तुमचा एक्सिट पोल अंदाज सांगा

Submitted by स्वरुपसुमित on 20 November, 2024 - 14:05

माझा अंदाज

महायुती अस्पष्ट बहुमत

मुंबई पुरते ठाकरे सेने ला यश मिळेल ( ११ पैकी ६-७ जागा शिंदे सेने विरुद्ध )
राज्यात ५१ लढती पैकी २०-२५
अजित पवार ह्यांची दाणादाण होणार व परत जाणार

दोन्ही राष्ट्रवादी एक होणार व कोणत्या तरी दुसऱ्या पार्टी ला बाहेरून सपोर्ट देणार

तुमचा अंदाज सांगा

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

लोकसभेत मोदी स्पर्धेत असताना उद्धव ठाकरे यांना मुंबईत यश मिळालेले तर विधानसभेत हमखास मिळायला हरकत नाही.
ठाणे मात्र शिंदे सेना जोरात असेल.

*तर, शरद पवार हे फडणविसांना बाहेरून आणि दादांना आतून पाठिंबा देऊन, राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हायला हरकत नाही असे म्हणून, शिंदेंना तुतारीवाल्या राष्ट्रवादीत घेऊन, उद्धव ठाकरे यांना उगीचच केंद्रात पाठवून, पटोले यांना पक्षवापसी करण्यास लावून, जरांगे पाटील यांना अतिदक्षता विभागात हलवून, संजय राऊत यांना शेपूट असल्याचे सिद्ध करून रामदास आठवले यांना मुख्यमंत्री करणार आहेत*

Axis सांगतीय त्यापेक्षा
भाजपाचा व्होट शेअर व स्ट्राइकिंग रेट वाढला पाहिजे असं वाटतंय. मतदान जिथे वाढलंय तिथे भाजप व कॉंग्रेस अशी दुहेरी लढत असेल तिथल्या निवडणुक निकालांबाबत मला खूप उत्सुकता आहे. काश्मीर, हरियाना मधील ट्रेंडचे कन्फर्मेशन या निवडणुकांत होणारेय असं वाटतंय. पुढच्या अनेक निवडणुकांचा ट्रेंड ठरणार आहे.
तेंव्हां पार्टीची टक्केवारीही वाढली पाहिजे. बाकी पक्षांचा मी विचार केलेला नाही.

अन्यथा मला मी विचार करण्याची पध्दत तपासून पहायला पाहिजे. Wink
मी विचार करताना माझी आवड निवड बाजूला ठेऊ शकतो असं मला वाटतं. तिथेच गोची झाली की काय?
Happy

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांत मतदानाची ही आतापर्यंतची दुसरी सर्वाधिक टक्केवारी आहे. याआधी १९९५ साली ७०%+ मतदान झाले. तेव्हा भाजप शिवसेनेच्या साथीने पहिल्यांदाच सत्तेत आली. म्हणजे मतांची टक्केवारी वाढली की भाजप सत्तेत येते. याही वेळी येणार. बहुतेक भाजपला एकहाती बहुमत मिळेल.

लोकनीती CSDS exit poll
आता फक्त व्होट शेअर सांगितला आहे. सीट्स सांगतात का बघू.
estimate of vote share Maharashtra
Maha Vikas Agadi 39%
Mahayuti 43%
Others 18%
Margin of Error + - 2.6%
Sample size 3959
No of ACs in the sample 40
Locations 160
Female in sample 46%
Muslims 10%
Buddhist 5%
SC 11%
ST 6%
Urban 40%
महायुतीला लँडस्लाइड विन मिळेल असं दिसतंय.

मी मागे लिहिले होते की आपली विचारधारा बदलणारे म्हणजे अजितदादा व उबाठा संपून जातील.
पण आता असं वाटतंय की, उबाठाचं काही खरं नाही.
पण अजित पवारांनी विचारधारा बदलली असली तरी चालू ट्रेंडला धरलेलं असल्याने त्यांचे तेवढे नुकसान होणार नाही.

दोन्ही बाजूंना 'साधारण' अर्ध्या अर्ध्या सीट्स मिळतील असे वाटते.

सरकार स्थापनेचा दावा करण्याच्या परिस्थितीत बहुधा दोन्ही बाजू येऊ शकतील.

अधांतरी विधानसभा आल्यास मायबोलीवरच्या तज्ञांना विधानपरिषद देऊन सरकार स्थापन करू द्यावे. सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा. फक्त ओरिजिनल आयडीने शपथविधी करता येईल हे समजावून सांगावे लागेल.
मुख्यमंत्री माबोकरांनी सहमतीने निवडावा.

>>> फक्त ओरिजिनल आयडीने शपथविधी करता येईल हे समजावून सांगावे लागेल.

येथे अस्तित्वात नसलेल्या संकल्पना तिकडे प्रत्यक्षात येणार नाहीत

भाजप शिंदेसेनेत कुठेत री मैत्रीपूर्ण लढत आहे ना? मग २८९ बरोबर.
युतीतल्या तिन्ही पक्षांत कुठे ना कुठे मैत्रीपूर्ण लढती आहेत.
मोर्शी - भाजप - उमेश यावलकर . राकॉ (घड्याळवाले) देवेंद्र भुयार
आष्टी- भाजप - सुरेश धस - राकॉ घड्याळ - बाळासाहेब आजबे
मानखुर्द - शिवाजीनगर - नवाब मलिक राकॉ घड्याळ वि सुरेश पाटील धनुष्यबाण
पुरंदर - विजय शिवतरे मशाल वि.संभाजी सदाशिव (अण्णा) झेंडे (कलेक्टर साहेब) आय ए एस - घड्याळ
देवळाली -राजश्री अहिरराव धनुष्यबाण वि. सरोज अहिरे घड्याळ

आणखीही असतील कदाचित.
इथे तपासून घ्या सर.
https://affidavit.eci.gov.in/CandidateCustomFilter

एवढा अभ्यास केलात. हे कसं सुटलं?

मी त्या अभ्यासात जात नाही.
Happy

मतदान वाढेल किंवा नाही यात रस होता. त्याचे उत्तर मिळाले.

उद्या भाजपा व कॉंग्रेसच्या थेट लढतीमधे जास्तीचे मतदान नक्की कुठे गेले यातच जास्त रस असेल.

त्यासाठी खालील साईट निवडलीय. थोडी बॅँकराऊंड मिळते. यातल्या दुरंगी लढती फक्त
https://www.tv9marathi.com/maharashtra/maharashtra-assembly-election-202...

भागवत सर तुम्ही असे छोटे अंदाज नका सांगू. तुम्ही सोमवारच्या मार्केटचा अंदाज सांगा. जब मॅटर बडे होते है तो भागवत सर खडे होते है.

भागवत सर तुम्ही असे छोटे अंदाज नका सांगू. तुम्ही सोमवारच्या मार्केटचा अंदाज सांगा. जब मॅटर बडे होते है तो भागवत सर खडे होते है
Happy

<महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांत मतदानाची ही आतापर्यंतची दुसरी सर्वाधिक टक्केवारी आहे. याआधी १९९५ साली ७०%+ मतदान झाले. तेव्हा भाजप शिवसेनेच्या साथीने पहिल्यांदाच सत्तेत आली. म्हणजे मतांची टक्केवारी वाढली की भाजप सत्तेत येते. याही वेळी येणार. बहुतेक भाजपला एकहाती बहुमत मिळेल.> माझा अंदाज बराचसा बरोबर आला. पुढल्या वेळी शत प्रतिशत भाजप.

माझा अंदाज बराचसा बरोबर आला. >> आश्चर्य वाटलं पण सहमत.
शक्यतो वाढलेलं मतदान हे सत्ताधार्‍यांच्या विरोधात असतं. पण असे सगळे सिद्धांत हे स्टुडीओत बसलेले विचारवंत कुणालाही न विचारता काढत असतात हेच खरं.

निवडणुकांचे सर्व्हेज, एक्झिट पोल्स आणि तज्ञांची विश्लेषणे ऐकणे - पाहणे सोडून दिलेली ही तिसरी निवडणूक. निर्णय योग्यच होता असे म्हणावे लागेल.

मग तरीही तुम्ही my axis चा exit पोलचा फोटो टाकून तुम्ही टोमणा मारलाच. त्यात आयोगाचाही उल्लेख केला.

तुमची रेष मोठी करा दुसऱ्यांची छोटी करण्याच्या प्रयत्न करू नका. तुमचे विश्लेषण चांगले होते, तेच positive रित्या मांडता येऊ शकले असते. थोडा निगेटिव्ह विचार कमी केलात तर जग सुंदर दिसेल. (स्मित हास्य)

वाली सर, चिल. तुम्ही फक्त माझ्यासाठी मायबोलीवर परत आलात की काय? मला इतकं महत्त्व देऊ नका हो.

Lolz, जळी स्थळी काष्ठी पाषाणी तुम्हाला लोक दिसायला लागलेत का.
Btw...वाली कोण, रामायण मधून थेट माबोवर आले का (हास्य)