।। १०।।
“ये बाळ”
“प्रणाम गुरुवर्य, तुम्ही इथे? मानवी प्रज्ञेच्या मर्यादा ओलांडून तुम्ही कधीच पुढे निघुन गेला होतात मग आज ह्या मितीत मागे वळुन कसे आलात?”
“माझ्या ह्या गुणी शिष्येचे कौतुक करायला आलोय बाळ. आत्मोन्नतीच्या प्रवासातला हा पहिला टप्पा, ‘कोऽहम् चा शोध’ सगळ्यात अवघड असतो. तो तू आज यशस्वी पणे पूर्ण केलास.”
“माझी गणना तर तुमच्या मुढतम् शिष्यांमध्ये व्हायला हवी गुरुवर्य. तुमच्या सारख्या परमज्ञानी गुरुने ह्या पाठाचा श्रीगणेशा करुन दिला, दोन जन्म मार्गदर्शन केले, तरीही मला तो पुर्णपणे आत्मसात करण्यासाठी तिसर्यांदा ह्या पृथ्वीवर यावे लागले.”
“इथे यशाचे परिमाण ज्ञान पूर्णपणे आत्मसात करणे हे असायला हवे बाळ. ते आत्मसात करण्याचा वेग नव्हे. तुझ्या उद्दिष्ट पुर्ती च्या मार्गात, तुझ्या मनात साचलेला क्रोधाचा मुख्य अडथळा होता. माझी आणि तुझी पहिल्यांदा भेट झाली तेव्हा मी तुझ्या मधील जिज्ञासा जागृत करु शकलो पण तुझ्या मनातल्या क्रोधाने त्या जिज्ञासेचा प्रवाह अडवून धरला होता. त्यामुळे आधी त्या क्रोधाचा संपुर्ण निचरा होणे आवश्यक होते. तसा तो झाल्यानंतर तू तुझे आकलन पुर्ण केलेस. त्यासाठी तुला तीन वेळा जन्म घेणे आवश्यकच होते. ज्यांना तू तुझ्या आधी हा शोध प्रवास पुर्ण करताना बघितले त्यांनी त्यांचा पाठ मागचे किती जन्म गिरवला होता हे तुला कुठे माहिती आहे?
शिवाय कोऽहम् चा शोध हा स्वतः पुरता मर्यादित कुठे असतो? तो घेताना इतरांना त्यांच्या शोधात सहाय करणे पण अंतर्भुत असते. तू अंबेच्या जन्मात सुरू केलेला तुझा प्रवास अंबा म्हणुनच पुर्ण केला असतास तर यामिनी आणि अमृताच्या प्रवासाला चालना कशी दिली असतीस?”
“ही सगळी तुमची योजना होती गुरुदेव? म्हणुन तुम्ही मला हे असे यामिनी बरोबरचे सहअस्तित्व घेण्याची प्रेरणा दिलीत?”
“योजना तर त्या जगन्नियंत्याची आहे बाळ. आपण सगळ्यांनी प्रगतीपथावर रहावे त्यासाठी आवश्यक असलेले अनुभव घ्यावेत, तसेच घेतलेल्या अनुभवातून योग्य ते निष्कर्ष काढुन ज्ञानार्जनाचे टप्पे गाठावेत ह्यासाठी तोच आपल्या सगळ्यांना प्रेरणा देत असतो. पण तुझ्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे तर हो, अनुभवातून शिकण्याच्या ह्या प्रक्रियेत मी तुम्हा तिघिंचाही मार्गदर्शक आहे. तुझ्या आकलनातून त्या दोघींच्या प्रवासाला चालना मिळण्यासाठी यामिनी बरोबरचे तुझे सह-अस्तित्व हा मार्ग मला योग्य वाटला.”
“पण तुम्हाला अपेक्षित असलेल्या दिशेला मी त्यांना वळवु शकले नाही आचार्य. त्यांच्या विचारांना चालना तर मिळाली माझ्यामुळे पण त्यांचे जागृत झालेले कुतुहल त्यांना सत् चित् आनंदाच्या वाटेने घेऊन जाण्याऐवजी त्यांच्या ओळखीच्या म्हणजे विज्ञानाच्या वाटेकडेच घेऊन गेले.”
“हा त्यांचा शोध आहे बाळ. ह्या शोधात प्रत्येकाने स्वतःची वाट स्वतः शोधायची. कुणीही कुणाला ह्यासाठी मदत करु शकत नाही. तू त्यांना वाट दाखवणे अपेक्षित नव्हतेच. त्यांची जिज्ञासा जागृत करण्याची आवश्यकता होती. ती तू केलीस. त्यांचा शोध इथून पुढे त्यांनी निवडलेल्या विज्ञानाच्या वाटेने व्हायचा आहे.”
“क्षमा करा गुरुदेव आपल्या आशयाचे आकलन मला झाले नाही.”
“त्या दोघिंना जनुकांची भाषा कळते, त्यामुळे जनुकीय चेतनेचा हा प्रवाह नेहमीपेक्षा वेगळ्या म्हणजे तुझ्यासाठी निवडलेल्या मार्गाने कसा मार्गस्थ होतो हे त्यांना पडताळुन पहायचे आहे. इथुन सुरू झालेला त्यांचा प्रवास त्यांना जनुकांच्या प्रयोजनाकडे म्हणजे जनुकांच्या रुपात ठेवल्या गेलेल्या उत्क्रांतीच्या नोंदींच्या दिशेने घेऊन जाईल.
“कोऽहम् चा शोध घेण्यासाठी मानवी अस्तित्व आवश्यक आहे. तो शोध पुर्ण होईपर्यंत जीवात्मा पुन्हा पुन्हा ह्या पृथ्वीवर जन्म घेत असतो. एका जन्मात ह्या शोधात केलेल्या प्रगतीची नोंद जनुकांच्या रुपात साठवली जाते आणि पुढच्या पिढीकडे सुपूर्द केली जाते. पुढच्या पिढीच्या रुपात तेच जीवात्मे जन्म घेतात ज्यांनी हे संचित सांभाळण्याची क्षमता त्यांच्या आधीच्या जन्मात अर्जित केली असते. अशा रीतीने हे चक्र अव्याहत सुरू असते.
कधी कधी ह्या शोध प्रवासातील एखाद्या टप्प्यात स्वतंत्र अस्तित्वाची आवश्यकता नसते. पण ह्या चक्राचे संतुलन राखण्यासाठी जनुकीय संचित पाठीमागून येणाऱ्या जीवात्म्यांसाठी ठेवून जाणे आवश्यक असते. त्यामुळे मग एकाच मानवी शरीरात असे दोन जनुकीय क्रम साठवुन ते संतुलन साधले जाते. “
तू दिलेल्या चालनेमुळे अमृता आणि यामिनीचा प्रवास ह्या आकलनाच्या दिशेने सुरू झाला आहे.”
“गुरुदेव तुमच्यासारखा मार्गदर्शक असल्यावर यामिनी आणि अमृताचा शोध यशस्वी होईल हे निश्चित. तुमच्या कृपेमुळेच माझ्या आकलनात राहिलेली अपुर्णता आज संपली. अंबेच्या अस्तित्वाचे प्रयोजन आता पूर्ण झाले.”
होय बाळ, आता तुला पुढच्या मितीत तुझ्या प्रवासाच्या पुढच्या टप्प्याची म्हणजे त्या परमतत्वाच्या वास्तव स्वरुपाच्या आकलनाची सुरुवात करायची आहे. त्यासाठी अंबा ह्या पृथ्वीवरच्या अस्तित्वाची आवश्यकता उरलेली नाही.”
“तुम्हाला ह्या अंबेचा शेवटचा प्रणाम गुरुदेव.”
“यशस्वी भव, बाळ. शुभास्ते पंथानः सन्तु!”
सुंदर शेवट..
सुंदर शेवट..
पुढच्या पिढीच्या रुपात तेच जीवात्मे जन्म घेतात ज्यांनी हे संचित सांभाळण्याची क्षमता त्यांच्या आधीच्या जन्मात अर्जित केली असते. अशा रीतीने हे चक्र अव्याहत सुरू असते>>>>>
हे आवडले. असाही विचार करता येईल.
खूपचं छान कथा.. आवडली.
खूपचं छान कथा.. आवडली.
एक जन्म स्वतःचा, एकात रूपांतर
एक जन्म स्वतःचा, एकात रूपांतर, तर एकात सुप्त सहअस्तित्व, आणि समाप्ती/मुक्ती (पण खरंच संपतो हा प्रवास?!)
भला मोठा आवाका, त्याला गवसणी घालण्याचा उत्तम प्रयत्न!
उत्तरांपेक्षा अधिक प्रश्न प्रसवणारी.. म्हणूनच विचारांना चालना देणारी..
मिथक, अध्यात्म, विज्ञान अनेक पातळ्यांवर फिरणारी कथा.
जनुकांच्या प्रयोजनाकडे म्हणजे जनुकांच्या रुपात ठेवल्या गेलेल्या उत्क्रांतीच्या नोंदींच्या दिशेने घेऊन जाईल. >> कळीचा मुद्दा
लेखिकेस विनंती: यातलं विज्ञान एका मराठी लेखमालिकेत उलगडून दाखवलं तर सर्वसामान्य वाचकाला उपयुक्त ठरेल. हा अनोळखी, थोडासा क्लिष्ट विषय सुलभ, वाचनीय पद्धतीत मांडण्याची हातोटी लेखिकेस साधली आहे.
सुंदर कथा शेवटही छान
सुंदर कथा
शेवटही छान
छान कथा!
छान कथा!
Abuva यांच्याशी सहमत!
मस्त कथा! आवडली!
मस्त कथा! आवडली!
धन्यवाद साधना, मनिम्याऊ, बुवा
धन्यवाद साधना, मनिम्याऊ, बुवा, किल्ली, व्हावे आणि स्वाति२.
बुवा तुमची सुचेना मला नीटशी कळली नाही. कायमेरिझम बद्दल लिहावे असे सुचवताय का? मला वाटते भाग ६ मध्ये मी प्रतिसादात मी त्यातला तपशील जरा वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तसे काही अपेक्षित होते का तुम्हाला?
होय, त्या भागात बऱ्याच
होय, त्या भागात बऱ्याच शास्त्रीय संज्ञा वापरल्या गेल्या होत्या. कायमेरिझम हा माझ्या वाचनात फारसा न आलेला एक शब्द अथवा विषय होता.
बोनमॅरो ट्रान्सप्लांट मधुन किंवा गर्भाकडुन आईला/ आईकडुन गर्भाला दुसरा जेनेटिक सिक्वेंस पास केला जाऊ शकतो >> ह्या वाक्यानं तर उत्सुकता फारच चाळवली होती.
त्याच संदर्भानं मागच्या एका प्रतिसादातही मी उल्लेख केला होता.
मी या विषयाचा अभ्यासक नाही पण जिज्ञासू आहे. डीएनए वगैरे संकल्पना भन्नाट असल्याने त्याबाबतीत आवडीने वाचन होते.
Random mutations पलिकडे DNA मध्ये जे (एका अर्थी) घडवून आणलेले वा घडलेले बदल हा कुतुहलाचा भाग आहे.
DNA, consciousness आणि त्यांचा परस्परसंबंध (असलाच तर! असणारच की..) हा मला कायम खुणावणारा विषय आहे.
अनेक यूट्यूब लेक्चर्स आणि एखाद-दोन पुस्तकं वाचूनही त्याचा उलगडा होत नाहीये. अर्थात तो दोष माझा आहे.
त्यामुळे कुणी या बाबतीत अधिकारवाणीनं बोलू शकत असेल तर ऐकण्या-वाचण्यात आनंदच आहे.
तुम्ही ज्या खुबीनं या विषयाचा कथा कल्पण्यात, विणण्यात, रंगवण्यात उपयोग केला ते बघून, कथेच्या परिघात न अडकता अधिक विस्तारानं, अधिक खोलात जाऊन विवेचन ऐकण्याची (स्वार्थी) इच्छा जागृत झाली.
पुनश्च धन्यवाद!
Epigenetics
प्रतिसाद अवांतर होता म्हणून उडवून टाकला.
छान कथा...
छान कथा...
धन्यवाद आबा.
धन्यवाद आबा.
बुवा तुमची विचारपुस चेक करा वेळ मिळाला की.
Science fiction म्हणून ही कथा
Science fiction म्हणून ही कथा खूप छान वाटली वाचायला.
केकु च्या काही कथांमध्ये पात्र, स्थळ- काळ, समांतर विश्व ह्यात भटकत असतात. तशा science fiction ची पण एक मजा आहे,
पण तुमच्या कथे मधे काही वेगळं जाणवलं, शास्त्र, पुराण, अध्यात्म ह्यांची छान सांगड घातली आहे अस वाचताना वाटत होत.
महाभारत आणि त्यातील पात्र ह्याच्यावर वाद घालू तेवढा कमी आहे, ते महाकाव्य वाचून, बघून जेवढा बोध घेता येईल तेवढा घ्यावा एवढंच
शास्त्रीय गोष्टी तुम्ही छान मांडल्या आहेत, तुमचा त्यात अभ्यास आहे तसच तुमच्या कडे लेखन शैली ही सुंदर आहे.
Chimeric DNA ची शस्त्रीय बैठक घेऊन दोन वेगळ्या काळातील व्यक्ती (?) एकच देहात राहून अपल्या मुक्ती चा मार्ग शोधतात ( एकमेकांना दाखवतात) ही कथेची कल्पनाच खरंतर भन्नाट आहे.
बाकी शास्त्रीय दृष्ट्या chimeric DNA आणि DID ची सांगड घालता येईल का? पण तुम्ही कथेत मांडलेला प्रकार DID पेक्षा वेगळा आहे. ह्यावर कुठेतरी शास्त्रीय चर्चा करायला मजा येईल.
मनःपुर्वक धन्यवाद मन्या. मी
मनःपुर्वक धन्यवाद मन्या. मी पण आधी DID आणि कायमेरिक डीएनए ची एकत्र सांगड घालण्याचा विचार केला होता. पण लिटरेचर सर्च मध्ये काही कॉंक्रिट सापडलं नव्हतं. मायबोलीवर कुणी तज्ञ असतील तर मलाही ह्या विषयावर चर्चा करायला आवडेल.
कायमेरिक डीएनए
कायमेरिक डीएनए
Darby, Alexis, "The Case of Lydia Fairchild and Her Chimerism (2002)". Embryo Project Encyclopedia (2021-06-01). ISSN: 1940-5030 http://embryo.asu.edu/handle/10776/13270.
कायमेरिक डीएनए कुणाच्या आयुष्यात वादळे आणतात त्याची सत्य कथा.
https://abcnews.go.com/Primetime/shes-twin/story?id=2315693
छान कथा. आवडली.
छान कथा. आवडली.