इंद्राबद्दल पक्षपात का?
मला नेहमी इंद्राबद्दल देवांच्या पक्षपाताबद्दल आश्चर्य वाटते. इंद्र आणि रावण यांची तुलना करूया.
इंद्राला सद्गुणी आणि पवित्र व्यक्ती मानण्यात आले. रावनला खलनायक म्हणून गणले गेले. पण नेमकी वस्तुस्थिती काय आहे..
रावण हा ब्रम्हादेवाचा पणतू , पुलस्य ऋषीचा नातू आणि वैश्वानर ऋषीचा मुलगा होता. अशा प्रकारे रावण ब्राह्मण होता आणि उच्च जातीत जन्मला आला होता. इंद्र हा नियुक्त व्यक्ती होता आणि त्याचा पूर्वजांविषयी निश्चिती नाही.
रावणाने आपल्या वडिलांच्या आश्रमात तसेच ब्रम्हदेवाच्या आश्रमात वेद आणि शास्त्रांचे अध्ययन केले. त्याने वेदांवर प्रभुत्व मिळवले होते आणि वेदासाठी काही रुचा देखील तयार केल्या आहेत. त्याचे शिवतांडव प्रसिद्ध आहे. इंद्राकडे कसलेही प्रशिक्षण नाही आणि तशी क्षमताही नाही. रावणाने रावणसंहिता निर्माण केली आणि तो आयुर्वेद आणि जोतिर्विद्यान यांमध्ये निपुण होता. इंद्राकडे असे कौशल्य नाही.
रावणाने कुबेराचा पराभव करून लंकेचे राज्य घेतले. इंद्राला स्वर्गाचे राज्य देवांनी दिले होते. रावण हा एक चांगला प्रशासक होता आणि त्याने इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड, कंबोडिया इत्यादी देशांत आपला साम्राज्य वाढविले. त्याची प्रजा सुखी आणि समृद्ध होती. इंद्राने अशी क्षमता किंवा शौर्य दाखवले नव्हते. तो पराभूत होऊन अडचणीत अडकत असे आणि भगवान विष्णूचा आश्रय जात असे. रावण शिव उपासक होता आणि इंद्रा हा कोणाचाच उपासक नव्हता.
रावण स्त्रीलंपट होता आणि माहिती असलेली घटना म्हणजे वेदवती, कुबेरांची सून आणि सीता. ब्रम्हकन्या अहिल्या हिच्यासह अनेक स्त्रियांच्या मागे इंद्रही स्त्रीलंपट होता. इतकेच नाही तर ऋषींची तपश्चर्या मोडण्यासाठी इंद्र त्त्यांच्याकडे स्त्रिया पाठवत असे. हाय प्रोफाईल लोकांना मुली पुरवणाऱ्या आजच्या एजंटपेक्षा तो वेगळा नव्हता. विश्वामित्र मेनका लक्षात ठेवा.
देवांनी इंद्राला शिक्षा का दिली नाही आणि रावणाचा वध का केला ?
ये सब गडे मुडदे निकालकर
ये सब गडे मुडदे निकालकर हमें क्या मिलेगा ?
कायच्या काय लेख आहे.
कायच्या काय लेख आहे.
इन्द्र एक च होता का?
इन्द्र फक्त अडचणी घेऊन ये त होता हे कशाच्या जोरावर म्हणता?
अजनबीन्चा प्रश्न लै म्हणजे लै आवडला.
इंद्र कुणीही असला तरी
पक्षपात ? देवेंद्र आहे तो - देवांनी “राजा” निवडलेय त्याला ! Privileges आहेत पदाचे.
इंद्र कुणीही असला तरी त्याच्या सिंहासनाचे डिझाइन फॉल्टी होते याबद्दल शंका नाही.
अजनबी :).
अजनबी :).
नानबा ह्यांच्याशी सहमत. सुरुवातीच्या काळात इंद्र ही व्यक्ती नसुन पोस्ट होती. ब्रम्हदेवाचे मानसपुत्र म्हणून ज्या प्रजातींचा प्रामुख्याने उल्लेख वैदिक आणि पौराणिक साहित्यात आढळतो ते म्हणजे कर्दम ऋषी आणि त्यांचे ९ जावई (मरिची, अत्री, अंगिरस, पुलह, पुलस्त्य, क्रतु, वशिष्ठ, भृगू आणि अथर्वन) ह्यांनी आपल्या समाजाची मांडणी केली त्या संस्कृतीतील पहिला राजा स्वयंभु मनु आणि पहिला सेनापती इंद्र. सेनापती हे पद असल्याने अनेक सेनापती म्हणजेच इंद्र होऊन गेले. पुढे हळुहळू मानवांच्या इंद्रा प्रमाणे देवांचा इंद्र अशी कल्पना विकसित होत होतं देवांचा राजा इंद्र अशी स्थिरावली असावी.
ऋग्वेदात इंद्र, इंद्र पत्नी आणि स्नुषा ह्यांनी रचलेल्या ऋचा आहेत ते नक्कीच देव नसावेत. पण देव म्हणुन इंद्राच्या केलेल्या स्तुति च्या वेगवेगळ्या ऋषिंनी रचलेल्या ऋचा पण ऋग्वेदात आहेत. पण रावणाने वेदातील ऋचा रचल्याचा उल्लेख मला कुठेच आढळला नाही. त्याने शीवस्तुती म्हणजे शीव तांडव स्तोत्र रचले असा उल्लेख आहे.
देवांचा राजा इंद्र आणि असुरांचा राजा विरोचन ह्यांना प्रजापतींनी आत्मज्ञाना संबंधि मार्गदर्शन केले असा उल्लेख छंदोग्य उपनिषदात आहे. तर अश्विनी कुमारांकडुन शिकलेला आयुर्वेद इंद्राने भारद्वाज ऋषिंना आणि त्यांनी पृथ्वी वरच्या इतर ऋषिंनी शिकवला असा उल्लेख चरक संहितेत आहे. थोडक्यात इंद्र देखील वेदशास्त्रसंपन्न होता असे मानायला जागा आहे.
जाता जाता , अहिलेच्या प्रसंगात गौतम ऋषींनी इंद्राला देखील शाप दिला होता. इंद्राला अनेक वेळा वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी शाप मिळालेत असे दाखले पुराणात अनेक ठिकाणी आहेत.
राज्यात देवेंद्र, देशात
राज्यात देवेंद्र, देशात नरेंद्र !
सिनेमात धर्मेद्र जीतेंद्र !!
पुढे हळुहळू मानवांच्या इंद्रा
पुढे हळुहळू मानवांच्या इंद्रा प्रमाणे देवांचा इंद्र अशी कल्पना विकसित होत होतं देवांचा राजा इंद्र अशी स्थिरावली असावी.>>>>जे नामाभिधान मानवांमध्ये सेनापतीपदाला ( राजाच्या तुलनेने दुय्यम पद ) दिले गेले, त्याच दुय्यम नामाभिधानाने देवांनी आपल्या राजाला ( सर्वोच्च पद भूषवणाऱ्याला) संबोधावे??.....Surely they don't have any class!!!
<<>>
उपरोधाने म्हणताय ना? कदाचित उलटे असेल, इंद्र देव म्हणुन आधी प्रस्थापित झाला असेल आणि आपला सेनापती इंद्रा प्रमाणे पराक्रमी आणि आपले रक्षण करणारा असावा ह्या इच्छेमुळे सेनापती ला इंद्र म्हणुन संबोधले गेले असेल. माझी चुक झाली.
अग्निहोत्राचा शोध लावणारे, नासदीय सुक्त रचणारे, लोक होते ते. They definitely had a class.
>>> देवांनी इंद्राला शिक्षा
>>> देवांनी इंद्राला शिक्षा का दिली नाही
गौतम ऋषींनी अंगभर क्षतं पडतील असा शाप दिला होता ना अहल्येकडे आलेल्या इंद्राला?
स्वर्गात इंद्र, देशात नरेंद्र
स्वर्गात इंद्र, देशात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र.
देवांनी इंद्राला शिक्षा का
देवांनी इंद्राला शिक्षा का दिली नाही आणि रावणाचा वध का केला ?
कारण रावण हा नेपोकिड होता (रावण हा ब्रम्हादेवाचा पणतू , पुलस्य ऋषीचा नातू आणि वैश्वानर ऋषीचा मुलगा होता)
इंद्र ही पोस्ट आहे. प्रत्येक
इंद्र ही पोस्ट आहे. प्रत्येक मन्वांतरासाठी एक इंद्र असतो. सध्याच्या इंद्राचे नाव काय आहे ?
थोडक्यात आपण पंतप्रधान, मुख्यमंत्री निवडून देतो तसे.
आता तिकडेही ईव्हीएम घोटाळा होत असेल तर सांगता येत नाही.
पण खालच्या दोन्हीही इंद्रांवर तसे आरोप आहेत.
इंद्राला पाऊस, ढग, ह्यांचाही
इंद्राला पाऊस, ढग, ह्यांचाही देव मानला जात असे (वरुणाचे दुसरे नाव ?)
इंद्राने वज्रासूराचा वध वज्राचा वापर करून केला होता.
इंद्राला जी हवी ती शिक्षा
इंद्राला जी हवी ती शिक्षा द्या..
पण एका विवाहीत स्त्रीला तिच्या मनाविरुद्ध पळविणाऱ्या रावणाचे तो अमुक तमुक वर्णाचा आणि विद्वत्तेचा आहे म्हणून त्याचे उदात्तीकरण करण्यात अर्थ नाही.
इंद्राने वज्रासूराचा वध
इंद्राने वज्रासूराचा वध वज्राचा वापर करून केला होता. >> वज्रासुराच्या पालकांनी जरा विचार करुन नाव ठेवायचं ना! बाळाचे पाय नावात कशाला दिसायला हवेत ते!
कोण आईबाप आपल्या मुलाचे नाव
कोण आईबाप आपल्या मुलाचे नाव असुर ठेवत असेल..
खरंय अमित, पण शेवटी काय नाव
खरंय अमित, पण शेवटी काय नाव पडायचं ते पडतंच. हेच पहा ना, रावणाचं नाव आधी सोन्या होतं, तरी पुढे नंतर सगळे रावण रावण असेच म्हणायला लागले त्याला.
कोण आईबाप आपल्या मुलाचे नाव
कोण आईबाप आपल्या मुलाचे नाव असुर ठेवत असेल.. >> नसेल. असुर ही पदवी आहे.
सोन्याची लंका
सोन्याची लंका
लंकेची पार्वती
पार्वतीचा शंकर
म्हणून आपला सोन्या रावण शंकराचा भक्त
असुर ही पदवी आहे.
असुर ही पदवी आहे.
इंद्र ही पदवी आहे.
आमचे आडनाव नाईक सुद्धा पदवी आहे.
लोकांना पदव्या नाव म्हणून मिरवायला फार आवडतात
असुर ही पदवी आहे.
दोनदा पडली.
शुभरात्री
आईबाप आपल्या मुलाचे नाव असुर
आईबाप आपल्या मुलाचे नाव असुर ठेवत असेल.. > चि. वज्र नाव असेल आणि असुर आडनाव असेल ना?
आणि पदवी असेल तर नावाच्या आधी नको का? अर्थात सफिक्स पदव्या असू शकतात. वामन पंडित.. आणि पंडित नेहरू. का पहिल्यात पंडित आडनाव होतं देवकी पंडित कि़ंवा गुड्डू पंडित आणि बबलू पंडित सारखं? आता सहा वेळा पंडित लिहिल्यावर मला तो पंडित शब्द काहीतरी विचित्र वाटू लागलेला आहे. आता आठ वेळा.
हो बरोबर. आडनाव असणार.
हो बरोबर. आडनाव असणार. इंद्रदेव वज्रासुर . त्याकाळी आडनाव हे नावाला जोडून घेत असावेत.
असुर ही खरोखरच पदवी होती
असुर ही खरोखरच पदवी होती वैदिक काळात. Mighty/powerful ह्या अर्थाची. वैदीक साहित्यात इंद्र, अग्नी, वरुण ह्यांचा उल्लेख असुर म्हणून केला आहे. पारशी देव अहुरा माझदा हा संस्कृत मध्ये 'असुर मेधा '. पुढे ओरीजनल इराणी लोकांनी असुर =चांगले हे रिटेन केले आणि त्यांच्या शी शत्रृत्व म्हणून इथे असुर वाईट झाले कालौघात.
कि़ंवा >> हा शब्द कसा काय
कि़ंवा >> हा शब्द कसा काय लिहिला?
धमाल गप्पा.मिले असुर मेरा
धमाल गप्पा.मिले असुर मेरा तुम्हारा
सुर हे असुरांचेच चुलत भाऊ आहेत असे कुठेतरी वाचले होते. काही ठिकाणी सुरा पिणारे ते सुर, सुरा अग्राह्य मानणारे ते असुर. आपलं व्हेज नॉनव्हेज असते तसे.
दैत्य - दिती आणि कश्यप ऋषींचे पुत्र
दानव- दक्षाची मुलगी दनुचे व कश्यपांचेच पुत्र
सुर- देवता पण मेन पार्टी (ब्रह्मा, विष्णू, महेश) नाही. मला वाटते हे डेमी गॉड असावेत, म्हणजे मर्त्य मानवांपेक्षा वरचे स्थान पण मेन पार्टी इतकी पावर नाय. कारण स्खलनशील व्यक्तिमत्त्वाचे असल्याने पावर दिली नसेल.
असुर - हा पावरफुल डेमी गॉड विरोधीपक्ष असावा.
सुरांपैकी सत्ताधीशाला इंद्र करत असावेत. त्यामुळे त्याचे सोमरस स्पष्टीकरण मिळते. चुलत भावांचा सिंहासनावर डोळा असणे नॉर्मल आहे. समुद्रमंथनातल्या गोष्टीत अमृतासाठी काय मारामारी केली आहे. पण हलाहल व लक्ष्मी मेनपार्टीकडे गेले. दैत्य, दानव ह्या असुरांचा उपगट असावा.
राक्षस - हे पृथ्वीवर राहणारे अति मानव वगैरे असावेत. मानवांपेक्षा जास्त बलवान व बुद्धिमान. रावण, बळी, हिरण्यकश्यपू वगैरे.
मालिकेत कायम घाबरेघुबरे इंद्रच बघितले आहेत. कुणी तप केले की घाबरले, सिंहासनासाठी आक्रमण केले की घाबरले, स्वतःची शची असून+ सुंदर अप्सरांचा लाईव्ह ताफा ओटीटी असूनही दुसऱ्यांच्या बायकांच्या मोहात पडणार. दोन पैशांचे जिगर नाही, लूजर आहेत इंद्रं..!
कुणीतरी लूप होल्स शोधून सेमी-अमरत्वाचा वर मागायचा ब्रह्मदेवाने किंवा शंकराने वर द्यायचा. मग त्याने त्रिभुवन त्राहिमाम करायचे आणि इंद्राची ऐष बंद पडायची. तो कुणाचे तरी पाय धरायला जायचा, मग ते तितकाच लूप होल्स असलेला तोडगा सांगायचे. बरं ऐष चालू असताना जरा स्थिरावले की हे 'अहिल्या कांड' वगैरे करणार. स्वतःही सुखाने बसणार नाहीत, दुसऱ्यांनाही बसू देणार नाहीत. हा लूपही रिपीट व्हायचा. There we go again
मला काहीच खात्री नाही या माहितीची, इकडेतिकडे वाचलेले आहे. त्यामागे काय असावे असे वाटले ते लिहीलेय.
इंद्रा बद्दल खरेच फार पक्षपात
इंद्रा बद्दल खरेच फार पक्षपात झालाय..
देव देव बोलून त्याची बरीच इज्जत काढली आहे.
>>> दोनदा पडली. शुभरात्री
>>> दोनदा पडली.
शुभरात्री
देवेंद्र जसे समस्या आली कि
देवेंद्र जसे समस्या आली कि हरणासाठी अमित शहा किंवा नरेंद्र मोदींकडे जातात तसेच इंद्र सुद्धा विष्णू किंवा महादेवाकडे जातात.
महादेव म्हणजे कदाचित सरसंघचालक असावेत. उठसूठ लुडबूड न करता जेव्हां गरज पडेल तेव्हांच मध्यस्थी.
त्यांची डिस्ट्रॉयर ही ताकद माहिती असल्याने सगळे टरकून असायचे / असतात.
अस्मिता..परफेक्ट वर्णन.
अस्मिता..परफेक्ट वर्णन.
असेच असेल.
खूप हुशार आहेस!!!
इंद्राचे कुठे मंदिर नाही
इंद्राचे कुठे मंदिर नाही,त्याच्या नावाने काही व्रत वैकल्ये नाहीत.
असला कसला हा देवांचा राजा?
Pages