शब्दवेध व शब्दरंग (४)

Submitted by कुमार१ on 2 October, 2024 - 02:13

भाग ३ :
https://www.maayboli.com/node/84791
* * * * * * * * * * * * *

तीन वर्षांपूर्वी चालू केलेला हा धागा आता चौथ्या भागात पदार्पण करतो आहे. त्यानिमित्त इथे चर्चेस नियमित येणाऱ्या सर्व माबो परिवाराचे मनापासून आभार !

विविध शब्दांची रोचक माहिती, व्युत्पत्ती आणि अर्थपूर्ण व मजेदार चर्चेमुळे शब्दांच्या विश्वातली ही सफर नक्कीच रंगतदार होते.
धागा संयोजनात एक सुसूत्रता असावी म्हणून पूर्वी केलेल्या काही सूचना पुन्हा एकदा :

१. हा मराठी भाषा विभागातील धागा असल्याने इथे फक्त मराठी शब्दच चर्चेला घ्यावेत. अर्थात अशा शब्दाच्या व्युत्पत्तीच्या चर्चेमध्ये आंतरभाषिकता येईलच; त्याचे स्वागत आहे.
( सर्व बिगर मराठी भाषांमधील शब्दचर्चेसाठी अन्य धागे उपलब्ध आहेत )

२. एखाद्या सभासदांनी नवा शब्द चर्चेस घेतल्यानंतर पुढील २० तास त्या शब्दासाठी राखून ठेवूयात. त्या दरम्यान पुढचा शब्द घेऊ नये. ही मुदत संपल्यानंतर त्यावर कोणतीही चर्चा झाली नसेल तरी नवा शब्द जरूर घ्यावा.

सहकार्याबद्दल धन्यवाद आणि चौथ्या भागात सहर्ष स्वागत . . .
Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुहू =

  1. कोकीळेचे गाणे
  2. प्रतिपदायुक्त अमावास्या (वै. सं)
  3. कुजणे ( सं)

वरील दुसऱ्या अर्थाच्या व्युत्पत्तीतून वैदिक संस्कृत हा एक प्रकार असतो असे समजले.

आनंदाची बातमी. अभिनंदन सर्वांचे. Happy
नवीन धागा काढल्याबद्दल आभार. नियम आवडले. Happy
येत जाईन.

आजचा शब्द - भंकस

एक इंग्रजी मित्र बोलताना बऱ्याचदा bonkers हा शब्द वापरतो. मला बोलण्याच्या संदर्भात साधारण अर्थ लक्षात आला तरी हा शब्द माहीत नव्हता. मग त्याचा कोशात अर्थ पाहिला. तसा बोलीभाषेतच आहे हा शब्द. शिवाय हे इंग्रजी (ब्रिट) लोक R चा उच्चार करत नसल्याने बाँकस असं ऐकू येतं. मग आपल्या भंकस शब्दाचं मूळ हे तर नाही ना अशी शंका आली.

माझ्या मते...
bohunkas
हा मूळ शब्द इंग्लिश आहे.
https://www.wordsandphrasesfromthepast.com/word-of-the-day/word-of-the-d...
1. silly behaviour, nonsense ...1918 obs. rare, originally and chiefly US usage
2. (often derogatory) an eastern or southeastern European, esp. of the working class; a Bohemian; a foreigner ...1924 Amer. dial.
3. a stupid, obnoxious, or worthless person; often used as a term of abuse or a contemptuous form of address ...1933
4. a person's buttocks; the bottom, the backside ...1941

ETYMOLOGY
apparently from the title of a comic song and the name of its rustic and unintelligent character, Bohunkus (1870s)

भंकस >>> वा ! छान शब्द
हा मी प्रथम 1978 मध्ये ऐकला तेव्हाची ही आठवण.

तोपर्यंत आम्हा मित्रांचे वाचन हे शहरी पांढरपेशा लेखकांपुरते मर्यादित होते. एकदा कट्ट्यावर गप्पा मारताना कॉलेजमधला दोन वर्षे मोठा असलेला मित्र म्हणाला,
“तुम्ही कोसला वाचली आहे का ?”
आम्ही म्हणालो नाही. ‘कोण आहेत त्याचे लेखक?’
त्यावर त्याने नेमाडे हे नाव सांगितले.
आम्ही सगळ्यांनीच त्यावर प्रश्नार्थक मुद्रा केली; त्याचा मथितार्थ हा होता, की हे कोण बुवा ?

आमच्या मनातले ते भाव ओळखून तो म्हणाला,
“अरे लेकांनो, आपण येता जाता हा जो भंकस आणि तसले शब्द वापरतोय ना . . ते सगळे कोसलामधनं आलेत हे माहिती आहे का? जा, पहिली वाचा ती कादंबरी”.

त्याने आम्हाला दिलेल्या वरील ज्ञानानुसार भंकसचा उगम कोसलातून (सप्टेंबर १९६३) मानावा काय ? किंवा त्यापूर्वीचा असल्यास कोणी सांगावे Happy

>>>त्याने आम्हाला दिलेल्या वरील ज्ञानानुसार भंकसचा उगम कोसलातून (सप्टेंबर १९६३) मानावा काय ?>>>>
कोसलाच्या आधीपासून हा शब्द प्रचलित आहे..

धन्यवाद, दसा !
एक उत्सुकता :
सध्याच्या कॉलेज तरुणांमध्ये तो कितपत वापरात आहे?

*The catcher
>> त्या दोन्ही पुस्तकांमधले साम्य आणि भेद दाखवणारे काही लेख पूर्वी वाचले होते.
त्यावर साहित्यविश्वात बराच काथ्याकुट झालेला आहे Happy

मला असं वाटतं की त्या शब्दामध्ये बकवास, टगेगिरी आणि फालतूपणा या सगळ्यांचे मिश्रण आहे.
उदाहरणार्थ,
वासूनाका ही कोसलाची साधारण समकालीन कादंबरी. त्यात खालील वाक्य आहे :

“उन्हे उतरली म्हणजे आमची कंपनी वूलन पॅन्टस् चढवून वासूनाक्यावर भंकसगिरी करायला जमत होती. आम्हाला चायला मधुबालेसारखी पणती पकडणे शक्य आहे का?”

https://sameerbapu.blogspot.com/2018/09/blog-post_81.html?m=1

>>>>भंकस म्हणजे बकवास असंच ना?>>>
समजा अ ला एखादी गोष्ट माहीत नाही. ब ती त्याला समजावतोय; पण अ ला ती खोटी वाटतेय ( कदाचित ती खरीही/खोटीही असेल) अशावेळी अ ब ला म्हणेल ए भंकस करायची नाय हा. इथे चेष्टा, मस्करी हा अर्थ अभिप्रेत असतो.

The catcher in rye.. बद्दल कुणी लिहिल का इथे?
मला उत्सुकता आहे.
ह.पा. किंवा अजून कुणी?
Happy

*The catcher in rye >>>
याची समग्र माहिती विकीवर आहेच पण या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीसंबंधीचा एक रोचक किस्सा नितीन रिंढे यांच्या या (https://www.maayboli.com/node/77708) पुस्तकात दिलेला असून तो थोडक्यात लिहितो.

जेडी सालींजर हे याचे लेखक. त्यांचे हे पुस्तक एका दृष्टीने एकमेव आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याची एकमेव बाजू म्हणजे, या पहिल्या आवृत्तीच्या मुखपृष्ठावर शाळेच्या आवारात खेळणाऱ्या एका लहान मुलीच्या झग्याकडे पाहणाऱ्या कादंबरीच्या नायकाचा चेहरा काढलेला आहे. चेहऱ्याची एकच बाजू दिसत असली तरी त्याच्या अर्धवट दिसणाऱ्या डोळ्यातले भाव अत्यंत जिवंत आहेत.

परंतु पुढे या लेखक महोदयांनी या जिवंतपणाचाच इतका धसका घेतला की काय ते माहित नाही. पण त्यानंतर त्यांनी त्यांच्या सर्व पुस्तकांच्या मुखपृष्ठांवरून कोणत्याही प्रकारची चित्रे किंवा अक्षररचना छापण्यास मनाई केली. आपलं पुस्तक काय सांगतय हे कोण्या चित्रकाराच्या मध्यस्थीद्वारे स्पष्ट व्हावं ही कल्पनाच त्यांना मंजूर नव्हती.

म्हणून The catcherची पहिली आवृत्ती हा दुर्मिळ ठेवा ठरतो.

स्नातक
= पदवीधर

[सं. स्ना = अंग धुणे] हे शब्दमूळ.

या संदर्भात स्नातकचे प्राचीन अर्थ/प्रकार पाहणे रोचक ठरेल :
* स्नात, स्नातक = विद्या संपादन करून गृहस्थाश्रम घेण्यास तयार झालेला पुरुष

*विद्यास्नातक = या काळांतच वेदाचे ज्ञान मिळविणारा

* 'व्रतस्नातक'= या काळांतच वेदाचे ज्ञान न मिळविणारा
आणि
*अभार्यस्नातक = ज्ञान मिळवून लग्न न करणारा.

(दाते शब्दकोश)

वा ! स्नान/ स्नात आणि स्नातक अशी काही लिंक असेल कधीच वाटले नव्हते Happy

……*अभार्यस्नातक = ज्ञान मिळवून लग्न न करणारा….

हे ज्ञान मिळवल्यामुळे लग्न न करणारा असे असावे का ?

अनिंद्य Lol

पदवीदान समारंभ बाबतीत ज्या बातम्या येतात, म्हणजे निदान ज्या पूर्वी येत, त्यांत स्नातक असा उल्लेख असायचा. मला वाटायचं की अंघोळ न करता गेलं तर ते पदवी देत नाहीत.

*अंघोळ न करता
Happy पदवीधर माणसाला अंघोळीचे महत्व समजावे अशी नक्कीच अपेक्षा आहे !!

गुरुकुलातील शिक्षण संपल्यावर विद्यार्थ्याचा विशिष्ठ स्नान सभारंभ होत असे, ज्यात गुरू शिष्याला स्नान घालत असे.
असे वाचलेले कुठेतरी.

तसेच मला अनावरण या शब्दाबद्दल वाटायचे. Happy
अमुक फलकाचे अनावरण झाले..
अशी बातमी वाचली की वाटायचे..की लपून राहणे अनावर झाल्याने तो फलक आता ओपन केला....

तसेच, आवरण शब्दाला अन् लावून ( unwind, undo अशा इंग्लिश शब्दांप्रमाणे ) विरुद्धार्थी झालेला हा एकमेव मराठी शब्द दिसतो!

Pages