Submitted by भरत. on 19 November, 2024 - 20:58
मतदान केलंत का? त्याबद्दलचे अनुभव लिहिण्यासाठी हा धागा.
ज्यांना मतदार माहिती चिठ्ठ्या मिळाल्या नसतील, ते https://electoralsearch.eci.gov.in/ या संकेतस्थळावर आपल्या मतदार ओळखपत्र क्रमांकाच्या आधारे शोधू शकतीत.
मतदान केंद्राचा पत्ता, यादी क्रमांक आणि अनुक्रमांक ही माहिती गरजेची आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
या निवडणुकीला आमच्या घरापासून
या निवडणुकीला आमच्या घरापासून दोन मिनिटांवर असलेली शाळा हे नेहमीचं केंद्र आम्हांला ( म्हणजे आमच्या सोसायटीतल्या मतदारांना ) नव्हतं. आताही ही शाळा मतदान केंद्र आहे. पण आमचं केंद्र घरापासून ५-७ मिनिटांवर असलेल्या एल आय सी ट्रेनिंग सेंटरमध्ये होतं. गेल्या शतकात हेच आमचं मतदान केंद्र असे. लोकसभेच्या वेळचा अनुभव लक्षात घेऊन आयोगाने मतदान केंद्रांची संख्या वाढवली असावी.
मी लोकसभेच्या वेळच्या गर्दी आणि दिरंगाईचा अनुभव लक्षात घेऊ़न लवकर जायचं ठरवलं. माझ्या कक्षात माझा बहुधा दुसरा नंबर लागला. तुरळक लोक येत जात होते. रांगा लागायला अवकाश होता. माझ्या आधी असलेल्या मतदाराच्या बोटाला शाई लावायला निवडणूक कर्मचारी विसरल्या होत्या. त्यांना मुख्य कक्ष अधिकार्याशी गेल्यावर हाका मारून परत बोलवून शाई लावली.
मी शाईसाठी कोणता हात पुढे करू असे विचारत दोन्ही पंजे टेबलवर ठेवले. शाईवाल्या बाईंनी शेजारच्या बाईंना विचारून डावा असे उत्तर मिळाल्यावर त्या माझ्या उजव्या हाताच्या बोटाला शाई लावू लागल्या. मग मला डावा हात हा, हे सांगावं लागलं.
तुमचं ट्रेनिंग झालं नाही का ? असं मी त्यांना विचारलं , तर त्या नाही म्हणाल्या. माझं हे नाही - दुसरं ट्रेनिंग झालं - ( - आधीच्या मतदाराच्या बाबत घोळ झाल्यावर त्यांचं जे बोलणं कानावर पडलं त्यावरून बहुतेक मतमोजणीचं ) असं त्या म्हणाल्या.
पुढची प्रक्रिया सुरळीत पार पडली. रांग नसल्याने मतदान कक्षाच्या बाहेर लावल्या जाणारं मतदानयंत्राचं प्रारूप पाहायचं राहून गेलं आणि मला इच्छित निशाणी शोधावी लागली. व्हीव्हीपीएटी स्लिपवर मी दाबलेलीच निशाणी प्रिंट झाली.
विसाव्या मिनिटाला घरी परत.
यावेळी मतदान करायला जाण्याचे
यावेळी मतदान करायला जाण्याचे एकमेव मोटीवेशन म्हणजे त्यासाठी माहेरी जाणार आहे.
काल रात्रीच निघणार होतो कारण सकाळी लवकर उठायला नको. दहा ते पाच उन्हात मी कधीच प्रवास करत नाही. त्यामुळे गेल्यावेळी संध्याकाळी निघालो होतो आणि अखेर पर्यंत वेळेत पोहोचतो की नाही याचे टेन्शन होते. यावेळी मुलांना सुद्धा सोबत न्यायचे असल्याने आदल्या रात्रीच निघणार होतो. पण काल अचानक उद्भवलेल्या ऑफिस पार्टी मुळे उशीर झाला. दगडापेक्षा वीट मऊ म्हणत आपण निवडून देणारे नेते पाच वर्षे आपल्याला पिळून खाणार आहेत तर त्यांच्यासाठी आपण का पार्टीतले फुकट खाणे सोडावे म्हटले.
पण वर म्हटले तसे, यावेळी मतदान करायला जाण्याचे एकमेव मोटीवेशन म्हणजे त्यासाठी माहेरी जाणार आहे...
त्यामुळे आज सुट्टी असूनही सकाळी लवकर उठलो आहे. तूर्तास तयारी चालू आहे. मनाची सुद्धा
आमचंही मतदान सुरळीत झाले.
आमचंही मतदान सुरळीत झाले. इच्छा नसताना विचासरणी न पटणाऱ्या उमेदवाराला मत दिले. पर्यायच नव्हता.
लवकर गेल्याने चवथा नंबर होता.
लवकर गेल्याने चवथा नंबर होता. 10 मिनिटात बाहेर. पण स्लिप नसणार्यांना(यादी क्रमांक माहीत नसणार्यांना) चक्क बाहेर जाऊन स्लिप घेऊन यायला पिटाळत होते.
अर्थात लोकांनीही वेबसाईटवर जाऊन हे काम आधी करायला हवे होते (हे माझे वैयक्तिक मत)
आमच्या प्रभागात कोणत्याच उमेदवाराने फारशी सुधारणा/कामे केलेली नाहीत तरी नाइलाजाने पक्ष बघून/ आशावाद ठेऊन मत द्यावे लागले.
शाई फार पुसट आहे. घरी
शाई फार पुसट आहे. घरी आल्यावर भांडी घासली आणि मग साबणाने हात धुतले तर ऑल्मोस्ट गेली.
मागच्या वेळी ते नख वाढत वाढत कापलं जाईपर्यंत होती.
आमचं मतदानकेंद्र जरा लांब आहे
आमचं मतदानकेंद्र जरा लांब आहे, आमच्या आरोग्याची काळजी घेत जाऊन येऊन एकंदरीत अडीच तीन किलोमीटर चालायला लावतात, त्यामुळे मॉर्निंग वॉक छान होतो. एनिवे पाच वर्षात दोनदा हरकत नाही एवढं. मी सकाळी सव्वासातला घरातून बाहेर पडले, आम्हाला एका पार्टीच्या स्लिप्स आलेल्या, फक्त नाव नं ठेऊन बाकी नाव निशाणी काढून टाकली, ती स्लिप घेतली. मोबाईल नेतच नाही कधी त्यामुळे रूल असो वा नसो. आधार कार्ड सोबत ठेवलं. तिथे गेल्यावर यावेळी पुरुष महिला अशा दोन वेगळ्या रांगा होत्या, महिला कमी होत्या. व्यवस्थित शिस्तीत एक पुरुष आणि एक महिला असं सोडत होते. ज्ये ना प्राधान्य देत होते. वोटिंग नीट पार पडले, काही अडचण आली नाही, सर्वांचे आभार मानले. बाहेर आल्यावर पोलिस आणि पोलिस मित्रांचे आभार मानून आठ वाजेपर्यंत घरी आले.
नवरा नंतर तासा दीड तासाने गेला तेव्हा महिलांची संख्या जास्त होती. त्याचंही वोटिंग शिस्तीत व्यवस्थित पार पडलं, एकंदरीत त्यावेळी जास्त लोकं असल्याने त्याला वेळ लागला.
मी सुद्धा अखेरीस अत्यंत
मी सुद्धा अखेरीस अत्यंत नाट्यमय पद्धतीने मतदान केले...
आणि अखेर नोटामार्गे न जाता एका जिवंत आणि धडधाकट उमेदवाराला मत देऊन आलो.
पण बटणाचा आवाज नाही आला...
आधी यायचा ना?
मलाही नाही आला बीप आवाज पण
मलाही नाही आला बीप आवाज पण स्लिप योग्य पडलेली दिसली तरी मी थांबले होते आणि तिथून mam नी सांगितलं, झालं मतदान. नवऱ्याला असा काही इश्यू आला नाही.
>>> मतदान केलंत का?
>>> मतदान केलंत का? त्याबद्दलचे अनुभव लिहिण्यासाठी हा धागा. >>>
हे आवडलं.
बटण दाबतानाच विविपट खिडकीकडे बघत होतो तेच चिन्ह आल्यावर लगेच वळलो तर अधिकाऱ्यांने थांबवलं. टुंssई आवाज आल्यावरच जा म्हणाले.
आमच्या इथेही चोख व्यवस्था
आमच्या इथेही चोख व्यवस्था होती. सकाळी 9 वाजता गेलो तेव्हा आमच्या बूथ मधे गर्दी नव्हती, अगदी 5 मिनिटांत आटोपलं. लेकीने तिचा मतदानाचा पहिला हक्क बजावला.
लेकीने तिचा मतदानाचा पहिला
लेकीने तिचा मतदानाचा पहिला हक्क बजावला. >>>> १८ वर्षांची झाली पण! Excited होती का पाहिलं मतदान करताना?
माझं मतदान केंद्र लांब होतं. १५ मिनिटे लागली. तिथून निघून जवळच असलेल्या तलावपाळीला चकरा. मग भाजी मार्केट. अजून दिवसभर काही कामे. असं करत काल अंदाजे १४००० पावले चाल झाली.
मलाही नाही आला बीप आवाज पण
मलाही नाही आला बीप आवाज पण स्लिप योग्य पडलेली दिसली तरी मी थांबले होते
>>>
हो.. आमच्याकडे सुद्धा आवाज नाही आला पण स्लीप योग्य दिसली तसे मी त्या अधिकाऱ्याकडे पाहिले. तर तो झाले जा म्हणाला.
पण आई गोंधळली. तिचे स्लीप वर काही लक्ष नव्हते. आवाज नाही म्हणून तिने अजून एकदा बटण दाबून थांबून राहिली होती.
पाच वर्षांतून एकदा कोणी आपले मत विचारते, ते वाया जाण्यासारखे दुःख नाही लोकशाहीत.
मी मतदान करायला गेलोच नाही.
मी मतदान करायला गेलोच नाही.
Excited होती का पाहिलं मतदान
Excited होती का पाहिलं मतदान करताना?### विशेष नाही, पण मत देऊन आली हे खरं. तुला यंदा ड्युटी नाही का गं?
तुला यंदा ड्युटी नाही का गं?
तुला यंदा ड्युटी नाही का गं? >>> नाही आली ड्युटी. लोकसभेला पण वाचले
एकूण ३०० orders आल्या होत्या फक्त आमच्या बिल्डिंगमध्ये. त्यात अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्माची पण लागली होती ड्युटी . नंतर HR ने जाऊन तो आकडा पन्नास वर आणला. नाही देवू शकत इतकी manpower. चीफ मॅनेजर्सना पण ड्युट्या लागल्या होत्या.
आमची भरपूर वाहने, SMC व इतर properties वापरायला देतात EC ला.
अंजू, तुम्ही राहता त्या भागात
अंजू, तुम्ही राहता त्या भागात जवळपास मतदान केंद्र म्हणून वापरता येतील अशा इमारती नाहीत का? शाळा /कॉलेज / हॉल?
काल संध्याकाळी कळलं की माझ्या घराजवळच्या दुसर्या शाळेतही केंद्र होतं. आमच्या आणि समोरच्या सोसायटीतल्या लोकांना दोन वेगवेगळी केंद्रे होती. (मी माझ्या पहिल्या प्रतिसादात लिहिलेली) माझ्या वरच्या मजल्यावर राहणार्यांनाही घराजवळची शाळा हे केंद्र होतं. माझ्या घरापासून तीन दिशांना ५-७ मिनिटांच्या अंतरावर तीन केंद्रे होती. म्हणजे यंदा सोय चांगली होती.
आमच्याकडे निवडणूक आयोगाने मतदार माहिती चिठ्ठ्या पोचवल्या होत्या. लोकसभेलाही मिळाल्या होत्या. एका पक्षानेही त्या चिठ्ठ्या पोचवल्या.
लोक आपला पत्ता बदलला तरी ते सरकारी रेकॉर्ड्समध्ये का बदलत नाहीत? आमच्या शेजार्यांचा मुलगा आणि सून हे घर सोडून गेल्याला किमान १० वर्षे झाली असतील. आधी भाड्याच्या घरात राहत. पण ५-६ वर्षे झाली, स्वतःच्या मालकीच्या घरात राहतात .त्यांची नावे अजूनही इथेच नोंदलेली आहेत. त्यांचा मुलगा आता सज्ञान झाला. त्याचं नाव त्यांच्या भागात नोंदलं आहे.
आमच्या इथे घरातल्या इतर
आमच्या इथे घरातल्या इतर सगळ्यांची (म्हणजे बायको, आई, भाऊ वगैरे) नावे एका ठिकाणी आणि माझे नाव वेगळ्या ठिकाणी आले होते.... लोकसभेलाही तसेच होते.... त्यांचे मतदान अगदी पाच मिनिटात वगैरे झाले अज्जिबात लाईन नव्हती.
आमच्या मतदार केंद्रावर पण इतर वर्गात पटापट मतदान करुन लोक बाहेर येत होते पण माझ्या इथे भली मोठी रांग लागली होती.... कारण विचारता असे कळले की तिथले EVM मशीन बंद पडले होते मग मशीन बदलून इतर सरकारी सोपस्कार करण्यात जो वेळ गेला तेवढ्या वेळात रांग वाढत गेली.... मला सुमारे ४५ मिनिट रांगेत थांबावे लागले पण रांग का वाढली याचे सविस्तर कारण तिथले अधिकारी सांगत असल्यामुळे लोकांनी फारशी चिडचिड न करता सहकार्य केले!!
मी गावी गेलेलो मतदानाला,
मी गावी गेलेलो मतदानाला, जाईपर्यंत ४.०० वाजलेले.
त्यामुळे अजिबात गर्दी नव्हती.
Polling agent कडे स्लीप मागितली पण त्याने नंबर ९४ नंबर सांगा तिथं अस सांगितल.
मोबाईल बाहेरच देऊन आलेलो आणि शाई लावत असताना पोलीस कर्मचारी आत आल्या आणि त्यांनी मोबाईल आतमध्ये आणलाय का अस विचारलं.
मी नाही म्हणून सांगितलं आणि मग पुढची प्रक्रिया पार पडली.
बटण दाबल, स्लिप योग्य पडलेली दिसली पण मशीन वरील लाईट लवकर बंद होईना. बंद झाल्यानंतर बाहेर आलो.
अंजू, तुम्ही राहता त्या भागात
अंजू, तुम्ही राहता त्या भागात जवळपास मतदान केंद्र म्हणून वापरता येतील अशा इमारती नाहीत का? शाळा /कॉलेज / हॉल? >>> आहेत ना जवळ शाळा, ती मतदानकेंद्रही आहेत पण आमच्या एरियातल्या लोकांचे लांबच्या शाळेत असतं. त्यात आमची काही जणांची नावं त्या एरियात कोणी टाकली माहिती नाही, प्रॉपर इथलं रेशनकार्ड कॉपी दिलेली, ही अठरा वर्षांपूर्वीची गोष्ट. नवऱ्याने अॅड्रेस बदलून घेतला, त्याचं काम झालं, माझे झालं नाही (लोकसभा, विधानसभा फरक पडत नाही, महानगरपालिकेवेळी फरक पडतो) . अर्थात हा मुद्दा नाही कारण इथल्या प्रॉपर अॅड्रेसच्या लोकांनाही ते केंद्र येतं. इथली लोकं आम्ही इथे राहायला यायच्या आधीपासून तिथेच जातात (लोकसभा, विधानसभेला), महानगरपालिकेवेळी त्यांचं जवळ असतं केंद्र .
हो केलं की मतदान. सकाळी
हो केलं की मतदान. सकाळी पावनेदहाच्या सुमारास.
महानगरपालिका शाळेत केंद्र.
लोकसभा मतदान वेळी बायकोचं नाव आमच्या प्रभागात सापडलं नव्हतं. जुन्या पत्त्यावरील जुन्या मतदान केंद्रात नाव होतं तिचं. दहा वर्षे झाले तिथे कधीच मतदान न करताही तिथले शिल्लक आहे अजूनही. आणि जिथे मतदान करतो तिथले नाव उडाले हे अगम्य होते.
म्हणून निवडणूक येणाच्या आधीच तिचे नाव परत नोंदवलं योग्य कागदपत्रासहित. फिजिकल voter ID मिळाले नव्हते, पण नाव सर्च केल्यावर सापडले.
पण आमच्या voter id नंबर लांबचे झाल्याने की काय आमच्या दोघांनाची 2 वेगळी केंद्र आलीत.
घरापासून फार लांब नव्हती. Mobile नेला नव्हता. लोकसभा अनुभव म्हणून. ते बरं झालं. माझे नाव जिथे होते तिथे एकापेक्षा अनेक बूथ होते. माझ्या क्रमांकाच्या बुथवर कोणीच नव्हते , बाकी बुथवर गर्दी आणि line लागलेली. अनुक्रमांक बूथ क्रमांक सगळे लिहून घेउन गेलो त्यामुळे ती शोधाशोध वेळ गेला नाही.
5 मिनिटात मतदान झाले. स्लिप पडताना पाहिली. योग्य होती.
मोठ्या रांगेतल्या लोकांकडे बघत , बरे झाले आपल्याला गर्दी नाही लागली असा विचार करत बाहेर आलो.
बायकोचेही पटकन झाले होते मतदान. माझे voter ID पाहिले त्यांनी आणि तेव्हाचा तरुण फोटो आणि मी अजून ओळखू येतो नीट म्हणून खुश झालो.
बायकोने आधार कार्ड नेले होते सोबत.
काही अपेक्षा अशा
1) एका फॅमिलीचे सर्वांचे नाव एकत्र असले पाहिजे. लांब लांब नावं असेल आणि ज्येष्ठ नागरिक असतील तर कर्त्या व्यक्तीला फार त्रास.
2) 12 की 14 तासाच्या त्या ड्युटी वर असलेल्या लोकांच्या खाण्याची , प्रसाधनगृहांची सोय नीट हवी. बिचारे ड्युटी ऑफिसर मतदार जास्त नसले अशी वेळ बघून की हळूच वडापाव खात होते. लोकसभे वेळी मुरमुरे फरसाण खात होते.
3) आईने कोल्हापूर मध्ये केले. दुपारी 2 च्या सुमारास गेली होती. थोडी सावकाश आणि किंचित लंगडत चालणारी ज्येष्ठ नागरिक बघून पोलिसाने line मधून पुढे पाठवले तिला.
आमच्यात साबा खडकवासला
आमच्यात साबा खडकवासला मतदारसंघात अणि आम्ही तिघे भोर मध्ये एकाच घरात राहतो खरंतर ..मज्जाच सगळी ..
कोथरूड च्या काही लोकांचे व्होटिंग सेंटर बालेवाडी मध्ये होते..
पण व्यवस्था चोख होती..5 मिनिटात सर्व सोपस्कार करून बाहेर..
आमच्या जुन्या बिल्डिंग मध्ये
आमच्या जुन्या बिल्डिंग मध्ये पहिल्या माळ्यावर मतदान केंद्र होते.
आणि काय किती रांग आहे हे गॅलरीत उभे राहिले तरी दिसायचे.
त्यामुळे लोकं उठल्याउठल्या पहिले जाऊन मत देऊन यायचे मग घरी येऊन ब्रश करायचे.
आता मात्र बिल्डिंग बाहेर पडून रस्ता ओलांडून समोर जावे लागते. त्यामुळे तयारी करून जावे लागते
त्यांची नावे अजूनही इथेच
त्यांची नावे अजूनही इथेच नोंदलेली आहेत
>>>>
माझे असेच आहे. आणि माझ्या सारखे अजूनही बरेच असेच आहेत. ज्यांचे आईवडील इथे राहत असल्याने मतदार पत्ता बदलला नाही. जे काल मतदान निमित्त भेटले. छान गेट टू गेदर झाले. तो एक जोक फिरतो ना, मतदानाला जा, जुनी मैत्रीण भेटेल. तसेच झाले.
काल भेटल्यावर आमच्यात हाच विषय चालू होता. आम्हाला मतदार पत्ता बदलायची इच्छा का होत नाही. आणि चर्चेत याचे जे कारण पुढे आले ते असे की जो इमोशनल बॉण्ड मूळ विभागाशी आहे तो नवीन विभागाशी नाही. त्यामुळे मुंबईचाच उमेदवार आपला वाटतो, आणि नवीन जागेतील परका
लोकसभा मतदान होते तेव्हा
लोकसभा मतदान होते तेव्हा सुट्टी नव्हती म्हणून सकाळी सात वाजता गेलो होतो आणि त्या शाळेबाहेर गेटपर्यंत रांग होती. अर्धा तास लागला होता. यावेळी सुट्टी होती त्यामुळे निवांत बारा वाजता गेलो. माझ्या आधी फक्त दोन बायका. त्यामुळे बावीस मिनिटात केंद्रावर जाणे, मतदान आणि घरी परत. मोबाईल नेला नव्हता. सोसायटीत दोन दिवस आधी स्लिप आली होती ती आणून ठेवली होती.
मी वेगवेगळ्या बूथवर जाऊन
मी वेगवेगळ्या बूथवर जाऊन स्लिपा आणि पैशे घेतले आणि मतदान न करता घरी येवून मस्त स्लिपलो.