अंमली! - भाग २४!

Submitted by अज्ञातवासी on 7 October, 2024 - 07:02

याआधीचा भाग - https://www.maayboli.com/node/85842

दोघेजण शांत बसलेले होते.
समोरसमोर...
कुणीही कुणाशी बोलत नव्हतं.
"मनीष."
मनीष काहीही बोलला नाही.
"बोल ना काहीतरी."
"हाय प्राजक्ता, मी बिजी होतो खूप. खूप काम होतं, म्हणून रिप्लाय नाही केला. एक स्टोरी लिहीत होतो..."
"...नॉर्मल आहेस."
"अगदी. मला काय झालय."
"गुड. मग मी निघतेय."
तो तिच्याकडे बघत राहिला.
"सॉरी..."
"... का असा आहेस."
"कसा आहे मी प्राजक्ता?"
"असा. जसा आहे तसा."
"आय लव यू प्राजक्ता." तो एवढंच म्हणू शकला.
आय नो.
"...आणि ते प्रेम मला कधीही मिळणार नाहीये. सो मी स्वतःला समजवतोय..."
"...गरज नाहीये."
"काय?"
"गरज नाहीये मनीष. कारण..."
त्याने तिच्याकडे बघितले.
"आय लव यू टू...बस एवढंच..."
आणि त्याचं जग त्याला मिळालं.
*****
जेव्हा दोन लोक प्रेमात असतात.
तेव्हा ते प्रेमात असतात.
आकंठ प्रेमात.
हे दोघेही त्याला अपवाद नव्हते.
कॉलेजमध्ये सतत सोबत...
...आणि कॉलेजनंतर सुद्धा.
मनाची, शरीराची सगळी बंधने तोडून ते एकत्र होते.
आयुष्य एकत्र घालवण्यासाठी.
तिला नवीन आयुष्य मिळाल्यासारखं झालं होतं.
एकदा ती मनिषच्या मिठीत आली, की तिला कशाचही भान उरत नसे...
...एकदा ती अशीच उठली. अचानक...
आणि जायला निघाली.
"जाऊ नकोस ना..."त्याने तिचा हात धरला.
"जावं लागेल मनू."
"का?"
"कारण माझा राघव घरी वाट बघतोय..."
...तोदेखील उठला. विचारात.
"प्राजक्ता..."
"बोल ना..."
"किती दिवस?"
"म्हणजे?"
"आयुष्य काढायचं आहे आपल्याला. मला तू आणि राघव सोबत हवे आहेत."
...ती हसली.
"नाही शक्य मनू."
"का नाही शक्य?"
"नाही शक्य..." ती म्हणाली.
"प्राजक्ता मी नाही राहू शकत तुझ्याविना..."
"...आय नो..."
"मग?"
"तू माझा आहेस मनू. फक्त माझा." तिने त्याला घट्ट मिठी मारली.
*****
"अण्णा."
"बोल तमा."
"तो काहीही बोलला नाही."
"बोल..."
"..कुणी माझी जागा घेऊ शकेल?"
"गौडा चरकला."
"का. काय झालं?"
"हे सगळं सोडायचंय मला." तो म्हणाला.
"हे सगळं तुझंच आहे. कसं सोडशिल?"
"सोडावं तर लागेल. प्राजक्तासाठी."
गौडा मोठ्याने हसला.
"तमा, य लाईनीत फक्त एन्ट्री असते. एक्झिट नसते रे."
"माझी एन्ट्री आणि एक्झिट मी प्लॅन करेन अण्णा. मला कुणीही थांबवू शकत नाही." तो म्हणाला.
"यशस्वी भव..." अण्णा म्हणाला.
*****
प्राजक्ता नेहमी सारखीच त्याच्या मिठीत होती.
"प्राजक्ता."
"बोल ना..."
"सिरियस टॉपिक आहे. तुला वेळ आहे?"
"हो. आहे ना."
"दुबईला जाऊयात?"
"काय? "
"दुबईला जायचं? मी एक व्हीला घेतलाय आपल्यासाठी. तू, मी आणि राघव."
"मनीष... वेडा आहेस का तू?"
"प्राजक्ता सहा महिन्यांसाठी फक्त. सगळी अरेंजमेंट झालीय. इथे सगळं निवळेन तोपर्यंत."
"मनीष..." तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता.
"प्लीज प्राजू... माझं आयुष्य तुम्ही दोघेजण आहात."
"मनीष." आततायीपणा करू नकोस.
"आततायीपणा नाहीये प्राजक्ता. हेच आपलं भविष्य आहे."
"का धर्मसंकटात टाकतोय मनू?"
"मला धर्म आणि अधर्म माहिती नाहीये"
प्राजक्ता... मला माहितीये फक्त तुझं आणि माझं प्रेम."
"यापुढे मग तेही मिळणार नाही... मनू मी माझा परिवार नाही सोडू शकत."
"मग माझा खेळ का होतोय?"
"...माझं प्रेम खेळ नाहीये मनीष. मीसुद्धा प्रेम करते तुझ्यावर."
"मग चल ना माझ्यासोबत."
"मला कॉलेजजवळ सोडशील प्लीज?"
तो काहीही बोलला नाही. चुपचाप त्याने गाडी काढली.
थोडंसं दूर गेल्यावर गाडी थांबली...
आणि त्याच्या गाडीवर गोळ्यांचा वर्षाव झाला...
"प्राजू, खाली वाक. प्लीज वर उठू नकोस." तो ओरडला.
समोरच्या ग्लोव्ह बॉक्समध्ये असलेली गन त्याने काढली, आणि गोळ्यांचा वर्षाव सुरू केला.
हल्लेखोर पळून गेले.
"प्राजू... तू ठीक आहेस ना?" तो धावत मागे येत म्हणाला.
"मनीष..." तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता.
"प्राजू. काहीही नाही झालेलं."
"कॉलेजला नको. मला घरी सोड. आताच्या आता."
"प्राजक्ता या गाडीची अवस्था बघ. माझ्या घरी जाऊयात. गाडी चेंज करू."
"नाही मनीष. नाही. तू कोण आहेस? खरं उत्तर दे..."
त्याच्याकडे उत्तर नव्हतं.
"मनीष ही गन तुझ्याकडे काय करतेय? हु आर यू?"
"तुला घरी सोडतो. मग आपण नंतर बोलुयात."
विषण्ण अवस्थेत ती घरी पोहोचली...
******
पुढचे काही दिवस कुणाचाही कुणाशी बोलणं झालं नाही.
त्याचे मेसेजवर मेसेज जात होते. मेलवर मेल जात होते.
तिचं उत्तर नव्हतं.
तो बिथरला होता. सैरभैर झालेला होता.
एके दिवशी तिला अनोळखी नंबरवरून फोन आला.
तिने उचलला.
"प्राजक्ता... काय झालंय तुला." तिकडून तो होता.
"हे बघ, भेटू, आणि बोलून संपवू सगळं. मला शंभर अनोन नंबर वरून फोन करायची गरज नाहीये. कळलं" त्याने फोन कट केला.
तिने त्याचा नंबर अनब्लॉक केला.
"कधी भेटायचं?" तिने मेसेज टाईप केला.
"उद्या सकाळी." तिकडून रिप्लाय आला.
"ओके." एवढंच ती म्हणू शकली.
*****
"तू कोण आहेस मनीष." तिने पुन्हा प्रश्न विचारला.
"गरजेचं आहे?" त्याचा प्रतिप्रश्न आला.
"हो. कारण त्या दिवशी गाडीत राघवसुद्धा असू शकला असता."
"मी तुम्हा दोघांना काहीही होऊ देणार नाही. तेवढी धमक आहे माझ्यात..."
"...कोण आहेस तू?"
"या नाशिकमधला सगळ्यात मोठा ड्रग माफिया..." त्याने उत्तर दिलं.
तिच्यावर वज्राघात झाला...
ती सुन्नच झाली.
"सगळं संपवू मनीष. प्लीज. मी तुझ्या पाया पडते."
"प्राजे. मी खरच तुझ्यावर खूप प्रेम करतो."
"दुसरी शोध प्लीज." ती विषण्ण अवस्थेत होती.
"तुझ्याविना नाही जगू शकत मी."
"असं. जर आधी सांगितलं असतंस तू कोण आहेस, मी इतक्या पुढे गेलेच नसते."
"मी सगळं सोडून येईल प्राजक्ता. सगळं. एक नॉर्मल आयुष्य जगू."
"आणि एक दिवस कुणीतरी पुन्हा गोळीबार करेन. नाही मनीष. नाही. प्लीज निघून जा."
"प्राजक्ता."
"ऐक." ती ओरडली...
"...तू वेडा आहेस. सायको आहेस हे आधीपासून मला माहिती होतं. पण मूर्ख मीच होते. आणि आय प्रॉमिस. यापुढे तुझा एकही कॉल, मेसेज अथवा काहीजरी आलं, तुझी सावली माझ्यावर पडली, तर मी जीव देईन. मी मरून जाईन मनीष."
"प्राजक्ता, मी नीच नाहीये ग इतका."
"...तू त्याहीपेक्षा खालच्या पातळीचा आहेस मनीष..."
...ती निघून गेली...
...तो पुन्हा एकदा निराशेच्या गर्तेत अडकला.
मात्र यावेळी हे नैराश्य भयानक होतं... अतिशय भयानक...
जे त्याचा जीवही घेऊ शकत होतं.
...पण नियती त्याच्यासाठी काहीतरी वेगळच आखत होती.

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप दिवसांनी कथेचा भाग आला ...!
अज्ञातवासी फार दिवसांनी लिहिते झालात तुम्ही ..
शुभेच्छा पुढील लेखनासाठी .!

आबा. थॅन्क्स.
रुपाली थॅन्क्स.
खूप दिवसांनी आलो, पण अचानक ब्रेक घ्यावा लागतोय परत. क्षमस्व.