ग्रेटचेन रुबिन यांच्या हॅपीनेस प्रॉजेक्ट बद्दल ऐकलेले होते पूर्वी. पण मला ते कधीच अपीलिंग वाटलेले नव्हते. पोकळ आनंदी आनंदी, सतत आनंदी रहाणे असे काहीतरी असावे असा अंदाज होता. त्यामुळे मी नंतर त्यांचे काहीच वाचले नाही.
पण मध्यंतरी 'लाइफ इन फाइव्ह सेन्सेस' नावाचे पुस्तक सापडले. ग्रंथालयात बसून चाळता चाळता इतके आवडून गेले की घरी घेउनच आले. म्हणजे इश्यु करुन, चेक आऊट करुन.
त्यात प्रत्येक सेन्स - गंध, स्पर्श, दृष्टी, श्रवण आणि स्वाद यांबद्दल विविध माहीती आहे, प्रयोग आहेत बरेचसे अर्थात स्वतःचे विचार मांडलेले आहेत. पुस्तक फार रोचक वाटले.
पैकी 'गेझिंग अॅट फेसेस' हा काही एक पानांचा सेक्शन मला फार आवडला. 'द ग्रॅटिफिकेशन ऑफ गेझिंग अॅट फेसेस', लोकांचे चेहरे न्याहाळण्यातून मिळणारा संतोष/समाधान. क-ड-क!! होय अशी काही गोष्ट आहे हेच असे शब्दात माहीत नव्हते मला. आणि तरीही कृतीत मात्र होते. आय अॅम हुक्ड टु ब्युटी. हां आता सौंदर्याची व्याख्या व्यक्तीपरत्वे बदलतेच पण हे जे 'व्हॉलप्शसनेस ऑफ लुकिंग' आहे . आहाहा 'व्हॉलप्शसनेस ऑफ लुकिंग' - या इतक्या सुंदर संकल्पनेचे भाषांतर कसे करायचे? ही जी चेहरे न्याहाळण्याची असोशी माणसात असते - तुम्ही म्हणाल असते का नक्की? यावर ग्रेटचेन म्हणते - मग हे फेसबुक, स्नॅपचॅट, टिकटॉक, युट्युब हे काय आहे? ही असोशी लक्षात घ्या.
तीन वर्षाच्या मुलांना लोकांचे चित्र काढायला सांगीतलेले होते तेव्हा त्यांनी चक्क मोट्ठा गोल चेहरा व चेहर्यालाच उगवलेले काड्यांसारखे पाय वगैरे काढलेले दिसतात. कारण मेंदूतील एक विवक्षित भाग अगदी आसुसून चेहरा बघत असतो. इतका की बरेचदा झाडात, इलेक्ट्रिक सॉकेटमध्ये वगैरेही आपल्याला चेहरे आढळतात.
.
.
आपण व्यक्तीची ओळख म्हणजे त्या व्यक्तीचा चेहरा मानतो. त्यातही अजून झूम करुन, डोळे पहातो. डोळे किती बोलतात. आपल्याला व्यक्तीची ओळख लपवायची असेल तर सहसा, आपण फोटोमध्ये डोळ्यांवरती काळी पट्टी लावून टाकतो. ग्रेटचेन म्हणते डोळे किती इन्टेन्सली बोलतात. ती काही सेलेब्रिटीजची नावे देते ज्यांनी ही इन्टेन्सिटी टाळण्याकरता, त्यांच्या सहकार्यांना डायरेक्ट आय कॉन्टॅक्ट करु नका असे बजावलेले आहे. ती अजुन एक उदाहरण देते. एका कॉन्फरन्समध्ये बरेच जण आलेले. अर्थात एकमेकांना, अनोळखी. आणि एक प्रयोग केला गेला. की अनोळखी शेजार्याच्या डोळ्यात, डोळे घालून २० सेकंद पहात रहायचे व नंतर त्यांना त्यांच्याबद्दल विचारणा करायची वगैरे. ग्रेटचेन म्हणते हा साधा प्रयोगही मला, म्हणजे तिला, ग्रेटचेनला अतोनात 'अनकम्फर्टेबल' करुन गेला. पण एक मात्र झाले त्या व्यक्तीशी कनेक्शन दृढ झाल्यासारखे वाटले.
हा पूर्ण सेक्शनच फार आवडला. अगदी पटला. 'गेझिंग' हा शब्दच सुंदर आहे. न्याहाळणे शब्दाला त्या शब्दाची सर काही येत नाही. एखाद्या व्यक्तीचे, मुख न्याहाळणे हा कम्प्लीटली मेडिटेटिव्ह आणि इन्टिमेट अनुभव असू शकतो. मग परत तेच 'बैठे रहे तसव्वुर-ए-जाना किये हुए...." (कल्पना करणे, दीदार करना) बायबलच्या प्रार्थना वाचताना मध्यंतरी, एकदा हे सुंदर वाक्य सापडून गेले होते - May God's face shine on you. काय सुंदर कल्पना आहे. या वाक्याची सर, ना 'गॉड ब्लेस यु' ला आहे ना ... अन्य एखाद्या वाक्याला.
तर एकंदर ही जी असोशी आहे, हा जो 'व्हॉलप्शसनेस ऑफ लुकिंग' आहे तो नक्कीच सेलेब्रेट करण्यासारखा आहे. मी एवढीच प्रार्थना करेन - May you find most beautiful face to gaze at. May that face shine on you.
आणखी फुलवून लिहिलं असतं तर
आणखी फुलवून लिहिलं असतं तर वाचायला आवडलं असतं.
व्हॉलप्शनेस - हा शब्द लक्षात येईना. याचं स्पेलिंग काय आहे?
चांगला परिचय.
चांगला परिचय.
>>>>>व्हॉलप्शनेस - हा शब्द
>>>>>व्हॉलप्शनेस - हा शब्द लक्षात येईना. याचं स्पेलिंग काय आहे?
"The 3 Great Interests of Man."
"the great interests of man: air and light, the joy of having a body, the voluptuousness of looking."
टायपो झालेला. 'स' गाळला गेला होता.
फुलवता आले असते पण मग बरेचदा उस्फूर्तता जाते त्यामुळे ...
प्रतिक्रियेबद्दल आभार.
धन्यवाद कुमार सर. पुस्तक
धन्यवाद कुमार सर. पुस्तक परिचय नाही.
एक सेक्शन आवडलेला त्यातील काही मुद्दे व मला काय वाटले ते आहे.
आवडतं gazing करत अंदाज बांधत
आवडतं gazing (अगदी dictionary meaning टक लावून बसणे असं नाही म्हणायचं मला ) करत अंदाज बांधत जायला. रेल्वे स्टेशन... बस स्टेशन इथे छान वेळ जातो.
शर्मिला अगदी अगदी. रेल्वे
शर्मिला अगदी अगदी. रेल्वे स्टेशन्स, कॅफेस, बागा , लायब्ररीसुद्धा माझी आवडती ठिकाणे आहेत. लायब्ररीत, पुस्तक वाचनात गढून गेलेले चेहरे आणि प्रार्थनेत गढून गेलेले चेहरे यात मला फरकच वाटत नाही.
अंडरस्टुड षर्मिला.
अंडरस्टुड शर्मिला. मी लांबवरचे लोक पहाते. ते त्यांचे ते मग्न असतात. जवळचे लोक कॉन्शस होतात त्यामुळे जवळच्यांकडे बघतच नाही.
मी अनेक तास केवळ एका बाकावर
खूप् छान
मी अनेक तास केवळ एका बाकावर बसून वाहता जनसमुदाय अन त्यांचे चेहरे, अविर्भाव न्याहाळण्यात घालवले आहेत..... खूप रोचक अन उद्बोधक असते
रेव्यु प्रतिसादाबद्दल, आभारी
रेव्यु प्रतिसादाबद्दल, आभारी आहे.
शर्मिला अगदी अगदी. रेल्वे
शर्मिला अगदी अगदी. रेल्वे स्टेशन्स, कॅफेस, बागा , लायब्ररीसुद्धा माझी आवडती ठिकाणे आहेत. लायब्ररीत, पुस्तक वाचनात गढून गेलेले चेहरे आणि प्रार्थनेत गढून गेलेले चेहरे यात मला फरकच वाटत नाही.>>>अगदी. कधी कधी अस वाटत कि आपण चित्रकार असायला पाहिजे होते.
वाह केकू मस्त कल्पक विचार.
वाह केकू मस्त कल्पक विचार.
>>>अगदी. कधी कधी अस वाटत कि
>>>अगदी. कधी कधी अस वाटत कि आपण चित्रकार असायला पाहिजे होते.>>>>
चित्रकार तुम्ही हातात ब्रश न घेताही होऊ शकता फक्त समोरच्याला आपण सुरुवात करुन द्यायची. ...बाबूमोशाय...
मग नुसतं ऐकत राहयच. हे मी अनोळखी चेह-यांबाबत बोलतोय. माझा वैयक्तिक अनुभव आहे. मी चेहरे असे बघतो की त्याला शंका येऊ नये हा आपल्याला पाहतोय. अगदी बर्डींग करावं तसं.
जो डूबना है तो इतने सुकून से डूबो
कि आस-पास की लहरों को भी पता न लगे
दसा हे फार भारी काम आहे!
दसा
हे फार भारी काम आहे!
छान लिहिले आहे. … झाडात,
छान लिहिले आहे. … झाडात, इलेक्ट्रिक सॉकेटमध्ये चेहरे आढळतात. होय !
Gazing at faces, nature, piece or art, eyes of a baby हे सर्व therapy for the soul वाटतात मला.
फक्त स्वछबीत फार गुंतणे नको. तसे लोक cause instant repulsion
>>>>जो डूबना है तो इतने सुकून
>>>>जो डूबना है तो इतने सुकून से डूबो
कि आस-पास की लहरों को भी पता न लगे
ओहो!! क्या बात है
>>>>>Gazing at faces, nature, piece or art, eyes of a baby हे सर्व therapy for the soul वाटतात मला.
किती सुंदर लिहलय.
अनिंद्य तुम्ही मागे म्हणालात का की तुमची चं रास वृषभ आहे? नसेल सांगायचे तर नका सांगू. आय अॅम बीईंग टू नोझी, आय अंडरस्टँड
कृत्तिका?
नाही हो, नाज़ुक कृत्तिका कसले
नाही हो, नाज़ुक कृत्तिका कसले - नक्षत्र कडक “मूळ”आहे माझे
जन्मानंतर ४० दिवसा नंतर बाबांना बघू दिले मला. मी अन्यत्र सांगितले होते तुम्हाला
आई ग्ग!!! कृत्तिका नाजूक असते
आई ग्ग!!! कृत्तिका नाजूक असते का हो? पण रसिक आहे ते नक्षत्र हे मला माहीत आहे.
माझा सूर्य आहे मूळेचा.
>>>>>>>>>>>.जन्मानंतर ४० दिवस बाबांना बघू दिले मला.
हाहाहा आई ग्ग!!! मूळावरच उठलात की कालीची एनर्जी आहे मूळेत. मूळापासून उखडुन टाकण्याची. विध्वंसक नाही, ट्रान्सफॉर्मेटिव्ह म्हणा.
बहुतेक माझ्या बाबांचे
बहुतेक माझ्या बाबांचे कृत्तिका (मेषेमधला पाद) आहे. मला असे फेंट आठवते.
अवांतर - कार्तिकस्वामी, द
अवांतर - कार्तिकस्वामी, द मोस्ट हँडसम गॉड आहे ना कृत्तिका नक्शत्रावरचा? तो तर नाजूक नाही देवसेनेचा सेनापती आहे. असो.
https://www.youtube.com/watch?v=zupcqPs1BDU
आज हे कार्तिकस्वामींवरचे, गाणे अक्षरक्षः खरच लुप वर आहे. काय सुरेख गाणे आहे. व त्यावरचे नृत्य मोहक मोहक!!