संस्मरणीय भायखळा, मुंबई गटग

Submitted by हेमंतकुमार on 5 January, 2025 - 12:32

नमस्कार मित्रांनो

व्यावसायिक कामानिमित्ताने मी मुंबईमध्ये भायखळा येथे आलेलो आहे.
फक्त उद्या संध्याकाळच - सहा तारीख माझ्यासाठी मोकळी आहे. म्हणून
सोमवार दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी ६ नंतर भायखळा येथे एक माबो गटग करण्याचे ठरत आहे. सोमवारचा, म्हणजे कामकाजाचा दिवस असल्याने फार लांबून कोणी येऊ शकणार नाहीत ह्याची कल्पना आहे. घाईत कळवल्याबद्दल क्षमस्व !

परंतु भायखळा परिसरात किंवा मुंबई उपनगरांत रहाणारे कोणी माबोकर येऊ शकत असतील तर त्यांचे सहर्ष स्वागत आहे. (केवळ एकमेकांची सदिच्छा भेट आणि गप्पा-टप्पांचा कार्यक्रम एवढाच ह्या कट्ट्याचा मूळ उद्देश आहे.

संजय भावे त्यांच्या एका मित्रासह इथे येत आहेत.
भेटण्याचे ठिकाण
HOTEL HERITAGE,
Sant Sawata Marg,
Next to Gloria Church,
Byculla (E), Mumbai - 400027
Tel No : 022-69374891
.......
शक्य असल्यास संपर्कातून जरूर कळवा. वाट पाहत आहे.
धन्यवाद ! Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

* एक मिश्किल शैलीतील लेख लिहिलेला >>> अहो, एकच नाही तर त्याहून अधिक लेखांतही अधूनमधून विनोदाची पेरणी मी केली आहे.
असो. Happy
. . .
* लेखनाचा आशय हाच त्याचा गाभा असतो. >>>> जोरदार अनुमोदन.

याच अनुषंगाने 'नाटक' म्हणजे मूलभूत काय, तर ते ग्रोटोवस्कीनी किती सुरेख सांगितले आहे ते इथे वाचता येईल :
https://www.maayboli.com/node/84576

("जीव ओतून अभिनय करणारा एक नट आणि त्याला पाहणारा एक प्रेक्षक या किमान गोष्टींनी नाटक सिद्ध होते"
पात्रांचे पोशाख, नेपथ्य, संगीत, नृत्य व प्रकाशयोजना या सर्व अवांतर गोष्टी आहेत." )

अहो, एकच नाही तर त्याहून अधिक लेखांतही अधूनमधून विनोदाची पेरणी मी केली आहे.
>>> हो, हो केली आहे. 'एक' फक्त उदाहरण म्हणून लिहिलेय असे समजा. Lol

ग्रोटोवस्कींशी सहमत निघाले माझे मत Happy

कुमार सर,
'संयोजकाच्या नजरेतून . . .'
हा सहा पदरी सविस्तर वृत्तांत खूप आवडला 👍

त्या नंतरच्या प्रतिसादात ह्या पानावरील प्रतिसादांमधून रंजकतेबरोबरच आलेल्या अन्य काही विचार करण्याजोग्या मुद्द्यांची घेतलेली स्वतंत्र दखलही आवडली. त्यापैकी,
मुद्दा क्र. १ :
>>"अति-शुद्धलेखनाचा आग्रह कोणाचाच नसावा परंतु जे काही लिहीले जाईल ते ‘स्वच्छलेखन’ असावे.">>
ह्याच्याशी १००% सहमत आहे.

मुद्दा क्र. २ :
>>"कल्ला करणे आणि कट्टा टाकणे हे वाक्प्रचार आम्ही 1980 च्या दशकापासून वापरत आलेलो आहोत. त्यामुळे तसे ते आता प्राचीनच म्हटले पाहिजेत !">>
माझा जन्म ऐशीच्या दशकात झाला असल्याने त्यावेळी किंवा त्याच्याही पूर्वी हे शब्द वापरात होते म्हणजे 'ते आता प्राचीनच म्हटले पाहिजेत !' 😀

मुद्दा क्र. ३ :
>>"जी माणसे आपल्याला ऑनलाइन भेटून बऱ्यापैकी सूर जुळणारी (किंवा न जुळणारी) वाटताहेत ती जेव्हा प्रत्यक्षात समोर येतात तेव्हा त्यांच्याबरोबर वेळ घालवणे कुतूहलजनक असते आणि अशा छोट्यामोठ्या संमेलनातच आपण आपल्यासमोर बसलेला माणूस ‘वाचायला’ शिकतो. त्यातूनच आपल्याला त्याची थोडीफार ओळख समजू लागते. असे ‘माणूस वाचन’ हे चार ते सहाच्या समूहात प्रभावीपणे होते. ">>
ह्याच्याशीही १००% सहमत आहे.

मुद्दा क्र. ४ :
>>"...">> हा अदृष्य मुद्दा न दिसल्यामुळे त्याला 'पास' 😀

मुद्दा क्र. ५ :
>>"माझ्या समजुतीनुसार मुळात हे संस्थळ म्हणजे लेखनाला प्राधान्य देणारे व्यासपीठ आहे. त्यामुळे एखाद्या लेखनामध्ये फोटोंचा वापर कितपत करावा हा मुद्दा विचार करण्याजोगा आहे आणि यावर मतभिन्नताही असणार हे उघड आहे.">>

येस... माझ्या समजुतीनुसार मुळात हे संस्थळ म्हणजे लेखनाला प्राधान्य देणारे प्रगत / आधुनिक व्यासपीठ आहे. त्यामुळे ह्या पाचव्या मुद्द्यात मांडलेल्या मतांचा आदर असला तरी त्यांविषयी प्रचंड 'मतभिन्नताही' आहे! ६ तारखेच्या गटगमध्ये झालेल्या आपल्या चर्चा-गप्पांमध्ये मतभिन्नता/मतभेद हे असावेतच, कारण त्यातून "विषय एकच असला तरी त्याकडे पाहणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्तींचे वेगवेगळे दृष्टिकोन समजतात" ह्यावरही एकमत झाले होते, त्यामुळे खरंतर ह्या मुद्द्याचे (आणि दुसऱ्या प्रतिसादातील 'ग्रोटोवस्की' च्या मताचे 😀) विश्लेषण करण्यासाठी तुम्ही मला स्वतंत्र लेखासाठी एक विषय पुरवला आहे, परंतु वेळेअभावी सध्या लेख 'पाडणे' शक्य नसल्याने इथेच प्रतिसादात लिहितो.
आणि,
>>>"या गटगचा वृत्तांत एका प्रतिसादात पूर्ण न करण्याचा गुन्हा माझ्याकडून घडणार आहे !">
च्या धर्तीवर हे विच्छेदन, आपलं विश्लेषण ह्या "एका प्रतिसादात पूर्ण न करण्याचा गुन्हा माझ्याकडून घडणार आहे !" 😂

प्रिय संजय,
तुमचेही पाच पदरी खंडनमंडन आवडले !

पाचवा मुद्दा हा खरोखर एका चांगल्या ललित लेखनाचा विषय आहे. लेखन आणि (प्रकाश)चित्रकला या दोन्ही विषयांमध्ये समान रुची असणाऱ्या कोणीही हा विषय ललितलेखन विभागात स्वतंत्रपणे घेत असल्यास मला तिथे प्रतिसादांमधून चर्चा करायला नक्कीच आवडेल. बघा विचार करून.
तूर्त इथे अर्धविराम देऊन मी थांबतो.

पुन्हा एकदा हे गटग यशस्वी करण्यात हातभार असलेल्या सर्व सभासदांना ( आणि वाचक-प्रतिसादकांना) धन्यवाद देऊन थांबतो.
Happy

किल्ली,
128 आणि 512 हे दोन क्रमांक जोडले आणि त्याच्या आधी &# व शेवटी ; लावले की झाले.
पण सलग

(संजय यांच्या जुन्या शिकवणीतून साभार !) Happy

@ किल्ली
नित्य वापरात येणाऱ्या काही निवडक स्मायली आणि एमोजींचे ( UTF-8) कोड्स :
(वापरुन वापरुन सवय झाली की कोड पाठ होतात 🙂)
स्मायली
😀 साठी = 😀
😁 साठी = 😁
😂 साठी = 😂
🙂 साठी = 🙂
😄 साठी = 😄
😇 साठी = 😇
😈 साठी = 😈
😉 साठी = 😉
😋 साठी = 😋
😍 साठी = 😍
😎 साठी = 😎
😏 साठी = 😏
😐 साठी = 😐
😘 साठी = 😘
😚 साठी = 😚
🤣 साठी = 🤣

एमोजी
👍 साठी = 👍
👎 साठी = 👎
👌 साठी = 👌
👊 साठी = 👊
👏 साठी = 👏
🙏 साठी = 🙏
🤚 साठी = 🤚
👆 साठी = 👆

वरती दिलेले कोड्स = नंतरच्या & पासुन ; पर्यंत कॉपी - पेस्ट करुन चाचणी घेउन बघा!
आपण व्हॉट्सअ‍ॅपवर वापरतो त्या जवळपास सगळ्या स्मायली / एमोजींचे इथे वापरायला सेफ असे UTF-8 कोड्स तुम्हाला इथे मिळु शकतील.

आणि हो, मला सर वगैरे नका म्हणु... नुसते संजय पुरेसे आहे 😀

व्वा!
सर्व वाचकांच्या रंजक प्रतिसादामुळे व कुमार सरांच्या विचार करण्याजोग्या मुद्द्यामुळे धागा रंगला.
तसेच धाग्याचा अचानक ठरलेले भायखळा गटग ते संस्मरणीय भायखळा गटग ( फोटोसहित ) हा शीर्षक प्रवास देखील रोचक.
धाग्याने शंभरी ओलांडली Happy

संजय,
ते तुम्ही दिलेले सर्व codes इथे माबोवर चालतील याची मला कल्पना नव्हती.
आज पहिल्यांदाच प्रयत्न केला Happy

कुमार सर,
आपण इथे किंवा अन्य कुठेही जे मराठी / देवनागरीत जे टंकतो ते सर्व युनिकोड (Unicode) मधे लिहिलेले असते, पण आपल्या नकळत! सगळा Encoding आणि Decoding चा खेळ आहे 🙂 ह्याचे एक गंमतीशीर उदाहरण बघा :

वरच्या प्रतिसादात तुम्ही जो मजकुर लिहिलाय त्यातले फक्त माझे नाव जरी UTF कॅरॅक्टर्स मध्ये लिहिल्यास,

\xe0\xa4\xb8\xe0\xa4\x82\xe0\xa4\x9c\xe0\xa4\xaf

असे वरील प्रमाणे भयंकर दिसेल 😂

पण हा (एनकोडेड) मजकुर डीकोड करण्यासाठी ह्या वेबपेजवर पेस्ट केल्यास तो खालील प्रमाणे दिसेल,

"संजय"

आज आपण जे काही आपल्या मातृभाषेत संगणक/जालावर लिहितोय (ते आणि ह्या स्मायली / एमोजी सुद्धा) ही सर्व UTF (Unicode Transformation Format) चीच कृपा आहे 🙏

संजय, खूप छान माहिती.
पाहिलं करून त्या पानावर. आता एकच विचारतो (अवांतर क्षमस्व).

मिपावर जशी काही ओळींच्या एखाद्या मजकूराभोवती रंगीत चौकट आखता येते किंवा एखाद्या परिच्छेदांत अक्षरांचा रंग वेगळा देता येतो, तसे इथे जमेल का ?

तसे इथे जमेल का ? Submitted by कुमार१

नाही. 😒

माबो प्रशासनाने फक्त Filtered HTML वापरण्याची मुभा दिली आहे.

तुम्ही म्हणताय त्या संस्थळावर Full HTML वापरण्याची सोय आहे म्हणून तिथे जमते.इथे नाही.

सुनील धन्यवाद !
. . .
या दोन दिवसाच्या मुंबईवारीच्या निमित्ताने माझी खरोखरच ‘जिवाची मुंबई’ झाली. अर्थात त्याची कारणे खाणे पिणे इत्यादी नसून ही दोन आहेत :
१. आमच्या डॉक्टरांच्या परिषदेत समारोपात आम्ही सादर केलेला बहुभाषिक सांस्कृतिक कार्यक्रम
आणि
२. अर्थात आपले माबोचे पंचम-गटग !

या खेपेस जवळजवळ सात वर्षांनी मुंबईला जाणे झाले. दोन्ही वेळा ट्रेनचा प्रवास होता एकेकाळी मनात सीएसएमटीबद्दलची एकमेव प्रतिमा अशी होती की इथे सर्व फलाट तळमजल्यावरच असतात आणि जिना अजिबात चढावा लागत नाही.

परंतु पुण्याहून जाताना कोयनाने पोचल्यावर माझे डबा जिथे आला तिथून मला एकदम 18 क्रमांक फलाट या प्रकारावर जावे लागले आणि जिना चढ-उतार हा प्रकार होताच; तसेच बाहेर पडायलाही खूप चालावे लागले. त्यामुळे ही ज्ञानात भर पडली.

परतीच्या प्रवासात भायखळ्याहून निघताना तेथील सहकाऱ्यांनी बजावून सांगितले की उबर बुक करताना “सीएसएमटी फलाट : 1” असे व्यवस्थित निवडा म्हणजे मग जिना वगैरे प्रकार लागणार नाही.

मुंबईविषयक सामान्यज्ञान हे आयुष्यभराचे शिक्षणच आहे ! Happy

धन्यवाद संजय.
छान माहिती दिलीत
Unicode माहिती आहे पण माबोवर आल्यावर संगणक साक्षरता कुठे जाते काय माहिती आणि मी कॉम्पुटर engineer राहतच नाही.
बागडो बागडो mode कायम 😂

आपले नवे सभासद डॉ. महेश यांनी सगळ्यांना आभार कळवले आहेत.

त्यांच्या नावाची नोंद इथल्या सूचीमध्ये झालेली आहे तरीही अद्याप त्यांना ते खाते लेखन करण्यासाठी सक्रिय झालेले नाही.
तरी वेमा यांनी यात लक्ष घालून ते सक्रिय करून द्यावी ही विनंती.

माबोवर न फिरकल्याचा परिणाम
अंगणात गटग झाले आणि पत्ताच लागला नाही Lol

मस्त धमाल केलेली दिसतेय वृत्तांतावरुन. मजा आली वाचताना

अरेरे!
योग नव्हता म्हणायचे. पुन्हा कधीतरी
दुसऱ्या कुठल्यातरी अंगणात Happy

>त्यांच्या नावाची नोंद इथल्या सूचीमध्ये झालेली आहे तरीही अद्याप त्यांना ते खाते लेखन करण्यासाठी सक्रिय झालेले नाही.
तरी वेमा यांनी यात लक्ष घालून ते सक्रिय करून द्यावी ही विनंती.
ते गेल्याच आठवड्यात सक्रिय झाले आहेत. त्यांनी लिहायचा प्रयत्न केला आहे का?

त्यांनी लिहायचा प्रयत्न केला आहे पण जमले नाही असे ते म्हणाले.
खाते सक्रिय असेल तर मला त्यांची माहिती का बघता येत नाही ? (https://www.maayboli.com/maaybolikar?uid=Mahesh+Madole) >>>>
(https://www.maayboli.com/user/81847)
"हे पान पहायची परवानगी नाही" असे उत्तर दिसते आहे.
. . .

अन्य एका जुन्या सभासदानाही इथे प्र देताना वारंवार एरर येते आहे व प्र देता येत नाही.

Test

Proud Proud Proud

डॉ. महेश,
तुमचे खाते वेमांनी सक्रिय केलेले आहे. आपण आता मायबोलीवर लिहू शकता

वेमा, धन्यवाद !

Pages