सापडली, सापडली! बर्याच दिवसांत ऑफिसचे कामकाज दाखवणारी एखादी मराठी सिरीयल सापडली नव्हती. घरगुती नाट्यातील बिनडोकपणा जो काय चालतो तो सगळेच करतात. पण जेव्हा कथानके ऑफिसमधे शिरतात तेव्हा खरी मजा येते. कारण तेथे जे दाखवायचे आहे त्याबद्दल अगदी बेसिक माहिती सुद्धा न घेता आपण मोठा थ्रिलर दाखवत आहोत अशा आविर्भावात सादर केलेले सीन्स. वरकरणी ऑफिसबद्दल वाटणार्या पण आगापीछा नसलेल्या बिझिनेस टर्म्स. "चांगल्या होणार्या" मिटिंग्ज. मोघम रीतीने उल्लेख केलेली "डील्स".
नाव शुभविवाह असले, तरी सध्या यात याची रेलचेल दिसते.
मला यातील कथानकाची पार्श्वभूमी माहीत नाही. एकदम साधारण ४७५व्या एपिसोडपासून बघत आहे. यातले सीन्स येताजाता आधी दिसले होते पण नक्की काय चालले आहे ते लक्ष देऊन पाहिले नाही. आणि तेव्हा बहुतांश घरगुती ड्रामाच वाटत होता.
३-४ एपिसोड्स मधे मला माहीत झालेले लोक
भूमी - ही सेण्ट्रल कॅरेक्टर दिसते. आशा काळे ते नीलकांती पाटेकर ("आत्मविश्वास" चित्रपटातील) याचे मिश्रण असणार्या व दोन तीन ऑलटाइम कारस्थानी स्त्रिया सोडून बाकी सर्वांना ज्यांचे सतत कौतुक असते अशा लीड्स बहुतांश सिरीज मधे असतात. ही तशीच वाटते.
आकाश - तिचा नवरा. हे सांगायची गरज नाही. नावावरूनच कळते.
रागिणी (आत्या) - ही सध्यातरी व्हिलन दिसते. हीच ती डेडली आत्या. सगळे घर हिच्या ताब्यात असताना, आणि त्यांच्या बिझिनेस मधेही तिला बराच रोल ऑलरेडी असताना काहीतरी कारणामुळे तिला व्हिलनगिरी करायची आहे. क्षणात ही किचन पॉलिटिक्स करते, तर क्षणात लोकांचे खूनबिन पाडते. हिचा नवरा सध्या पोलिस लॉक अप मधे आहे. तिला त्याची काही फिकीर दिसत नाही.
आई - घरातील सर्वात सिनीयर स्त्री. ही नॉर्मल आहे असे वाटते. कारस्थानी वगैरे नाही.
सून क्र १ - ही चेहर्यावरून कारस्थानी वाटत नाही. भूमीची बहिण असावी. तिला सपोर्ट करते. म्हणजे लिटरली तिच्या संवादांवर माना डोलावते.
सून क्र २ - ही जरा ग्रे एरियामधली आहे. रागिणीची मुलगी असावी नक्की काय करते कळत नाही. पण ४-५ एपिसोड्स मधे फक्त स्वगत म्हणताना दाखवली आहे.
एक तरूण मुलगी - वेधू का काहीतरी नाव आहे. ही कितपत रिकरिंग कॅरेक्टर आहे माहीत नाही. बहुधा आकाशच्या मागे होती/आहे. तिच्या वयानुसार मोबाईल, बाहेर मित्रमंडळींबरोबर हँग आउट करणे वगैरे सोडून असल्या नाट्यात तिला भलताच इंटरेस्ट दिसतो.
काही निर्जिव गोष्टी. यांचा उल्लेख अशासाठी की नाट्यपूर्ण प्रसंगात यांचा रोल असतो.
कारंजे - यांच्या घराच्या समोर दोन्ही बाजूच्या पायर्यांच्या मधे आहे. पण ते चालू केले की पायर्यांवरचा माणूस पूर्ण भिजतो.
किल्ल्या - प्राचीन काळच्या पिक्चर्स मधे असत तसा १०-१२ दणकट किल्ल्यांचा एक जुडगा आहे. तो रागिणीच्या कमरेला असतो. घराचा ताबा तिच्याकडे असतो म्हणून. सध्याच्या जमान्यात कोणाला अशा किल्ल्या लागतात कल्पना नाही.
पाहायला सुरूवात केल्यावर लौकरच "नवर्याला जेवायला घालण्यात जे सुख आहे ते इतर कशात नाही" असा संवाद ऐकल्यावर सिरीज खूप आधुनिक आहे याची खात्री झाली. तेच मोठे घर (आणि तरीही दारासमोर जेवायला बसणारे लोक), तेच भारदस्त आडनाव व त्याचा वारसा वगैरे - इथे "महाजन". कामाला जाणारे नवरे, सतत किचन मधे वावरणार्या व किचन पॉलिटिक्स करणार्या बायका, व्हॉट्सअॅप अंकल्स व काकूंना आवडेल असे कौटुंबिक चित्र उभे करणारे आणि दोन तीन पिढ्या आधीच्या परिस्थितीचे ग्लोरिफिकेशन करणारे सीन्स. लग्न झाले तरी बेडरूम मधे फक्त नवर्याचा मोठा फोटो. एकूण सरंजामी मामला.
सर्व चेकमार्क्स चेक्ड.
कोणी पाहात असाल तर लिहा. मी लिहीन जमेल तसे. अमेरिकेत हुलू वर आहे. भारतातले माहीत नाही.
फा..
फा..

पण तिला सापडलेली काडेपेटी तीच कशावरून...दुसरीही रँडम रस्त्यात पडलेली असू शकते की...
पण तो आपलाही बाप आहे हे त्या
पण तो आपलाही बाप आहे हे त्या पौर्णिमाला लक्षात नसल्यासारखे तिचे सीन्स आहेत.
"पिच डार्क" असताना घराबाहेरच्या भागात पायाला काहीतरी लागले >>> तर सामान्य माणसं विंचू काटा आहे का बघतील. हे लोक पणत्या लावतात. यांच्या बंगल्याला कुंपण, गेट वगैरे नाही का? रस्त्यावरून येणारं जाणारं कुणीही डायरेक्ट हॉलमध्ये येतं?
इथे ढळढळीत प्रकाशात, फॅन बिन बंद करून काडी पेटवायला गेलं तर ती निम्म्यात विझते, वात तेलात सुसाईड करते आणि या साडी नेसलेल्या हिरॉइनी उंबऱ्यावर न ठेचकाळता, रांगोळीवर पाय न देता तीवरची पणती लावतात.
आणि दिवाळीचे सर्व विधी म्हणजे काय? एक लक्ष्मीपूजन सोडल्यास बाकी काय गोष्ट आहे जी एकाच माणसाला करावी लागते? बरं बिझनेस फॅमिलीत लक्ष्मीपूजन जनरली HUFचा कर्ता करतो. मग बायकांचा कसला मान? ज्या कुणाचा मान असतो त्या काय इतरांच्या नवऱ्याला पाडव्याला ओवाळतात?
दिवाळीचे सर्व विधी म्हणजे काय
दिवाळीचे सर्व विधी म्हणजे काय? >>>
हो खरे आहे. इतके काय असते. ते काय नवरात्र वगैरे नाही.
इथे ढळढळीत प्रकाशात, फॅन बिन बंद करून काडी पेटवायला गेलं तर ती निम्म्यात विझते, वात तेलात सुसाईड करते आणि या साडी नेसलेल्या हिरॉइनी उंबऱ्यावर न ठेचकाळता, रांगोळीवर पाय न देता तीवरची पणती लावतात. >>>
बाकी अजून या लोकांनी सुचण्यासारखा मसाला दिला तर लिहीनच पण एक सीन पाहिला त्यात तिकडे भरत यांनी "खुनाचे आचरट प्रयत्न" हा एकदम चपखल वापरलेला शब्द आठवला
दिवाळीत फटाके उडवताना का कोणास ठाउक हे लोक घराच्या बर्यापैकी बाहेर असलेल्या अंगणात अनवाणी असतात. बोट बॉम्बिंग, झोपडी पेटवणे वगैरे वरून आत्या व गँगचे मोडस ऑपरेण्डी आता शालेय लेव्हलच्या कृत्यांवर आले आहे. भूमी कोणतातरी फटाका लावत असताना तिच्या थोड्या मागे नुकतीच संपलेली एक फुलबाजी पौर्णिमा टाकते. तिचा पाय त्यावर पडून भाजावा म्हणून. त्याने नक्की काय होणार आहे माहीत नाही. आत्या त्यावरही खुनशी चेहरे करते.
मुळात प्रेग्नंट बाई अंगणात
मुळात प्रेग्नंट बाई अंगणात अनवाणी का फिरेल? विसरली का काय ती प्रेग्नंट असल्याचं?
हे असले आचरट सीन्स म्हणजे
हे असले आचरट सीन्स म्हणजे फक्त प्रेक्षकांच्या मनात धडधड वाढविण्यासाठी! की तिचा पाय आता त्या लाल, गरम फुलबाजीवर पडेल..मग भाजेल..... !!
हो तसेच सीन्स होते. मला वाटलं
आकाश हा टोटल फद्या आहे हे
आकाश हा टोटल फद्या आहे हे पुन्हा दिसले. मधले बरेच भाग भूमी घरी येणार, नाही येणार, आली तरी थोडी कर्तव्ये पार पाडून मग नेहमीची केसरी ट्रॅव्हल्सची लाल बॅग उचलून महाजनांची थोरली सून माहेरी जाताना घरी चालत जाणार. हे सगळे चालले होते. ते बोअर झाले. त्यात आकाशचा सीईओ रोल हा "हम सिंघासनपर जा बैठे, जब जब करे इरादे" इतकाच असल्याने तो पूर्णवेळ भूमीच्या आठवणीत गर्क असतो. बायकोने घरातील व्यक्तीबद्दल भयंकर आरोप केले आहेत, तेव्हा जरा त्यांच्यावर पाळत ठेवून काही सुगावा लागतो का बघावे वगैरे त्याला काही इंटरेस्ट नाही.
मधे भूमी नोकरी करायला एका ठिकाणी इंटरव्यू द्यायला जाते. तेथे एक बाळबोध कहाणी रचली आहे. तिच्या बाजूचा "कॅण्डिडेट" बाकी सगळे तेथील कॅण्डिडेट्स सोडून फक्त भूमीशी बोलताना त्या कंपनीबद्दल कायकाय बोलतो. भूमी त्या कंपनीला डिफेण्ड करते. तीही गारमेण्ट कंपनीच असते व भूमीला त्यातली (म्हणे) माहिती असते. मग तो "कॅण्डिडेट" तेथून निघून जातो. आणि काय आश्चर्य! नंतर भूमीला मुलाखतीकरता बोलावण्यात येते तेव्हा स्रूप स्रूप कॅमेरा शॉक्स झाल्यावर दिसते की त्या कंपनीचा मालक्/बॉस हा दुसरातिसरा कोणी नसून तोच "कॅण्डिडेट" होता व हिची परीक्षा घेत होता. हा फेवर तेथील इतर लोकांना का नव्हता माहीत नाही.
तिकडे एका जंगी कॉन्फरन्स ची चर्चा सुरू असते. आकाशचे तेथे मोठे स्पीच असते. कंपनीची इमेज त्यावर अवलंबून असते. प्रत्यक्षात त्या कॉन्फरन्स मधे टोटल दोन पुरूष व दोन बायका असतात. आकाशला अभिजितने दारू पाजल्यामुळे तो बोलायच्या स्थितीत नसतो. तेथे आत्या व अभिजित असतात. वास्तविक ते कंपनीत मोठ्या हुद्द्यावर असायला हवेत. कारण आकाश त्या दिवशी ऑफिसमधे गेला नसता तर आत्या सीईओ होणार होती. पण आकाश महाजन अजून का आले नाहीत या प्रश्नावर ते किचन पॉलिटिक्स मधे करतात तसे तेथे उभे राहून कुजबूज करत बसतात.
आकाशची अवस्था भूमीला कळाल्यावर ती डायरेक्ट तेथे येते व कॉन्फरन्स रूम मधे घुसून स्वतःची ओळख सांगते. ती सीईओची बायको असल्याने तेथील आत्यासारखे ज्येष्ठ अधिकारी सोडून तीच उपस्थितांना उद्देशून बडबड सुरू करते. ही कंपनी एका कुटुंबाच्या मालकीची आहे व आकाश "मालक" आहे, की ही इतर कंपन्यांसारखी चालते हे एकदा ठरवा लेको. परवा "बोर्ड ऑफ डायरेक्टर्स" नी सीईओ ठरवला. म्हणजे इतर अधिकारी वर्गही असावा. अशा सिस्टीममधे सीईओची बायको रॅण्डमली येउन कॉन्फरन्समधल्या लोकांना भाषण देते.
आकाशला शुद्धीवर आणण्याकरता थोडा वेळ हवा असल्याने ती कंपनीच्या इतिहासाबद्दल एक फिल्म लावून देते. लहान मुलांना एंगेज करायला कार्टून लावून देतात तसे. ते आलेले लोकही वेळोवेळी अगदी खुष होऊन माना डोलावत असतात, संगीताला दाद दिल्यासारखे (श्रेय - भरत - आकुकाकचा धागा
)
श्रेय - भरत - आकुकाकचा धागा
श्रेय - भरत - आकुकाकचा धागा
(No subject)
फा - जबरदस्त पंचेस!!! एक एक
फा - जबरदस्त पंचेस!!!
एक एक कोट करण्याआधी सुद्धा परत एकदा वाचायचे आहेत. ‘भुकेच्या वेळा‘, ‘स्विंगिंग काडेपेटी’, ‘क्रम चुकलेला रोमॅन्स‘ - कहर!!
अस्मिता, माझेमन - त्रिवार दंडवत तुम्हालाही.
फा, वरची पोस्ट अफलातून आहे
फा, वरची पोस्ट अफलातून आहे
लहान मुलांना एंगेज करायला कार्टून लावून देतात तसे. ते आलेले लोकही वेळोवेळी अगदी खुष होऊन माना डोलावत असतात, संगीताला दाद दिल्यासारखे (श्रेय - भरत - आकुकाकचा धागा Happy ) >>> कहर!
ती कंपनीच्या इतिहासाबद्दल एक
ती कंपनीच्या इतिहासाबद्दल एक फिल्म लावून देते. लहान मुलांना एंगेज करायला कार्टून लावून देतात तसे>>
कहर
दुसरातिसरा कोणी नसून तोच "कॅण्डिडेट" होता व हिची परीक्षा घेत होता>>> हे असे कुठल्याश्या विमेन सबलीकरण शॉर्ट फिल्म का अॅड मधे ही पाहिले होते. बाई मुलाखती ला थांबली असते (बाहेर वेटींग एरियात)
काहीही. उगाच. ती शिबा चढ्ढा असते बॉस भुमिकेत.
उमेदवार बाई गरोदर असते..कॅजुअली बोलत असते दुसरीशी , दुसरी तिला तिचा डबा ऑफर करते.
आणि थोड्या वेळात रीसेप्शन वाली विचारते, कसा झाला इंटरव्ह्यु?
थोड्या वेळात रीसेप्शन वाली
थोड्या वेळात रीसेप्शन वाली विचारते, कसा झाला इंटरव्ह्यु? काहीही >>> अगदी अगदी
आत्या व अभिजितचे एक संभाषण
आत्या व अभिजितचे एक संभाषण
आत्या: "चार दिवसांपूर्वी आपल्याला एक मेल आला होता तो बघितलास का?"
अभिजितः: "नाही"
पहिले, मेल जरी "मेल" असली इतके शब्दशः घ्यायची गरज नाही. "ती" मेल असते. "तो" मेल नव्हे. . दुसरे म्हणजे "यांना" मेल आली होती? म्हणजे सर्व ऑफिसला घाउक पाठवली होती कोणीतरी? यांचा ऑफिसमधे नक्की रोल काय? अशी कोणती मेल जी कंपनीत कोणत्यातरी पदावर असलेल्या अभिजितला व कोणत्याही पदावर नसलेल्या आत्याला एकदम आली?
त्याहीपुढे - चार दिवसांपूर्वी यांना दिवसभरात एकच मेल आली का? अभिजितला ती विचारते चार दिवसांपूर्वी एक मेल "आला" होता तो पाहिलास का आणि कोणती मेल, कोणाकडून आलेली, कोणत्या विषयावर वगैरे काहीही न विचारता आणि हा म्हणतो नाही.
तिकडे भूमी ज्या गार्मेण्ट कंपनीत अधूनमधून दिसते तेथील बॉस परितोष हा आकाशचा कॉलेजमित्र असतो. भूमी "अधूनमधून दिसते" इतकेच लिहीले. "नोकरी करते" असे नाही, कारण ती तेथे अधूनमधून जाणे व ज्यूस पिणे यापेक्षा काहीच करताना दिसत नाही. आता दोन्ही कंपन्या एका ऑर्डर करता कोलॅबोरेशन करणार आहेत तर यांचा सीईओ थेट त्यांच्या सीईओबरोबर डे-टू-डे काम करणार. त्याकरता आकाश स्वतःच त्यांच्या कंपनीत जाउन बसणार रोज. तेथे तो याला वेगळे केबिन देतो तर आजन्म उपकृत झाल्याचे भाव व संवाद आकाशच्या तोंडी आहेत. त्यात त्याला तेथे असिस्टंट पाहिजे म्हणून पुन्हा भूमी. तीही असिस्टंट म्हणजे त्याच टेबलवर त्याच्याच समोर बसणार दिवसभर.
सीईओचा आब आकाशला सिरीजमधे सुद्धा झेपत नाही. कोणत्यातरी हिंदी पिक्चर मधे भुरट्या चोरांना तोतया सरकारी अधिकार्याचे काम करायला सांगतात - वरच्या हुद्द्यावरच्या, पण तेथे पोलिस इन्स्पेटर आल्यावर ते सवयीप्रमाणे उठून उभे राहतात तसे आकाशचे होते. हे लोक टायटल्स मोठ्या अधिकार्यांची घेतात पण बॉडी लँग्वेज व संवाद एण्ट्री लेव्हल कर्मचार्याचे.
आपल्या लोकांना आकाशची माहिती तो परितोष देतो तो सीन फार विनोदी आहे. मागे स्क्रीनवर एक ग्राफ येतो. त्याकडे बोट दाखवून तो म्हणतो "हा त्यांच्या कंपनीचा ग्राफ". कसला ग्राफ, काय मोजत आहेत, ते वर वर जाणारे बार्स आहेत ते रेव्हेन्यू दाखवत आहेत, की नफा, त्याचे स्केल काय आहे, काही पत्ता नाही. कसलीही चर्चा नाही. एक डावीकडून उजवीकडे मोठे होत गेलेले बार्स असलेला चार्ट, बस्स! त्यात दाखवलेल्या काळामधेच तो ग्राफ तो इतक्या लहान संख्येवरून इतक्या मोठ्या संख्येवर जातो, की त्या ग्राफ मधल्या काळाच्या आधी इतकी वर्षे ही कंपनी नक्की काय करत होती प्रश्न पडेल. अर्थात फक्त आपल्याला. तेथील कर्मचारी माना डोलावतात. ग्राफ इज ग्राफ. त्यात काय विचारायचे.
मग उरलेला वेळ पूर्ण स्क्रीन आकाशचा एक लिन्क्ड इन फोटो दाखवून त्याची तारीफ चालते.
यांना हे ही सांगायला पाहिजे की एखाद्या ठिकाणी तुम्ही २-३ लोकांशी बोलून झाल्यावर निघताना "मी येतो" हे घरगुती/सोशल सेटिंग मधे म्हणतात. कंपनीत तुम्ही लोकांना काम नेमून दिल्यावर तेथून जाताना "मी येतो" म्हणत नाहीत. सीईओ असाल तर काहीच सांगायची गरज नाही. तुम्हाला शंभर कामे आहेत आणि ती तुम्ही करायला चालला आहात हे गृहीत असते.
फा.. मी येतो... खूपच मस्त !
फा..
मी येतो... खूपच मस्त !
फा..
फा..
आत्तापर्यंत पडला नसेल तर पुढच्या काही एपिसोडमध्ये पारितोष भुमीच्या प्रेमात पडेल. पण अर्थातच त्याचं नाव जल, वायू किंवा तेज नसल्याने उसका पहला प्यार अधुरा रह जाएगा। शिवाय आकाशला डुबवण्यासाठी एक नविन व्हिलन मिळेल.
आणि भुमी-आकाशच्या होऊ घातलेल्या मुलाचं नाव क्षितीज असेल.
फा
फा
'तो मेल' - हे अनेकांना म्हणताना ऐकलंय.
मी 'ते मेल' म्हणते, टपाल कॅटेगरी.
फा, ही सिरियल मी बघण्याची
फा, ही सिरियल मी बघण्याची सुतराम शक्यता नाहीये. पण केवळ तुझ्या “रस”ग्रहणासाठी ही सिरियल चालू रहावी असं वाटतं
ग्राफ इज ग्राफ. त्यात काय
ग्राफ इज ग्राफ. त्यात काय विचारायचे. >
फा _/\_
भुमी-आकाशच्या होऊ घातलेल्या मुलाचं नाव क्षितीज असेल.>>
Lol farend अशक्य आहे ग्राफ.
Lol farend अशक्य आहे ग्राफ. हे असले बघून गॅदरिंग चे दिवस आठवतील
तुम्हाला, भरत आणि अमा यांना मराठी शिरेलच्या एडिटिंग टेबल वर बसवले तर टायटल साँग व्यतिरिक्त प्रेक्षकांना काहीच दिसणार नाही सगळेच एडिट होईल.. आणि ह्या सगळ्या जाचातून सुटका होईल 
तुम्हाला, भरत आणि अमा यांना
तुम्हाला, भरत आणि अमा यांना मराठी शिरेलच्या एडिटिंग टेबल वर बसवले तर टायटल साँग व्यतिरिक्त प्रेक्षकांना काहीच दिसणार नाही सगळेच एडिट होईल >>> १०००++
"तो" मेल
"तो" मेल
चार दिवसांपूर्वी यांना दिवसभरात एकच मेल
अधूनमधून दिसते
आजन्म उपकृत झाल्याचे भाव
पोलिस इन्स्पेटर आल्यावर ते सवयीप्रमाणे उठून उभे राहतात तसे आकाशचे होते
हा त्यांच्या कंपनीचा ग्राफ
>>>
ग्राफ मधल्या काळाच्या आधी इतकी वर्षे ही कंपनी नक्की काय करत होती >>> तो राधिका मसालेवालीच्या कंपनीचा ग्राफ असेल
त्या सिरिअल मधेही ऑफीसातली लोकं लॉबीसदृश सेटिंगमधे बसून गप्पा. कुचाळक्या इतकंच काम करायची. मात्र टर्नओव्हर करोडोंचा. अश्या कंपनीत काम करायची इच्छा आहे माझी 
अश्या कंपनीत काम करायची इच्छा
अश्या कंपनीत काम करायची इच्छा आहे माझी
>> अश्याच कंपनीची मालकीण होण्याची इच्छा आहे माझी
>> अश्याच कंपनीच्या मालकाची
>> अश्याच कंपनीच्या मालकाची आत्या/काकू होण्याची इच्छा आहे माझी. नो जबाबदारी आणि फुल्ल अधिकार.
मालकीण , आत्या , काकू
मालकीण , आत्या , काकू वगैरेंवर उगाच हल्लेबिल्ले होत राहतात. शिवाय चार दिवसांतून मेल्स येतात आणि त्या उगाच वाचायला लागतात
वर पुन्हा कोणाकोणाला मारायचे कट करत रहायला लागतं. असल्या जबाबदार्या कोण घेणार? 
रमड
रमड
"पण माझी शिंक काही चुकीची
"पण माझी शिंक काही चुकीची नव्हती" - पौर्णिमा
कधीकधी एखादे वाक्य बास असते एखाद्या एपिसोडबद्दल आख्खा परिच्छेद लिहिण्यापेक्षा
फा, रमड धमाल चालली आहे इथे
फा, रमड
धमाल चालली आहे इथे
पण माझी शिंक काही चुकीची
पण माझी शिंक काही चुकीची नव्हती" - पौर्णिमा
>>> हे काय आहे?
यूट्यूब वर अश्या सिरिजचे वेबिसोड्स टाकतात त्यांची वरची चित्रं असतात तसं पोटेन्शियल आहे या वाक्यात. म्हणजे ही पौर्णिमा दाखवून बबलमध्ये हे वाक्य लिहायचं. मग उरलेल्या चित्रात कुठेतरी भूमी, आकाश वगैरे कॅरॅक्टर दाखवून ' अरे देवा, काय हा गोंधळ! ' असं निरर्थक वाक्य टाकायचं वगैरे.
मागे एकदा कुठल्याश्या सिरिजच्या वेबिसोड पोस्टरवर आसावरी जोशी होती आणि बबलमध्ये लिहिलं होतं ' तेल लावून देऊ का? '
पण माझी शिंक काही चुकीची
पण माझी शिंक काही चुकीची नव्हती" - रिअली??
Pages