विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर: आधुनिक क्रिकेटमधील तुलना

Submitted by च्रप्स on 11 December, 2024 - 21:40

King beats God !!!

सचिन तेंडुलकरला “क्रिकेटचा देव” म्हणतात, पण प्रत्येक देवाच्या काळात एक राजा येतोच, जो गोष्टी बदलतो. विराट कोहली हा तोच राजा आहे. देव महान होता, पण राजा काळानुसार खेळ बदलेल हे ठरवतो. सचिनने भारतीय क्रिकेटला घडवलं, पण विराटने त्याला आधुनिक काळात नवा आत्मा दिला. चला पाहूया, का विराट कोहली हा क्रिकेटच्या दुनियेत खऱ्या अर्थाने श्रेष्ठ ठरतो.

१. रन चेस करणारा “राजा”

सचिनने मोठ्या धावा केल्या, पण सामना जिंकण्यासाठी शेवटपर्यंत उभा राहण्याचा विराटचा विक्रम अचाट आहे. विराटने चेस करताना २५ शतके केली आहेत, ज्यातून भारताने जिंकलेले प्रत्येक सामना म्हणजे इतिहास. दुसरीकडे, सचिनच्या शतकांपैकी अनेक वेळा संघ हरला! म्हणजे, देव फक्त धावा करतो, पण राजा सामना जिंकतो.

२. तीन प्रकारांत प्रभुत्व

सचिन कसोटी आणि एकदिवसीयचा बादशाह होता, पण विराटने कसोटी, वनडे आणि टी-२० या तिन्ही प्रकारांमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. टी-२० क्रिकेटमध्ये सचिनचा विचारच करू शकत नाही, पण विराट तिथे ‘बॉस मोड’मध्ये असतो. “नवा काळ, नवा राजा” असं विराटने दाखवून दिलं आहे.

३. फिटनेसचा सम्राट

सचिनने क्रिकेटमध्ये शतकांचा डोंगर उभा केला, पण फिटनेसवर फारसा भर नव्हता. विराटने मात्र फिटनेसचं स्वप्न भारतीय क्रिकेटला दाखवलं. तो फक्त फलंदाजी करत नाही, तर प्रत्येक चेंडूवर प्राण ओततो. सचिन फिटनेससाठी प्रसिद्ध नसला, तरी विराटने भारतीय संघाचा फिटनेस स्तरच बदलला.

४. परदेशी भूमीवरचा बादशाह

सचिनने परदेशी धावा केल्या, पण विराटने परदेशी भूमीवर मालिकाविजय मिळवले. कसोटी संघ परदेशात कधी जिंकतो हे फक्त स्वप्न होतं, पण विराटने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, आणि दक्षिण आफ्रिकेत विजय मिळवून दाखवलं. देवासाठी फक्त मंदिरातच जागा असते, पण राजा मैदानावर राज्य करतो.

५. कर्णधार म्हणून क्रांती

सचिनने कर्णधारपद मिळवले, पण त्याचा अनुभव फारसा यशस्वी नव्हता. दुसरीकडे, विराटने कर्णधार म्हणून भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलला. कठोर नेतृत्व, शिस्तबद्ध संघ, आणि विजय मिळवण्याची मानसिकता विराटने संघात रुजवली. सचिनने शतकांचा रेकॉर्ड केला, पण विराटने विजयांचा इतिहास घडवला.

६. काळानुसार बदल

सचिन ज्या काळात खेळला, तेव्हा क्रिकेटचा वेग खूपच वेगळा होता. आजच्या वेगवान क्रिकेटमध्ये, सतत दबावाखाली विराटने सातत्य दाखवलं आहे. फिटनेस, तंत्रज्ञान, विविध प्रकारांची कौशल्यं यामध्ये विराटची कामगिरी अतुलनीय आहे.

निष्कर्ष: राजा श्रेष्ठ का देव?

सचिन तेंडुलकर क्रिकेटचा देव होता, पण विराट कोहलीने खेळाचं स्वरूप बदललं आहे. त्याने केवळ स्वतःचं यश साधलं नाही, तर भारतीय क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेलं आहे. देवाचा सन्मान आहेच, पण आजचा राजा विराट कोहली आहे, यात शंका नाही!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण क्रिकेट म्हणजे निव्वळ फलंदाजी समजून फक्त सचिन विरुद्ध विराट करायचे असेल तर माझे मत सचिनच्या पारड्यात.
सध्या तर ते प्रकर्षाने जाणवतेय

सविस्तर नंतर..
पण वरील मुद्द्यांबाबत एकेक वाक्यात मत द्यायचे झाल्यास

१) लिमिटेड क्रिकेटमध्ये रन चेस बाबत विराट जास्त उजवा वाटतो हे खरे आहे.

२) ऑल फॉरमॅट ऑल कंडीशन मात्र सचिन विराटला सहज भारी पडतो. सचिन हा परिपूर्ण फलंदाज होता.

३) सचिनचा फिटनेस कमाल होता. किंबहुना आजही आहे. फक्त डोले शोले बघू नका.

४) परदेशी भूमीवर देखील सचिन सरस आहे.
कोणाच्या काळात जास्त जिंकलो आहोत हा निकष लावला तर पुजारा रहाणे सुद्धा सचिन द्रविड आणि गावस्करपेक्षा वरचढ ठरतील.

५) कर्णधार म्हणून दादा विरुद्ध धोनी करावे. सचिन कोहलीला कुठे यात ओढता.

६) काळानुसार बदल यात सचिन कुठल्याही खेळाडूपेक्षा कित्येक प्रकाशवर्षे पुढे आहे. मुळात त्याच्याइतका बदललेला काळ आणखी कोणी पाहिला नसावा.

धोनी को इसमें मत लाओ—एक छक्के से वर्ल्ड कप नहीं जीता जाता! पूरी टीम की मेहनत होती है, और बाकी खिलाड़ियों ने भी योगदान दिया था!

पूरी टीम की मेहनत होती है - हे फक्त धोनी आले की आठवते का? वर तुम्हीच म्हणाला की सचिनने फक्त धावा केल्या आणि विराटने विजय मिळवले..

गंमत ऐका.
रोहीत शर्मा १२ कसोटी शतके
आणि सर्वच्या सर्व विजयात..
जर नुसते किती शतकांपैकी किती शतके विजयात आली या गुनोत्तराचा निकष लावला तर सचिन विराट कोणी आसपास सुद्धा नाही Happy

तुलनेत एक महत्त्वाचा निकष राहिला असं वाटतं - सचिन व विराटने कोणत्या गोलंदाजांविरुद्ध धांवा केल्यात . केवळ हा एकच निकष लावून शोएब अख्तर सचिनला विराटच नव्हे तर सर्व फलंदाजांच्या तुलनेत सर्वकालीन ग्रेट म्हणतो !
( अर्थात, दोन महान खेळाडूंची तुलना वस्तुनिष्ठ होणं कठीणच ! त्यात व्यक्तिगत आवड डोकावणारच - जसं इथ माझं सचिनबाबत होतंय !! Wink )
.

खर तर वेग वेगळ्या कलखंडतल्या खेळाडूंची तुलना करता येत नाही. बरेच नियम बदललेले असतात. उदा, सध्याला भालफेकी मध्ये टॉप चे खेळाडू ९०-९२ मीटर फ्राताना दिसतात तर रेकॉर्ड १०७ चा आहे. कारण सध्याचे नियम वेगळे आहेत. सचिनच्या वेळेचे क्रिकेट आणि सध्याच्या क्रिकेट मध्ये बरेच बदल आहेत.

सचिनने गोलंदाजी मध्ये चांगले योगदान दिले आहे, तसे कोहलीचे गोलंदाजीतले योगदान स्मरणात नाही. सचिनने बरेचदा गरजेच्या वेळी विकेट काढून दिल्या आहेत, ९३च्या हिरो कपच्या अंतिम सामन्यात साऊथ आफ्रिकेच्या २ विकेट लक्षात आहेत, आणि असे अजून काही सामने आहेत जिथे सचिनची गोलंदाजी भारतीय संघाच्या उपयोगी आली.

माझ्यामते वेगवेगळ्या कालखंडातल्या दोन ग्रेट्स ची कधी तुलनाच होऊशकत नाही, खूप if & but चा आधार घ्यावा लागतो वैयक्तिक बायसेस आड येतात. त्यामुळेच तुलना नेहमी समकालीन व्यक्तींमध्येच करावी. तसेच संघाच्या यशस्वितेची यादी वैयक्तिक कामगिरीत धरणेही फारच बाळबोधपणाचे होते, कारण ती सांघिक कामगिरी असते.

जेवढी वर्षे सचिन खेळला तेवढी वर्षे तो त्याच्या समकालीन खेळाडूंमधे निर्विवादपणे सर्वश्रेष्ठ होता. आणि त्याच्या समकालीन खेळाडूंमधे ग्रेट खेळाडूंची वानवा तर कधीच नव्हती मग ते वॉ बंधू असूदेत, एकखांबी लारा, स्फोटक सनथ की चिवट बून, सईद अन्वर,वा रनतुंगा...शिवाय प्रत्यक्ष भारतीय संघातही द्रविड, सौरभ, लक्ष्मण, सेहवाग यांसारखे दिग्गज फलंदाज होते पण सचिन त्या काळच्या दोन्हि फॉरमॅटमधे यापैकी कोणत्याही फलंदाजाला लिलया आऊटक्लास करत असे. आपण हिच गोष्ट कोहलीबाबत म्हणू शकू का? बाकी फलंदाजीला पोषक केलेल्या खेळपट्ट्या, एका बाजूला आखूड सीमारेषा असलेली मैदाने, फलंदाज बाद ठरवण्यासाठी वपरण्यात येणारे अद्ययावत तंत्रज्ञान, खेळाडूंना विविध स्पेशालिस्ट कोचेस मार्फत पुरवण्यात येणारा अद्ययावत तांत्रिक, टॅक्टिकल सपोर्ट, ढासळलेला गोलंदाजीचा स्तर, आणि विराटचे समकालीन प्रतिस्पर्धी व सचिन चे समकालीन प्रतिस्पर्धी यांचा स्तर या सर्व सबजेक्टिव बाबी बाजूला ठेवून जर आपण विराट जेव्हापासून खेळायला लागला तेव्हा अत: पासून इति पर्यंत तो समकालीन फलंदाजांमधे सर्वश्रेष्ठ राहीला का याचा विचार केला तर काय उत्तर मिळेल?

वैयक्तिकरित्या म्हणाल तर सध्याच्या गोलंदाजांमधे सचिन बुमरा ला कसा खेळला असता ते पहायला आवडलं असतं.

फारस विथ डिफरन्स
+७८६
माझी पुढची पोस्ट हीच असणार होती.
सचिन त्याच्या वेळी दोन्ही फॉरमॅट अव्वल होता.
कोहली हा स्मिथ रूट विल्यमसन यांच्या बरेच मागे पडला आहे.
लाबूषण आणि आता हॅरी ब्रूक अशी नवीन नावे सुद्धा आली आहेत.
अर्थात ती लोक सुद्धा एकाच फॉरमॅटमध्ये तितकी हवा करतात.
ऑल फॉर्मेट प्लेयर असले तरी ऑल फॉर्मेट लेजंड गणले जात नाहीत.
फॉरमॅट बदलला की त्यांचा ऑरा कमी होतो.

हे जे काही आहे, ते क्रिकेट या ग्रुपमध्ये अधिक योग्य नाही का?
>>
+७८६
ग्रुप बदला ..
क्रिकेट विभागात धागा सहज सापडतो.

अर्थात, दोन महान खेळाडूंची तुलना वस्तुनिष्ठ होणं कठीणच ! त्यात व्यक्तिगत आवड डोकावणारच - जसं इथ माझं सचिनबाबत होतंय !! Wink>>>> +1
तुलना करायची असेल तर सचिन खेळामध्ये श्रेष्ठ आहे. कारण त्याचा अनुभव जास्त आहे विराट हल्लीचा आहे. कितीही झालं तरी अनुभव कमीच राहणार सचिनपेक्षा.
सचिन मध्ये पेशन्स जास्त आहे सुरुवातीपासूनच. विराट च्या पेशन्स बद्दल न बोललेलंच बरं अधिक माहितीसाठी सुरुवातीच्या विराटच्या मॅचेस पाहाव्यात . सचिन कधीही मैदानात किंवा बाहेरही अपशब्द काढत नाही त्याची बॅट जास्त बोलते . म्हणून सचिन देव आहे .राजे बदलतात देव नाही.
पण आता सद्याच्या काळात बेस्ट फिटनेस असणारा आणि त्यातही सातत्य असणारा विराट कोहली हा एकमेव खेळाडू आहे.हेही खरं आहे.

इंद्र हा आधी देव होता आणि नंतर राजा झाला असं त्या इंद्राच्या धाग्यावर लोक म्हणत आहेत

अशा प्रकारची चर्चा - हु इज द गोट (ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम) नेहेमी माय्कल जॉर्डन, टायगर वुड्स यांच्या बाबतीत होत असते. आणि त्या चर्चांमधे केवळ एका निकषावर हे दोघे बास्केट बॉल आणि गॉल्फ मधले "गोट" ठरतात. हु मेड द ग्रेटेस्ट इंपॅक्ट ऑन द गेम. हाच निकष क्रिकेटला लावल्यास तेंडल्या नि:संशय गोट ठरतो...

हे जे काही आहे, ते क्रिकेट या ग्रुपमध्ये अधिक योग्य नाही का?
नवीन Submitted by भरत. on 11 December, 2024 - 23:45

>>>नो सर …हा विषय क्रिकेट पलीकडे आहे…

https://www.mymahanagar.com/featured/saransh/literature-which-is-full-of...
जे कथेत मावत नाही आणि कवितेत गावत नाही ते ललितलेखनात सापडते या शब्दात ललितलेखनाचे महत्व अधोरेखित केलेले आपणास आढळते. मुळात काव्यामधली मधुरता आणि गद्यातली चिंतनशीलता हे दोन्हींचा संगम ललित गद्यात होत असतो. जवळपास आठशे हजार शब्दात एखादा विषय मांडताना त्याचा आशय आणि अभिव्यक्ती या दोन्हींचा समावेश करत सकस साहित्यनिर्मिती करणे हा ललितलेखनाचा गाभा आहे
लेखकाच्या लेखकत्वाचे समृद्ध रूप हे ललितलेखनात पहायला किंवा वाचायला मिळते. अशा प्रकारच्या लेखनात कल्पनेला जास्त वाव नसतो ,हा साहित्यप्रकार मुळात आत्मसिद्ध आहे. त्या वास्तवाला सौदर्यदृष्टी दिली कि एक प्रकारचे ललितगद्य तयार होत असते. एखादा प्रसंग किती भावोत्कटतेने मांडतो त्यावर ललित लेखाचा दर्जा ठरत असतो.

क्रमश:

हु मेड द ग्रेटेस्ट इंपॅक्ट ऑन द गेम. हाच निकष क्रिकेटला लावल्यास तेंडल्या नि:संशय गोट ठरतो... >> सॉरी, तो मान फक्त नि फक्त ब्रॅडमन चा आहे. न झाकल्या जाणार्‍या विकेट्स वर पिच, बॉलर, हवामान ह्यापैकी कसलाही परीणाम न होता काढलेल्या धावा नि ती सरासरी निव्वळ अशक्य आहे.

टी-२० क्रिकेटमध्ये सचिनचा विचारच करू शकत नाही, पण विराट तिथे ‘बॉस मोड’मध्ये असतो. >> खर तर इथेच लेख सोडायला हवा होता. सचिन च्या उमेदिच्या काळात टी २० नव्हते हा मोठा भाग सहजपणे इग्नोर केला गेला आहे.

ब्रॅडमन सुद्धा १९२८-४८ या कालखंडात ५२ कसोटी खेळले. त्या देखील फक्त इंग्लंड ऑस्ट्रेलियामध्ये खेळले. भारताशी सुद्धा पाच कसोटी आहेत आणि त्यात त्यांनी पावणे दोनशेच्या सरासरीने धावा चोपल्या आहेत. तेव्हाच्या भारतीय संघाबद्दल काही न बोललेले बरे पण एकूणच तेव्हाचा क्रिकेटचा दर्जा, प्रतिस्पर्धी गोलंदाजांची ताकद वगैरे काही कल्पना नसताना निव्वळ आकडे बघून ब्रॅडमन यांच्या खेळाचे मूल्यमापन करण्यात अर्थ नाही असे मला वाटते.

“ हे जे काही आहे, ते क्रिकेट या ग्रुपमध्ये अधिक योग्य नाही का?” - ‘हे जे काही आहे’ ते ‘ललित’ मधेच योग्य आहे. Proud

एकूणच तेव्हाचा क्रिकेटचा दर्जा, प्रतिस्पर्धी गोलंदाजांची ताकद वगैरे काही कल्पना नसताना निव्वळ आकडे बघून ब्रॅडमन यांच्या खेळाचे मूल्यमापन करण्यात अर्थ नाही असे मला वाटते. >> एक क्यूरिओसिटी म्हणून हे 'अर्थ नसणे' स्वतःपुरतेच मर्यादित आहे कि इतरांनीही न करावे असे सुचवलेले आहे ?

माझं असं झालं की मला ब्रॅडमन कोण आहे हे माहीत नव्हतं. म्हणून मी थोडं शोधून पाहिलं. कळलं की तो एक जुन्या काळातला फलंदाज होता. पण माझ्या मते, एका फलंदाजाचं कौशल्य ठरवताना सरासरी हा एकमेव निकष असू नये. बघा, एक खेळाडू एखाद्या सामन्यात १ धाव करू शकतो आणि पुढच्या सामन्यात १०० धावा करू शकतो. किंवा कधी कधी तो शून्य धावा करूनही नाबाद राहू शकतो आणि पुढच्या वेळी १०० धावा करू शकतो. अशा परिस्थितीत त्याची सरासरी ६०+ येते, पण ती त्याच्या स्थिरतेचा किंवा सातत्याचा मापदंड नाही. आणि हो, ब्रॅडमनचं टी२० मध्ये एकही शतक नाही.

इतरांनीही न करावे असे सुचवलेले आहे ?
>>>

इतरांनी मूल्यमापन करायला आडकाठी घेणारा मी कोण..
फक्त त्याला अर्थ नाही इतकेच Happy

ब्रॅडमन नक्कीच त्याच्या समकालीन खेळाडूंमध्ये ग्रेट असणार..
पण आताच्या खेळाडूंची तुलना जवळपास सत्तर ऐंशी वर्षे आधी खेळलेल्या व्यक्तीसोबत कशी करणार..

ब्रॅडमन वन डे सुद्धा नाही खेळला.
जगभरातल्या विविध कंडिशनमध्ये नाही खेळला.
कुठल्या कुठल्या नावाजलेल्या गोलंदाजांना खेळला याची कल्पना नाही.
त्याला रोखायला बॉडीलाईन गोलंदाजी करावी लागली म्हणजे गोलंदाजांकडे फक्त वेग असावा, बाकी युक्त्या नसाव्यात, आणि ते लूजर असावेत.

मला वाटतं ब्रॅडमन याना ह्या तुलनेच्या चर्चेत न आणल्यास योग्य होईल. त्यांची एक खास जागा क्रिकेटच्या इतिहासात अबाधित आहे व ती तशीच राहावी !
( त्यावेळी इंग्लंड विं. ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी त्यापैकी एका संघाला बोटीने प्रवास करून कित्येक महिने स्वतःच्या कुटुंबापासून संपर्कही कठीण अशाप्रकारे दूर राहावं लागतं असे, ही एकच बाब त्यावेळची परिस्थिती किती वेगळी होती व आताच्या तुलनेसाठी अयोग्य आहे, हे लक्षात येतं . शिवाय, जिथे स्वतः सचिन ज्यांना मुद्दाम भेटून वाकून वंदन करण्यात धन्यता मानतो, त्यांचीच सचिनशीच तुलना करणारे आपण कोण ? )

ब्रॅडमनचा उल्लेख चर्चेत उत्सुकता वाढवतो, पण तो मूळ विषयावरून लक्ष हटवतो. विराट आणि सचिन यांची तुलना त्यांच्याच काळात, स्वरूपात, आणि परिस्थितीत होऊ शकते. ब्रॅडमनचा काळ, खेळण्याची शैली, आणि परिस्थिती यांमुळे त्यांची तुलना फक्त संदर्भापुरतीच मर्यादित असायला हवी.

रिटायर्मेंट च्या वयात टी २० च्या ९६ सामन्यांत ३२ च्या सरासरीने आणि १६ अर्ध शतके आणि १ शतक ही कामगिरी नक्कीच अब्व्ह अ‍ॅवरेज आहे, नाही का?

https://www.espncricinfo.com/cricketers/sachin-tendulkar-35320

धोनी आणि ब्रॅडमन यांची तुलना करणे योग्य राहील. धोनी निश्चितच ब्रॅडमन यांच्यापेक्षा कितीतरी पटीने उजवा आहे पण तरीही धोनीशी तुलना केल्याने ब्रॅडमन यांच्या खेळाला थोडाफार न्याय मिळेल.

Lol

राधा ही बावरी - स्वप्निल बांदोडकर - गाण्याच्या चालीवर लारा हा डावरा वाचले

इतरांनी मूल्यमापन करायला आडकाठी घेणारा मी कोण..
फक्त त्याला अर्थ नाही इतकेच >> बोलण्यात सुसंगती नसावीच असा काही नियम आहे का तुझा ? Lol त्यानंतरची ब्रॅडमनबद्दलची मुक्ताफळे वाचून तुझी कीवच वाटली.

माझं असं झालं की मला ब्रॅडमन कोण आहे हे माहीत नव्हतं >> सचिन नि विराट ह्यांची तुलना करणार्‍या व्यक्तीला ब्रॅडमन माहित नाही असे शक्य नाही. धागा ललित मधेच शोभतो खरा.

. शिवाय, जिथे स्वतः सचिन ज्यांना मुद्दाम भेटून वाकून वंदन करण्यात धन्यता मानतो, त्यांचीच सचिनशीच तुलना करणारे आपण कोण ? >> खरय भाऊ ! जिथे धागाच टाईमपास साठी काढला आहे नि तिथे सरांनी नेहमीचे ट्रोलिंङ सुरू केले आहे तिथे काय बोलायचे.

कोण कुठला, जुन्या जमान्यातला, गूगल करून हुडकावा लागणारा ब्रॅडमन, स्वार्थी तेंडुलकर, शिवराळ-चिडका कोहली (ह्यापेक्षा विजय तेंडुलकर आणि नरेंद्र कोहली ही तुलना अधिक योग्य ठरली असती) - ह्या अतिसामान्य खेळाडूंच्या तुलनेत सर्वकालीन सर्वश्रेष्ठ देवांग गांधी, गगन खोडा, सामी सोहेल (टी २० मधे सर्वाधिक असा ५६.१२ चा अ‍ॅव्हरेज) ह्यांचा अनुल्लेख केला असल्यामुळे ह्या लेखाचा दर्जा घसरला आहे ह्याची कृपया नोंद घ्यावी.

बुमरा टाईम मशीनमध्ये बसून मागे गेला तर ब्रॅडमनला प्रत्येक बॉलवर आऊट करेल. ब्रॅडमनचे हात पाय थरथरतील बुम्राला समोर बघून. कदाचित ब्याट हेल्मेट तिथेच टाकून ब्रॅडमन मैदानाबाहेर पळ काढू शकतो.

एक गोष्ट ऑब्जार्व्ह केली आहे.
सचिनच्या बरेच चाहत्यांना त्याची तुलना विराट कोहलीशी केली की राग येतो.
धोनी ला या स्पर्धेत घेतले तर सहनच होत नाही.
आधी क्रिकेटचे चाहते बनावे. मग खेळाडूचे.

विराट कोहली त्याचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील १००वा सामना आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध १०० किंवा त्याहून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा विराट कोहली हा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून ऑस्ट्रेलियाविरुद्ध ११० सामने खेळले होते. ९१ सामन्यांसह महेंद्रसिंग धोनी तिसऱ्या क्रमांकावर आहे

या बाबतीत विराट आणि धोनी हे दोघे सचिन समोर बच्चू आहेत.

पैलू,सचिन तेंडुलकर,विराट कोहली
सामने खेळलेले सामने,463,281
धावा,18,426,13,342
सरासरी,44.83,57.46
स्ट्राइक रेट,86.23,93.63
शतकं,49,47
अर्धशतकं,96,67
सर्वोत्तम स्कोर,200*,183

वन डे

सचिन - ४६७ सामने खेळून ४९ शतके
विराट - २८१ सामने आणि ४७ शतके

कोण बच्चा आहे - सरळ दिसत आहे… imagine विराट आफ्टर ४६७ मॅचेस…

आता तितक्या वन डे खेळल्या जात नाहीत
२०-२० सामन्यांचे प्रमाण वाढत चालले आहे.
आयपीएल सुद्धा त्यात फिट करायचे असते.

त्यामुळे वनडे मध्ये ज्याने जे रेकॉर्ड केले ते आता तिथे थांबून जातील..
स्पेशली सर्वाधिक धावा, शतके, विकेट, झेल वगैरे.. जे विक्रम जास्त सामने खेळूनच होतात

सचिनच्या आधी ब्रॅडमन कोणालाही माहीत नव्हता. जसा सचिन मोठा खेळाडू व्हायला लागला तसा त्याला कमी लेखावं म्हणून ब्रॅडमनला मधे घुसवण्यात आलं. आणि दुःखाची बाब म्हणणे आपले भारतीय तथाकथित क्रिकेट जाणकार पण आपल्याला भारी कळतं भारी समजतं हे दाखवायच्या नादात फॉरेन लोकांबरोबर हो ला हो मिळवतात.

शतकांच्या संख्येपलीकडे आणि एकूणच सांख्यिकी पलिकडेही कोणत्याही खेळातले कसब कालातीत रहाते. सामान्य माणूस कोणत्याही गोष्टींची तुलना क्वांटीफिबल पॅरामिटर तोलूनच करु शकतो, म्हणूनच जेव्हा दोन कलाकृतींची तुलना करायची वेळ येते तेव्हा फार फार तर तो तौलनिकदृष्ट्या त्यांच्या किमतींची तुलना करुन डावे उजवे करु शकतो, कारण दुर्दैवाने त्याची त्याच्या अवतीभोवतीच्या जगाबद्दलची दृष्टी तेवढ्यापुतीच सीमीत असते ( you surely can pity them, if not blame them for it ).

सद्याच्या काळात बेस्ट फिटनेस असणारा आणि त्यातही सातत्य असणारा विराट कोहली हा एकमेव खेळाडू आहे.>>>>

विराट तेवढा टिकला पाहिजे. वय झालंय त्याचं. फॉर्म गेलाय. ४६७ मॅच खेळणे शक्य नाही.>>>
विराट त्याच्या फिटनेवर कुणिही घेत नाही/ घेतली नाही इतकी मेहनत घेतो हे खरं आहे पण त्यामधिल एक पैलू स्ट्रॅटेजीकली करीअर शेप करण्याचाही आहे.
- सचिन एकूण २०० टेस्ट खेळला आहे तर विराट १२०
- सचिन ३१० फर्टक्लास क्रिकेट सामने खेळला आहे तर विराट १५२
- सचिन ४६३ एकदिवसीय सामने खेळला आहे तर विराट २९५

Pages