New OCI/OCI Renewal करून घेणे, त्यातल्या समस्या, उपाय व अतिरिक्त माहीती...

Submitted by परदेसाई on 15 January, 2020 - 11:40

https://ociservices.gov.in/welcome

इतरत्र असलेली OCI Renewal माहीती एकत्रित करून ठेवलेली आहे....
Submitted by परदेसाई on 22 October, 2019 - 09:46
पुनश्च OCI....
या वर्षी भारतात सुट्टीसाठी जाणार्‍या बर्‍याच (OCI असलेल्या) लोकांना विमानतळावरून परत पाठवले गेले अशी बातमी आहे.
कालच एका जवळच्या मित्राच्या भाचीला ही परत पाठवले गेल्याचे तो सांगत होता, तेव्हा खरे असावे.
मुळ नियमः OCI आयुष्याची वीस वर्षे पूर्ण होण्या आधी घेतले असले तर २० वर्षे पूर्ण झाल्यानंतर किंवा....
५० वर्षे पूर्ण होण्याआधी घेतले असले तर ५० वर्षे पूर्ण झाल्यानंतर, OCI Renew करणे गरजेचे आहे.
.... Part-B
१. हा नियम पहिल्यापासूनच आहे पण त्याची अंमलबजावणी होत नव्हती.
२. भारतात Immigration Officer ला विचारले असता, कशाला आजून पैशे खर्च करताय? असे उत्तर ३/४ वर्षांपूर्वी मिळाले होते.
३. अजूनही भारतात Immigration Officer ने या डिसेंबर मधे अडवले नाही..
४. ज्या लोकाना विमानतळावरून परत पाठवले गेले , त्याना विमान कंपन्यानी परत पाठवले (असावे).
५. सध्या हा नियम १ जून २०२० पर्यंत शिथील करण्यात आलेला आहे अशी बातमी वाचली (पण पुन्हा हा प्रश्न येणारच आहे).
६. OCI चा गोंधळ नको म्हणून On -Arrival Visa Online घ्यायला किमान ४ Business days द्यावे लागतात.
७. OCI Renew साठी Online Site आहे, पण ती नीट चालत नाही... (गेल्या ४ वर्षात ३/४ प्रयत्न करून सोडुन दिले आहेत).
OCI Renewal..
१. Part-A, Photo/Image Upload, Part-B अश्या तीन Steps आहेत.
२. प्रयत्न सुरू करण्यापूर्वी आपल्या घरातल्या सगळ्यांचे पासपोर्ट, सगळ्यांचे OCI, आणि सगळ्यांचे जुने भारतीय पासपोर्ट हाताशी ठेवा.
३. Part-A केव्हाही भरता येतो. तो भरल्यानंतर मिळालेला Temporary ID जपून ठेवा.
४. Photo/Image Upload इथे सगळ्यात मोठी गोची आहे. Photo/Image वर बरेच नियम आहेत. (Pizel size, aspect Ration, file size) इत्यादी. हे सगळे करूनही जवळपास २ तास घालवले तरी Photo/Image Upload होत नव्हती. याच कारणासाठी मी प्रयत्न सोडला होता.
५. सगळे काही ठिक असूनही, Submit केले तर पुन्हा Photo/Image Upload पान परत येते, आणि एकही Error message दाखवला जात नाही (तुम्ही गाढव आहात, तुमचा Photo चुकीचा आहे, फालतूगिरी करू नका, आम्ही झोपलो आहोत असले काहीही नाही).
६. Internet वर बर्‍याच लोकांनी प्रश्न विचारले आहेत, पण कोणत्याही साईटवर त्याचे नीट उत्तर नाही.
७. एका ठिकाणी उत्तर मिळाले.. ( भारतात Business Hours असतील तेव्हाच Photo/Image Upload करता येते)...
८. आज इथे अमेरिकेत पहाटे ५:५० ला Photo/Image Upload झाली.
९. Part-B आज सुरू केला आहे. ८ वाजता प्रयत्न केला पण पुर्ण झाला नाही. कदाचित भारतात Business Hours असतील तेव्हाच होणार असेल. उद्या पहाटे परत करून बघणार आहे.
....
....
Internet वर अशी साईट (फक्त Business Hours मधे चालणारी) बघितली नव्हती.. ..
आणि असली तरी 'We are sleeping , come tomorrow,' किंवा 'कल आना' असा Message द्यायला काय होते कळत नाही....
असो.. 'मेरा भारत महान..' असल्याने पुढे प्रयत्न करण्यात येतील...
...
याचा कुणाला उपयोग झाला तर झाला म्हणुन लिहीले आहे.. आणि तुम्हाला काही आतल्या गोटातून माहिती मिळाली असेल तर मला सांगा म्हणजे माझाही त्रास / त्रागा कमी होईल...
Submitted by सुनिधी on 6 January, 2020 - 13:16
मी मागच्या वर्षात दोन वेळा हे उद्योग केले होते. आता मागच्या १-२ महिन्यांत प्रोसेस पुन्हा बदलली आहे. मेधा म्हणते तसे आता सुरूवातीलाच ओरिजिनल ओसीआय पाठवावे लागते. पूर्वी अ‍ॅप्लाय करताना फक्त कॉपीज पाठवून अगदी नंतर ओरिजिनल पाठवावे लागे व त्यानंतर दोन आठवड्यात नवीन ओसीआय येत होते. माझा दोन्ही वेळचा अनुभव असा होता की ही प्रोसेस किचकट आहे पण सीकेजीएस शी संपर्क करून सर्व शंकांबद्दल कन्फर्म माहिती काढून केले की व्यवस्थित होते. सीकेजीएसचे मेल ला उत्तरे देण्याबद्दल आणि फोनवरही माहिती देण्याबद्दल अनुभव चांगले आहेत.
https://www.in.ckgs.us/resources/pdf/Press%20Release%20OCI%20Reissuance.pdf
https://boi.gov.in/content/overseas-citizen-india-oci-cardholder
या पानावर नोट सेक्शन मधला १ बघा.
OCI card holders shall now be given Immigration clearance on the strength of their valid forign passport and OCI Registration Certificate (OCI booklet, popularly known as OCI card).

दर वेळी पासपोर्ट बदलला म्हनुन re-issue ची गरज नाही. (exception 20 and 50 age)

भारतीय पासपोर्ट सरेंडर केला तरी, तो पासपोर्ट लागतो? <<< नाही...
पण विचारलेले प्रश्न इतके संदिग्ध आहेत, की कळत नाही.... उदा...
Did you have Dual Nationality...?
इथे Except India विचारलेले नाही. त्यामुळे मी आधी हो म्हटले.. म्हणुन पासपोर्ट नंबर विचारला.... मी घाबरून जाऊन जुना पासपोर्ट शोधला.
नंतर मी विचार करून 'नाही' म्हणालो..

एका ठिकाणी OCI Reference No. विचारला (तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा)... आता OCI Reference No. कुठे सापडला नाही.
(12 Alpha Numeric) मग मी File No. वापरला... जो १२ अक्षरांचा होता...

असल्या भानगडी बर्‍याच आहेत.. त्यामुळे गोंधळ उडतो...

चला... आता १ भाग पूर्ण झाला....
आता in.ckgs.us वर इतर मारामारी करू...
अर्ज Online भरा. मग एक Web Reference दिला जाईल.. तो जपून ठेवा.
आता बर्‍याच गोष्टी छापुन ठेवायला लागतील...
१. म्हणजे Affidavit in Lieu of Originals.. हे नोटरी समोर सही करून घ्यायचे आहे.. त्यात US passport copy पाठवतो/ते असे म्हटले आहे.
२. २ फोटो
३. Address Proof म्हणुन Driving License ची कॉपी.
४. CKGS ने दिलेला Payment Receipt Number/Web reference No
५. मनिऑर्डर/ बँकर चेक...
६. Fedex Label... कागद पाठवताना Fedex पाकिटावर लावायचे आहे.
७. CKGS label ... कागद पाठवताना Fedex label वर लावायचे आहे.
शिवाय...
१. OCI Renew चा छापील अर्ज सही करून..
२. OCI चे पहिले आणि शेवटचे पान कॉपी आणि सही करून.
३. Passport ची कॉपी सही करून..
४. Original OCI हे ही पाठवायचे आहे...

यात Copy केलेल्या सगळ्या कागदांवर Self Attestation म्हणून सह्या करायच्या आहेत..
Fedex ची दोन लेबल सोडता बाकी सगळे Fedex पकिटात भरून Fedex वाल्याकडून लेबलं लाउन पाठवण्याचा विचार आहे..

Submitted by परदेसाई on 7 January, 2020 - 16:23

मॅरेज सर्टिफिकेटही असेल लिस्ट मधे <<< ते फक्त भारतीय नवरा , अभारतीय बायको किंवा अभारतीय नवरा भारतीय बायको यांच्या साठी आहे..

मनिऑर्डर साठी... Cox & Kings Global Services USA LLC असा Recipient असणे आवश्यक...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

Lol तीन महिन्यांनी एका वाक्याची एक मेल येईल. एकदम इतका आटापिटा करून हेच फळं फिलिंग.
आणि पुढच्यावेळी एअरपोर्ट वर एअर लाईन कंपनी विचारेल की अपडेट केलं आहे का? त्यांना दाखवायला हातात काहीच नाही!

अमित - १५-२० दिवसांनी तू वेबसाइटवर गेलास की इण्डायरेक्टली कळते. मला लक्षात आहे ते असे - आपले रेकॉर्ड फेच करायला पासपोर्ट नं व ओसीआय नं असे काहीतरी एकत्र भरावे लागते. हे जर अपडेट झाले असेल तर नवीन पासपोर्ट नं नेच रेकॉर्ड फेच केले जाते. जुनाच टाकला तर रेकॉर्ड सापडत नाही. मला असेच समजले की अपडेट झाले आहे. मेल आली होती पण का कोणास ठाऊक आधी सापडली नाही. नंतर हे बघितल्यावर शोधली तेव्हा सापडली.

आजकाल मुळात काही विचारतात का शंका आहे. पण ही मेल किंवा या स्क्रीनची प्रिंट ठेवली तर चालेल असे वाटते.

ओह्ह. मी परत वेबसाईटवर जायचं धैर्य एकवटलं नाही Lol पण हे एकदम पर्फेक्ट आहे. कनव्होल्युटेड वे ने समजणार. सरळ सांगायचं नाहीच.

हे ओसिआय संबंधित असल्याने इथेच लिहितो.

अमेरिकेत ग्लोबल एंट्रि नावाचा एक प्रकार आहे. तुम्हि फ्रिक्वेंट ट्रॅवलर असाल तर एअर्पोर्ट सिक्युरिटिला (टिएसए प्रिचेक) वेगळी छोटि रांग असते, बूट, लॅपटॉप इ. बॅगेतुन काढावी लागत नाहित. शिवाय घरी परतताना कस्टम+ इमिग्रेशन पटकन होते. फक्त कियॉस्कवर आपला चेहेरा स्कॅन करुन इमिग्रेशन ऑफिसरचं वेलकम होम स्विकारायचं आणि दोन मिनिटांत आपण बाहेर.

तसाच प्रकार भारत सरकारने भारतीय नागरिकांकरता आणि ओसिआय धारकांकरता सुरु केलेला आहे. फास्ट ट्रॅक इमिग्रेशन - ट्र्स्टेड ट्रॅवल प्रोग्रॅम. प्रोसेस सध्यातरी सोप्पी आहे. माझं अप्रुवल २ दिवसांत आलं. पुढच्या महिन्यांत मुंबई एअर्पोर्टवर बायोमेट्रिक केल्यावर प्रोसेस कंप्लीट होइल. त्याचा अपडेट देइन आल्यावर...

<< घरात इतर कोणी ओसी आयला अप्लाय केले आहे का ? हो उत्तर दिले तर माहीती विचारतात जी नवीन अ‍ॅप्लीकेशनच्याच एव्हढी आहे. >>
------ येथे "नाही " उत्तर लिहील्यावर पुढचे प्रश्न येत नाही.
हा प्रश्न कशासाठी आहे? बहुधा " in process application " असा असावा.

<< तीन महिन्यांनी एका वाक्याची एक मेल येईल. एकदम इतका आटापिटा करून हेच फळं फिलिंग.
आणि पुढच्यावेळी एअरपोर्ट वर एअर लाईन कंपनी विचारेल की अपडेट केलं आहे का? त्यांना दाखवायला हातात काहीच नाही! >>
------ OCI अपडेटचे सोपस्कार पूर्ण झाले नसले तरी त्यामुळे OCI धारकाला प्रवास करतांना कुठलाही अडथळा/ त्रास व्हायला नको.

" There will be no restriction on the OCI Cardholder to travel to/from India during the period from the date of issue of new passport till the date of final acknowledgement of his/her documents in the online system. "

आज वसुबारसेच्या मुहुर्तावर माझे OCI Card आले. हुश्श!
नवर्‍याचे अजून यायचे आहे.
आता मुलाच्या पाठीशी लागेन करुन घे म्हणून.

माझ्या लेकाचं पण महिन्याच्या आत आलं.
भारतात फार कटकट आहे ओसीआय करायला. त्यामानाने इथे प्रोसेस फारच सोप्पी आहे.

हा प्रश्न कशासाठी आहे? बहुधा " in process application " असा असावा. >> हो फक्त तसे लिहिलेले नाहिये. "तुम्ही आत्मनिर्भर व्हा नि तुमचे तुम्हीच समजून घ्या" असा मामला आहे सगळा Wink आम्ही अजूनही कतारमधेच आहोत अपडेट बद्दल.

I also applied for Fast Track Immigration 9 days ago. They asked for proof of address in India which I thought was not needed since I live outside India. I sent them a copy of the latest electricity bill for the home in India - not required to be in my name - yesterday. I got the approval today.
Biometric will be completed at Mumbai airport when I go to India next.

I am trying to minimize any interaction with Indian or US government if I can.

इंग्रजीतून लिहिल्याबद्दल क्षमस्व पण आळस.

Pages