Submitted by डॉ. रोहिणी चंद्... on 9 November, 2024 - 21:18
मुक्त मी
(देवराज वृत्त)
झुंजले किती पुन्हा पुन्हा स्वतःस ताडिले
कोष भोवती फुका कशास नित्य गुंफीले?
आज सोडली झणी अतर्क्य मिथ्य बंधने
मार्ग मोकळा पुढे कशास वांझ कुंथणे?
उंच उंच कोट जे सभोवतीस बांधले
त्यांस मी प्रहार देत ताड ताड फोडिले
गोठले नसांत रक्त उष्ण संथ ओघळे
कोंडले मनात खोल सर्व मुक्त वाहिले
गार गार संथ वात झोंबतात भोवती
शुध्द क्लांत भागल्या मनास ते सुखावती
चौकटीस लांघले दिसे मला न उंबरा
पंख मोकळे करून जायचे दिगंतरा
चंद्र ना दिसे कुठेच चांदण्या न सोबती
आग हो मना मशाल नित्य ठेव पेटती
काळजी कशास व्यर्थ? होय आत्मसिद्ध मी
आर्त गायचे खुशाल मुक्त मी विमुक्त मी
- डॉ. रोहिणी चंद्रात्रे वाघमारे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान कविता ..
छान कविता ..
शब्दरचना सुंदर..!
सुंदर!
सुंदर!
>>>>>>>>>चौकटीस लांघले दिसे
>>>>>>>>>चौकटीस लांघले दिसे मला न उंबरा
पंख मोकळे करून जायचे दिगंतरा
वाह!!
वा वा! खुपच सुंदर लिहिली आहे!
वा वा! खुपच सुंदर लिहिली आहे!