नमस्कार माबोकर मंडळी.
आज नाताळ.
नवीन वर्षाची सुरुवात लवकरच होईल, व्यायामशाळा गर्दीने फुलून जातील. Healthy/ पौष्टिक खाण्याच्या संकल्पाची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न जवळपास सगळेचजण करतील.
ह्याही वर्षी काही विशेष संकल्प असतील तर इथे लिहूया आणि नियमितपणे update देऊया.
काही कामे अशी असतात की ती प्रत्यक्ष सुरु केल्यानंतरच त्याची depth कळते आणि ती वाढत जातात. त्यामुळे कधीकधी पूर्णत्वाकडे जात नाहीत.
असंही काही असेल आणि आपण comfortable असू तेवढं इथे share करूया. कदाचित ती आव्हाने पूर्ण करण्यासाठी मदत इथे मिळेल. एकमेकांचे अनुभव कामाला येतील. Motivation तर नक्की मिळेल.
मागचं वर्ष वैयक्तिक /भावनिक पातळीवर प्रचंड उलथापालथ करणारं ठरलं माझ्यासाठी. जीवनाची घडी जमेल तशी बसवते आहे. ती व्यवस्थित करण्याच्या दृष्टीने माझ्यासमोर अनेक आव्हाने आणि कामे आहेत. तोच माझा plan असेल. त्यातील काही कामांची नोंद इथे ठेवीन.
.............
१. कार driving शिकणे - पातळी: स्वतः गाडी ऑफिसला आणि इतर कामासाठी पुण्यात घेऊन जाता आली पाहिजे आणि one piece मध्ये वापस आली पाहिजे सुरक्षित.
२. Documents ची कामं - चिक्कार आहेत. सगळी इथे लिहीत नाही.पण मुख्य कामे पूर्ण झाली की अपडेट्स देईन.
३. Health आणि व्यायाम :
A.नियमितपणे walking सुरु ठेवीन. त्याची attendance maintain करेन. म्हणजे track राहिल.
B. Diet : ह्याचीही एक checklist बनवली आहे. ह्यात काय खायचे नाही आणि काय खायचे ह्याचे calender बनवले आहे ते भिंतीवर लावून रोज टिक करत जाईन. जास्त काही strict नाही. फक्त अनियंत्रित असणाऱ्या वाईट सवयी सोडण्यासाठी आहे.
४. मानसिक आरोग्य आणि stress management
ह्यात सुधारणा करायची आहे.
५. माझ्या कामाला पूरक अशी नवीन technology शिकणे आणि त्यात project करणे.
६. लिखाण almost बंद झाले आहे. ते परत सुरु करायचे आहे. माझ्या दोन्ही web sites बंद पडल्यात त्या परत सुरु करायच्या आहेत.
......
नवीन वर्षाच्या शुभेच्छा!!!
छान, कीप इट अप.
छान, कीप इट अप.
जर पुढे लिहिले ते होत नसेल तर आवर्जून सगळे चावून चावून खाणे, भात, पातळ पदार्थ असले तरी सुद्धा लाळ मिळण्यास पुरेसा वेळ देऊन मग आत ढकलणे असे करून बघा. मला त्याने खूप फरक जाणवला.
गाजर बीट किंवा अजुन असे जे काही असेल ते नुसते खायचा कंटाळ आला तर थोडं आलं, लसुण, दोन मिरे ठेचून, पाव वाटी दह्यात घालून चवी पुरते काळे मीठ किंवा साधे मीठ घालून सलाड ड्रेसिंग करता येईल. त्यात इटालियन सिझनिंग वगैरे ऑप्शनल. पण हे सगळ्यांना आवडेलच असे नाही.
छान भरत!
छान भरत!
ड्रेसिंग दिलं (आम्ही आयतं अनहेल्दी देतो, हे वरचं केलं पाहिजे) की गाजरं, ब्रोकोली फस्त होतात हा आमच्या पोरांचा अनुभव आहे.
गाजर बिटावर जिरेपूड पुरेशी
गाजर बिटावर जिरेपूड , मीठ पुरेसे होत आहेत.
वेळ असेल तेव्हा गाजराची / काकडीची कोशिंबीर, फोडणीत मिरची उभी चिरून घालून ती न खाणे , हेही सुरू आहे. इतरही अनेक बदल केले आहेत.
मानव, आपलं एका धाग्यावर बोलणं झालं होतं आणि तुम्हांला याबद्दल संपर्कातून मेल करायला घेतली होती. पण राहून गेलं. आज उद्या- परवात करतो.
अमितव, ब्रोकोली खा असा सल्ला मिळाला आहे. तेही करेन.
ब्रोकोली थोडीच खाऊन बघा आधी.
ब्रोकोली थोडीच खाऊन बघा आधी.
काहींना त्यामुळे ब्लोटिंग होऊन, हार्टबर्न, रिफ्लक्स होऊ शकते. मला होते.
ब्रोकोली नीट उकडून, थोडं तूप
ब्रोकोली नीट उकडून, थोडं तूप आणि थोडं मीठ मिरपूड घालून छान लागते.तूप नको असल्यास स्कीप करता येईल.
भरत : तुम्ही एकदम राईट
भरत : तुम्ही एकदम राईट ट्रॅकवर आहात. आणि न कंटाळता योग्य रिझल्ट दिसेपर्यंत कंटिन्यू करू शकलात याबद्दल अभिनंदन. हे मलाही फॉलो करता येईल तो सुदिन...
जेवण आहे की औषध म्हणून वैताग
जेवण आहे की औषध म्हणून वैताग यायचा. पण त्याचा सुपरिणाम होऊन सुपरमॅनसारखं वाटायला लागलं>>>>
अभिनंदन, भरत.
अभिनंदन, भरत.
ब्रॉकोली नुसती लाइटली वाफवून किंचित मीठ घालून भारी लागते. पार मेण करायचं नाही. ग्रिल करूनही मस्त लागते - तव्यात थोड्या तेलावर तिखटमीठ घालून खरपूस परतता येईल.
उकडलेल्या बिटाची दह्यातली कोशिंबीर माझी फेव्हरिट आहे. उकडलेलं बीट जाडसर किसून त्यात दही, मीठ, साखर, मिरची, कोथिंबीर घालायची.
किंवा उकडलेल्या किसलेल्या बिटात (चालत असेल तर) बारीक चिरून टोमॅटो, मीठ, मिरची, दाण्याचं कूट आणि साखर.
गाजराचा कीसही नुसतं उकडण्याला पर्याय होऊ शकतो.
फोडणीवर मिरची आणि गाजराचा कीस घालायचा. मीठ, साखर, लिंबू, दाण्याचं कूट, ऑप्शनली खोबरं घालून आधणाचं झाकण ठेवून अंगच्या वाफेवर शिजवायचा. वरून कोथिंबीर घालायची. नुसतासुद्धा खायला छान लागतो. असाच दुध्याचाही छान होतो कीस.
गाजराच्या सूपची रेसिपी आहे मैत्रेयीची मायबोलीवर - तेही सुंदर होतं.
अभिनंदन भरत, जिंकलंच की मग !
अभिनंदन भरत, जिंकलंच की मग !
वर स्वातीने दिलेल्या कृतीने बीट, गाजर (न वाफवता) आणि पत्ता कोबीचीही होेते. सगळ्या कोशिंबीरी लिंबू पिळून छान लागतात. कच्च्या पालकचीही होते दही घालून. इथे मोठी पालकची पिशवी येते ती मी एकदा पराठे, एकदा भाजी, एकदा कोशिंबीर करून संपवते. मी कच्च्या मुळ्याचीही करते. लिंबाचा रस, दाण्याचा कूट आणि तूपजिरे फोडणी व किंचित साखर असली की उग्र लागत नाही फारसं.
काही कारणाने आहारात आमूलाग्र
काही कारणाने आहारात आमूलाग्र बदल करावा लागला. पॅक्ड फूड , मैदा , तळलेले. , मसालेदार पदार्थ संपूर्ण बंद.
अभिनंदन , काळी कॉफी पिऊन बघा. एकदा ती सवय लागली की मग चहा व त्यात लपून येणारी साखर बंद होईल.
ब्रोकोली सर्वांनाच सूट होईल / रुचेल असे नाही.
गाजर, उकडवलेले बीट, किंवा
गाजर, उकडवलेले बीट, किंवा (blanched / अगदी कमी उकडवलेली) ब्रोकोली यांवर लिंबू पिळले की चव ही छान लागते आणि त्याची पौष्टीक ता ही वाढते.
माझे दोन आणे
ब्रॉकोली नुसती लाइटली वाफवून
ब्रॉकोली नुसती लाइटली वाफवून किंचित मीठ घालून भारी लागते. .... +१.पण मानव म्हणाले तसेही होऊ शकते.त्यामुळे अल्प प्रमाणात खाल्ली जावी.मला काकडीने तसे ब्लोटिंग आणि ढेकर येतात.
सामोच्या पद्धतीने बिटाची कोशिंबीर चांगली होते.उकडलेले बीट किसून त्यात दाण्याचे कूट,साखर मीठ कोथिंबीर
घालायची.वरून मोहोरी हिंग मिरची फोडणी द्यायची.
मी तेल/तूप अगदी थेंबभर घालते.
पांढरा मूळा किसून तिखट,हिंग ,मीठ घालून लिंबू पिळावे.
मीही सकाळी बिस्किट्स खाणे बंद करून 4 दिवस झाले आहेत.दुपारी मात्र 2 बिस्किटे घेते.दूध बंद केले.त्याऐवजी दही जास्त खातेय.
माझी पत्नी ब्रोकोली तेलामधे
माझी पत्नी ब्रोकोली तेलामधे लसूण, लाल मिरची टाकून परतते. एक वाफ काढते.
माझी दोन्ही मुले (६,११ वर्षे) आवडीने खातात.
ब्रॉकोलीचे तुरे वाफवून
ब्रॉकोलीचे तुरे वाफवून घ्यायचे. थोड्या तेलावर बारीक चिरलेला लसूण परतून घ्यायचा. त्यात सॉय सॉस, थोडे चिली फ्लेक्स आणि सेसमी ऑइल घालायचे . लगेच वाफवलेले तुरे घालून एक दोन मिनिटे परतायचे. गरम गरम खायला घ्यावे .
सुचवण्यांसाठी सगळ्यांचे आभार.
सुचवण्यांसाठी सगळ्यांचे आभार. बरेच पर्याय मिळाले.
स्वाती, गाजराची कोशिंबीर मी अशीच करतो.
>>>>पांढरा मूळा किसून तिखट
>>>>पांढरा मूळा किसून तिखट,हिंग ,मीठ घालून लिंबू पिळावे.
मूळ्याचा चटका म्हणतात ना याला? आय थिंक सो.
बिस्किट्स पूर्ण बंद करणेच
बिस्किट्स पूर्ण बंद करणेच चांगले. त्यातले मेन घटक मैदा, पामतेल व साखर! अमेरिकेत पार्ले जी इतके स्वस्त मिळतात की भारतात तयार करून इथे आणून विकणे कसे परवडते असा प्रश्न पडतो !
Dataiku Machine Learning
Dataiku Machine Learning Practitioner certificate complete झाले आज, म्हणजे पास झाले.
कोर्स करून बरेच दिवस झाले होते.
बरेच प्रयत्न करून आज हे cartificate मिळालं.
२०२४ साल सरत आलेय, हा शेवटचा
२०२४ साल सरत आलेय, हा शेवटचा क्वार्टर.
बरीच कामे झालीत, बरीच बाकीयेत.
आता पुन्हा एकदा बघायला हवं, सगळं थंड पडलेलं मध्यंतरी
Dataiku advanced designer
Dataiku advanced designer
अजून एक सर्टिफिकेट पूर्ण झालं.
हे जरा सोपं गेलं कारण ह्याच stack मध्ये कामं करतीये.
अभिनंदन किल्ली
अभिनंदन किल्ली
अभिनंदन किल्ली
अभिनंदन किल्ली
अभिनंदन किल्ली!!!!
अभिनंदन किल्ली!!!!
अभिनंदन किल्ली. कौतुक वाटतं
अभिनंदन किल्ली. कौतुक वाटतं तुझं.
अभिनंदन किल्ली!!!!
अभिनंदन किल्ली!!!!
अभिनंदन किल्ली!
अभिनंदन किल्ली!
धन्यवाद लोकहो
धन्यवाद लोकहो
लगे रहो किल्ली
लगे रहो किल्ली
जिद्दी ये दिल
आम्ही केलेले संकल्प विसरून गेलो, तू मात्र नीट करत आहेस हे बेस्ट
किल्ली, खूप कौतुक गं. झकासराव
किल्ली, खूप कौतुक गं. झकासराव यांच्याशी सहमत
धन्यवाद
धन्यवाद
पण सध्या बरीच ढिली पडलीये मी
खूप कामं आहत
Pages