Submitted by उपाशी बोका on 14 October, 2024 - 02:56
साधारण नोव्हेंबरच्या ३ ऱ्या आठवड्यात कुठेतरी भटकायला/ट्रेकिंगला जायचा विचार आहे, म्हणून अन्नपूर्णा बेस कॅम्प ट्रेक करायचा विचार करत आहे. (केवळ १ जण). कुणी हा ट्रेक केला आहे का? ही वेळ योग्य आहे का की थंडी असेल? ग्रुप बरोबर जावे की एकटे? (पोर्टर सोबतीला घेऊन जाणार आहे.) कुठल्या ट्रेकिंग कंपनी चांगल्या आहेत? Trek the Himalayas कंपनीचा काही अनुभव आहे का?
किंवा दुसरा पर्याय म्हणजे Indiahikes.com चा हर की दून हा ट्रेक करावा का?
याव्यतिरिक्त इतर कुठले ट्रेक करता येतील का (साधारण ७-१२ दिवस, easy/medium difficulty) किंवा इतर काही माहिती/सूचना/सल्ले देऊ शकाल का यासाठी हा धागा काढला आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/2240
मायबोलीवर शोधले होते, कुठेही
मायबोलीवर शोधले होते, कुठेही माहिती मिळाली नाही.
Trek the Himalayas कंपनीचा
Trek the Himalayas कंपनीचा काही अनुभव आहे का? <<<>>>> उत्तम आहे. आम्ही तिघांनी मिळून एकूण ७ ट्रेक्स केलेले आहेत. त्यातले ५ डिफीकल्ट होते. व्यवस्था चांगली असते. सगळे गाईड्स बेसीक माऊंटेनिअरींग कोर्स केलेले असतात. लीड गाईड अॅडव्हान्स कोर्स केलेला असतो. हा त्यांचा नियम आहे.
बाकी ट्रेक द हिमालयाज / इंडीया हाई क्स वगैरे वर क्रायटेरीया देऊन ट्रेक्स शोधता येतात.
आता विंटर ट्रेक्स सुरु होतील. ते जनरली फार ऊंचावरचे नसतात. थंडी ( जी मायनस असते ) सहन होणार असेल तर जाऊ शकता. नाहीतर जनरली मे एंडपासून बाकी ट्रेक्स सुरु होतात. ग्रुप बरोबर जाणे चांगले. ऊंचावर बरोबर लोक असले की वेळ जातो, सोबत होते. शक्यतो माहीतगार कंपनी (ट्रेक द हिमालयाज / इंडीया हाई क्स वगैरे )कारण त्यांचं नेटवर्क ऊत्तम असतं.
मिडीयम आणि डिफीकल्ट ट्रेक करण्यासाठी चांगली शारिरीक तयारी असा यला हवी.
माहितीबद्दल आभारी आहे.
माहितीबद्दल आभारी आहे.
माहिती व ट्रेनिंग नसेल तर
माहिती व ट्रेनिंग नसेल तर एकटे जाऊ नका. गेल्या वर्षी माहितगार ट्रेकर्स थंडीत गारठले, छोटी चुक भोवली.
ट्रेक द हिमालयाजचे नाव चांगले आहे. युथ होस्टेलचेही शोधा, तोही वेगळा अनुभव आहे.
एकटा आहे म्हणजे सोबत मित्र
एकटा आहे म्हणजे सोबत मित्र किंवा कुटुंबीय, twin sharing ला कुणी नाहीये. एकट्याने ट्रेकिंग करायला मी Reinhold Messner नाहीये ओ.
एखाद्या कंपनी/ग्रुपबरोबरच जाणार.
मग ठिकाय….
मग ठिकाय….
आमचा अन्नपूर्णा ट्रेक ऐन वेळी
आमचा अन्नपूर्णा ट्रेक ऐन वेळी हवामान खराब झाल्याने रद्द करावा लागला. ऑगस्ट महिना असल्याने असेल.
त्या ऐवजी मग आम्ही माना - व्यासगुहा - भीमपूल - स्वर्गाच्या शिड्या हा ट्रेक केला. या ट्रेकला महाराष्ट्रातून आलेले लोक भेटतात. तसेच वर काही मदत लागली तर कुणी ना कुणी खालून मदतीस येऊ शकते. ट्रेकच्या रस्त्यावर जोशीमठ , बद्रीनाथ ही ठिकाणे आहेत. जोशीमठ पासून वर औली आहे. औलीला सुद्धा वर उत्तम ट्रेकींग करता येते. खाली येताना जगातील सर्वात उंचावरच्या रोप वे तून खाली येता येईल.
अन्नपूर्णा ग्लेशिअर चा ट्रेक करायचा असेल तर सगळा जामानिमा लागेल.
Trek the Himalayas कंपनीचा
Trek the Himalayas कंपनीचा ब्रह्मताल ट्रेक मी या वर्षी फेब्रुवारीत केला. धनश्री यांनी सांगितल्याप्राणे ही कंपनी खूप चांगली सेवा देते. सगळी व्यवस्था चांगली होती. खाण्यापिण्याची सोय इतकी चांगली होती की येताना एक दोन किलो वजन वाढवून आलो होतो.
हिमालयातील ट्रेक एकदा केला कि परत परत जावंसं वाटतंच त्यामुळे त्यावर फार विचार करू नका. अनुभव नसेल तर easy ट्रेक ने सुरुवात करणे योग्य.
पैसे देऊन आपलं सामान खेचरावर लादून न्यायची सोय पण असते. जर शारिरीक तंदुरुस्ती पुरेशी नसेल तर हा पर्याय निवडायला हरकत नाही. बाकी थंडीची तयारी व्यवस्थित करून जाणे. ट्रेकच्या आधी ते लोक सगळं सांगतात व्यवस्थित त्याप्रमाणे कपडे घेऊन जाणे. ब्रह्मताल ट्रेकला इतका बर्फ पडला की शेवटच्या दिवशी समिटला आजूबाजूचं काहीच दिसलं नाही. प्रचंड थंडी अनुभवली.
कोणता ट्रेक करावा यावर मी म्हणेन की एकेक करून जमतील तसे सगळेच करा.
ट्रेक द हिमालय चा माझाही
ट्रेक द हिमालय चा माझाही अनुभव चांगला आहे
मी कांचनगंगा बेस कँप ट्रेक केलेला
मस्त बडदास्त ठेवतात, खायची प्यायची चंगळ असते
म्हणजे ट्रेकर च्या मनाने कारण आमच्याच ट्रेक ला त्या खाण्याला नावे ठेवणारीही लोकं हो
खायची प्यायची चंगळ असते <<<>
खायची प्यायची चंगळ असते <<<>>>> अगदी. बाली पासला आम्हाला शेवटच्या दिवशी गरमागरम सामोसे पण मिळाले होते.
अर्थात जिथे जाणार आहोत त्या ठिकाणावरही अवलंबून असतं. मागच्या वर्षी नवर्याने केदारताल ट्रेक केला. त्याचा रस्ता खूप अरुंद असल्याने तिथे खेचरे जात नाहीत. सगळे सामान पोर्टर वाहून नेतात, शिवाय पहीले २ दिवस कँप साठी सपाट, मोकळी जागा नाहीये, म्हणून खाण्याचे ऑप्शन्स जरा कमी होते.
लेकाने आणि मी फ्रेंडशीप पीक केलं तेव्हा त्यांचा खाण्याच्या वेळेचा अंदाज जरा चुकला. पण जोरदार पावसात, पावलाएवढ्या बर्फात टेंट असतांना गरमागरम राजमा चावल वाढले होते आणि जेवण प्रत्येकाला टेंटमध्ये नेऊन दिले होतं.
पण मला मुख्य त्यांची जी गोष्ट आवडते ती की त्यांचे सगळे गाईड्स सर्टीफाईड असतात. शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलेले असतात. बाकी आठ एक दिवस खाण्यापिण्या त जरा वरखाली झाले तर ते ठिक आहे.
The trek was well-organized,
I recently completed the Annapurna Base Camp trek with Trek The Himalayas, and it was an unforgettable experience. The journey took us through diverse landscapes—from lush rhododendron forests to terraced fields and serene alpine meadows. The views of peaks like Machhapuchhare and Annapurna South were absolutely breathtaking.