इंद्राबद्दल पक्षपात का?

Submitted by अविनाश जोशी on 10 December, 2024 - 01:52

इंद्राबद्दल पक्षपात का?
मला नेहमी इंद्राबद्दल देवांच्या पक्षपाताबद्दल आश्चर्य वाटते. इंद्र आणि रावण यांची तुलना करूया.
इंद्राला सद्गुणी आणि पवित्र व्यक्ती मानण्यात आले. रावनला खलनायक म्हणून गणले गेले. पण नेमकी वस्तुस्थिती काय आहे..
रावण हा ब्रम्हादेवाचा पणतू , पुलस्य ऋषीचा नातू आणि वैश्वानर ऋषीचा मुलगा होता. अशा प्रकारे रावण ब्राह्मण होता आणि उच्च जातीत जन्मला आला होता. इंद्र हा नियुक्त व्यक्ती होता आणि त्याचा पूर्वजांविषयी निश्चिती नाही.
रावणाने आपल्या वडिलांच्या आश्रमात तसेच ब्रम्हदेवाच्या आश्रमात वेद आणि शास्त्रांचे अध्ययन केले. त्याने वेदांवर प्रभुत्व मिळवले होते आणि वेदासाठी काही रुचा देखील तयार केल्या आहेत. त्याचे शिवतांडव प्रसिद्ध आहे. इंद्राकडे कसलेही प्रशिक्षण नाही आणि तशी क्षमताही नाही. रावणाने रावणसंहिता निर्माण केली आणि तो आयुर्वेद आणि जोतिर्विद्यान यांमध्ये निपुण होता. इंद्राकडे असे कौशल्य नाही.
रावणाने कुबेराचा पराभव करून लंकेचे राज्य घेतले. इंद्राला स्वर्गाचे राज्य देवांनी दिले होते. रावण हा एक चांगला प्रशासक होता आणि त्याने इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड, कंबोडिया इत्यादी देशांत आपला साम्राज्य वाढविले. त्याची प्रजा सुखी आणि समृद्ध होती. इंद्राने अशी क्षमता किंवा शौर्य दाखवले नव्हते. तो पराभूत होऊन अडचणीत अडकत असे आणि भगवान विष्णूचा आश्रय जात असे. रावण शिव उपासक होता आणि इंद्रा हा कोणाचाच उपासक नव्हता.

रावण स्त्रीलंपट होता आणि माहिती असलेली घटना म्हणजे वेदवती, कुबेरांची सून आणि सीता. ब्रम्हकन्या अहिल्या हिच्यासह अनेक स्त्रियांच्या मागे इंद्रही स्त्रीलंपट होता. इतकेच नाही तर ऋषींची तपश्चर्या मोडण्यासाठी इंद्र त्त्यांच्याकडे स्त्रिया पाठवत असे. हाय प्रोफाईल लोकांना मुली पुरवणाऱ्या आजच्या एजंटपेक्षा तो वेगळा नव्हता. विश्वामित्र मेनका लक्षात ठेवा.
देवांनी इंद्राला शिक्षा का दिली नाही आणि रावणाचा वध का केला ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाकी इंद्रा पदवी आजही चालू आहे. रोब्लॉक्स मधल्या ब्लॉक्सफ्रूटस चा डेव्हलपर रिप-इंद्रा ( पोरांच्या भाषेत रिपिनड्रा) आहे आणि तो एपीसी आणि पहिल्या तीन समुद्रांचा बॉस आहे, असं ऐकून आहे.

छल्ला धन्यवाद. Happy
इंद्राचे कुठे मंदिर नाही,त्याच्या नावाने काही व्रत वैकल्ये नाहीत.
असला कसला हा देवांचा राजा? >>> असे गुणं उधळल्यावर कोणी का मंदिर बांधेल. तरीही भारतात कुठेतरी कानाकोपऱ्यात एखादे असेलच, शास्त्र म्हणून एखादा मान दिला असेलच.
रिपिनड्रा >>> Lol

ज्या देवांचे मंदिर नसते त्यांना कोणीतरी शाप दिला असतो की तुझे कोणी मंदिर बांधणार नाही..
तुझी कोणी पूजा करणार नाही...

पण मग कुठेतरी एखादे मंदीर बांधलेले असते कारण त्यावर उशाप सुद्धा मिळाला असतो.

असे गुणं उधळल्यावर..
>>>

आज इंद्र मायबोलीवर असता तर म्हणाला असता,
वोह करे तो रासलीला..
हम करे तो कॅरेक्टर ढिला..

कोणीतरी काढा इंद्राचा डुप्लिकेट आयडी. त्याचीही बाजू समोर यायला हवी.

जर त्याला देवांचा राजा हा दर्जा दिलाच आहे तर त्याच्या प्रत्येक वागण्यामागे काहीतरी कारण लपले असणारच. कारण देव करतो ते भल्यासाठीच.. हा तर त्यांचाही राजा आहे.

Lol
कारण देव करतो ते भल्यासाठीच. >>> देव नाही, देवता आहे. शिवाय जो स्वतःच 'त्राहिमाम' अवस्थेत असतो, तो इतरांचे काय भले करणार. Happy

कोणीतरी काढा इंद्राचा डुप्लिकेट आयडी. त्याचीही बाजू समोर यायला हवी.
>>>>
माझं नाव इंद्र, पण हल्ली माझं अस्तित्वही डावं झालंय. एकेकाळी देवांचा राजा होतो, आता मात्र ‘पावसाचा प्लंबर’ बनलोय! आणि त्या वर महेंद्र बाहुबली आणि अमरेंद्र बाहुबली यांनी मला कायमचं मागे टाकलंय. अहो, एकेकाळी मी स्वर्गाचा राजा होतो, आणि आता Netflix वर “बाहुबली” बघताना वाटतं, आपणच चुकलो का? कटप्पाने अमरेंद्रला मारलं, तसं देवांनी माझ्या इमेजला मारलंय!

आता माझं ऐका—देवांचा राजा असूनसुद्धा माझ्या बाबतीत फारच गोंधळ आहे. तुम्हाला माहिती आहे, स्वर्गाचं काम किती अवघड आहे का? मीच सगळं सांभाळतो—पाऊस कधी पाडायचा, कोणाला वादळात फसवायचं नाही, आणि वरून देवांचा अहंकारही सांभाळायचा. पण काय झालं, जरा जास्त पाऊस पाडला तर लगेच लोक म्हणतात, “इंद्र चिडला आहे!” अहो, मी चिडलो नाहीये; माझं पावसाचं मशीन फक्त जरा over-speed वर गेलं होतं.

आता माझं म्हणणं एवढंच आहे—स्वर्गात महेंद्र बाहुबली राजा असता, अमरेंद्र बाहुबली त्याचा वारस असता, आणि नरेंद्र प्रचारक असता, तर मी काहीतरी वेगळं करून दाखवलं असतं. पण आता फक्त पाऊस पाडायचा, वादळं शांत करायची, आणि स्वतःचं अस्तित्व शोधायचं एवढंच उरलंय!

देव नाही, देवता आहे >>> अरे देवा.. आता कुणीतरी यातला फरक सांगा

मानव - मानवता
देव - देवता
जेव - जेवता?

मागचा प्रतिसाद पुढे चालू..

महादेव म्हणजे संघप्रमुख. त्यांना सत्तेचा मोह नसतो. पण सर्वांवर वचक असतो. देवांचे देव महादेव. म्हणजेच शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांचा रिमोट कंट्रोल मातोश्री असायचा तसा स्वर्गाधिपतीचा रिकं कैलासाला असायचा. मागच्या शतकाच्या सुरुवातीला महादेव हेच सर्वांत पॉप्युलर देव होते. त्यावेळी त्यांच्या पुत्राचा उत्सव सुरू झालेला नव्हता. माझ्या आजीच्या गोष्टीत नेहमी शंकर पार्वती हे विमानातून जात असताना त्यांना भक्तावर संकट आलेले दिसत असे. मग महादेव रूप बदलून किंवा खऱ्याखुऱ्या रूपात प्रकट होत. पार्वतीचं काम असायचं "अहो, हे बघा, मी काय सांगते ऐका! भक्त भक्त म्हणून इमोशनल होऊन* काही तरी वर देऊन बसाल आणि नंतर ते निस्तरायला देवांचा मोर्चा आपल्या बिनभिंतीच्या घरावर येईल. इंद्रराजांचं काही वाटत नाही हो. पण ते विष्णू भाऊजी नाकातले कानातले केस जळतील असं बोलतात हो. बोलतात साधंच पण त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी टिंगलटवाळीचे भाव असतात असं वाटतं. त्यांना रामावतारात खाली पाठवलं होतं तेव्हांच फक्त बरं वाटलं होत. *

थोडक्यात देव, नाही नाही, महादेव असला तरी बायकोचे अनमोल सल्ले चुकलेले नाहीत.

विष्णू हे प्रकरण शरद पवारांसारखं वाटत. विष्णूला एकेरी संबोधन चालतं. महादेवासारखी भीती वाटत नाही. टिंगल टवाळी, मिस्किल बोलणं यामुळे आपलासा वाटतो. पण तो बायकांना जास्त आपलासा वाटतो त्यामुळं आपलासा मधून बराच आपलेपणा झटक्यात उणे होतो. तमाम नवऱ्यांना हा थ्रेट आहे. त्यामुळेच बायका पळवणारा शाहरुख खान महिलावर्गात तुफान लोकप्रिय झाला असावा. आणि कृष्ण रूपात काय सांगावं... राज कपूर का लोकप्रिय झाला?
बरखा बहार आयी गाण्यावर बंदी आणूनही स्व. गोपीनाथ मुंडे लोकप्रिय का होते?
करूणेचा त्याग करून शर्मिलेसे धनुभाऊ माळ्याच्या बागेतलं शुभ्र फूल तोडूनही निवडून का आले?
कारण कृष्ण सखा वाटतो महिलांना. नवरा इज्जे हजबंड मटेरियल, बट सखा इज सखा. म्हणून गर्लफ्रेंड / बायको आयुष्यात येत नाही तोपर्यंत तरूणांना कृष्ण आपलासा वाटतो. त्याचा आदर्श घ्यावासा वाटतो. मात्र एकदा का गफ्रे / बायको आयुष्यात आली कि थेट श्रीराम आदर्श वाटू लागतो. जोडीने रामभक्ति करावी म्हणजे ती आपोआपच सीतेचा आदर्श घेते. एकदा का तिने सीतेच्या भूमिकेत एण्ट्री केली कि नवऱ्याच्या मनातला कृष्ण बाहेर पडायला दार ठोठावू लागतो. शेवटी दोन्हीही विष्णुचीच रूपं, त्यामुळे चालतं नवरे मंडळींना.
असं कनेक्शन द्रौपदी आणि सीते मधे नसल्याने ती मुभा बायकोला नाही त्यामुळे वादविवादात किंवा सिनेमात पुरूष पात्राला गप्प करायला द्रौपदीचा ढोस देतात त्यात काही लॉजिक नाही अभ्यास नाही. उगीच उचलली जीभ प्रकार आहे..

पुढे चालू..

* हे संघप्रमुखांचे लक्षण नाही

मानव - मानवता
देव - देवता
जेव - जेवता? >> हे आवडलं Lol

यज्ञ करताना जी वैदिक स्तोत्रे म्हणतो त्यात इंद्राचा उल्लेख पूर्‍वेचीदेवता म्हणून पण येत असतो. देवळांपेक्षा वेगळ्या स्वरुपाचे पूजन वाटते अशा देवतांच्या बाबत. रच्याकाने बौद्ध साहित्यामधे पण इंद्राचा उल्लेख बरेचदा येतो.

इंद्राचे देउळ नाही कारण इंद्र ही वैदिक देवता आहे. वैदिक देवतांचे पुढे पौराणिक देवतांमध्ये रुपांतर झाले त्यात इंद्र, उषा, आदित्य, वरुण, वसु, मरुत्, अश्विनी कुमार ही मंडळी मेन स्ट्रीम मध्ये राहिली नाही. शंकर आणि विष्णू आणि त्यांच्याशी संबंधित देव ह्यांची पुजा सुरू झाली. यज्ञ वगैरे क्वचित प्रसंगी व्हायला लागले आणि मुर्ती पुजा सुरू झाली त्यानंतर देवळे बांधली जाऊ लागली. सिंधू-सरस्वति उत्खननात यज्ञवेदी मिळाल्या पण एकही देऊळ मिळाले नाही. रामायण महाभारतात देखील देवळांचा उल्लेख नाही. तज्ञांचा उल्लेख बर्याच ठिकाणी आहे.

असामी छान पोस्ट.

बौद्ध साहित्यात इंद्राचा उल्लेख साक्य असा आहे. त्याला काही वेळा देवानाम इंद्र म्हटले आहे. जैनांमधेही इंद्राचे उल्लेख आहेत. झेंद अवेस्तामधेही इंद्र आहे. ग्रीक साहित्यात इंद्र ही कल्पना आहे.

पर्जन्याची देवता, वीज वादळ आणणारी देवता म्हणून या साहित्यात वेगळ्या नावाने जी देवता आहे ती इंद्र आहे. देवांचा राजा ही कल्पना बौद्ध साहित्यात आहे.

वैदीक साहित्यानंतरच्या साहित्यात इंद्राच्या कल्पनेत फरक होत गेला. पुरंध्रा ( कि पुरंद्र ? ) हा इंद्र असताना त्याला एक सहस्त्र डोळे होते. ते त्याच्या शरीरावर सहस्त्र ठिकाणी होते अशी कल्पना आहे. हा ब्रह्मदेवाच्या एक मन्वंतर काळासाठी इंद्र होता. यानंतर वेगवेगळे इंद्र सिंहासनावर बसले .

चुभूदेघे.

आता इथलं हे सगळं इंद्रदेवाला दाखवून हे स्वर्गात पसरवू का, असं विचारतोच त्याला ! माझा प्रवास भत्ता कसा नाहीं वाढवत आता तेंच बघतो !! नारायण... नारायण...

; 20191222_220545_3.jpg

भाऊ Lol

खतरनाक Happy _/\_
नारद बुवा अपॉरच्युनिस्ट आहेत Happy

वैदीक साहित्यानंतरच्या साहित्यात इंद्राच्या कल्पनेत फरक होत गेला. पुरंध्रा ( कि पुरंद्र ? ) हा इंद्र असताना त्याला एक सहस्त्र डोळे होते. ते त्याच्या शरीरावर सहस्त्र ठिकाणी होते अशी कल्पना आहे. हा ब्रह्मदेवाच्या एक मन्वंतर काळासाठी इंद्र होता. यानंतर वेगवेगळे इंद्र सिंहासनावर बसले . >> +१ हे वाचल्याचे आठवते. किंबहुना पुरंदर हा संदर्भ तत्कालीन धार्मिक मांडणीवर वेदांचा वाढता प्रभाव ह्या अँगलमधे वाचला आहे. ते करण्यात पुढाकार घेतलेल्या व्यक्तीला इंद्र असे मानले गेले.

इंद्रा एव्हढा षंढ देव कुठल्याही पोथी पुराणात नाही. खर तर तो देव नाहीच. एक नास्तिक

Pages