।।९।।
“माइंड ब्लोइंग आहे हे सगळे. तु CCR मध्ये विपश्यनेसाठी जायचे ठरवलेस तेव्हा खरं तर मी खूप साशंक होते. दोन महिन्यांच्या एकांताचा तुझ्या वर काही तरी भलताच परिणाम होईल अशी भिती वाटत होती मला.”
“खरतर ते तिनेच सुचवले होते अमृता. ती म्हणाली, मी घेतलेला प्रत्येक अनुभव, त्यावर केलेला विचार ह्या सगळ्यांची ती साक्षीदार होती. मागे कधीतरी mindfulness मध्ये इंटरेस्ट आला होता तेव्हा मी Google talks मधले डॉ. वाॅलेस ह्यांचे भाषण ऐकले होते युट्युब वर . त्याची तिने आठवण करून दिली.
त्या भाषणात मनाच्या आत लक्ष केंद्रित करून मनाचा शोध घेण्याच्या पद्धतीबद्दल डॉ वॉलेस जे बोलले, ते ऐकून मग मी CCR ला जायचे ठरवले. पण गमतीची गोष्ट अशी आहे की मी विपश्यना केलीच नाही तिथे. आम्ही दोघी सतत बोलत होतो एकमेकींशी दोन महिने. तिला निरोप देताना अगदी रुममेट सोडुन जातेय कायमची असे फीलिंग आले होते मला.”
“मी अजुन तिचं महाभारत कालीन असणेच पचवतेय. तुझी तिची मैत्री वगैरे तर पुढची गोष्ट. तरीही, मी खुश आहे. तुझ्या आयुष्यातला हा महाभारत चाप्टर संपला. आता सगळे पुर्वी सारखे, म्हणजे नॉर्मल होणार.”
“ माझ्या साठी अजुन हा चाप्टर संपला नाही अमृता.”
“म्हणजे?”
“अजुन बरेच प्रश्न अनुत्तरित आहेत. तिच्या बोलण्यात वारंवार यायचे की घडणाऱ्या प्रत्येक घटनेमागे काही तरी प्रयोजन असते. मग आमची ही अशी एकत्र मोट बांधली जाण्याचे काय ‘प्रयोजन’ असु शकेल?
“कदाचित महाभारत खरच घडले होते, हे जगाला कळावे हा उद्देश असेल.”
“तसा उद्देश असता तर मग हिप्नॉसिस सेशन्स मध्ये तिचं अस्तित्व उघड होणे जास्त संयुक्तिक नसते का ठरले? इनफॅक्ट तिथे तिचं अस्तित्व उघड होऊ नये ह्याबद्दल ती स्वतः दक्ष होती. आता निव्वळ मी सांगतेय म्हणुन कोण विश्वास ठेवणार? आणि मी सांगणार तरी काय? मला नाही वाटत, महाभारताबद्दल जगाला कळणे हा उद्देश असेल ह्या सगळ्याचा.”
“पण मग अजुन काय असु शकेल?
“तेच तर कळत नाहीये मलाही. ती असेही म्हणाली होती की मी तिचे संचित मी सांभाळायचे आहे इथुन पुढे तेही मला नीटसे कळले नाहीये.”
“गुगलनुसार संचित = सन् (संपूर्ण) + चित् म्हणजे ज्ञान किंवा चेतना. ह्या अनुषंगाने विचार करुन बघु.”
“मला माहीतीये, मी पण गुगल केले होते. पण ज्ञान तर काही दिलेच नाही तिने.”
“तिला ज्ञानाऐवजी चेतना अपेक्षित असेल तर?”
“म्हणजे?”
“चेतना म्हणजे consciousness असा अर्थ घेतला तर तिचा स्वतःचा डीएनए सिक्वेंस इथुन पुढे तु सांभाळ असे तिला म्हणायचे असेल कदाचित.”
“पण मग डीएनए सिक्वेंस मध्ये कुठे चेतना आहे? ती निघून गेली, तिचा डीएनए सिक्वेंस अजुन आहे. तो माझ्यासोबतच राहील. पण त्याने काय होणार?”
“मी कायमेरिझम बद्दल शोधाशोध करताना कॅरेन केगन नावाच्या एका बाईबद्दल वाचले होते. ती ५२ वर्षांची असताना तिला किडनी ट्रान्सप्लांट ची गरज पडली. पोटेन्शियल डोनर म्हणून तिच्या तीनही मुलांचे टेस्टिंग करण्यात आले तेव्हा हे लक्षात आले की तीनही मुलांना तिनेच जन्म दिला असला तरी त्यातील दोघांची ती आई नसुन बायलॉजिकल मावशी होती!
ब्रुस लिफ्टन नावाच्या एका वादग्रस्त सेल बायलॉजिस्ट चे एक हास्यास्पद मानले गेलेले हायपॉथिसिस आहे. त्याच्या मते “One has more control over genetic expression than we think. This control is influenced by thoughts and perception.” Apparently our perception programs our subconscious mind which in turn give rise to chemical signals that direct our cell’s behavior!
तुझ्या केस मध्ये हे हायपोथिसिस मॉडिफाय करुन असे म्हणता येईल की तुला हे सगळे माहिती असण्याचा तुझ्या रिप्रोडक्टिव आउटकम वर काही विवक्षित परिणाम होऊ शकेल. असे काही असेल का आणि असेल तर नक्की काय असेल ते आपण तुझ्या होणार्या बाळांचे डीएनए सिक्वेंसिंग करु तेव्हा कळेल.”
“ते तर करुच ते जन्माला येतील तेव्हा पण हे तेवढ्यापुरते मर्यादित का ठेवायचे? कारण हा शेवटी ऍनेक्डोटल एव्हिडंसच ठरणार ते पण ऑब्झरवर बायस सह. कॅरेन च्या केस मध्ये असा काही ट्रिगर होता का, असल्यास काय होता? नसल्यास तिच्या केस मध्ये २/३ मुलांचे डीएनए सिक्वेंस वेगळे हे कशामुळे घडु शकले? हे प्रश्न पण आहेतच.”
“खरंय”
मला असे वाटते की एका स्वतंत्र प्रोजेक्ट मधुन तपासायला हवे आपण तुझे हे मॉडिफाइड हायपॉथिसिस.”
“ते कसे शक्य आहे? ह्युमन प्लुरीपोटंट स्टेम सेल्स तर आपण वापरु शकत नाही आणि तुझ्या सारख्या ह्युमन केसेस असतील का, असल्यास आपल्याला सापडु शकतील का हे ही प्रश्न आहेत. त्यामुळे केस स्टडीच्या फॉर्म मध्ये रिसर्च केला जाऊ शकत नाही. रहाता राहिले उंदीर पण त्यांचा काय उपयोग? त्यांचे पर्सेप्शन वगैरे कसे तपासणार?”
“पर्सेप्शन नाहीच तपासता येणार, पण असे कायमेरिक माउस मॉडेल डेव्हलप करुन माझ्यासारखे असे घोस्ट ट्विन न्युरल डेव्हलपमेंट होण्याची शक्यता किती, त्याला कुठले घटक कारणीभूत ठरु शकतात अशी बेसिक उत्तरे मिळु शकतात आपल्याला.
“इंटरेस्टिंग, पण टेट्रागमॅटिक कायमेरिझम असलेले माऊस मॉडेल तयार करणेच फार कठीण वाटतेय मला. तुला वाटते ते जमू शकेल?”
“मला नाही जमणार पण माझी होणारी कोलॅबोरेटर खुप टॅलेन्टेड रिप्रोडक्टिव बायलॉजिस्ट आहे. सध्या ती तिच्या कुजकट बॉस घ्या अतर्क्य थेअऱ्या तपासण्यासाठी कधी कधी माऊस मॉडेल्स तयार करते. तिच्याच आऊट ऑफ बॉक्स थिंकिंग मुळे आतापर्यंतची उत्तरे मिळु शकली आहेत ह्या प्रकरणात. तिला नक्की जमेल.”
“गुड आयडिया! मला तसंही म्हाताऱ्याला कायमचा रामराम करायचाच आहे लवकरात लवकर. मी असं करते नवीन असाइनमेंट एम्ब्रायो मॉडेल्स वर काम करणाऱ्या गृप मधे शोधते. तिथे मला काही बेसिक गोष्टी शिकता येतील. तो अनुभव वापरुन मला तुला हवे आहे तसे माउस मॉडेल जनरेट करायला उपयोगी पडेल.”
“तुला कॉन्फिडन्स आला की आपण रिसर्च प्रोजेक्ट सबमिट करु फंडिंग साठी.”
“डील!”
संदर्भ
CCR = Center for Contemplative Research (https://centerforcontemplativeresearch.org/mind-labs/retreat/)
Dr Allen Wallace's speech at Google Talks = Toward the First Revolution in the mind Sciences (https://www.youtube.com/watch?v=9p7Y1JFOUok&t=10s)
बऱ्याच नवीन तांत्रिक संज्ञा
बऱ्याच नवीन तांत्रिक संज्ञा कळल्या. त्यावर गूगल करणं बाकी आहे. पण एकंदर मामला गहन आहे!
मग डीएनए सिक्वेंस मध्ये कुठे चेतना आहे? >> हे वाक्य मला इंटरेस्टिंग वाटतंय..
खूप दिवसांनी वैज्ञानिक विचार, वाचन, कदाचित अभ्यास करायला लावणारी तरीही उत्कंठावर्धक कथा वाचायला मिळते आहे. पुभाप्र...
खूपच इंटरेस्टिंग होते आहे कथा
खूपच इंटरेस्टिंग होते आहे कथा. पुढील भागाच्या प्रतिक्षेत
धन्यवाद बुवा आणि मनिम्याऊ.
धन्यवाद बुवा आणि मनिम्याऊ.
मी लिहिताना घातलेल्या लिंक्स प्रकाशित झाल्यावर दिसत नव्हत्या त्या खाली संदर्भ म्हणून दिल्या आहेत. जर कुणाला इंटरेस्ट असेल तर
सुरुवतीपासून वाचत आलो, अंतिम
सुरुवतीपासून वाचत आलो, अंतिम भागा नंतर विस्तृत चर्चा होईलच. तोवर थांबणार होतो पण ह्या भागा वर प्रतिक्रिया द्यायलाच हवी.
हा खूप वेगळा विषय माबो वर वाचायला मिळाला.
तुमच्या लेखनातून जाणवत की तुमचा हया कथेसाठीचा अभ्यास केवळ गुगल युनिव्हर्सिटी पुरता मर्यादित नसावा, तुम्ही स्वतः जीवशास्त्राशी संभादित विद्यावाचस्पती असाव्यात.
लेखन शैली तर छानच आहे, दोन काळातील प्रसंग अतिशय सुंदर लिहीले आहेत
आणि एक... नवीन भाग प्रकाशित
आणि एक... नवीन भाग प्रकाशित झाल्यावर आधीच्या भागाची लिंक देत जावे तसेच पुढील भाग प्रकाशित झाल्यानंतर त्याची लिंक मागच्या भागात एडिट करून टाकावी. जेणेकरून भविष्यात सलग मालिका वाचन करणे सोयीचे जाते
मस्त! कल्पना फारच आवडली.
मस्त! कल्पना फारच आवडली. तुम्हाला यातली तांत्रिक/वैज्ञानिक माहिती चांगली आहे असं दिसतंय, त्यामुळे प्रभावी झाली आहे कथा.
अंबा/शिखंडीचं यामिनीच्या मनातलं (खरं तर शरीरातलंसुद्धा) अस्तित्व हे तिला स्वतःला एक वेगळा दृष्टिकोन मिळावा यासाठीच होतं का? मग आता ती 'मुक्त' झाली असं समजायचं का?
ही एक उत्तम विज्ञानकथा झाली आहे.
धन्यवाद मान्या आणि वावे.
धन्यवाद मन्या आणि वावे.
मनिम्याऊ नक्की काय समस्या आहे माहिती नाही पण मी लिखाणात घातलेल्या लिंक्स दिसत नाहीत. मी परत एकदा ट्राय करीन जर जमले तर मागचे पुढचे भाग जोडुन टाकीन.
मन्या तुमचा तर्क शब्दशः बरोबर आहे (असे म्हणुन शकते). पदवी पुणे विद्यापीठाची असल्याने "विद्यावाचस्पती" अशी आहे :)- आणि विषय आहारशास्त्र आणि त्याच्याशी संलग्न जीव रासायनिक विश्लेषण. तुम्ही पण जीवशास्त्राशी संबंधित आहात का? कुठली शाखा?
वावे तुमच्या प्रश्नाचे उत्तर पुढच्या (अंतिम) भागात येणार आहे.
सगळ्यांच्या कौतुकामुळे अंगावर मुठभर मांस चढले आहे.: ) तुम्ही सगळ्यांनी वाचल्याची पोच दिलीत म्हणून लिहायचा उत्साह कायम राहिला. शेवटच्या भागात तुमच्या प्रामाणिक प्रतिक्रिया नक्की द्या.
Abuva +११
Abuva +११
खूप छान सुरुये मालिका