Submitted by ऋन्मेऽऽष on 25 November, 2024 - 10:32
लिलाव शेवटच्या टप्प्यात आहे. कोणत्या संघात कोण हे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे चर्चा सुरू करायला हरकत नाही. होऊन जाऊ द्या.. कोरबो लोरबो जिताबो रे.. दुनिया हिला देंगे हम.. व्हिसल पोडू
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दोन धमाके
दोन धमाके
१) आयपीएल इतिहासातील सर्वाधिक महागडा खेळाडू -
२७ करोड - ऋषभ पंत
२) आयपीएल इतिहासातील सर्वात लहान खेळाडू -
१३ वर्षे फक्त - वैभव सूर्यवंशी (१.१ करोड)
अर्जुन तेंडुलकर अनसोल्ड. बरं
अर्जुन तेंडुलकर अनसोल्ड. बरं झालं पनौती गेली. ती आल्यापासून मुंबईची वाट लागली होती.
आली परत.
आली परत.
@ असामी,
@ असामी,
ऋषभ पंत २७ करोड कसे जास्त नाहीत याचे उत्तर इथे देतो.
१) त्याचे २०-२० इंटरनॅशनल आकडे चांगले का नसेना पण त्याचे आयपीएल आकडे दुसऱ्या कुठल्याही भारतीय विकेट किपर पेक्षा भारी आहेत.
ऋषभ पंत - ३५ सरासरी १४८ स्ट्राईक रेट
संजू - ३० सरासरी १३८ स्ट्राईक रेट
ईशान - २८ सरासरी १३५ स्ट्राईक रेट
जर हा लिलाव आयपीएल साठी चालू आहे तर याच स्पर्धेतील आकड्याना प्राधान्य देणे योग्य नाही का.. कारण फॉरमॅट सेम असला तरी संघ बदलला की भूमिका बदलते, मेंटॅलिटी बदलते, परिणामी खेळावर परिणाम होतो.
२) ट्वेंटी-ट्वेंटी इंटरनॅशनल वर्ल्ड कपला भारताने देखील त्यालाच खेळवले हे विसरता कामा नये. ते देखील फक्त आयपीएलचा परफॉर्मन्स बघून. एकही इंटरनॅशनल मॅच न खेळता तो थेट वर्ल्डकपला गेला. जर भारतीय निवड समिती त्याच्या आयपीएल परफॉर्मन्सवर विश्वास ठेवते तर आयपीएलवाले स्वतः का नाही ठेवणार![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
३) अपघातातून परत आल्यावर त्याने टेस्टमध्ये जे आतापर्यंत केले त्यावरून हे लक्षात येते की अपघाताने त्याचा खेळ घसरला नाही तर उलट उंचावला आहे.
४) त्याची विकेटकीपिंग जबरदस्त आहे. जेव्हा त्याच्यासोबत इतर विकेटकीपर भारतीय संघात खेळत असतात तेव्हा विकेट कीपिंगची जबाबदारी त्याच्यावरच सोपवण्यात येते.
५) वरील सर्व मुद्दे एकीकडे आणि हा शेवटचा मुद्दा एकीकडे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ऋषभ पंत आपल्यासोबत एक ब्रँड व्हॅल्यू घेऊन येतो. या लिलावात जितके प्लेयर उतरले होते, त्यात त्याच्यापेक्षा मोठी ब्रँड व्हॅल्यू कुणाचीच नव्हती. आयपीएल हा एक बिझनेस आहे. जिंकतो एखादाच संघ, पण कमावतात सारेच. ते या खेळाडूंची ब्रँड व्हॅल्यूच कॅश करतात.
स्पेशली इतक्या मोठ्या अपघातातून मृत्यूच्या दाढेतून तो परत आला आणि आता असे जलवे दाखवत आहे याने त्याची ब्रँड व्हॅल्यू कमालीची वाढली आहे. म्हणून ज्याना अश्या एखाद्या खेळाडूची, अश्या एका नावाची गरज होती ते त्याच्यापाठी गेले
माझी पोस्ट काय होती नि वरचे
"पंत वर लावलेली विक्रमी बोली मला तरी धाडसी वाटते. त्याचे टी २० चे आकडे संख्या बघितली तर फारसे इंप्रेसीव्ह नाहित. घोडामैदान जवळच आहे. काय होते ते. " आयपील मधे आयपीलमधले आकडे विशेषतः इंटरनॅशनल प्लेयर चे जो इतकी वर्षे खेळला आहे ते न बघता आयपील चे आकडे (तेही अजिबात असामान्य नाहि आहेत. पंतचा प्लेयर म्हणून इंपॅक्ट आयपील मधे प्रचंड झालाय असेही नाही. माझ्या आठवणीप्रमाणे एक सीझन वगळता दिल्ली प्ले ऑफ मधेही गेलेली नाहीये . ). कॅप्टन म्हणूनही अय्यर नव्हता तेंव्हा पाँटींग ने त्याला बॅक केले होते. "ट्वेंटी-ट्वेंटी इंटरनॅशनल वर्ल्ड कपला भारताने देखील त्यालाच खेळवले हे विसरता कामा नये." हे लिहिल्यावर भारताने कप जिंकण्यामधे पंतच्या किती इनिंग्स चा वाटा होता हे बघतोस ? पंत वन ऑफ अ काईंड एक्स्पेशनल टेस्ट मधे खेळतो नि खेळलय. लिमिटेड ओव्हर्स मधे चुकार इनिंग्स आहेत. जबरदस्त विकेटकीपिंग ह्या आयपील मधे मुद्दा कधीच नसतो, अॅव्हरेज किपिंग असेल नि बॅटींग एक्सपशनल असेल तर तेव्हढे पुरते तेंव्हा त्या मुद्द्यात अर्थ नाही.
राहता रहिला ब्रँडींग चा भाग तर एक मेन सेंटर म्हणून आयपील मधल्या दहा फ्रँचाईजीमधे ते शेवटून पहिले दुसरे आहे. दोन वर्षापूर्वी त्याची फस्ट ग्रोथ झाली होती नि मग स्टॅगनंत झाले. लखनौ हे मुंबई. दिल्ली, चेन्नई, हैद्राबादसारखे मोठे शहर नाही कि एका लिमिट बाहेर एक्स्पांशन करता येईल. त्यांच्या आधीच्या मॅचेस बघितल्या तर हे लक्षात आले असते कि इतर संघांनाही तिथे बरेच बॅकिंग मिळते. त्यामूळे ब्रँड व्हल्यू म्हणून एव्हढा मोठा पंट केलाय हे प्रचंड धाडसी वाटते.
त्यामूळे ब्रँड व्हल्यू म्हणून
त्यामूळे ब्रँड व्हल्यू म्हणून एव्हढा मोठा पंट केलाय हे प्रचंड धाडसी वाटते.
>>>>
कारण तुम्ही पंतची खेळाडू म्हणून उपयुक्तता किती यातच अडकला आहात. त्यामुळे बिझनेस दृष्टीकोनातून विचार करू शकत नाहीत.
काही उदाहरण देतो.
कोहलीने आजवर बेंगलोर ला एकही टायटल जिंकवून दिले नाही. पण त्याला बेंगलोर कधी सोडेल का? बिलकुल नाही. कारण
मुंबई अर्जुन तेंडुलकर याला आपल्या संघात का घेते? कारण त्या सोबत सचिन येतो. आणि सचिन त्यांच्यासाठी काय करतो, तर ब्रँड व्हॅल्यू देतो. त्याच्याकडे बघून लोकं मुंबईला सपोर्ट करतात.
धोनी.. द ग्रेट थाला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
त्याला वय झाले असूनही खेळवले का जाते? उत्तर सर्वाँना माहीत आहेच
आयपीएल ऑक्शनमध्ये ब्रॅण्ड
आयपीएल ऑक्शनमध्ये ब्रॅण्ड व्हॅल्यू महत्त्वाची असते हे मान्य करूनही, एखाद्या खेळाडूबाबत त्या ब्रँड व्हॅल्यूला अवाजवी व्हॅल्यू दिली गेली आहे का, हा विचार मनात येऊ शकतो व त्यावर चर्चा होणंही रास्त ठरतं. पटतं ?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
आता , कसोटी संघातल्या जागेसाठी आयपीएल खेळाडूंसाठी ऑक्शन ठेवायचं: आपोआप कळेलच ना, तिथे खेळण्याला ते खरंच किती "व्हॅल्यू" देतात ते !!![20190124_233403_2.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u13291/20190124_233403_2.jpg)
ऑक्शन मध्ये खेळाडूला त्याच्या
ऑक्शन मध्ये खेळाडूला त्याच्या क्षमते प्रमाणेच भाव मिळतो असेच नाही. बऱ्याच वेळा औक्शनची वेळ, म्हणजे लिस्ट मध्ये तो खेळाडू कितवा आहे यावरूनही भाव ठरतो. पंत दुसऱ्या दिवशी औक्शनला आला असता तर कदाचित एव्हढे पैसे मिळलेही नसते. समोरच्या संघाला किती गरज हेही महत्त्वाचे आहे.
एखाद्या खेळाडूबाबत त्या ब्रँड
एखाद्या खेळाडूबाबत त्या ब्रँड व्हॅल्यूला अवाजवी व्हॅल्यू दिली गेली आहे का?
पंत दुसऱ्या दिवशी औक्शनला आला असता तर कदाचित एव्हढे पैसे मिळलेही नसते. समोरच्या संघाला किती गरज हेही महत्त्वाचे आहे.
>>>
हो, बरोबर आहेत दोन्ही मुद्दे.
म्हणून तर सध्या कुठल्याच फॉरमॅटमध्ये भारतीय संघात नसलेल्या अय्यरला देखील २६.७५ करोड मिळाले.
त्याचा केवळ आयपीएल परफॉर्मन्स आणि आयपीएल कप्तानी बघितली गेली.
पंतबाबत लखनौ मालकाने म्हटले की आम्ही पंतसाठी २६ करोड बजेट डोक्यात ठेवून त्यानुसार calculation केले होते. एखाद करोड जास्त गेले.
कारण फॉरमॅट सेम असला तरी संघ
कारण फॉरमॅट सेम असला तरी संघ बदलला की भूमिका बदलते, मेंटॅलिटी बदलते, परिणामी खेळावर परिणाम होतो.
>>
जर काही कारणामुळे पंत चा 2025 आयपीएल परफॉर्मन्स त्याच्या आधीच्या परफॉर्मन्स पेक्षा खराब झाला तर मी तेंव्हाच म्हणालो होतो कॅटेगरी मधल्या स्टेटमेंट ची पेरणी झाली आहे...
रच्याकने,
रच्याकने,
पंत ला 27 करोड त्याच गोएंका नी दिले आहेत ज्यानी राहुल ला भर मैदानात झापला होता. एका सीझनाच्या खराब कामगिरी नंतर ज्यानी धोनी कडून कर्णधारपद काढून घेतलं होतं (आणि पुढच्याच वर्षी संघ फायनल खेळाला होता, अन् केवळ 1 रन नी हरला होता).
हे सर्व होताना तू याच गोएंका ला दूषणं देत होतास.
इतके पैसे मोजल्यावर तो पंत कडून काय काय अपेक्षा ठेवेल त्याची कल्पना कर...
>>एखाद करोड जास्त गेले.
>>एखाद करोड जास्त गेले.
श्या... असे म्हणतायत कि एखाद रुपया जास्त गेला. इकडे मी मेलो तरच घरच्यांना एक करोड इन्शुरन्स वाले देतील. ते पण बहुतेक टॅक्स कापून.
पंत ला 27 करोड त्याच गोएंका
पंत ला 27 करोड त्याच गोएंका नी दिले आहेत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>>>>
हो याचेच वाईट वाटते आहे..
त्या नालायक माणसाच्या संघात जायला नको होता.
पण एकदा लिलावात उतरल्यावर आता हे त्याच्या हातात नव्हते.
असो,
आता अशीच इच्छा आहे की पंत चमकावा, त्याच्या फटकेबाजीचा आणि खेळीचा आनंद लुटता यावा पण त्या गोयंकाची टीम जिंकू नये
हे लिहिल्यावर भारताने कप
हे लिहिल्यावर भारताने कप जिंकण्यामधे पंतच्या किती इनिंग्स चा वाटा होता हे बघतोस?
>>>>>
त्याने या वर्ल्डकपला यष्टीपाठी १३ की १४ बळी घेत विश्वविक्रम केला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
या आधीचा विश्वविक्रम गिलख्रिस्ट आणि अजून कोणाच्या तरी नावे ९ बळींचा होता. फरक बघा... पुढची शंभर वर्षे तरी हा विक्रम काही तुटत नाही
आणि भारतासाठी मानाचा असलेला पाकिस्तानचा सामना विसरू नका. लो स्कोरिंग सामन्यात पंत टॉप स्कोअरर असतो या लौकिकाला तो जागला होता. आणि आपला पाकिस्तानसोबतचा विक्रम कायम ठेवला होता.
त्याने या वर्ल्डकपला
त्याने या वर्ल्डकपला यष्टीपाठी १३ की १४ बळी घेत विश्वविक्रम केला. >> हे रन्स बॅटींग करतानाचे आहेत का ? तुला लखनौने पंतला किपिंग साठी घेतला असेल असे वाटत असेल तर बोलणेच खुंटले. एका सामन्याचे उदाहरण देऊन तू माझ्याच बोलण्याला पुष्टी देतो आहेस . माझे जाऊ दे आयसीसी ने त्या वर्ल्ड कप नंतर जो संघ निवडला त्यात पंत नव्हता तर गुरबाझ होता. किमानडिसेंट किपिंग करता येणे एव्हढीच माफक अपेक्षा असते कीपरबद्दल टी २० मधे. मुख्य फोकस बॅटींगवर असतो.
त्यामुळे बिझनेस दृष्टीकोनातून विचार करू शकत नाहीत. >> माझ्या पोस्ट मधला शेवटचा पॅरा परत एकदा वाच. इंग्लिश चे वावडे आहे असे तू जिथे तिथे गर्वाने लिहित असतो म्हणून बिझनेस स्टँडर्ड मधे आयपील इकॉनॉमी वर लिहून आलेले लेख नि क्रिकोनॉमिक्स जबरदस्त सुंदर असे पुस्तक वाच असे सांगितले असते. सोशल इडीयावरच्या कचर्यापेक्षा इकॉनॉमिस्ट काय लिहितात ते वाचले तर उत्तम असे मला वाटते ( तुला हे पटेल असे मला अजिबात वाटत नाही. )
आता , कसोटी संघातल्या जागेसाठी आयपीएल खेळाडूंसाठी ऑक्शन ठेवायचं: आपोआप कळेलच ना, तिथे खेळण्याला ते खरंच किती "व्हॅल्यू" देतात ते !! >> विनोद म्हणून पण असे नका बोलू भाऊ. आधीच बाकीच्या डोमेस्टीक ची व्हॅल्यू घसरवून ठेवली आहे![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
हे रन्स बॅटींग करतानाचे आहेत
हे रन्स बॅटींग करतानाचे आहेत का?
>>>>
तुम्ही पंत चे वर्ल्ड कप मधील योगदान विचारले ते मी सांगितले की त्याने एक विश्व विक्रम केला.
मुळात माझा मुद्दा होता की भारतीय निवड समितीने सुद्धा इतर सगळ्या विकेटकीपरना मागे सारून थेट दीड वर्षांनी आलेल्या पंतला एकही सामना न खेळता वर्ल्ड कप ला नेले. इथेच कळते तो केवढा महत्त्वाचा प्लेयर आहे. मान्य आहे की नाही?
तुला लखनौने पंतला किपिंग साठी घेतला असेल असे वाटत असेल तर बोलणेच खुंटले.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>>>
पुन्हा सांगतो,
संजू, ईशान, राहुल वगैरे इतर कुठल्याही भारतीय विकेटकीपर पेक्षा त्याचे आयपीएल मधील आकडे भारी आहेत.
आणि त्याची ब्रँड व्हॅल्यू सुद्धा यंदा लिलावात उतरलेल्या एकूण एक खेळाडूपेक्षा भारी होती.
हे पुरेसे वाटत नसेल तर खरेच बोलणे खुंटले
बिझनेस स्टँडर्ड मधे आयपील
बिझनेस स्टँडर्ड मधे आयपील इकॉनॉमी वर लिहून आलेले लेख नि क्रिकोनॉमिक्स .....
>>>>>
चला माझे सोडा,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुम्हाला असे वाटते का की तो बिजनेसमन गोयंका आणि जी टीम तो तिथे घेऊन बसला होता ते सारे बावळट आणि चणे फुटाणे विकणारे होते आणि त्यांना यातले काही कळत नाही
बरे पंतला सत्तावीस करोड द्यायचा निर्णय काही लिलावाच्या गर्मीत नाही झाला तर २०.७५ वरून त्यांनी विचार करून २७ हा आकडा दिला. ते लोकं आधीच आपले कॅल्क्युलेशन करून आले होते आणि त्यांना पक्के ठाऊक होते ते काय करत आहेत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुम्ही पंत चे वर्ल्ड कप मधील
तुम्ही पंत चे वर्ल्ड कप मधील योगदान विचारले >> सिलेक्टीव्ह वाचून उत्तर देऊ नकोस. माझे पोइस्ट हे " "ट्वेंटी-ट्वेंटी इंटरनॅशनल वर्ल्ड कपला भारताने देखील त्यालाच खेळवले हे विसरता कामा नये." हे लिहिल्यावर भारताने कप जिंकण्यामधे पंतच्या किती इनिंग्स चा वाटा होता हे बघतोस ? " किपिंगच्या इनिंग्स नसून बॅटींग च्या बघतात हे क्रिकेट खेळणारा शेबडा पोरगा ही सांगू शकेल. तू परत माझाचा पंतच्या बॅटींग बद्दलचा मुद्दा सिद्ध करतो आहेस.
तुम्हाला असे वाटते का की तो बिजनेसमन गोयंका आणि जी टीम तो तिथे घेऊन बसला होता ते सारे बावळट आणि चणे फुटाणे विकणारे होते आणि त्यांना यातले काही कळत नाही >> त्यांचे माहित नाही पण तुला किती कळते ह्याबद्दल नक्कीच शंका आहे. मूळ पोस्ट काय होते ? उत्तर काय ? बॅटींगच्या जस्टीफिकेशनला किपिंग चे आकडे देऊन तोच मुद्दा आहे सांगत राहणे. इंटरनॅशनल प्लेयर चे आअयपील चे आकडे बघून त्याला सिलेक्ट केले आहे म्हणायचे नि परत तोच प्लेयर वर्ल्ड कपला का नेला हे सांगायचे - नेहमीचाच सारवासारव. खरच कंटाळा येत नाही का रे तुला ह्याचा ?
हे भाऊंनी लिहिलेले आहे ते हजार वेळा टाईप कर कदाचित समजेल - "आयपीएल ऑक्शनमध्ये ब्रॅण्ड व्हॅल्यू महत्त्वाची असते हे मान्य करूनही, एखाद्या खेळाडूबाबत त्या ब्रँड व्हॅल्यूला अवाजवी व्हॅल्यू दिली गेली आहे का" ह्यातल्या व्हॅल्यू च्या आधीच्या विशेषणाचा अर्थ समजत असेल अशी अपेक्षा धरायची का ?
तुम्हाला असे वाटते का की तो
तुम्हाला असे वाटते का की तो बिजनेसमन गोयंका आणि जी टीम तो तिथे घेऊन बसला होता ते सारे बावळट आणि चणे फुटाणे विकणारे होते आणि त्यांना यातले काही कळत नाही >> त्यांचे माहित नाही पण तुला किती कळते ह्याबद्दल नक्कीच शंका आहे.
>>>>
कमाल आहे!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
त्यांचे का माहीत नाही?
ज्यांनी खुद्द हा निर्णय घेतला आहे आणि विचारपूर्वक घेतला त्यांच्या हुशारीवर शंका नाही पण जे त्या निर्णयाचे समर्थन करत आहेत त्यांच्यावर शंका
सगळं सोडा, या दोन गोष्टी
सगळं सोडा, या दोन गोष्टी मान्य आहेत की नाही हे फक्त सांगा
१) लिलावात उतरलेल्या संजू, ईशान, राहुल वगैरे इतर कुठल्याही भारतीय विकेटकीपर पेक्षा त्याचे आयपीएल मधील आकडे भारी आहेत.
२) त्याची ब्रँड व्हॅल्यू लिलावात उतरलेल्या एकूण एक खेळाडूपेक्षा भारी होती.
या नुसार लिलावात सर्वाधिक रक्कम पंत ने मिळवणे यात काही आश्चर्य नाही हे आधी मान्य करूया.
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मग नंतर तरीही २७ करोड द्यायला हवे होते का? ही रक्कम अवाजवी आहे का? हे वाद न घालता थांबून जाऊया. पण वरचे मान्य करायला दोघानाही हरकत नसावी. कारण लिलाव आधी पासूनच पंत सर्वाधिक बोली घेणार हा जाणकारांचा अंदाज होताच. त्यामुळे त्यावर आपले सुद्धा एकमत होऊन जाऊ दे
राजस्थाननेचे यावेळी रिटेंशन
राजस्थानचे यावेळी रिटेंशन अनाकलनीय होते त्यामुळे त्यांची auction मध्ये तारांबळ झाली!!
राजस्थानच्या गेल्या तीन वर्षातील परफॉर्मन्स बघता जी नावे आवर्जून समोर येतात ती बटलर, चहल, संजू, आणि बोल्ट!! बाकी लोक अधूनमधून चमकत होते पण सातत्याने मिडटेबल अडखळत असलेल्या राजस्थानला प्लेऑफचे दावेदार बनवण्यात या चौघांचा वाटा मोठा होता. त्यातल्या तिघांना रिलीज करण्यामागचे लॉजिक कळले नाही.... बर काही वाजले असेल म्हणावे तर या तिघांच्याही मागे जायचा व्यर्थ का होईना प्रयत्न केला राजस्थानने auction मध्ये!! एक शक्यता म्हणजे त्यांनाच जर auction मध्ये उतरुन स्वताची मार्केट व्हॅल्यू टेस्ट करायची असेल तर काय माहित!!
पण रिप्लेसमेंट काही जमल्या नाहीत म्हणजे कागदावर तरी त्या तोडीच्या नाहियेत.... बॅकअप तगडा नाहिये!!
बॅटींग तरीही ठीक आहे पण आवेश, बोल्ट, संदीप शर्मा, चहल, अश्विन आणि बर्गर हा खरेच तगडा बॉलिंग ॲटेक होता मागच्या वेळेस त्या तुलनेत आताची बॉलिंग अगदीच साधारण वाटतेय!!
राजस्थानचा फॅन म्हणून आता परत एकदा राजस्थानला मिड टेबल बघायची तयारी केलेली आहे..... प्लेऑफला वगैरे गेले तर तो सुखद धक्का असेल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
यंदा द्रविड असूनही राजस्थान
यंदा द्रविड असूनही राजस्थान चा ऑक्शन कूछ जम्या नही टाईप होता. संजू वर अतिरेकी लोड येणार असं वाटतं आहे आत्ता तरी.
असाच RCB चा ही अप्रोच थोडा गांडल्या गत वाटतो आहे. एक कोहली अन् बाकी इतर असं दिसतं आहे.
२०२५ आयपीएल सुरु होते आणि
२०२५ आयपीएल सुरु होते आणि चुम्मा पहिल्या दोन तीन मॅचेस एकहाती जिंकवून देतो. गोयंकच्या आनंदाला पारावार उरत नाही. अगदी स्वप्नवत असल्यासारखं सुरु असतं आणि अचानक कोणाचीतरी नजर लागते. टीम लागोपाठ सामने हरायला लागते. गोयंका लालभडक होऊन सगळे सामने पाहत असतो. शेवटी तो दिवस येतो. राहुलच्या टिमविरुद्ध खेळताना राहुल शतक मारतो आणि पंत शून्यावर बाद होतो. शेवटी सामना संपल्यावर राहुल मैदानावरूनच गोयंकने केलेले हातवारे त्याला करून दाखवतो आणि गोयंकच्या सहनशक्तीचा कडेलोट होतो आणि मग......
![Untitled.png](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u68879/Untitled.png)
ज्यांनी खुद्द हा निर्णय घेतला
ज्यांनी खुद्द हा निर्णय घेतला आहे आणि विचारपूर्वक घेतला त्यांच्या हुशारीवर शंका नाही पण जे त्या निर्णयाचे समर्थन करत आहेत त्यांच्यावर शंका >> तुझ्यासारखी माझी गोएंका वगैरेशी ओळख नसल्यामूळे ते कसा विचार करतात ह्याबद्दल मला कल्पना नाही. ह्यात अश्चर्य वाटण्यासारखे काय आहे नक्की ? तूझ्या समर्थानाला आक्षेप आहे कारण तू समर्थनार्थ मांडलेले बहुतांशी मुद्दे मुळ प्रश्नाशी फारकत घेणारे आहेत. कूठले ते वर लिहिलेले आहेत. ब्रँड व्हॅल्यू हा एकमेव मुद्दा दम असलेला होता त्याबद्दल मी मला जे वाटले ते आधीच लिहिलेले आहे.
मग नंतर तरीही २७ करोड द्यायला हवे होते का? ही रक्कम अवाजवी आहे का? हे वाद न घालता थांबून जाऊया. पण वरचे मान्य करायला दोघानाही हरकत नसावी. >> परत तू टारगेट सरकवले आहेस. माझे मूळ पोस्ट फक्त ती रक्कम एव्हढी अधिक का आहे ह्याबद्दल आश्चर्य व्यक्त करणारी होती. (परत भाऊंची पोस्ट बघ) त्याला सर्वात अधिक मिळायला हवे होते का ह्याबद्दल त्यात शब्दही नव्हता. मुद्दा समजून घेऊन त्यावरच राहणे फारसे कठीण नसते. प्रयत्न करून बघ.
लोक अधूनमधून चमकत होते पण
लोक अधूनमधून चमकत होते पण सातत्याने मिडटेबल अडखळत असलेल्या राजस्थानला प्लेऑफचे दावेदार बनवण्यात या चौघांचा वाटा मोठा होता. त्यातल्या तिघांना रिलीज करण्यामागचे लॉजिक कळले नाही >> ऑप्शन काय होता रे ? सगळॅ रीटेन करायचे तर मग पर्स कमी होऊन जाते एकदम ऑक्शन्साठी. त्यातल्या त्यात बॅलॅन्स करायचा प्रयत्न केलाय त्यांनी. संगा नि द्रविड जनरली कोणालाही घेऊन चांगली टीम बिल्ड करू शकतात असे मला वाटते . ह्या वर्षी नसले तरी पुढच्या वर्षी तरी नक्की मस्त संघ तयार होईल.
बोकलत
बोकलत![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
राजस्थानने फेरबदल केले ते
राजस्थानने फेरबदल केले ते कदाचित त्यांना विनिंग कॉम्बिनेशन बनवायचे असावे. नुसते प्ले ऑफ जाण्यात समाधान मानायचे नसावे.
२००८ साली पहिलाच सीजन जिंकले होते.
त्यांनतर २०२२ साली उपविजेता.
इतकेच
"पण रिप्लेसमेंट काही जमल्या
"पण रिप्लेसमेंट काही जमल्या नाहीत म्हणजे कागदावर तरी त्या तोडीच्या नाहियेत" - मला राजस्थानच्या जमेच्या वाटलेल्या बाजू: पूर्वीचा बॉलिंग अॅटॅक ताकदवान होता, पण फ्लेक्सिबल नव्हता. उदा. बोल्ट पॉवरप्ले मधे जितका प्रभावी होता, तितकाच त्याला डेथ ओव्हर्स मधे लपवायला लागायचं. अश्विन ची विकेट-टेकिंग अॅबिलिटी गेल्या सीझनला कमी झाल्यासारखी वाटली (यंदा सीएसके कडून तो हिआय्येस्ट विकेट टेकर असला तर आश्चर्य वाटायला नको.
). त्यातल्या त्यात चहल आणि संदिप कुठेही बॉलिंग करू शकणारे बॉलर्स होते. पण ह्या चौघांना खेळवलं की बॅटिंग लिमिटेड व्हायची.
पण आर्चर, हसरंगा, थीक्षना, देशपांडे, मधवाल, फारूखी हे कुठल्याही टप्प्यावर (स्टेजला) बॉलिंग करू शकतात. आर्चर आणि हसरंगा बॅटिंग डेप्थ पण देतात. बॅटिंग मधे हेटमायर वगळता फॉरिन प्लेयर्सचे ऑप्शन्स नाहीत, पण नितीश राणा मुळे मिडल ऑर्डर जरा भक्कम वाटतीय (एक पार्ट-टाईम बॉलिंग ऑप्शनपण अॅड होतो).
"संगा नि द्रविड जनरली
"संगा नि द्रविड जनरली कोणालाही घेऊन चांगली टीम बिल्ड करू शकतात असे मला वाटते . ह्या वर्षी नसले तरी पुढच्या वर्षी तरी नक्की मस्त संघ तयार होईल." - +१ मलाही हा लाँग प्ले वाटतोय.
उदा. बोल्ट पॉवरप्ले मधे जितका
उदा. बोल्ट पॉवरप्ले मधे जितका प्रभावी होता, तितकाच त्याला डेथ ओव्हर्स मधे लपवायला लागायचं. >> नि मुंबईने नेमके डेथ ओव्हर्स साठी त्याला घेतलय. आपण सगळॅ अल्टरनेट युनिव्हर्स मधे राहतो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
असाच RCB चा ही अप्रोच थोडा गांडल्या गत वाटतो आहे. एक कोहली अन् बाकी इतर असं दिसतं आहे. >> अँकी मला उलट पहिल्यांदाच त्यांनी कोहली वरची डीपेंड्न्सी कमी केली असे वाटले. सॉल्ट, पतिदार, पांड्या नि लिव्हिंग्स्टोन हे हुकुमी एक्के नसले तरी कंसिस्टंट आहेत (किमान गेल्या वर्षी होते). बॉलिंग मधे भुवी. हेझलवूड , दयाल्/थुसारा हे चांगले काँबो आहे. प्रश्न स्पिनचा येणार आहे. कॅप्टन कोण असेल ?
Pages