तवशाचे तुकडे - २ वाट्या
लाल मोहरीची पूड - २-३ चमचे
ऊकळून गार केलेले पाणी - अर्धी ते पाऊण वाटी
पोपटी मिरच्यांची भरड - १ टे. स्पून
मीठ - चवीनुसार
फोडणी:
तेल - ४-५ टी. स्पून
मोहरी
हिंग
हळद
१. तवशाची साल आणि बिया काढून त्याचे १ से.मी. चे क्यूब्स करावे
२. पोपटी मिरच्या भरड वाटाव्यात. दगडी खलबत्त्यात वाटल्यास मिरचीहून हिरवे. नाहीतर मिक्सर आहेच.
३. मोहरीची बारीक पूड पाण्यात घालून फेटून घ्यावी
४. त्यातच मिठ घालून घ्यावे
५. हे पाणी, तवशाचे तुकडे, मिरचीचा ठेचा एकत्र करून चांगले ढवळावे
६. गार झालेली फोडणी घालावी
१. तवशे हे माशांशी र्हाइमींग असले तरी ते मासे नव्हेत याला श्रावण काकडी असेही म्हणतात.
२. तवशाबद्दल अधिक माहिती गजाने दिली होती. बाफ सापडल्यास लिंक देण्यात येईल.
३. आम्हाला तिखट मिरच्याच लागतात - असे म्हणून लवंगी अथवा काळसर हिरव्या मिरच्या वापरू नयेत. यातली मिरची फक्त स्वादाला आहे. तिखटपणाला नाही.
४. तुमच्या भागात लाल मोहरी मिळत नाही? Import करा. पण काळी मोहरी वापरू नका.
५. मोहरी फेटताना आधी आपल्या क्षमतेचा अंदाज घ्या. चढलेली मोहरी नाकात मस्त झिणझिण्या आणते.
६. फोडी करकरीत असतानाच या लोणच्याची मजा असते. त्यामुळे ४ दिवसांच्या वर ठेऊ नये. फ्रिजमध्येच ठेवावे.
७. लोणचे बनवताना मिठ ठसठशीत असावे. दुसर्या दिवशी ते नॉर्मल होते.
८. घेताना नुसतेच किंवा दह्यासोबत खावे आणि भाजीच्या प्रमाणात खावे
फेसलेल्या मोहोरीमुळे डोळे
फेसलेल्या मोहोरीमुळे डोळे कपाळात चढलेत असं वाटलं नाही तर तो फाऊल समजावा खुश्शाल!
आई मस्त करते हे लोणचं. ते खाऊन माझी मैत्रीण पहिल्या घासातच आऊट झाली होती. नाक झिणझिणतंय म्हणून कुरबुरत बसली होती.
तवशाला आमच्याकडे मेणी काकडी
तवशाला आमच्याकडे मेणी काकडी म्हणतात , मोठ्या अन लाम्ब बिया असतात यात.
करुन बघतो. अजुन एक दोन
करुन बघतो. अजुन एक दोन काकड्या आहेत शिल्लक.
आधी लाल मोहरी शोधतो.
मस्त रेसिपी.
मस्त रेसिपी.
तवशाचं लोणचं करतात माहीत
तवशाचं लोणचं करतात माहीत नव्हतं. धोंडस माहीत आहे, खाल्लं आहे आणि केलंही आहे. हल्लीच तवसोळे हा प्रकार फेसबुक रील मध्ये पाहिला. अंजू म्हणतात , ती पानगी हीच असावीत.
रेसिपी आवडली. टीपा अधिक आवडल्या.
फायनल प्रॉडक्ट चे फोटो डकवले
फायनल प्रॉडक्ट चे फोटो डकवले असते तर थोडी डोळयांना पण आयडिया आली असती
आमच्याकडे ह्याला वाळकं
आमच्याकडे ह्याला वाळकं म्हणतात
भरत, मी पानगी नाही, पातोळे
भरत, मी पानगी नाही, पातोळे लिहिलंय, तवसोळे रील बघितलं नाहीये मी (पानगी म्हणत असतील पण माहीती नाहीये मला, पानगी केळीच्या पानात भाकरी थापून भाजतात त्याला म्हणतात आमच्याकडे). आमच्याकडे पातोळे स्टफड करत नाहीत. काकडी किस, तांदूळ पीठ,गुळ, ओलं खोबरे एकत्र शिजवून हळदीच्या पानात थापतात, माहेरी ओलं खोबरं ऑप्शनल, सासरी मस्ट पण मला ते घालावं असं वाटतं, छान लागते.
बाबा गणपतीत कोकणात जायचे तेव्हा मोठं तवस आणि हळदीची पाने घेऊन यायचे. दोन तीन वर्षांपूर्वी भावाने आणलेले हे तेव्हा केलेले पातोळे, फोटो आहेत, पोस्ट करते इथे सवडीने.
(No subject)
लोणचे बाफ वर पातोळे, सॉरी. तवस कारणीभूत. फोटो खास नाहीत पण समजेल साधारण. तवस खूप मोठं असतं, त्याचा फोटो नाहीये.
अंजू, बरोबर पानगी वेगळी. आता
अंजू, बरोबर पानगी वेगळी. आता पानगी आणि पातोळे एकच का वेगळी ते आठवत नाही.
तवसोळे म्हणजे काकडीचा कीस घालून केलेले घावण
https://fb.watch/vgmedTwOEH/
हा प्रकार कधी खाल्ला नाही
हा प्रकार कधी खाल्ला नाही अजून. पण तवस कुठे मिळणार इथे? वरच्या फोटोत काकड्या आहेत त्या मिळतात. त्याचं करून बघते.
पातोळे हळदीच्या पानात करतात ना? पानगी केळीच्या पानात.
(आम्ही 'पातोळे...आम्ही हो पातोळे ' असं गाणंही म्हणायचो )
अन्जू, आमच्याकडे पण तवशाचे
अन्जू, आमच्याकडे पण तवशाचे पातोळे (हळदीच्या पानात) आणि केळीच्या पानात पानगी असेच असायचे. पण आई पानगीचे पीठ भाकरीसारख नाही तर इडलीच्या बॅटरसारखं सरसरीत भीजवायची. पाण्याऐवजी दूध असायचं. थोडा गूळ का साखर (नक्की आठवत नाहीये आता पण पानगी पांढरीशुभ्र असायची म्हणजे बहुदा साखरच असेल) घालायची - गोड होण्याएवढी नाही, फक्त किंचीत गुळमट होण्याइतपतच. मला ती नुसतीच खायला आवडायची. घरचं लोणी असेल तर अजून स्वर्गसुख.
ही तवशी.. ही जेव्हा लागतात
ही तवशी.. ही जेव्हा लागतात तेव्हा पांढरट असतात. मोठी होतात तेव्हाही पांढरट असतात, पिकत आली की शेण्दरी पिवळी होतात. ही शिजवुन खावी लागतात, कच्ची खाल्ली तर फारशी चव लागत नाही. काकडीच्या कुटूंबातलीच पण जरा वेगळी.
साधना आमच्याकडचे तवस अजून
साधना आमच्याकडचे तवस अजून लांबलचक आणि जाड टाईप असायचं. हिरवट रंग नुकताच पिवळट केशरीपणाकडे गेलेला असायचा त्यावेळी बाबा आणायचे म्हणजे गणपती करुन यायचे तेव्हा तवस असं झालेलं आणायचे.
पातोळे झाल्यावर, आई रायतं करायची आणि त्यातून उरलेली काकडी आम्ही खायचो तिखट मीठ लाऊन. चांगली लागायची.
ती वेगळी जात असेल.
ती वेगळी जात असेल. माह्ह्याकडे २ वर्षापुर्वी लागलेले ते हिरवे होते, माधवच्या फोटोतल्यासारखे. ते आलेय याचा आम्हाला पत्ता लागला नाही. बाग साफ करायला बाया आल्या त्यांनी दिले. त्याचा हिरवा रंग कायम होता पण पिवळट बनत चाललेला. ते ४ महिने मी तसेच ठेऊन दिले. त्या वर्षी ३ भोपळे पण लागलेले. तेही खुप महिने तसेच राहिले.
हेच अगदी
हेच अगदी
पळसाच्या पानात आई बनवायची उकडीच्या मोदकांसारखी
यालाच आम्ही पाणगे म्हणत असू
अन ह्या काकडीला वाळकं
भोपळे पूर्वी शिंकाळ्यात
भोपळे पूर्वी शिंकाळ्यात टांगून ठेवत ते रहायचे बरेच महिने. तवशी पण अशी झाडावरून (वेल) काढल्यावर राह्ते का बरेच महिने?
हो… टांगुन ठेवलेली बरी पण
हो… टांगुन ठेवलेली बरी पण अशीही राहते.
माझ्याकडे अजुन ५ आहेत बाहेर
माझ्याकडे अजुन ५ आहेत बाहेर बागेत. टांगुन ठेवेन अजुन काय करणार…. गावात खुप जणांकडे आहेत वेल, त्यामुळे देणार तरी कोणाला असे होते.
वा काय मस्त रेसिपी आहे.. तवशी
वा काय मस्त रेसिपी आहे.. तवशी आवडतत पण खुप आसली कि कोशिंबीर शिवाय काय करायचे हा प्रश्नच असतो..
मस्त..
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=yZLQhADKJSM
केवळ आमच्याकडचे तवस कसं असतं दाखवण्यासाठी स्वानंदीचा हा vlog शेअर करतेय. सेम मोठी अशी काकडी असते, ही हिरवी जास्त आहे, बाबा आणायचे तेव्हा केशरी होत चाललेली असायची.
https://www.youtube.com/watch
मी पूर्ण vlog आत्ता बघितला. फक्त तवस् बघून वरची पोस्ट लिहिलेली. इथे तिने तवस लोणचे आणि पातोळे दाखवले आहेत. माझ्या माहेरी करतात तसे आहेत पातोळे, ओलं खोबरे न घालता केलेत. मी सगळं आधी शिजवून घेते मग हळदीच्या पानात परत थापते आणि शिजवते.
Pages