टिक टिक वाजते डोक्यात ...

Submitted by - on 3 October, 2024 - 23:16

एक कुटुंब ..
वडिलांना वाटणारी अपराधी पणाची भावना... आईला हि क्षणासाठी काही न उमगणे आणि दुसऱ्या क्षणी दोन लेकरांची जबाबदारी... समाजाचा ताण .... आणि वेळेचे कधीही न थांबणारे काटे....
हे असेच असते प्रत्येकाच्या जीवनात ... कमी अधिक प्रमाणात ...
आजचाच किस्सा ..
पावसामुळे घर्षण कमी झालेला रस्ता ...
दोन चाकीवर ना पेलवणारा संसार ..... मुलांना शाळेत वेळेत पोहचवण्याची सर्कस ..... आणि रस्त्यावरची आमच्या सारख्यांची गर्दी ........
मग काय झाली स्लिप गाडी ... बराच प्रयत्न केला बापाने तोल सांभाळायचा .. पण नाही झेपला त्याला.
मग पिल्लंही रडायला लागली .. आईला तर काही समजेनाच ..कारण पडतोय आपण पण तोल कसा सांभाळावा नाही जमत मागे बसल्याला.
बघणार्यांनी केली मदत. फार काही नव्हते मोठे छोटा स्लिप होता ...
पण बापाच्या मनाची झालेली चलबिचल ... आपण असमर्थ झाल्याची, अपराधी पणाची भावना ....... त्याचे निश्चिल शरीर एकदम स्पष्टपणे दाखवत होते.. जमलेले सर्व जरी सांत्वन करत असले तरीही ... आपण fail झालो आणि आपला अधिकारच नाही मुलांचे सांत्वन करायचा ह्याच विचारात होते.....
आईला तर दोनीही बाजू सांभाळायच्या होत्या ... एकतर आपण पडलोय हेच पचनी पडले नव्हते ...
त्यात लेकरांचे रडणे .... जमलेल्यांची सहानभूती ... पुढे सरकणारा वेळ .... काही काही नको होते ...
तरीही ती माउली उठते ... कोणाच्याही नजरेला नजर ना देता ... मुलांना सांभाळते कारण टिक टिक वाजते डोक्यात.
आणि परत जीवनाचे रहाड गाडगे सुरु सर्वांसाठी .. अगदी तुमच्या आमच्या साठी.....

Group content visibility: 
Use group defaults

.

छान वर्णन केले आहे. अगदी असेच होते.

लिखाणाची शैली छान.
पण टिंब टिंब खूप झालीत ती टाळता येतील असे वाटले..