याला सुध्दा 'बळी देणे' हाच शब्द असायचा. (अर्थात हे खूप लहानपणी म्हणजे चौथी पाचवीत असताना असेल)

@पान पराग त्याच उत्तर आत्ता मिळालं तरी चालेल मला. की पान पराग मध्ये तंबाखू असतें का नसते Happy

Submitted by मी बिल्वा. on 17 December, 2023 - 18:21
>>>>>>
दोन्ही प्रकारचे मिळतात, साधे आणि तंबाखुयुक्त. दोन्ही पुड्यांचा रंग वेगळा असतो, तंबाखु नसलेली पुडी निळ्या रंगाची.

(मायबोलीवर वेळ लागेल पण उत्तर मात्र मिळतं. Wink )

यहां अमके अमके मना आहे. हे वाक्य मला होकारार्थी वाटे. मना है - हे नकारार्थी कसे असेल.
"मना नही है " असे हवे ना!

गॉगल घालणारे सिगारेट ओढणारे लोक सरसकट उद्धट/उर्मट आहेत असे वाटायचे. काहीही कारण नसताना त्यांचा राग येत असे Lol
(आजच्या काळात मीच स्वतः सिगारेट नसलो कधी ओढत तरी गॉगल मात्र घालतो अनेकदा Proud )

अक्षरशः डोळ्यातूंन पाणी येईस्तोवर हसलो. सगळे आपापल्या प्रतिसृष्टीचे विश्वामित्र जणू... Biggrin

लहाणपणी मी ताडगोळा कधी पाहीला नव्हता ( अर्थात घरी न आणल्याने ) आणि आमच्या शेजारच्या काकू वरचेवर आणत, मी त्यांच्या मुलासोबत खेळायला जात असे तेव्हा त्या आग्रह करत असत, तर मला तो जिलेबी सारखा तळलेला काही तरी तेलकट पदार्थ आहे असे वाटे, आणि जिलेबी आधीपासूनच नावडती असल्याने मी त्याला नकार देत असे, पुढे मोठं झाल्यावर कळलं हे तर फळ आहे एक प्रकाचं

मला वाटतं अगदी दहावीपर्यंत आम्ही नव्या वर्षाच्या स्वागताला जुन्या वर्षाचं प्रतिक असलेला मानवाकृती पुतळा जाळताना त्याला आवर्जून सांताक्लॉजचाच मुखवटा घालून त्याला जाळून त्याच्या भोवती फेर धरुन नाचत असू.... आश्चर्याचा भाग म्हणजे घरातल्या मोठ्या मंडळींना देखील सांता माहित नव्हता.

आमच्या इथुन मुंबई विमानतळावर उतरणारी विमाने अगदी जवळून दिसत, पण त्यातून निघणारा धूर कधी दिसत नसे त्यामुळे आकाशात उंचावरून धूराची रेषा काढत उडते ते रॉकेट असते अशी ठाम समजूत होती.

लहानपणी जेव्हा कुणी विजेच्या तारांना चिकटते तेव्हा त्याला सोडवायला लाकडी कठीने मारायचे असते हे मोठ्यांकडून ऐकून ऐकून डोक्यात पक्कं झालेलं, बाकी काही उपाय असतो हे माहीतच नव्हतं....जेव्हा केव्हा कुणी मोठी माणसं विजेचं काम करायला जात तेव्हा खबरदारी म्हणून मी एक काठी जवळ घेऊन ठेवत असे, पण माझे हे security protocols इतर कुणा मोठ्यांना माहीत नव्हते नाहीतर काठीच्या फटक्यांच्या भितीने त्यांचे कामात लक्ष लागले नसते. Rofl

मला वाटतं अगदी दहावीपर्यंत आम्ही नव्या वर्षाच्या स्वागताला जुन्या वर्षाचं प्रतिक असलेला मानवाकृती पुतळा जाळताना त्याला आवर्जून सांताक्लॉजचाच मुखवटा घालून त्याला जाळून त्याच्या भोवती फेर धरुन नाचत असू.... आश्चर्याचा भाग म्हणजे घरातल्या मोठ्या मंडळींना देखील सांता माहित नव्हता.

>> हे बहूतेक मुंबई स्पेसिफिक असावे. कारण मी माझ्या पुण्याच्या नवऱ्याला आम्ही ख्रिसमस असा सेलिब्रेट करायचो असे सांगितलं. त्याला इतकं आश्चर्य वाटलं. प्लस, त्याने पुतळा का जाळायचात, भोवती का नाचायचात वगैरे विचारलं तर मला काहीच सांगता आलं नाही. लहानपणी आपण किती वेड्यासारखं काहीही करायचो. खरंच भारी दिवस होते.

त्याहून मज्जा म्हणजे तो सांता क्लॉज पुतळा घरोघरी घेऊन जाऊन / दाखवून ख्रिसमसची वर्गणी मागणे. ती १-२ रुपये इतकीच मिळायची घरटी. कोणीतरी चपटी दारूची बाटली आणून त्या पुतळ्यात कापसात लपवत असे.

मी माझ्या मोठ्या भावाला ते बाटलीचे विचारले होते लहानपणी. मी बालवाडीत तो चौथीत. त्याने सांगितलं होतं की दारू हे वाईट गोष्टींचं प्रतीक असतं. त्यामुळे त्या पुतळ्यासोबत तेही जाळायचे. माझ्यासाठी अर्थातच "दादा वाक्यं प्रमाणं" होते.

कोणी ख्रिस्ती बांधव हे वरचे सगळे लॉजिक वाचून जीव द्यायचा Lol

त्याहून मज्जा म्हणजे तो सांता क्लॉज पुतळा घरोघरी घेऊन जाऊन / दाखवून ख्रिसमसची वर्गणी मागणे. ती १-२ रुपये इतकीच मिळायची घरटी..>>> हो हे राहीलंच की Happy Cheap Thrills!!!

हे वाचताना आठवलं आमच्या शेजारच्या सोसायटी मध्ये मुलं असा पुतळा करून त्यांच्या सोसायटी भर फेरी मारायची.. तेव्हा गाणी म्हणायची.. नंतर बहुदा जाळत असावेत... म्हणजे तस ऐकलेल.

मग ते काय असत??>>> Technically known as contrails( जो धूर दिसतो तो ), these white trails are created from water vapour produced by the combustion of fuel in aircraft engines. At their cruising altitude of 10,000m, temperatures are around -55°C. As it’s so cold, the water turns to ice particles, but how long they remain visible depends on humidity.

If the air is relatively humid, the contrails will grow and remain visible long 
after the aircraft has disappeared.

जेव्हा हवेचे तापमान शून्याच्या खूप खाली असते तेव्हा कार्सच्या एक्झॉस्ट मधून पांढरा धूर येतो ते हेच contrails (condensation trails).
फाविदडि ह्यांनी सांगितल्या प्रमाणे एक्झॉस्ट गॅस मधील पाण्याच्या वाफेचे संक्षेपण (condensation) होते. मात्र हा धूर जास्त टिकत नाही.

तापमान न बघता घराबाहेर पडला आणि पुढील कार्स चा पांढरा धूर दिसायला लागला तर आज तापमान खूप कमी आहे हे समजण्याचा ठोकताळा आहे. टेस्ला कार्सने हा अंदाज हिरावून घेतला आहे.

आम्ही पूर्वी बैलगाडीतून जाताना थंडी वाजली की तापमान कमी आहे असा अंदाज बांधायचो. इतकंच कशाला, भुताला थंडी वाजली म्हणून त्याच्या डोक्याला चोळी बांधणाऱ्या बायका होत्या एके काळी.

(संदर्भ - चिकवा)

सगळेच Rofl

बोकलतचा फोटो विशेष चपखल आहे. प्रचंड हसते आहे Lol

अरे देवा मग ते नसतं का रॉकेट?>>> माझा पण हा गैरसमज अगदी अलिकडेच दूर झाला आहे. झाकल्या मुठींचा काऊंट वाढवा Lol

सांता क्लॉज पुतळा
Security Protocol
>>> Lol

भुताला थंडी >>> Proud

अरे देवा मग ते नसतं का रॉकेट?>>> माझा पण हा गैरसमज अगदी अलिकडेच दूर झाला आहे. झाकल्या मुठींचा काऊंट वाढवा>>>>> ह्यात माझी पण मूठ झाकतो मी 🤣

रॉकेट नसतं का ते . मला इथे वाचून ज्ञानप्राप्ती झाली.

ख्रिसमस वर्गणी, सांताकलॉज. नवीन वर्षाचे स्वागत करताना पुतळा जाळणे हे आमच्या लहानपणी आमच्या एरियात तरी नव्हतं. ते मी लग्न झाल्यावर नालासोपाऱ्यात गेल्यावर कॉलनीत बघितलं हे.

मला वाटतं अगदी दहावीपर्यंत आम्ही नव्या वर्षाच्या स्वागताला जुन्या वर्षाचं प्रतिक असलेला मानवाकृती पुतळा जाळताना त्याला आवर्जून सांताक्लॉजचाच मुखवटा घालून त्याला जाळून त्याच्या भोवती फेर धरुन नाचत असू...>>>> मुंबईत राहणाऱ्या मुलांना हे माहीत असण्याची शक्यता जास्त आम्ही पण लहानपणी बिल्डींगच्या एंट्रन्स लां दाढीवाला पुतळा बसवून मग तो 12वाजता न्यू इयर जाळत होतो .दारूची चपटी मस्ट ,त्यामागचा मला दादा लोकांनी सांगितलेला अर्थही सेम.त्याला सांता किंवा बुढा बाबा असं म्हणून अगदी लहान मुलांना जवळ जाऊ नये मज्जाव असायचा पण सांता जरी असला मुलांसाठी त्याला जाळणे आनंदाची बाब होती मज्जा यायची.

Pages