Submitted by डॉ. रोहिणी चंद्... on 17 November, 2024 - 10:21
ती क्षणा क्षणाला झुरते, ती कणा कणाने मरते
ती तिच्याच नजरे मधुनी जग अनोळखी हे बघते
मन पटलावरती जे जे लिहिलेले होते सगळे
का कागद दिसतो कोरा ती विसरत आहे सगळे
गर्दीत एकटी असते वाटेत असे एकाकी
या मनास भासे आता घर अंगण दारे परकी
डोळ्यात साठल्या गहिऱ्या विझलेल्या जीवन ज्योती
गुंतला जीव ना कोठे ना कसली नाती गोती
वाटेत विखरुनी गेली पिकलेली पिवळी पाने
फांदीस धुमारे आता ना फुटती नव्या दमाने
का अनोळखी रस्त्याने पाउले चुकीने पडती?
थकल्या शिणल्या गात्रांना पैलाची गाणी स्मरती
ना वाटे आता काही जग तिच्याच पुरते सुन्न
रिझवे न मनाला काही मन शांत तरीही खिन्न
या क्षणोक्षणी झुरताना ती खिन्न मनाने हसते
ती किंचित अजुनी मरते मरणाला पुरून उरते
-डॉ. रोहिणी चंद्रात्रे वाघमारे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आवडली.
आवडली.
>>>>ती किंचित अजुनी मरते मरणाला पुरून उरते
आई ग्ग!!
सामो. धन्यवाद.
सामो. धन्यवाद.
ही कविता अल्झायमर विकार झालेल्या व्यक्तीचे वर्णन करणारी आहे. आता त्या अनुषंगाने वाचून सांग कशी वाटते.
आई ग्ग!!! किती समर्पक वर्णन
आई ग्ग!!! किती समर्पक वर्णन आहे रोहीणी. फार फार हृदयस्पर्शी
हृदयस्पर्शी कविता
हृदयस्पर्शी कविता
ही कविता अल्झायमर विकार
ही कविता अल्झायमर विकार झालेल्या व्यक्तीचे वर्णन करणारी आहे.
>>>
या संदर्भाने वाचल्यावर अजून भिडली..
खूप छान!!
खूप छान!!
आवर्जून दिलेले प्रतिसाद बघून
आवर्जून दिलेले प्रतिसाद बघून खूप हुरूप आला लिहिण्यास.
सगळ्यांचे आभार.
आवडलीच !
आवडलीच !
Yeh कुमार सरांना आवडली म्हणजे
Yeh कुमार सरांना आवडली म्हणजे अल्झायमर चे वर्णन जमले आहे. धन्यवाद सर. आता पुढील कविता स्किझोफ्रेनिया वर लिहिलेली आहे लवकरच पोस्ट करते नक्की वाचा आणि सांगा.
>>>>पुढील कविता
>>>>पुढील कविता स्किझोफ्रेनिया वर लिहिलेली आहे लवकरच पोस्ट करते
कराच. उत्सुकता आहे.