अभ्यासाचे नियोजन कसे करावे

Submitted by पिहू१४ on 30 December, 2024 - 22:19

मुलगा नववीत आहे. शाळेची वेळ १० ते ६ आहे आणि क्लास ७ते९ सायंकाळी असतो . सकाळी लवकर उठायचा कंटाळा करतो , काय नियोजन करावे. जास्त वेळ मन एकाग्र होत नाही त्याचं काही बोलले तर चिडचिड करतो सारखं सुचना नको देऊ मला . काय करु

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

सकाळी ६ ला जरी उठला तरी सात ते नऊ रोज सलग न चुकता अभ्यास करता येईल. रात्री कटाक्षाने hit the bed at nine thirty or ten

मुळात क्लासची गरज काय हा प्रश्न माझ्या मनात आला. १२ वी पर्यंत मी तर रोज संध्याकाळी २ तास बॅडमिंटन खेळत असे.

१० ते ६ आणि मग ७ ते ९ इतका १० तास अभ्यास झाल्यावर अजून कसले नियोजन करायचे आहे, ते कळले नाही.

उबो काही कठीण वाटणारे विषय असतील तर class लावून पक्के करता येतात. कधी कधी एखादा विषय शाळेत नीट शिकवला जात नाही किंवा आपला कच्चा असतो.
Class मध्ये पुन्हा शिकवून सराव घेतात.
मला गणिताचा होता नववी, दहावी ला. पण वेळ सकाळची होती.

उबो+१.
अजून एकही मिनिट अभ्यास कर सांगू नका. चिडणारच तो.
रात्री घरी आल्यावर tiktok, इन्स्टा, हँगआऊट करून झोपायला ११ ११:३० तरी होणारच. सकाळी ८ पर्यंत उठून १० का शाळेत पोचला तर नशिब म्हणा. वाईंड डाऊन करायला त्याला वेळ द्या फक्त. पिक्चर बघा, गप्पा मारा, काही खेळा, पीएस ५ वर एकत्र खेळा काहीही मजेचे करा.

गणित आणि विज्ञान साठी आहे क्लास. लिखाण पुर्ण होत पण वाचन करत नाही. जरा तर वाचनाची सवय झाली पाहिजे ना पुढे दहावी आहे .

१० ला असं काय वाचन करायला लागतं? आणि इतकी १४ वर्षे वाचनाची सवय नाही लावली तर एका वर्षात काय सवय लागणारे?

शाळेची वेळ १० ते ६ आहे आणि क्लास ७ते९ सायंकाळी असतो
>>> भारतात हे असंच असलं आणि पुढेमागे आम्हांलाही या परीस्थितीला तोंड द्यावं लागणार असलं तरी ही -

मुलगा खूप वेळ एकाच गोष्टीत एंगेज राहतो आहे. त्याला मेंटली रिलॅक्स व्हायला वेळ मिळत नाहीये.
किंवा
तेच तेच करून तो बोअर होतोय. खूप हुशार मुलांना एखाद गोष्ट समजली असताना परत परत करायला लावली तर तिचा वैताग येतो.

सर्वात प्रथम ॲप्टीट्युड टेस्ट करून घ्या.

काही मुलांना अभ्यास करायची जेन्युइन आवड असते, काहींना आवड नसते, महत्व माहित नसतं. मुलाची आकलनशक्ती, कल, हुशारी याबाबत स्वतःशी प्रामाणिक राहून त्याच्याशी शांतपणे बोला.

त्याला त्याचं शेड्युल तयार करायला सांगा.

सकाळी त्याला आवडणारा एखाद छंद/खेळ (क्रिकेट, टेनिस, गिटार) वगैरे करायचे आहे का ते विचारा. त्याचा बोअरडम गेला तर कदाचित अभ्यासाकडे तो नव्याने पाहिल.

त्याला गरज वाटत नसेल तर एखाद विषयाचा क्लास बंद करा. तुमच्या मनःशांतीसाठी त्याच्या सहमतीने काही क्वांटिफायेबल गोल्स सेट करा की त्या विषयात अमुक मार्क मिळाले पाहिजेत. त्यासाठी तुम्हा पालकांची सरासरी व आत्तापर्यंतची त्या विषयातील त्याची सरासरी याचा वापर करा.

वाचनाची आवड नसेल तर माईंड मॅप्स, फ्लॅश कार्डस् वगैरे तयार करायला सांगा.

He is young adult. Start treating him like one and start handing over his primary responsibilities to him.

एक पालक म्हणून काळजी वाटणं स्वाभाविक आहे पण स्वानुभवाने सांगते की तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका. आठवी ते दहावीतील बहुतांश मुलांच्या (बॉईज) पालकांना तुम्ही वर लिहिलंय असा प्रश्न पडतोच. एकतर त्यांच्या बरोबरच्या मुली बऱ्यापैकी मॅच्युअर झालेल्या असतात आणि मुलं त्यामानाने पोरकटच असतात.
१०-६ आणि ७-९ म्हणजे बऱ्यापैकी वेळ मुलगा अभ्यासाला पूरक अशा वातावरणात असतो, तेवढं पुरेसं आहे. अजून जर अभ्यास करायला लावला तर हट्टाने न करण्याकडेच कल असू शकेल. त्याला बाहेर जाऊन खेळायचं असेल तर खेळूदे. सध्या त्याच्या मोबाईल वापर, गेमिंग, सोशल मीडिया वरील वावर ह्यावर लक्ष ठेवा.
वाचनाचं म्हणाल तर त्याची आवड असेल तरच ते होतं. नाहीतर तो अभ्यासाचाच एक भाग वाटतो. तसही आपल्याकडे बारावी पर्यंत ' घासंपट्टी आणि घोकंपट्टी ' हेच यशाचं सूत्र म्हणून मान्य पावलं आहे.
स्व अभ्यास किंवा सेल्फ स्टडी ची सवय लावता आली तर त्याचा उपयोग पुढे होईल.
थोडक्यात आत्तापर्यंत जर त्याचे मार्क्स डिसेंट असतील तर काळजी करू नका.

वर सगळ्यांनी लिहिलं आहे त्याला मम.
नववी - दहावीत बऱ्याच मुलांना गणित - विज्ञानाचा क्लास लावावा लागतो हल्ली. क्लास रोजच आहे का? इथे क्लास आठवड्यातून तीनच दिवस असतो. त्यामूळे उरलेले तीन दिवस मुलांना स्वतःचा दुसऱ्या विषयांचा अभ्यास किंवा होमवर्क करायला मिळतात.
अकरावीत गेलाय मुलगा माझा - त्याचे नववी - दहावी चे वेळापत्रक सांगते
सकाळी सव्वासहा ला उठून पावणेसात ला शाळेत बास्केटबॉल खेळण्यासाठी. आठ ते दोन शाळा. अडीच ला घरी आल्यावर अंघोळ, कपडे बदलून माझ्याबरोबर टिव्ही बघत आणि गप्पा मारत जेवण आणि मग थोडा टीपी. चार ते पाच होमवर्क / अभ्यास. पाच ते साडे सात दोन विषयांचा क्लास. तिथून आल्यावर परत थोडा वेळ टिपी आणि होमवर्क उरला असेल तर करणे. ९ ला जेवण. ते झाल्यावर थोडावेळ परत इन्स्टा / डिस्कॉर्ड/ यूट्यूब. मग थोडा वेळ एखादे पुस्तक वाचून दहा / साडे दहा ला झोपणे.
क्लास नसलेल्या दिवशी चार ते सात स्वतःचा अभ्यास / होमवर्क करायचा मध्ये मध्ये ब्रेक घेत. सात ते साडे आठ ग्राऊंडवर खेळायला जायचा. आल्यावर अंघोळ करून सरळ जेवण.
आता यात लिहिलेला अभ्यासाचा वेळ तो तंतोतंत पाळत नव्हताच. बऱ्याचदा या वेळात मोबाईल किंवा पिसी वर गेम खेळणे पण व्हायचे/ रादर तेच जास्त व्हायचे. तर कधी कधी होमवर्क राहिल्यामुळे किंवा दुसऱ्या दिवशी परिक्षा असल्याने अभ्यास आठवून रात्री जागरण पण करत बसायचा.
स्वतःचा अभ्यास स्वतःहून मागे न लागता करायला बरीचशी मुलं दहावी - अकरावी मध्ये शिकतात. आमचा मुलगा पण तेंव्हाच शिकला. होमवर्क अपूर्ण नाही ठेवायचे, रोज तासभर तरी खेळायचे, रोज थोडावेळ तरी पुस्तक वाचायचे, नाहीतर मोबाईल मिळणार नाही( त्याला वाचायची खूप आवड होती पण लॉक डाउन मध्ये हातात मोबाईल आल्याने वाचायची सवय कमी व्हायला लागली होती म्हणून हा नियम), शाळेतून होमवर्क पूर्ण नाही, वर्गात लक्ष नाही अशी शिक्षकांची तक्रार नको आणि किमान परिक्षेच्या काळात ( दहा - पंधरा दिवस आधी पासून ते परिक्षा संपेपर्यंत) insta - game - youtube इत्यादी चा वेळ अर्धा तास लिमिट ठेवायचा ( सुट्टीच्या दिवशी घरी अभ्यास करताना हा वेळ वाढायचा.. ब्रेक मध्ये हेच केलं जायचं) हे नियम होते आमच्या घरी.

थँक्यू अल्पना ताई , वाचनाची आवड आणि सवय होती पण मोबाईल वरच्या अभ्यासामुळे जड जातंय. शाळेत आणि क्लास मधे शिकवत त्याची जरा तरी रिविजन घरी झाली पाहिजे ना. सुट्टीच्या दिवशी तर पुस्तक हातात नाही घेत त्यांचे बाबा मलाच बोलतात तु लक्ष देत नाही . अपेक्षित मार्क्स असेल तर पुढे काय करायचे तो विचार ठरवता येतो . मिडल क्लास कुटुंब आहे. आज काही शिकलो तर भविष्य सेट होतात. एकच मुलगा आहे.

उपाशी बोका यांनी लिहिलं तसंच माझं होतं. क्लास नव्हता आणि सकाळी म्हणजे अगदी सकाळी नाही तर नऊ ते अकरा वेळात शाळेने दिलेला अभ्यास करायचो.

पण ते जाऊ दे. फार जुने झालं.
मुलीला क्लासला घातलेच नाही. पहिली ते बी. कॉम. कधीही नाही.
मग काय? नवनीत ची गाईड आणून दिली. त्यातून बघून रोज तीन ताव कागद लिहिणे आणि मग खेळायला जाणे. त्या अभ्यासाने मिळतील ते मार्क. कधीच शिकवले नाही. हाच कार्यक्रम कॉलेजला ठेवला. अकाउटन्सी विषय मीच पहिल्या आठवड्यात संपूर्ण शिकवून टाकला.

थोडक्यात क्लासला रिपीट शिकवले जाते पण अभ्यास असा होत नसतो. एवढा वेळ दिवसाचा बाकड्यावर गेल्यावर आणखी अपेक्षा का ठेवता?

दहावी पर्यंत शाळेत खरं तर चांगलं शिकवल्या जातं. (शाळा कोणतीही असली तरीही.) कारण शाळा पण त्यांच्या नववी दहावी वर लक्ष देतातच.

क्लास खरंच नका लावू.

वर लिहिलेलं टाईम टेबल नववी मध्ये आणि दहावीच्या शेवटी होते. दहावीत आम्ही कसलाही क्लास लावला नव्हता. दिवाळीच्या वेळी जी सहामाही/ सराव परिक्षा झाली त्याचा रिझल्ट फारच भयानक होता. ( गणितात अगदीच काठावर पास, विज्ञान पूर्वीपेक्षा कमी पण बरे मार्क...बाकी विषय ९० च्या आसपास). मग तो म्हणाला मला गणित आणि विज्ञान साठी क्लास हवा आहे. डिसेंबर ते फेब मध्ये परिक्षा होईपर्यंत क्लास लावला.
यावर्षी फक्त गणितासाठी एक तास जातो क्लास ला तो आठवड्यातून तीन दिवस. बाकी जुनेच वेळापत्रक आहे. आता बाकी प्रोजेक्ट्स आणि भरमसाठ कामं/ ॲक्टिव्हिटी असतात म्हणून संध्याकाळ चे खेळणे जरा कमी झाले आहे. सकाळचे मात्र सुरू आहे.
ग्राऊंडवर जावून खेळण्याचे त्याचा स्क्रीन टाईम कमी झाला. अभ्यास करायची इच्छा होते खेळल्याने असे त्यानेच सांगितले.

शाळेत चांगलं शिकवतात, पण बऱ्याचदा वैयक्तिक लक्ष दिले जात नाही, सराव होवू शकत नाही. क्लास चा उपयोग शाळेत न समजेलेले समजावून घेणे आणि सराव यासाठी होतो. शाळेत शिकवल्यावर क्लास मध्ये परत एकदा त्याचा सराव होतोच आहे, मग परत घरी पण तेच करावे अशी अपेक्षा करू नका. घरी होमवर्क आणि जे विषय क्लास मध्ये होत नाहीत त्याचा थोडा सराव इतके पुरेसे आहे.
माझेमन यांनी लिहिलेल्या प्रमाणे, त्याला आवडणारी दुसरी एखादी गोष्ट नक्की करू द्या. अभ्यासावर पण फरक पडेल. फक्त अभ्यास करायला सांगितले तर थकेल आणि कंटाळ येईल त्याला आणि मग उलट अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल.

हल्ली क्लासेसना न जाणे हा निर्णय घरी भांडणं वाढवू शकतो. कारण क्लास लावूनही मार्कं कमी पडले तर कुणी काही बोलत नाही. पण क्लास लावला असता तर अधिक मार्क पडले असते हे पालुपद सगळीकडून गायले जाईल.
ज्यांचं करिअर शिक्षणावरच अवलंबून आहे त्यांना क्लास अनिवार्य ठरतो.

तर मुद्द्यांचं बोलायचं तर मुलाने शाळा अधिक क्लास केल्यावर आणखी अभ्यासात कसे गुंतवायचे हा आहे. शारीरिक थकवा येत नसेल तरच काही युक्त्या करता येतील.