हिंदी-मराठी चित्रपटसंगीत आणि व्यवसाय (उपजीविकेसाठी करत असलेल्या कामाचा नामोल्लेख किंवा वर्णन असलेली गाणी)

Submitted by स्वाती_आंबोळे on 20 December, 2021 - 09:53

आता हा खेळ सगळ्यांच्या ओळखीचा झालाच आहे.

मी माझी चटकन आठवलेली यादी टाकते, तुम्ही भर घाला. Happy

मराठी:

१. आम्ही दैवाचे दैवाचे शेतकरी रे
२. बाई गं केळेवाली मी
३. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे
४. भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी, सैनिकहो तुमच्यासाठी
५. माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पानी जातं
६. माळ्याच्या मळ्यामंदी कोन गं उबी
७. विठ्ठला, तू वेडा कुंभार
८. कबिराचे विणतो शेले कौसल्येचा राम
९. दळिता कांडिता तुज गाईन अनंता
१०. गाडीवान दादा हो, गाडी ने भरारा
११. पोटासाठी नाचते मी, पर्वा कुणाची
१२. नाविका रे, वारा वाहे रे

हिंदी:

१. चक्कू छुरिया तेज करा लो
२. मेरा नाम है चमेली, मैं हूँ मालन अलबेली... ओ दरोगा बाबू बोलो
३. माँ के पेट से मरघट तक है तेरी कहानी पग पग प्यारे दंगल दंगल
४. सर जो तेरा चकराये... मालिश तेल मालिश
५. सारी दुनिया का बोझ हम उठाते हैं
६. जीना यहाँ मरना यहाँ... ये सर्कस है खेल तीन घंटे का
७. दम भर जो उधर मूँह फेरे ओ चंदा... मैं चोर हूँ काम है चोरी (उपजीविकेचं साधनच आहे हेही! Proud )
८. पैसा फेको तमाशा देखो... देखो बाइस्कोप देखो
९. आ गया आ गया हलवावाला आ गया
१०. काबुलीवाला
११. मैं पल दो पल का शायर हूँ
१२. मैं शायर तो नहीं

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोंबड्यांनो, विचार करा कि थोडा
अंडी द्या नाहीतर खुराडी सोडा

व्यवसाय- अर्थातच कुक्कुटपालन

चित्रपट- आम्ही दोघे राजा राणी

पण पूर्वी ते माहीत नसल्याने संक्रांतीचा हलवा आहे असा समज झाला होता.
कोई गाता, मै सो जाता
मैं हुं डॉन
नाही, तो आपल्याक्डे इराण मधून आला"
>>>> Lol फा, संपूर्ण यादीच.‌ हहपुवा आहे.

भरत, मिथुन चक्रवर्ती आणि स्मिता पाटील ???? Lol अजून काय काय बघावे लागणार आहे.

ऐ मालिक तेरे बंदे हम
कोणताही व्यवसाय न करणाऱ्यांचे गाणे >>> Lol दे रे हरी, खाटल्यावरी.
जब तक है जान ( नर्तकी)>>> Lol

सगळ्याच पोस्टी छान आहेत.

आणखी काही व्यवसाय

मै गाऊं तुम सो जाओ - गवई
मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है - पॅकर्स अ‍ॅण्ड मूव्हर्स
ये कहां आ गये हम, युं ही साथ चलते चलते - पदयात्रा
तेरे दर पे आया हूँ, कुछ कर के जाऊँगा / झोली भर के जाऊँगा - आक्रमक भिकारी

एनर्जेटिक गाणं >>> हो एवढ्या उत्साहात भीक मागितली तर लोक भीक घालायच्या ऐवजी मजुरी करायला सांगतील.

जोगी ओ जोगी
भाग में मेरे लिखा है
एक दिन मैं राजा बनूँगा
तेरा ही तोता कहता है

हे आलंय का इथे?

ही नटरंगी नार, मारी काळजात वार
पाडी कासोट्याला पार, चापुनिया पट्टी

पाटलाला दावला चाळा, कुलकर्ण्याला घालते डोळा
मास्तरानी सोडली शाळा हिच्यासाठी

तेल्यापासून तेल बघा नेती, वाण्यापासून गूळ ही घेती
हिनं गुजराला येडा केला
खुळा झालाया बामण, सोडून दिले देवध्यान
मागं पंचांग घेऊन पळतोया किती

खाऊन मिठाईचा पुडा, केला हलवायाला येडा
हिनं कितिकांना दिला बघा धडा
लागली न्हाव्याच्या पाठी, त्याची लिलाव केली धोपटी
अशी नार हिच्याकाठी भुलविले किती

हिचा पाहुनिया ताल, फुगले सोनाराचे गाल लाल
त्यानं दुसर्‍याचा माल हिला दिला
लावलं तांबटाला पिसं, केलं बुरडाचं हसं
परटाचा फाडला खिसा, आता सांगू किती

हिचा कळला नाही कावा, सोडला कुंभारानं आवा
गुरवाला दावली बघा हवा
अशी बाजिंदी नार, हिचं दिसणं गुलजार
म्हणे पठ्ठे बापू पार छंद सोडा हिचा

रसिक होऊ दे दंग चढु दे रंग असा खेळाला
साता जन्मांची देवा पुण्याई लागू दे आज पणाला
हात जोडतो आज आम्हाला दान तुझा दे संग
नटरंग उभा ललकारी नभा स्वरताल जाहले दंग

Pages