Submitted by deepak_pawar on 6 October, 2024 - 01:43
“माझ्या संग चांदणं ही”
हे माझं नवं गाणं रिलीज झालं आहे. एकदा नक्की बघा आणि गाणं कसं वाटलं सांगा.
https://youtu.be/wFyTCuCXdPs?si=u2k7pzivz-u5yW9i
सपनानं तुझ्या मन रातभर व्यापलं
माझ्यासंग चांदणं ही रातभर जागलं
कंकण आवाज
पैजणाचं नाद
रातभर घुमे
सखे तुझी साद
असं कसं राती मला आगळच वाटलं.
माझ्यासंग चांदणं ही रातभर जागलं.
नभातला चांद सखे तुझ्यावानी वाटला
तुझा श्वास गंध साऱ्या रानीवनी दाटला
दाटला सुगंध
वाऱ्यातून येई
गंधाळून मन
सखे माझं जाई
गंध तुझ्या पिरतिचं रातभर दाटलं.
माझ्यासंग चांदणं ही रातभर जागलं.
सरुनिया रात मग उजाडता दिस
फुलापरी मन माझं उमलतं कसं
विखरून मनभर
सपनाचं ठसं
पिरतनं तुझ्या मन
भारलय जसं
असं कसं मन आता वागतय आगळं.
माझ्यासंग चांदणं ही रातभर जागलं.
दीपक पवार.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दीपकजी
दीपकजी
वेलकम बॅक.
कविता आवडली. अजून यू ट्यूब वर ऐकली नाही. ऐकून लिहीनच.
छान कविता.
छान कविता.
हे लेखन कविता विभागात हलवा.
छान झाले आहे गाणे! शुभेच्छा!
छान झाले आहे गाणे! शुभेच्छा!
केशवकूल सर, किल्ली मॅडम,
केशवकूल सर, किल्ली मॅडम, स्वाती२ मॅडम मनःपूर्वक धन्यवाद.
दीपक भाऊ
दीपक भाऊ
आत्ताच यू ट्यूब वर ऐकले. मस्त आहे खाली दोघांची नावे आहेत लोहार आणि डांगे. कृपया गायक आणि संगीतकार कोण आहेत? ते पण लिहा.
आता मागे वळून बघू नका. पुढेच जा. माझ्या शुभेच्छा !
गाणे फार गोड आहे. उपासे यांनी
गाणे फार गोड आहे. उपासे यांनी काय हळवेपणा आणलाय गाण्यात. आहाहा!
छान अभिनंदन
छान अभिनंदन
सामो
सामो
उपासे ? गायक आहेत का ते? मला का नाही दिसले त्यांचे नाव?
आहा. पीसी वर उघडले तेव्हा सगळी क्रेडीट दिसली.|
धन्यवाद सामो.
केशवकूल सर, सामो मॅडम,
केशवकूल सर, सामो मॅडम, Sparkle मॅडम मनःपूर्वक आभार.
छान झाले आहे गाणे! शुभेच्छा!
छान झाले आहे गाणे! शुभेच्छा!
SharmilaR मॅडम मनःपूर्वक आभार
SharmilaR मॅडम मनःपूर्वक आभार.
मोहक शब्दकळा, ओघवती कविता!
मोहक शब्दकळा, ओघवती कविता!
मस्त वेडंपिसं गीत.
मस्त वेडंपिसं गीत.
बेफ़िकीर सर, दत्तात्रय साळुंके
बेफ़िकीर सर, दत्तात्रय साळुंके सर मनःपूर्वक धन्यवाद.
सुंदर गीत ..
सुंदर गीत ..
गीताचे सादरीकरण , त्यातला निसर्ग अप्रतिम आणि नायक - नायिका ही छान आहेत ..
दिपक तुम्हांला खूप शुभेच्छा ... नवनवीन कविता लिहिण्यासाठी ..!
रूपाली मॅडम मनःपूर्वक आभार.
रूपाली मॅडम मनःपूर्वक आभार.