याआधीचा भाग - https://www.maayboli.com/node/85943
"नेहमी असच वागायचं का?"
"सॉरी गायत्री."
"मनू तू ना, दिवसेंदिवस वेडा होत चाललाय."
त्याने तिला घट्ट मिठीत घेतले.
"सोड मला, ओलं करतोय नुसता."
त्याने तिला मिठीतून बाहेर सोडलं...
ती आत गेली. तिने साडी काढून बाजूला टाकली. ब्लाऊज देखील काढलं...
"...वेडा..." ती स्वतःशीच हसली. "केव्हाही सुरू व्हायचं का?"
तिने शृंगार उतरवायला सुरुवात केली...
...आणि त्यानंतर तिने तिचा आवडीचा ड्रेस निवडला.
... ब्लॅक कलरचा शर्ट, त्यावर ब्लॅक ब्लेझर...
...आणि खाली ब्लॅक ट्राऊजर.
आज सगळे पार्टीला झकपक पोशाखात अवतरले असताना, गायत्री वेगळी असणार होती.
...आणि ही तिची स्टाईल होती. नेहमी वेगळं असण्याची.
मनू अजूनही शांत पडून होता.
"रेडी हो, आळशी मुला." ती ओरडली.
"तू अशी दिसणार असशील, तर आय एम थिंकिंग ऑफ वन मोर राऊंड."
"इनफ. रात्रीसाठी काहीतरी ठेव. आता उठ. उठ. उठ..."
तो उठला, त्यानेदेखील कपडे काढायला सुरुवात केली.
आणि त्याने सेम ड्रेस निवडला...
...अगदी गायत्रीशी मॅच असणारा.
"जर आता कॉलेजचा ड्रेस घातला ना आपण, तरीही कुणी डाऊट घेणार नाही." ती म्हणाली.
तू डीएज होतेय, आणि मीही...
"...हे असच व्हायला हव आयुष्यात, कळलं?"
"हो गायू... लव यू." त्याने पुन्हा एकदा तिचा किस घेतला.
"चल जाऊयात आता." ती म्हणाली.
"येस. आज नाशिकचे रस्ते स्वतःच्या भाग्यावर प्रसन्न होतील." तो म्हणाला.
*****
नाशिकच्या रस्त्यांवर त्या रात्री अनेक गाड्या धावत होत्या...
...अक्षरशः एक फौज गाड्यांमध्ये जात होती असा भास होत होता.
कित्येक डिफेंडर पुढे चालल्या होत्या, त्यांच्या मागे मिहिरची फरारी धावत होती...
....आणि त्याच्या मागे एक टोयोटाची सेंच्युरी.
ज्यात गायत्री आणि तो बसलेला होता.
त्याच्याही मागे एक डिफेंडरची फौज तै
नात होती.
तरन सगळ्यात पुढे होता, तर कबीर सगळ्यात मागे...
"...एवढा फौजफाटा जमा केलाय, पण आकाशातून कुणी हल्ला केला तर?" तिने विचारलं.
तो फक्त हसला, आणि थोडी काच खाली केली.
...आणि क्षणार्धात तिला घरघर ऐकू आली.
कारण पाच हेलिकॉप्टर वर उडत होते...
"..लव यू बेबी..." तिने त्याला मिठी मारली.
...तो हसला, आणि त्याक्षणी त्याच्या खळीवर तिने ओठ टेकवले.
एवढा वेळ अतिशय बैचेन असणारा तो, आता कातळ असावा असा कणखर भासत होता...
...एक अतिशय मोठं साम्राज्य, एक सामर्थ्यशाली फौज, जगातील सर्वशक्तिमान लोक त्याच्या मदतीला आणि दिमतीला देखील...
जगभरात कॉन्टॅक्टस, ड्रग आणि आर्मसच्या पूर्ण बिजनेस वर एकहाती कंट्रोल...
...आणि सोबत एखाद्या सम्राटाने जीव ओवाळून टाकावा अशी सम्राज्ञी...
तिचं नाव 'द एम्प्रेस' कधी पडलं हे तिचं तिलाच कळलं नाही, पण तिने ते स्वीकारलं...
...आणि त्या नावाला आयाम देखील प्राप्त करून दिला.
...साम्राज्याचा एकच वारस, राजा विक्रमादित्य.
"गायत्री."
"बोल."
"आपण किती दिवस झाले सोबत डान्स नाही केलेला?"
"मला नाही आठवत. तू डान्स करणं कधीचंच विसरलास."
तो विचारात गढला.
******
एक मोठा वाडा चिरेबंदी. अनेक खोल्या असलेला.
तिथे एक खुर्ची मध्यभागी.
समोर अनेक लोकांचा जत्था उभा.
मध्यभागी एक माणूस बसलेला...
उंचपुरा. लांब केस असलेला, दाढी न वाढवलेला.
...लांब तरतरीत नाक, गोल चेहरा, आणि गंभीर भाव.
"दादा, तुम्हीच सांगा काय करायचं? जनता कल्याण पक्ष वेड्यासारखा पैसा ओततोय प्रत्येक निवडणुकीत. पूर्वी आमदारकीची निवडणूक एक दोन कोटीत सहज व्हायची. आता वीस वीस कोटीपर्यंत ते पैसा ओतताय."
"दादा नाशिक फक्त दादासाहेबांनी दिलेला उमेदवार निवडून द्यायचं. आता मात्र कोण निवडून येईल, हे ब्रह्मदेव सांगू शकत नाही... इतक्या युत्या आणि आघाड्या झाल्या आहेत, की उमेदवारी कोणाला मिळेल नाही सांगता येत."
"...मुद्दा हा नाहीये, की कोण निवडून येईल. मुद्दा हा आहे, की नाशिकमधील तीस जागा कोणाच्या पारड्यात पडतील.
प्रत्येकाने आपापले सुभे बांधून ठेवलेत. नाशिक फक्त हँगिंग आहे. म्हणून लक्षात घ्या, नाशिकच पुढचा मुख्यमंत्री ठरवेन." तो म्हणाला.
"...दादा एकच पक्ष निवडून आला, तर नाशिकमधील कुणीही मंत्री होणार नाही. एवढं तर साधं गणित आहे..."
"...नाशिक विकास आघाडी, सर्व तीस जागा लढवेल..."
त्याने बॉम्ब टाकला आणि सर्वजण चकित झाले.
कारण तिथला प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या पक्षाशी संलग्न होता.
शेलार पूर्ण नाशिक, नगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यांवर प्रभाव टाकत होते. कमीत कमी सत्तर ते ऐंशी जागा हे जिल्हे ताब्यात ठेवत असत.
मात्र त्यांना अजूनही पक्षाची कवचकुंडले हवी होती.
खिचडी तर आधीच झाली होती. मात्र त्यावर मोक्ष फोडणी टाकायच्या विचारात होता...
...आणि आजपर्यंत तो अशक्य ते शक्य करून दाखवत होता, त्यामुळे त्याला गंभीरपणे घेणं भाग होतं.
"चला या आता. विचार करा." तो उठला आणि आत जायला निघाला.
लोकदेखील लगबगीने निघाले.
मोक्ष आत आला.
"शरा..." त्याने आवाज दिला.
एक प्रौढ बाई समोर आली.
"आवाज काय देतोय, आवरतेय ना ती."
"म्हणून आवाज देतोय. साक्षी आलीय ना?"
"तुझी साली, तुला माहिती?" तिने खांदे उडवले.
"काकू तुम्ही माझी बायको आल्यापासून मला सावत्र वागणूक देत आहात." तो लटक्या रागाने म्हणाला.
"नाही रे माझ्या राजा. तू तर मला सगळ्यात जास्त प्रिय आहेस."
तो हसला.
"शरा..." त्याने आवाज दिला.
"आवरलं, आवरलं..." ती म्हणाली. "आणि तू काय असाच येणार आहेस?"
"वाईट काय आहे? माझं लग्न थोडीच आहे?"
"मोक्षा... एकदा झालं आहे ना. पुन्हा का करायचं?"
"अग मग चल ना. तसंही मी बेगानी शादी में अब्दुला दिवाना बनून चाललोय."
"असं?"
"हो माझा काय संबंध."
"कारण प्राजक्ता एंटरप्रायजेस तुझी कमीत कमी वीस टक्के ह्युमनपॉवर वापरतं, आणि त्याचे वीस टक्के आम्ही फक्त कन्सल्टनसी चार्जेस म्हणून तुला देतो. आता तूच अकाऊंट बघ. "
साक्षी त्याच्या मागेच उभी होती.
"मी इतकाही मोठा हिरो नाहीये,की माझ्या बायकोच्या एक्स च्या वाढदिवसाला मी आनंदाने जाईन."
"अच्छा?"
"हो. तसही तो अस्तित्वात आहे की नाही, आय डाऊट. आजही गायत्रीच केक कापेन बहुतेक."
साक्षी विचारात पडली, आणि तिने गायत्रीला फोन लावला.
...गायत्रीने फोन उचलला. तिचा उसासा साक्षीला स्पष्ट ऐकू गेला.
"गायत्री. इज द घोस्ट हीयर?"
"इन्साईड मी." गायत्रीने फोन ठेवला.
"फ*" साक्षीच्या तोंडातून शब्द बाहेर पडले, आणि ती मोक्षकडे वळून म्हणाली.
"द घोस्ट इज हियर! येणारेस तू?"
त्याने फक्त मान हलवली.
****
हॉटेल मुनब्लास्ट...
प्राजक्ता एंटरप्रायजेस पेक्षा फक्त एक फूट कमी उंची असलेली बिल्डिंग...
...मात्र या हॉटेलने अख्ख्या भारताला भुरळ घातली होती...
एकीकडे निऑनच्या आकर्षक लाइट्स, त्याचा मनसोक्त वापर...
...दुसरीकडे गॉथिक शैलीत सजवलेले रूम्स...
... तिसरीकडे जॅपनीज पद्धतीने सजावट केलेलं हॉल...
....आणि भारतीय पद्धतीने देखील.
सर्वात वरच्या मजल्यावर एक भलामोठा पार्टी हॉल. त्यात मध्यभागी एक तीस बाय तीसचा डान्स फ्लोर...
एकावेळी पाचशे गाड्या बसतील अशी पार्किंग...
... त्याचा ताफा हॉटेलजवळ पोहोचताच सिक्युरिटीची तारांबळ उडालीच. मात्र त्यांना माहिती होतं, की त्यांना काहीही करावं लागणार नाही.
त्याची फौज सगळं मॅनेज करणार होती.
सगळ्यात आधी डिफेंडर ओळीने सी आकारात उभ्या राहिल्या. त्यात मध्यभागी मिहिरची फरारी त्याने पार्क केली...
...त्याच्याच बाजूला सेंच्युरी पार्क झाली.
गायत्री आणि तो उतरला...
आणि त्याचक्षणी रायफलधारी तुकडीने त्यांना कवर केलं.
मिहीरच्या शेजारी तरन होता, आणि गायत्रीच्या शेजारी कबीर.
दोघांच्या मध्यभागी तो...
...गायत्रीने आपली गन कबीरला दिली.
...आणि त्याने आपली गायत्रीला...
याचाच अर्थ तो आज तो असुरक्षित होता आणि ही असुरक्षितता त्याने स्वतः निवडली होती.
...पण सर्वजण निर्धास्त होते.
कारण गायत्री त्याच्या सोबत होती...
*****
दहा बारा इनोवा, सात आठ फॉर्चुनर आणि मध्ये एक land cruiser!
त्यामध्ये मोक्ष शेलार, साक्षी आणि शरावती बसले होते.
गाडी थोडी लांबवर आली, आणि थांबली...
...अचानक.
पुढच्या सगळ्या गाड्या थांबल्या होत्या.
मोक्ष वैतागला, त्याने फोन लावला.
"खानसाहेब..."
...सगळ्यात पुढच्या गाडीतल्या एका माणसाचा फोन वाजला.
"का थांबवल्या गाड्या?"
"व्हीआयपी मुवमेंट सुरू झाली आहे, असं म्हणतात..."
"...कोण व्हीआयपी? नाशिकमध्ये सगळ्यात मोठा व्हीआयपी मीच आहे. कमिशनरला फोन लावा."
"खाली उतरून बघशील तर दिसेल, ट्रॅफिक पोलिसांचं काम कमिशनर करताय..."
...मोक्षच्या कानांवर विश्वास बसला नाही. तो खाली उतरला.
"दादा." काहीजणांनी आवाज दिला, तेही उतरले.
तो सरळ चालत समोर गेला.
खरोखर कमिशनर प्रत्येकाला सूचना देत होते. अक्षरशः निम्मा नाशिकचा फौजफाटा तिथे तैनात होता...
...नाशिकची सगळ्यात गजबजलेली चौफुली, फक्त एल आकारात वाहतुकीसाठी खुली होती.
आणि तिथूनही एकही वाहन जाऊ दिलं जात नव्हतं.
तो चालतच समोर आला, आणि एका पोलिसाच्या मागे उभा राहिला.
लांबूनच गाड्यांचा आवाज ऐकू येऊ लागला...
...त्यानंतर त्याने जे बघितलं, ते कल्पनेच्या बाहेर होतं...
...असंख्य डिफेंडर त्या एल वरून अक्षरशः ड्रॅग करून वळत होत्या...
मात्र एक फरारी हळूवार गेली...
...त्याच्याच मागे ती सेंच्युरी वळली... मोक्ष उडालाच.
कारण भारतात बघितलेली त्याने ती पहिली सेंच्युरी होती.
तीदेखील त्याच्या नजरेआड झाली, आणि पुन्हा डिफेंडर सुरू झाल्या.
तो ताफा गेला... आणि पोलिसांनी वाहतुक पुन्हा सुरू केली.
मोक्ष गाडीत बसला, आणि त्याने खानसाहेबांना फोन लावला.
"तुम्ही सर्वजण परत जा."
"का?"
"कारण ही इज वे मोर पॉवरफुल. त्याला आपल्याला काहीही करायचं असेल, तो बेधडक करेल."
फक्त ती Land क्रुजर सरळ गेली.
...बाकी सर्व यू टर्न घेऊन परत निघाल्या.
क्रमशः
Sorry पण नाही आवडला हा भाग.
Sorry पण नाही आवडला हा भाग. मोक्ष ही गुंड आणि मानसही. पण मानसला लार्जर than लाईफ करायच्या नादात मोक्षला पार छोटंसं करून टाकलं.
अर्थात लेखकाला स्वातंत्र्य आहेच. पण तरीही.
"अज्ञातवासी" ही तुमची सगळ्यात आवडलेली दीर्घकथा आहे. आणि त्याच्या हीरोला असा गुंडाळलेल पटत नाहीये.
छान झालाय भाग.
छान झालाय भाग.
मला तरी मोक्ष कुठे छोटा झालाय असं नाही वाटलं.
आताशी तर एन्ट्री झालीय त्याची
तसही असेल. बघुयात.
तसही असेल. बघुयात.
फ्रॉम लेखक - ही गोष्ट ना
फ्रॉम लेखक - ही गोष्ट ना मनूची आहे ना मोक्षची.
ही गोष्ट आहे गायत्रीची!