मन सुद्ध तुझं

Submitted by rmd on 20 December, 2021 - 14:28

mansuddhatuza.jpg

एबीपी माझा वर 'मन सुद्ध तुझं' नावाची मालिका ३ ऑक्टोबरपासून दर रविवारी सकाळी १०.३० / रात्री ८ वाजता सुरू झाली आहे. यात प्रमुख भूमिकेत स्वप्निल जोशी असून त्याने यात मानसोपचारतज्ञाची भूमिका केली आहे. दर एपिसोड मधे एक वेगळी केस तो सोडवतो. प्रत्येक एपिसोडमध्ये मराठी चित्रपट / मालिकांमधले वेगवेगळे चेहरे दिसतात. साधी, थोडीशी बाळबोध पण मनोरंजन करणारी ही मालिका वाटते आहे. काही काही केसेस अगदी जवळच्या माणसांत, नातेवाईकांत पाहिल्यासारख्या रिलेट होतात. आधीचे एपिसोड युट्युबवर उपलब्ध आहेत.

इतर माहिती -
कथा : डॉ. नंदू मुलमूले
पटकथा-संवाद : प्रशांत दळवी, गीत दासू
दिग्दर्शक : चंद्रकांत कुलकर्णी

या मालिकेबद्दल चर्चा करण्यासाठी हा धागा.

Group content visibility: 
Use group defaults

मुळात महारास्ठ्रात सध्याच्या परिस्थितीत उद्भवणा रे प्रश्न घेतले आहेत. व लोकांचे अ‍ॅक्टिन्ग भाषा एकद्म ऑन पॉइन्ट आहे. नीना कुलकर्णी च्या पात्रासारखी भयानक गिल्ट डोक्यावर घेउन जगायचा प्रयत्न करणा रे लोक्स आहेत. व प्रतीक्षा लोणकर सारख्या आया सुद्धा. त्यात आपले प्रतिबिंब दिस्ते का हे मी शोधत होते.

दोन वर्शा खाली माझी नणंद कॅन्सर ने गेली. ती कॅन्सर ने आजारी होती हे आम्हाला अधिकृत रीत्या सांगितलेच नव्हते त्यामुळे आम्ही जे बोललो त्याचा विपर्यास करून त्या फॅमिलीने तिच्या लवकर जाण्याचा गिल्ट माझ्यावर लादला. बर त्यांना कोप व्हायला ह्यात मदत होत असेल तर
ते ही सहन करू म्हणून मी स्वतःची समजूत घातली पण भयानक गिल्टी वाटूण सहा महिने वर्श अगदी विचित्र गेली. आता त्यांचे वागणे सुधारले आहे पण माझे इमोशनल डॅमेज झाले ते आहेच ते कुठे गेले नाही. असे इशू अ‍ॅड्रेस करायला सीरीअल ची मदत झाली. आपण वागलो ते चुकले नाही असे थोडे व्हॅलिडेशन मिळा ले.

प्रतीक्षा लोन कर च्या कॅरेक्टर सारखी पण माझी स्थिती झाली असती पण सेपरेशन इशू पहिलेच व्यवस्थित हँडल करावे लागले त्यामुळे तसे झाले नाही पण व्हेरी मच रिलेटेबल.

साठीच्या जवळ मनात इतके लेयर झालेले असतात की त्यातून इशूज सुधारणे अवघड असते. कधी कधी थेरपी चीच गरज असते.

ओह, अमा!! बिग हग. विपर्यास करणारी मंडळी आजूबाजूला असली की तगणं तसंही कठीणच असतं. त्यात मृत्यू इ दु:खदायक परिस्थिती आली तर अजूनच कठीण. त्यातून तरलात. तुमचे कौतुक करावे तेवढे थोडे. तुमच्यासारखे बळ सगळ्यांना मिळो हीच सदिच्छा!

बापरे! अमा, काय काय सहन केलंत! बिग हग रिअली.
या धाग्यामुळे तुम्हाला थोडीशी का होईना पण मदत झाली हे वाचून मनापासून बरं वाटलं.

अतिशय आवडलेली मालिका. मानसिक आरोग्यावर प्रबोधन पर असलेली वास्तववादी मालिका. इथे सर्व भाग पहायला मिळतील
https://youtube.com/playlist?list=PLh0Ol8Y0tIRRBXebvqlMqyXgGtr9Tdc-x&si=...

'मन सुद्ध तुझं' मालिकेचा सीझन २ नुकताच संपला. या सीझनमधे स्वजो ऐवजी सुबोध भावे आहे डॉक्टर. हा सीझन पण चांगला वाटला. प्रभावळकरांचा, निर्मिती सावंतचा आणि अजून एक 'डाएट करणार्‍या बाईचा' हे एपिसोड्स आवडले. ज्यांना आधीचा सीझन आवडला होता त्यांना हा ही आवडेल असं वाटतं.
या सीझनची प्लेलिस्ट सापडली नाही. मी इथे पहिल्या भागाची लिंक देते आहे. तिथून पुढे बाकीचे एपिसोड्स शोधता येतील. हा सीझनसुद्धा १३ भागांचा आहे.

ही पहिल्या भागाची लिंक -
https://www.youtube.com/watch?v=ImbkcpjYWVo

प्रभावळकरांचा, निर्मिती सावंतचा आणि अजून एक 'डाएट करणार्‍या बाईचा' हे एपिसोड्स आवडले >> +१.

मला, का कुणास ठाऊक, पण स्वजो जास्त आवडला होता त्या भूमिकेत. एरवी फारसा आवडत नाही तो.

Pages