Submitted by KulkarniRohini on 5 November, 2019 - 23:40
माझ्या बे मध्ये बहुत जणांकडे mi चा मोबाइल आहे. सगळीकडे तेच तेच आवाज वाजत असतात. पाहिल्यांदा जेंव्हा college मध्ये असताना mobile मिळाला तेंव्हा रोज नवी रिंगटोन मी ठेवायचे. इव्हन hellotune सुद्धा.
सध्या यात काही नाविन्य उरल नाही का ? मी सुद्धा mi ची default रिंगटोन ठेवलीये.
मागे माझी मुलगी लहान होती तेंव्हा तिच्या आवाजातले गाणे ठेवले होते . फोन वाजला की असलं भारी वाटायचं.
आज मी senorita ऐकत होते वाटलं याची रिंगटोन ठेऊ.
तुम्हाला पण ह्या गोष्टी मॅटर करतात का? त्या त्या ringtone चा पण एक काळ असतो असे वाटते का?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
माझा फोन बरेच दिवस सायलेंट
माझा फोन बरेच दिवस सायलेंट असतो तसा. पण मी ठेवलेल्या रिंगटोन
शिवाजी महाराजांची गारद (कॉलेज)
पाटील आला (कॉलेज)
तूयो : narcos चे टायटल साँग (जॉब लागल्यापासून सर्वाधिक काळ)
The Good, the bad and the ugly BGM (आवडते खूप, पण पुन्हा पुन्हा ऐकून नावीन्य जाते म्हणून जास्त दिवस नाही ठेवत)
Pirates of Caribbean ची थीम (current, पण खूप कॉमन आहे, बदलतो आज)
मन सुद्ध तुझ ( कॉफी आणि... मध्ये ऐकून आवडलेली, पण 8 दिवसात बंद केलेली.
लम्हा लम्हा गॅंगस्टरhttps:/
लम्हा लम्हा गॅंगस्टर
https://youtu.be/VGYfbc6qWFM
या गाण्यातील ११ ते २३-२४ सेकंदापर्यंतचा म्युजिक पीस कट करून ठेवलेला. फर्स्ट जॉबला असताना. पण तो दोनच दिवस टिकला.
कारण हि टोन माझ्या एका सिनीअर मुलीला आवडली. ती सुद्धा चारच दिवसात माझी क्रश झालेली. त्यामुळे तिचे मन राखायला/जिंकायला मी तिच्याशी हि रिंगटोन शेअर केली. आणि माझी बदलली. तिच्या फोनमध्ये ती पुढे सहा महिने वर्षभर वाजत होती. वाजायची तिथे आणि गुदगुल्या मला ईथे व्हायच्या
तसेही हि टोन तिलाच सूट करत होती. माझ्या तेव्हाच्या ईमेजला जात नव्हती. मी त्यानंतर दूरी गाण्याचा मुखडा ठेवला होता. म्युजिक पीस नाही तर आतिफचा आवाज. एकदम खणखणीत आणि दमदार..
उंच माझा झोका याची शिट्टी
उंच माझा झोका याची शिट्टी मेसेजसाठी.
तुम्हाला गुदगुल्या कशा कशाने
तुम्हाला गुदगुल्या कशा कशाने होतात हा आगामी धागा?
माझा रिंगटोन आणि लिरिक सहित
माझा रिंगटोन आणि लिरिक सहित मला अतिशय आवडलेलं टायटल साँग. माझी अतिशय फेवरीट Canadian वेबसिरिज - Heartland
https://youtu.be/wfUZVytfsro
मन सुद्ध तुझ ( कॉफी आणि...
मन सुद्ध तुझ ( कॉफी आणि... मध्ये ऐकून आवडलेली)
>> डबल सीट मध्ये आहे ना ते गाणं? आणि मूळ गाणं प्रभातच्या बहुतेक 'कुंकू' सिनेमात?
गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय
गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमही खूप वर्षे ही रिंगटोन होती.ऐकल्यावर खूप प्रसन्न वाटते.आणी अंगावर काटापण येतो.
'पंचायत' मधल्या प्रधानजींची
'पंचायत' मधल्या प्रधानजींची रिंगटोन ऐकल्यावर हमखास हसू येते.
गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय
गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमही खूप वर्षे ही रिंगटोन होती.ऐकल्यावर खूप प्रसन्न वाटते.आणी अंगावर काटापण येतो.
>>>>
+७८६
मी सुद्धा ठेवलेली ही.
गणपतीच्या दिवसात मी बाप्पांच्या गाण्यांच्याही बरेच रिंगटोन ठेवायचो. मराठीत खूप छान गाणी आहेत गणपतीची. मन प्रसन्न आणि वातावरण मंगल करून टाकणारी..
https://youtu.be/6gb5A8R3dkg
https://youtu.be/6gb5A8R3dkg
माझी रिंगटोन... TravelXP theme.
यामुळे जग किती सुंदर आहे आणि मला अजून काय काय बघायचंय याची आठवण आणि उमेद राहते. पाच वर्षांपासून हीच वापरते, आवाज सूदींग आहे अलार्मिंग नाही. तो व्हिडिओ बघायलाही सुंदर आहे.
पदरावरती जरतारीचा
पदरावरती जरतारीचा
रमा माधवाचे जिथे चित्त लागे ,
रमा माधवाचे जिथे चित्त लागे , याचे सुरुवातीचे बासरीवरील म्युझिक मागील १५ वर्षे रिंगटोन आहे, काही काळ आनेवाला पल चा इंट्रो पीस पण होता
पंचायत' मधल्या प्रधानजींची
पंचायत' मधल्या प्रधानजींची रिंगटोन ऐकल्यावर हमखास हसू येते>>>>> रिंकीया के पापा…..
नवीन लोकांनी पण लिहा ना इथे.
नवीन लोकांनी पण लिहा ना इथे.
आणि जुन्या लोकांनी रिंगटोन बदलल्या असतील एव्हाना त्यांनी पण.
- चांगल्या रिंगटोनच्या शोधात असलेली पियु :wink:
अनेक वर्षं झाली, माझ्या
अनेक वर्षं झाली, माझ्या मोबाईलवर व्हायब्रेटरचा हुंकार वाजतो. रिंग टोन असते हे विसरूनच गेलो होतो.
आधी ये मोह मोह की धागे
आधी ये मोह मोह की धागे instrumental होती ...सध्या वादळवाट title song instrumental आहे..आभाळ माया मिळाले नाही..
Money heist चं म्युझिक..
Money heist चं म्युझिक..
आधी एक तमिळ गाणं म्युझिक होतं.
सॅमसंग ची deafult रिंगटोन आहे
सॅमसंग ची deafult रिंगटोन आहे.
सो बोरिंग
https://youtu.be/AX6OrbgS8lI
https://youtu.be/AX6OrbgS8lI?si=P9l5SuH9TofHTtLw
जब मैं हद से आगे बढ गया था आशिकी मे... तू है कहा
माझा फोन तर कायम व्हायब्रेट
माझा फोन तर कायम व्हायब्रेट मोड वर असतो.
आता सवय झाली आहे.
मोह मोह के instrumental
मोह मोह के instrumental
डाऊनटन अॅबीचं टायटल म्युझिक
डाऊनटन अॅबीचं टायटल म्युझिक
डोरेमॉन title ट्रॅक
डोरेमॉन title ट्रॅक
"हीच अमुची प्रार्थना अन् हेच
"हीच अमुची प्रार्थना अन् हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे"
गणपतीत ठेवलेली ही रिंगटोन
गणपतीत ठेवलेली ही रिंगटोन
अजूनही आहे.
आज बदलतोच...
⭕️ लिंक नवीन विंडो/टॅब मधे उघडेल.
मोस्टली व्हायब्रेशन मोड वर,
मोस्टली व्हायब्रेशन मोड वर, रिंगटोन जुन्या कीपॅडवाल्या एमटीएनएल फोन ची रिंग, पण बीप मधला स्पेस ९ सेकंदाचा कस्टमाइझ ( फोनची कंटिन्यू रिंग / कमी शांत स्पेस असलेली रिंग इरिटेट करते फार म्हणून), फुल्ल रिंग दिली तरी फक्त तीनदाच बीप वाजणार.
पंचायत टायटल ट्रॅक.
पंचायत टायटल ट्रॅक.
ला ला लँड टायटल ट्रॅक (another day of sun).
WhatsApp आणि फोन साठी दोन वेगळ्या रिंगटोन ठेवते.
टिंग टिंग टिंग टिंग
टिंग टिंग टिंग टिंग
टिरडिंग टिरडिंग टिरडिंग टिरडिंग
टिंगडींगडिंगडिंगडिंग डिंग डिंग डींग
डींग डींग डींग डींग
टिरिट्री डिरिट्री टिरिट्री डिरिट्री टिरिट्री डिरिट्री ट्यांव
ड्यांव ड्यांव
आधी शाओमीची default ringtone
आधी शाओमीची default ringtone होती.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याची बातमी आली त्या दिवसापासून 'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी' ही ringtone आहे.
पंचायत टायटल ट्रॅक >>> माझी
पंचायत टायटल ट्रॅक >>> माझी पण .
आता downtown abbey ची शोधते
Pages