बिगबॉस हिन्दी : सिझन १८

Submitted by दीपांजली on 8 October, 2024 - 02:01

मराठी बिगबॉस वर चर्चा ही सुरु झाली म्हणून कन्टिन्यु करण्या साठी हा धागा !
यावेळी बरेच काँट्रोव्हर्शिअल लोकं आहेत , पॉलिटिकल डिस्कशन्स करायला पूर्वी मनाई होती, यावेळी खुल-ए-आम डिस्कस करत आहेत !
Btw यावेळी बिबीच्या अंगणात गाढव आणून बांधलय ते ऑडियन्सचे प्रतीक का Biggrin

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डॉ + अ‍ॅड सदावर्ते साहेब डेंजर माणुस आहे.
आज मोठी मोठी पॉलिटिकल नावं घेऊन थेट त्यावेळच्या महाराष्ट्र सरकार्वर निषाणा साधला, आश्चर्यच वाटलं .. पूर्वी बिगबॉस म्युट करायचे फेमस लिडर्सची ची नावे, खूप एन्टरटेनिंग आहेत वकिल साहेब !
रजत दलाल हा एक क्रिमिनल आणुन ठेवलाय, किती मारामार्‍या होणार तेच बघायचं आता !
बग्गा माणुस पण काँट्रोव्हर्शिअल असून एन्टरट्र्निंग आहे.
लाइफ कोच आफरीन खान आणि त्याही पेक्षा त्याची बाय्॑को प्रॉमिसिंग वाटले एकदम.
बाकी बायका सगळ्या एका साच्य॑तून काढल्या सार्॑ख्या बोरींग आहेत !
शिल्पा शिरोडकरचे तर काहीच प्रेझेन्स दिस्॑त नाहीये.

मला यातला करण माहित आहे.. खतरोंके.. जि़कला म्हणुन.. पण छान खेळला तिथे अन माणुस म्हणुन पण बरा वाटला.
तो बग्गा ला काल शिव्या देत होता त्याने खरच त्या बाईक वाल्याचा अ‍ॅक्सिडेंट केला होता ना? न्युज मध्ये व्हिडियोवर दाखवत होते.. अन हा एकदम शिव्या द्यायला लागला बग्गा ला... घर खुप छान वाटलं.. सगळ्यांना सकाळी उठवायला यावेळी गाढव ओरडणार वाटतं गाणी नाहि लावणार... श्रुतिका मज्जा आणतेय बोलण्यात Happy

अधे मधे एखद दोन एपिसोड तेही पळवत बघतेय . सध्या तरी फार मजा नाही, सदावर्ते, करणवीर, विवियन,श्रुतिका, हेमा( व्हायरल भाभी) हे उठून दिसले कन्टेन्ट आणि फुटेज च्या बाबतीत. बाकी स ग ळ्या मुली महा मठ्ठ आणि बोरिंग. त्या अंगणातलं गाढव त्यांच्यापेक्षा एन्टरटेनिंग आहे.
रजत निव्वळ गुंड वाटला. धमक्या वगैरे देतोय.

हया धाग्यावर प्रतिसाद नाही म्हणून दिसला नाही बहुतेक, पण धागा उडवता येत नाहीये.

बिग बॉस १८ सुरु होऊन चार दिवस झाले धागा दिसेना म्हणून मीच काढला, १८ लोक आहेत सध्या मला जसे वाटले तसे ..
ह्यावेळी एक जण फक्त सोशल मीडिया वाल आहे, मराठी बिग बॉस वरुण धडा घेतलेला दिसतोय. बाकी चर्चा करुच हया धाग्यावर
1) रजत दलाल: हा एक वेटलिफ्टर आहे भारतासाठी खेळलेला आणि गरम डोक्याचा आणि वाद वैगेरे असणारा आहे बिग बॉस मधे पण तसाच वागतोय पण उगाचच भांडण काढणारा वाटतोय 2) तजिंदर सिंग बग्गा : राजकारणी आहे प्रेमळ दिसतोय आल्या आल्या एका टास्क मुळे स्वतःहून जेल मधे गेलाय खरच प्रेमळ आहे सध्यातरी.
३) शिल्पा शिरोडकर: घर सांभाळणारी आई चा रोल चालूआहे सध्या ४) चाहत पांडे: सिरियल ची लीड आहे साधी आहे असा दाखवणारी रडकी पण स्ट्राँग आहे जाईल पुढे
५) शेहजादा धामी: रियालिटी शो केलेला आणि सीरियल मधून काढून टाकलेला थोडक्यात त्याच्यावर अन्याय वैगेरे झालेला आहे असा बोलत होता सिक्स पॅक च्या घोळक्यातल्या वाटतो
६) अविनाश मिश्रा: हा पण सिरियल एक्टर आहे ह्याच्यावर पण अन्याय झालाय बहुकेक चाहत कडून
७) विवियन डिसेना: सिरियल केलेलं जास्त ओव्हरक्टिंग करणारा मला तरी सिद्धार्थ शुक्ला ला कॉपी करतोय असा वाटतोय ८) श्रुतिका अर्जुन : साउथ एक्टर आहे मी लहान बाल आहे असा दाखवते आहे आणि थोडी थोडी नाज ची कॉपी करतेय असा वाटतोय.पण कैमरा तिच्यावर असतो.
९) न्यारा एम बॅनर्जी: एक्टर आहे सध्या जेवण बनवते आहे बाकी काही नाही
१०) चूम दरंग: ईशान्य भारतातून आलेली एक्टर सध्या काही करत नाहीये एक सिक्स पॅक बरोबर छोटा भांडणं केलंय बाकी काही नाही ११)करण वीर मेहरा: खतरो के खिलाडी करुन आलेला सिक्स पॅक आहे लंबी रेस का घोडा वाटतोय
१२) मुस्कान बामने: एक्टर आहे दिसत नाहीये
१३) अरफीन खान: सेलिब्रेटी लाइफ कोच आहे हाई पेड ऋतिक रोशन पण तारीफ करत होता बायको बरोबर आलेला. जर वेगळा आहे भांडण सध्या तरी भांडण सोडवणे वैगेरे
१४) सारा शर्मा खान: नवराबरोबर आलेली ही पण तेच काम करते आहे उगाचच भांडण करते आहे.
१५) हेमाशर्मा : व्हायरल भाभी सोशल मीडिया वर आहे सामान्य जनतेतून आलेली आहे . ही पण पहिल्याच दिवशी उगाचच शहाणपण दाखवून जेलमध्ये गेली. बाकी लोकना खेचून घ्याचं कसा हे जमतंय वचावाचा बोलते
१६) गुणरतन सदावर्ते: महाराष्ट्रातले राजकीय सेलिब्रिटी वकील पण जिकायला आलेले नाहीत राजकारणातले किस्से वैगेरे सांगत आहे थोडक्यात बिचुकले सारखे आहेत
१७) ईशा सिंग: टीव्ही शो केलेली आहे सध्या एकीला पकडून कोपऱ्यात बसून एंजॉय
१८) ॲलिस कौशिक: एक्टर आहे ईशा बरोबर बसून टाईमपास

पेटाने म्हणे तक्रार केलीय, गाढवाचा मनोरंजनासाठी वापर करुन घेताय. इथे गाढव येऊ दिलंय मग वर्षाताई तिची माऊ मागत होती तर द्यायची होती मराठी बिग बॉसने.

७) विवियन डिसेना: सिरियल केलेलं जास्त ओव्हरक्टिंग करणारा मला तरी सिद्धार्थ शुक्ला ला कॉपी करतोय असा वाटतोय >>>> मलाही तसे वाटले.

मलाही करणवीर , हेमा , सदावर्ते आणि बग्गा एन्टरटेनिंग वाटत आहेत.
डाकुओंका वारीस सदावर्ते जाम हसवतो, काल नॅशनल टेलिव्हिजन वर मोबाइल नंबर देऊन मोकळा झाला , वर बिबॉला लपेट्यात घेतले !
मिडिया मधे अशी फवा आहे कि सदावर्तेचाही एक लाडका पाळीव गाढव आहे , त्याचे नाव मॅक्स आहे आणि बिबॉ मधे बांधलेला ‘गधराज’ हा मॅक्सच आहे, सदावर्तेचाच गाढव आहे Proud
व्हिवुअयन चॅनलचा लाडका रिअल लाइफ व्हॅम्पायर वाटतो आणि शरद पवारां सारखं तोंड करून बोलतो, करणवीर मस्तं नक्कल करत होता त्याची Biggrin
रजत दलाल क्रिमिनल आहे, त्याने बरोबर बकिल साहेबांशी मैत्री ठेवली आहे !
चाहत क्राय बेबी ट्रॅजेडी बहु सर्वात अनॉयिंग आहे पण भयंकर फुटेज घेते Uhoh

हया धाग्यावर प्रतिसाद नाही म्हणून दिसला नाही बहुतेक, पण धागा उडवता येत नाहीये.
<<<
तू अजुन एक धागा काढला आहेस का ?
हा मी सुरु केला होता प्रिमियर झाल्यावर, डिलिट फक्तं ओरिजनल धागा काढणार्‍याला करता येतो Happy

हिंदी बिग बॉस सुरू व्हायच्या आधीच मीडियात आलेलं, सदावर्ते हिंदी बिग बॉस मध्ये त्याचं गाढव घेऊन जाणार आहे, त्याचंच असेल ते.

मजा येतेय पहायला बिबॉ हिंदी यावेळचा .. ओळखीचे चेहरे माझ्या तरी बघण्यातले एक-दोन जण आहेत
काल सदावर्तेनी धमाल आणली.

तू अजुन एक धागा काढला आहेस का ?
हा मी सुरु केला होता प्रिमियर झाल्यावर, डिलिट फक्तं ओरिजनल धागा काढणार्‍याला करता येतो >>>>>
हो मी पण काल काढला धागा पण आता दिसत नाहीये बार झाल एडमिन ने डिलेट केला वाटतं…

ह्या वेळेला रिल्स्टार आणि रॅप वाले अजिबात नाहियेत , बर झाल वेठीला धरतात त्यांचे फॅन्स. मराठी बीबी ची वाट लागली बिचारी निकी आणि अरबाज लायक असूनपण विनर नाही झाले, सूरज विनर झाला म्हणून दुःख नाही पण तो काहीच न करता विनर झाला..

काल नोमिनाशन टास्क बराच बरा झाला बायका सगळ्या सेम दिसत आहेत व्हायरल भाभी आणि शिल्पा सोडली तर….बाकी बघू

विवियन खूप डोक्यात जातोय एकतर तो सिद्दर्थ ची नक्कल करतोय आणि दिसायला अजिबात क्यूट नाही. अजुन बायकांमध्ये ती साउथ ची एक्टर पण नाज ची एक्टिंग करुन आणि बालिश बनून डोक्यात जातेय.
ती नवराबायको जोडीतली बायको उगाचच भांडत होती सेलिब्रिटी लाइफ कोच आहे ह्यावर विश्वासच बसेना माझा हिला स्वतःच्या भावना आवरता येत नाही …

असो

अरे काय धमाल आणतोय सदावर्ते !
पॉलिटिकल स्टेटमेन्ट करतो, बिबॉला पुरून उरतो, कोणाची आज्ञा जुमानत नाही आणि घरच्यांना तर पारच लिंबुटिंबु समजतो , आरोळ्या देतो, उपोषण करतो ..धमाल नुसती !
कालचा एपिसोड पूर्ण त्यांच्या नावावर.. बिबॉ पण इतके इम्प्रेस्ड, त्यानी सदावर्तेचा प्रोमो बनवून घरच्यांना द॑खवला आणि नॉन अ‍ॅक्टर असून इतका ड्रामा करतायेत याचं कौतुक करून इतर अ‍ॅक्टर्स्ना टोमणा मारला बिबॉने .

सदावर्ते खरच मजा आणतोय परवा स्वतःच नंबर दिला हेमा ला आणि मग बीबी लाच सुनावलं आणि निकाल हेमाच्या बाजूने दिला इनिसंट म्हणून .
कालचा भाग काही नीट पहिला नाही . पण हेमा आणि सरदार जेलच्या बाहेर आले राशन डाव पी लगा के आता त्याना फक्त बेसिक राशन मिळणार म्हणे.
विकेंड चा वार नऊ वाजता असेल बहुतेक पण आज मैच पण आहे , वार दसरा मेळावे त्यात बीबी चा आज त्याग करावा लागणार उद्या रिपीट बघेन . तासही आज काय सलमान कोणाला बोलणार नाही आज लोकना जागेकरेल आणि सदावर्ते ला राजकारणावर बोलू नको म्हणून सांगेल काल का परवा न्यूज वार सदावर्ते ची क्लिप दाखवत होते .
बाकी सगळ्यानं दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

आत्ता बघितला मेसेज, आज नऊ वाजता वेळ नव्हता, जिओ वर बघेन रिपीट टेलिकास्ट, विकेंड वार वेळ सांगण्यासाठी थँक्स सीमा.

मुंबईत एका बड्या नेत्याची हत्या झाली म्हणून सलमानने बिग बॉसचे शूटिंग रद्द केलं अशा बातम्या येतायेत.

बाबा सिद्दिकी माणुस फक्तं राष्ट्रवादीचा नेता नाही तर बॉलिवुड मधेही खूप बडं आणि पॉवरफुल प्रस्थं होतं !
हा माणुस कोण माहित नव्हतं पण त्यांच्या ग्रँड इद पार्टीज मुळे कायम पेज ३ वर दिसायचा !
अनेक वर्षं चालु असलेली सलमान- शाहरुख दुश्मनी बाबा सिद्दिकीनेच त्याच्या इद पार्टीत मिटवली म्हणून खूप जास्तं मिडिया फेमस झाला.
बॉलिवुड हादरलय पण सलमान खान तर जास्तं हादरणारच, कारण सल्लुवर गोळीबाराचा प्रयत्नं केलेल्या विष्णोई गँगचाच हात आहे याही हल्ल्यात !

तो घाबरलाय.

एनिवे चांगला टीआरपी असून मराठी सिझन, हिंदीमुळे गुंडाळला असेल तर हा बोअर झाला तर आनंदच वाटेल मला, येऊदे टीआरपी खाली याचा.

बिग बॉस मधे कोणी eliminate झालं की त्यांचे मित्र मैत्रिणी असे रडतात की तो/ती बिग बॉस हाऊस नाही तर जग सोडुन चालले आहेत. थोडं वाईट वाटणं किंवा डोळे पाणावणे समजु शकतो पण धाय मोकलुन रडणे, panic attack येणं किंवा dead body उचलुन नेताहेत असं अंगावर पडुन रडणे is so much overacting.

Family visit च्या वेळेसही तेच. दोन्ही पार्टीज एवढ्या रडतात की युद्धभुमीवरची भेट आहे. परत भेटू न भेटू, जगु न जगु अशी परिस्थिती असल्यासारखे आक्रोश करतात. How funny ! म्हणजे इतर वेळेस शूटिंग, शो किंवा इतर कामासाठी एकमेकांना सोडुन जातच नाहीत का? इथे तर बायकांचे नवरे प्रोजेक्टसाठी सहा सहा महिने दूरदेशी राहतात. एवढेच काय आम्ही बायका देखील एकेक महिना फॅमिली पासून दूर राहतो. जाताना किंवा परत आल्यावर ती एकमेकांना hug करणं इतपत ठीक आहे, पण एवढी रडारड कधीच करत नाही.

बघतय का कोणी ?’
सिझन हिट कि फ्लॉप माहित नाही पण प्लेअर्स भारी आहेत, कोणीही मराठी बिबॉच्या लोकांसारखे फेअर खेळायचे किंवा गुडीगुडी रहायचे नाटक करत नाहीत, प्रत्येक जण एकमेकांना सतावून हैराण करून सोडतय, रुथलेस सगळे !
बिबॉने व्हिविअनला ‘लाडका’ अनाउन्स केले आसले तरी मला अविनाश सर्वात भारी प्लेअर वाटतोय, मजा येतेय त्याचा गेम बघायला.
आता त्या क्रिमिनल रजतने फिजिकल आणि शाब्दिक दोन्ही लेव्हलवर अविनाश व्हिविअनला टशन द्यायला सुरवात केली आहे , वाइलडकार्ड पण चांगलेच आगलावे घर डोक्यावर घेणारे आलेत !
करणवीर साइडलाइन झालाय अविनाश व्हिविअन रजतमुळे !
मुलींमधे श्रुतिका आणि चाहत चांगल्या टक्कर देतात अविनाश व्हिविअनला.

मला कंटाळा येतो रोज बघायचा. अधून मधून बघते. काही टास्क नसतात नुसते बडबड भांडण किती वेळ बघणार.
मेल प्लेयर्स भारी आहेत हे खरे. मुली चाहत आणि श्रुतिका जरा दिसतात , बाकी असून नसून सारख्या.

मिपण बघते रोज.. खरं खुप भांडणं असतात..
रजत आवडत न्हवता पण मस्त टफफाईट देतोय तो चांडाळ-चौकडीला.. ते चौघे बिल्कुल आवडत नाहित..
नविन दोघेहि छान आहेत. टाईम गॉड चेंज होईल आज अस वाटतय.

अरे कोणी बघताय की नाही ?
मी पाहते रोज पण नक्की कोण कोणाचे दुश्मन आहेत तेच कळेन झालाय फक्त अवुनाश चा ग्रुप वेगळा दिसतोय बाकी विवियन सारख्या स्वघोषित ऑर्गनायझेड माणसाने अवुनाश ला कसा जवळ केला हे कोडच आहे बाकी तो सिद्धार्थ ला कॉपी करतो एवढे मात्र नक्की बाकी काय सगळेच मित्र आणि दुश्मन दिसतात फक्त विवियन + कारण vs विवियन चालते जर पण ते पण अधीमधी नीट होतात . आणि विवियन च्या आघवपणाला सगलेच कावळेले दिसतात हळूहळू त्याची इज्जत काढायला लागलेत.

बघतेय मी, मला अविनाश आवडतो, विव्हिअन कधीकधी पण त्या अ‍ॅलिस इशा नाही आवडत.
विव्हि॑न गृपला फेवर मिळत असले तरी दुसरा मोठा गृप व्हिक्टिम वगैरे अज्जिबात वाटत नाही, सगळेच शैतानी दिमाग !
रजत नडतो त्यांना फ्रन्ट फुटवर पण मला रजत काही केल्या आवडत नाही , त्याची गुंडागर्दी हिस्टरी माहित आहे इथेही तसाच वागतो, प्लेअर म्हणून चांगलाच आहे पण !
मला कुठल्या निगेटिव वागणार्‍या लोकांचा प्रॉब्लेम नाही बिबॉ बघताना , पण शिल्पा शिरोडकर सर्वात अनॉयिंग वाटते !
उगीच क्लासी बनायच्या नादात रडारड, दोन्ही गृप्॑मधे गुडीगुडी रहाणे आणि फावल्या वेळात शर्टलेस मुलांना व्यायाम करताना बघून मिटक्या मार्॑णे हा तिचा दिनक्रम !

कुणी बघत नाही आहे का bb18.
सारखे नवीन wildcard घेत आहेत आणि elimination कॅन्सल करत आहेत त्यामुळे कंटाळा येत आहे .
मला पण रजत नाही आवडत.
Karan कधी कधी आवडतो कधी कधी त्याचे वागणे पटत नाही.
साध्या तरी karan , chum , अविनाश , दिग्विजय यांचा गेम आवडत आहे.
सारा, bagaji, श्रुतिका अजिबात आवडत नाहीत.

मी पण बघते रोज.. कंटाळवाणा आहे यावेळचा.. खुपजण येत जात आहेत..
मला करण, चुम, दिग्विजय.. चाहत पण थोडी थोडी Happy आवडतात..
ते त्रिकुट अजिब्बात आवडत नाहि. शिल्पा बिल्कुल आवडत नाहिय.