King beats God !!!
सचिन तेंडुलकरला “क्रिकेटचा देव” म्हणतात, पण प्रत्येक देवाच्या काळात एक राजा येतोच, जो गोष्टी बदलतो. विराट कोहली हा तोच राजा आहे. देव महान होता, पण राजा काळानुसार खेळ बदलेल हे ठरवतो. सचिनने भारतीय क्रिकेटला घडवलं, पण विराटने त्याला आधुनिक काळात नवा आत्मा दिला. चला पाहूया, का विराट कोहली हा क्रिकेटच्या दुनियेत खऱ्या अर्थाने श्रेष्ठ ठरतो.
१. रन चेस करणारा “राजा”
सचिनने मोठ्या धावा केल्या, पण सामना जिंकण्यासाठी शेवटपर्यंत उभा राहण्याचा विराटचा विक्रम अचाट आहे. विराटने चेस करताना २५ शतके केली आहेत, ज्यातून भारताने जिंकलेले प्रत्येक सामना म्हणजे इतिहास. दुसरीकडे, सचिनच्या शतकांपैकी अनेक वेळा संघ हरला! म्हणजे, देव फक्त धावा करतो, पण राजा सामना जिंकतो.
२. तीन प्रकारांत प्रभुत्व
सचिन कसोटी आणि एकदिवसीयचा बादशाह होता, पण विराटने कसोटी, वनडे आणि टी-२० या तिन्ही प्रकारांमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. टी-२० क्रिकेटमध्ये सचिनचा विचारच करू शकत नाही, पण विराट तिथे ‘बॉस मोड’मध्ये असतो. “नवा काळ, नवा राजा” असं विराटने दाखवून दिलं आहे.
३. फिटनेसचा सम्राट
सचिनने क्रिकेटमध्ये शतकांचा डोंगर उभा केला, पण फिटनेसवर फारसा भर नव्हता. विराटने मात्र फिटनेसचं स्वप्न भारतीय क्रिकेटला दाखवलं. तो फक्त फलंदाजी करत नाही, तर प्रत्येक चेंडूवर प्राण ओततो. सचिन फिटनेससाठी प्रसिद्ध नसला, तरी विराटने भारतीय संघाचा फिटनेस स्तरच बदलला.
४. परदेशी भूमीवरचा बादशाह
सचिनने परदेशी धावा केल्या, पण विराटने परदेशी भूमीवर मालिकाविजय मिळवले. कसोटी संघ परदेशात कधी जिंकतो हे फक्त स्वप्न होतं, पण विराटने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, आणि दक्षिण आफ्रिकेत विजय मिळवून दाखवलं. देवासाठी फक्त मंदिरातच जागा असते, पण राजा मैदानावर राज्य करतो.
५. कर्णधार म्हणून क्रांती
सचिनने कर्णधारपद मिळवले, पण त्याचा अनुभव फारसा यशस्वी नव्हता. दुसरीकडे, विराटने कर्णधार म्हणून भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलला. कठोर नेतृत्व, शिस्तबद्ध संघ, आणि विजय मिळवण्याची मानसिकता विराटने संघात रुजवली. सचिनने शतकांचा रेकॉर्ड केला, पण विराटने विजयांचा इतिहास घडवला.
६. काळानुसार बदल
सचिन ज्या काळात खेळला, तेव्हा क्रिकेटचा वेग खूपच वेगळा होता. आजच्या वेगवान क्रिकेटमध्ये, सतत दबावाखाली विराटने सातत्य दाखवलं आहे. फिटनेस, तंत्रज्ञान, विविध प्रकारांची कौशल्यं यामध्ये विराटची कामगिरी अतुलनीय आहे.
निष्कर्ष: राजा श्रेष्ठ का देव?
सचिन तेंडुलकर क्रिकेटचा देव होता, पण विराट कोहलीने खेळाचं स्वरूप बदललं आहे. त्याने केवळ स्वतःचं यश साधलं नाही, तर भारतीय क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेलं आहे. देवाचा सन्मान आहेच, पण आजचा राजा विराट कोहली आहे, यात शंका नाही!
*सचिनच्या आधी ब्रॅडमन
*सचिनच्या आधी ब्रॅडमन कोणालाही माहीत नव्हता.* - स्वतः सचिनही हंसेल हे वाचून !!
दोघेही फालतू आहेत! मुळात
दोघेही फालतू आहेत! मुळात क्रिकेट हा खेळच फालतू आहे!
*सचिनच्या आधी ब्रॅडमन
*सचिनच्या आधी ब्रॅडमन कोणालाही माहीत नव्हता.* ही माहिती होती व ती खरी नव्हती , म्हणून कॉमेंट केली;- *दोघेही फालतू आहेत! ....* , हे कुणाचंही प्रामाणिक मत असू शकतं , म्हणून नो कॉमेंट्स !
*सचिनच्या आधी ब्रॅडमन
*
मला वाटतं कोहली जर
मला वाटतं कोहली जर ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटमधल्या वर्चस्वाच्या सुवर्णकाळात असता ( जेंव्हा सचिन होता ) तर त्याला बहुतेक आंधळ्यांच्या चष्मा घालून फिरला असता तरच मारलेल्या 'धक्क्यांचे' समर्थन झाले असते, एवढे धक्के प्रतिस्पर्धी खेळाडूंना मारावे लागले असते..
तूलना सोडा.
तूलना
सोडा.
धाग्याचा टायमिंग चुकलाय..
धाग्याचा टायमिंग चुकलाय..
का टायमिंग चुकला?
का टायमिंग चुकला?
एखाद्या खेळाडूचे कौतुक करायचे
एखाद्या खेळाडूचे कौतुक करायचे असेल तर तो जेव्हा चांगल्या फॉर्म मध्ये असेल तेव्हा करायचे..
आणि टीका करायची असेल तर खराब फॉर्म ची वाट बघावी..
विराट फॉर्म मधेच आहे… सेकंड
विराट फॉर्म मधेच आहे… सेकंड इनिंग मधे सेंचुरी असेल…
गेले तीन चार वर्षांचे बघितले
गेले तीन चार वर्षांचे बघितले तर. शेवटचे सातत्य कधी दाखवले त्याने कसोटीत हे आठवत नाही..
लिमिटेड मध्ये धावा काढल्यावर हा धागा यायला हवा होता. सध्या कसोटीत तो साधारण खेळाडू भासत आहे.
शोल्डर मजबूत आहे अजून
शोल्डर मजबूत आहे अजून
आपल्याला पैलवानी करायची
आपल्याला पैलवानी करायची नाहीये
दिवाळीत ५ - ५ मिनीटाला एशियन
दिवाळीत ५ - ५ मिनीटाला एशियन पेंट्स तर्फे रंगाऱ्याचं काम केल्यावर शोल्डर मजबूत होणारचं.....फुल टाईम रंगारी बनण्याच्या दृष्टीने पूरक प्रगतीच म्हणता येईल...
विराट कोहली भलताच फार्मात आहे
विराट कोहली भलताच फार्मात आहे, अगदी आदेशाप्रमाणे सेकंड इनिंगमधे सेंच्युरी मारलीच पठ्ठ्याने... फक्त स्कोअर बोर्डवाला एक तर ठार आंधळा आहे किंवा जळकुटा आहे मेला (मजबूत शोल्डर्स वर बहूतेक)...साल्याने २९ बॉल मधे ५ रन असा स्कोर चिकटवून टाकला विराटच्या नावावर निर्लज्जपणे...
मुळात ही तुलनाच चूकिची आहे.
मुळात ही तुलनाच चूकीची आहे. सचिन निर्विवाद कधीही उजवाच ठरेल तुलना केलीच तर. परंतू दोघेही वेगवेगळ्या काळात खेळले आहेत त्यामुळे सरळ सरळ तुलना होऊ शकत नाही.
तरीही बोलायचेच झाले तर सगळे लारा, शोएब, नासिर सारखे दिग्गज सचिनलाच श्रेष्ठ मानतात यातच सगळे आले.
र आ ह्यांच्यावर एव्हढी कठोर
र आ ह्यांच्यावर एव्हढी कठोर कारवाई करायची गरज होती काय? मला नाही वाटत. निषेध. फारच झाल तर वार्निंग द्यायची होती.
आम्ही तर अजुन पर्यंत सनी
आम्ही तर अजुन पर्यंत सनी शिवाय कुणालाच मानत नाही.
परवाच एका यु ट्युब शॉर्ट्स मध्ये पाहिलं, गावस्कर नी जो विंडीज च्या तोफखाना समोर उभा राहिला आहे, ते साचिन (सचिन) ने अनुभवले नाही.
- इम्मु
र आ ह्यांच्यावर एव्हढी कठोर
र आ ह्यांच्यावर एव्हढी कठोर कारवाई करायची गरज होती काय? मला नाही वाटत. निषेध. फारच झाल तर वार्निंग द्यायची होती.>>> अवांतर आहे, पण प्रत्येकवेळी सनी सारखं बलवंत रायययययSSSS अशी आरोळी ठोकून तावातावाने वाद करणे हा माझ्या मते मुर्खपणा आहे..... टप्प्यात आल्यावर, किंवा जरी टप्प्यात नसेल तरी इंप्रोवायझेशन करुन, नियमांत राहून योग्य प्रकारे ठासता येते. धाग्या धाग्यावर याची उदाहरणे दिसतील, जिथे मी मी म्हणणाऱ्यांना धाग्यावर पुन्हा लिहीण्यासाठी झालेल्या फजितीवर पडदा पडेस्तोवर जखमा चाटत संधीची वाट पहात ताटकळत बसावे लागते.
The True Measure Of Success
The True Measure Of Success Is Not Just In What You Achieve, But Also In How You Impact Others Positively
Pages