नमस्कार मित्रांनो
व्यावसायिक कामानिमित्ताने मी मुंबईमध्ये भायखळा येथे आलेलो आहे.
फक्त उद्या संध्याकाळच - सहा तारीख माझ्यासाठी मोकळी आहे. म्हणून
सोमवार दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी ६ नंतर भायखळा येथे एक माबो गटग करण्याचे ठरत आहे. सोमवारचा, म्हणजे कामकाजाचा दिवस असल्याने फार लांबून कोणी येऊ शकणार नाहीत ह्याची कल्पना आहे. घाईत कळवल्याबद्दल क्षमस्व !
परंतु भायखळा परिसरात किंवा मुंबई उपनगरांत रहाणारे कोणी माबोकर येऊ शकत असतील तर त्यांचे सहर्ष स्वागत आहे. (केवळ एकमेकांची सदिच्छा भेट आणि गप्पा-टप्पांचा कार्यक्रम एवढाच ह्या कट्ट्याचा मूळ उद्देश आहे.
संजय भावे त्यांच्या एका मित्रासह इथे येत आहेत.
भेटण्याचे ठिकाण
HOTEL HERITAGE,
Sant Sawata Marg,
Next to Gloria Church,
Byculla (E), Mumbai - 400027
Tel No : 022-69374891
.......
शक्य असल्यास संपर्कातून जरूर कळवा. वाट पाहत आहे.
धन्यवाद !
कट्ट्यास शुभेच्छा.
कट्ट्यास शुभेच्छा.
फोटोसह वृत्तांताच्या प्रतीक्षेत.
माझे मुंबईतील एक घर इथून चालत
माझे मुंबईतील एक घर इथून चालत पंधरा ते वीस मिनिटे अंतरावर आहे
आणि आज मी तिथेच होतो. आता बारा वाजता नवी मुंबईला परत आलो.
लॅपटॉप सोबत होता. धागा आधी आला असता तर वर्क फ्रॉम होमचा विचार करत थांबता आले असते. किंवा मुलांच्या शाळेचा विचार करता शक्य झालेही नसते. पण ठिक आहे. पुढच्या वेळी कधीतरी नशिबात आहे समजूया.. भेटीला शुभेच्छा..
शुभेच्छा. वृत्तांत टाकणे.
शुभेच्छा. वृत्तांत टाकणे.
एकेकाळी रहात होतो...
एकेकाळी रहात होतो...
आता मुंबई सुटली.
BTW is it Sant Sawata Marg?
या गटगला येण्याची खूप इच्छा
या गटगला येण्याची खूप इच्छा होती, किंबहुना वैयक्तिक संभाषणात आपले तसे बोलणेही झाले होते.
अचानक महत्वाचे काही काम निघाल्यामुळे येणे शक्य होत नाहीये.
पुन्हा लवकरच हा योग येवो....
संध्याकाळी सहा/सव्वा सहा
संध्याकाळी सहा/सव्वा सहा पर्यंत ठरलेल्या ठिकाणी पोचतो....
>>BTW is it Sant Sawata Marg?
>>BTW is it Sant Sawata Marg?>>
हो, संत' 'सावता' चे चुकुन' सविता' झालेले दिसतंय
BTW is it Sant Sawata Marg?
BTW is it Sant Sawata Marg?
हो, संत सावता माळी मार्ग आहे तो.. चुकून सविता भाभी आल्या तिथे
धन्यवाद मित्रांनो
धन्यवाद मित्रांनो
तुमच्या शुभेच्छा खूप मोलाच्या आहेत !
ऋन्मेऽऽष / अन्य कोणीही,
7 जानेवारीला संध्याकाळी मी पाच दहाच्या डेक्कन क्वीन ने परतीच्या प्रवासात निघत आहे . चार वाजता सीएसएमटी ला यायला जमेल का?
तो एक शेवटचा पर्याय राहतो
ऋतुराज येणार आहेत स्वागत !
ऋतुराज आज येणार आहेत
स्वागत !
Two's company, three's a माबो
Two's company, three's a माबो गटग
कुमार सरांना भेटून.. पुनःहा
कुमार सरांना भेटून.. पुनःहा ऑफिसला निघालो....
मायबोली वर अनेक वर्षापासू सरांचे लेखन माहितीपूरक, मार्गदर्शक वाचत आहे....
संध्याकाळी मला वेळ नाही.... पण कुमार सरांना भेटण्याची संधी गमवायची नाही... म्हणून धावती भेट....
गटग ला यायला आवडलेच असते..
पुढील वेळी नियोजनपूर्वक....
सतीशना भेटून खूप आनंद झाला.
सतीशना भेटून खूप आनंद झाला.
पहिलीच भेट ..... पण गाढ मैत्र म्हणजे काय ते अनुभवणारी
छान भेट .
छान भेट .
आजच्या गटगला शुभेच्छा.
तिथे संत सावता माळी सभागृहही आहे, एकदा गेलेले म्हणून असंच लिहितेय.
आज मी दीड वाजता भायखळ्यालाच
आज मी दीड वाजता भायखळ्यालाच होतो. पण संध्याकाळी सहापर्यंत तिकडे थांबणे अशक्य होते.
तसे आपण दोन तीनदा पुण्यात भेटलो आहेच. ओळख झाली आहे. लोणावळा गटग ठेवा नऊ ते चार. मुंबई पुणे दोन्हीकडच्या लोकांना मध्यवर्ती. सोयीचं.
६ चे ४ जणांचे गटग जोरदार
६ चे ४ जणांचे गटग जोरदार रंगते आहे.
दुसरा अंक ऐन भरात आहे......
संजय
ऋतुराज
डॉ महेश
व
मी.....
धमाल
व्वा छान वृ येऊ द्या
व्वा छान
वृ येऊ द्या
व्वा छान वृ येऊ द्या
व्वा छान
वृ येऊ द्या
वृ येऊ द्या
वृ येऊ द्या
>>>> येणार येणार....
आता तिसरा अंक संपून लोक आपापल्या घरी मार्गस्थ झाले आहेत.
वृ. यथावकाश येईलच.
वृत्तांताच्या प्रतिक्षेत,
वृत्तांताच्या प्रतिक्षेत, तोवर मजा करा.
भायखळा गटग वृतांत:
भायखळा गटग वृतांत:
मायबोलीवरच्या गटगची मजा काही औरच.
आज सकाळी सकाळी कुमार सरांचा हा अचानक ठरलेला भायखळ्याच्या गटगचा धागा वाचला आणि (ट्रेनमध्ये असल्याने) मनातल्या मनात आनंदाने उडी मारली.
कुमार सरांना भेटण्याची इच्छा होतीच आणि तीही मुंबईत पूर्ण होणार होती. त्यामुळे लगेच आज संध्याकाळी काही मीटिंग, कॉल नाही ना? ते पाहून घेतले व लगेच संपर्कातून सरांना मी येतोय म्हणून कळवले. त्यांच्याबाबत संजय भावे पण भेटणार होते त्यामुळे उत्सुकता अधिक.
दिवसभराची कामे वेळेत आटपून लगेच भायखळ्याला गेलो. स्टेशनपासून हे हॉटेल अगदीच जवळ असल्याने मी जरा लवकरच पोचलो. हॉटेलच्या लॉबी मध्ये वाट पाहत बसलो. पाच मिनिटात कुमार सर आणि त्यांचे मित्र डॉ महेश आले. हे गुजरातचे मायबोलीकर. नमस्कार चमत्कार झाल्यावर मग जुजबी ओळख झाली. इतक्यात संजय भावे बदलापुरहून आले. मग गप्पांना सुरुवात झाली. जुनी मायबोली, नवी मायबोली, आयडींची गंमत, ड्यू आयडी, रंगलेले किस्से आणि लेख अशी तुफान चर्चा झाली.
आता जरा बाहेर पडून पाय मोकळे करू आणि फिरत फिरत गप्पा मारू असे ठरले. बाजूलाच राणीची बाग आहे, त्यामुळे तिकडेच गेलो पण ती पाच वाजताच बंद झाली होती त्यामुळे तिथून अबाऊट टर्न घेऊन हॉटेलात शिरलो.
आता भुका चाळवल्या, ऑर्डरी गेल्या.
आता खर गप्पांना उधाण आले होते. कुमार सर आणि संजय भावे छान बोलत होते. लिखाणाची सुरुवात कशी केली, कोणत्या गोष्टी लिखाणाला स्फूर्ती देतात, जीवनशैली कशी असली पाहिजे, गत आयुष्यातील मजेदार आणि संस्मरणीय प्रसंग, त्यातून मिळालेले आयुष्याचे धडे, आयुष्यात आलेली माणसे, त्यांच्यापासून घेतलेली प्रेरणा, आयुष्यातील स्थित्यंतरे आणि पुढील आयुष्यात केलेले बदल या आणि अश्या अनेक विषयांच्या गप्पा अगदी खास रंगल्या. एका विषयातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा असे निघत राहिले. मी तर नुसता गुंग होऊन ऐकत होतो.
पोट भरले पण गप्पांनी मन काही भरले नाही.
मग अचानक घड्याळात पाहिले तर सव्वा नऊ झाले होते त्यामुळे जरा आवरते घेतले. खरं तर अजून गप्पा मारायच्या होत्या.
मग पुढच्या गटगसाठीची आमंत्रणे दिली गेली आणि आम्ही निघालो.
असे हे वर्षाच्या सुरुवातीला अनपेक्षित घडलेले गटग धमाल आणि रंगतदार झाले.
ऋतुराज छान वृत्तांत.
ऋतुराज छान वृत्तांत.
छान वृ ऋतुराज. फोटो?
छान वृ ऋतुराज.
फोटो?
खूप छान.
खूप छान.
ऋतुराज यांचा वृ वाचून खूप
ऋतुराज यांचा वृ वाचून खूप काही मिसल्याचे फिलिंग येत आहे.
ऋतुराज छान वृत्तांत.
ऋतुराज छान वृत्तांत.
ऋतुराज छान वृत्तांत....
ऋतुराज छान वृत्तांत....
मला आता अधिकच चुकल्यासारखे वाटतंय.....
छान वृत्तांत.
छान वृत्तांत.
अरे वा छान सुटसुटीत
अरे वा छान सुटसुटीत वृत्तान्त..
जमायला हवे होते मला..
फोटो येऊ द्या...
आणि हो, काय खाल्ले ते पहिले येऊ द्या.. गप्पा तर केवळ निमित्त असतात
बाई दवे,
राणीबागेत माझे नाव सांगितले असते तर चोर दरवाजा उघडून एन्ट्री दिली असती
यातले दोघे गोष्टीवेल्हाळ आणि
यातले दोघे गोष्टीवेल्हाळ आणि अनुभवांची गाठोडी सांभाळलेले असल्याने वेळ कमीच पडणार हे माहीत आहे.
अशा गटगाला एकच उपाय म्हणजे audio/voice record करणे.
Pages