New OCI/OCI Renewal करून घेणे, त्यातल्या समस्या, उपाय व अतिरिक्त माहीती...

Submitted by परदेसाई on 15 January, 2020 - 11:40

https://ociservices.gov.in/welcome

इतरत्र असलेली OCI Renewal माहीती एकत्रित करून ठेवलेली आहे....
Submitted by परदेसाई on 22 October, 2019 - 09:46
पुनश्च OCI....
या वर्षी भारतात सुट्टीसाठी जाणार्‍या बर्‍याच (OCI असलेल्या) लोकांना विमानतळावरून परत पाठवले गेले अशी बातमी आहे.
कालच एका जवळच्या मित्राच्या भाचीला ही परत पाठवले गेल्याचे तो सांगत होता, तेव्हा खरे असावे.
मुळ नियमः OCI आयुष्याची वीस वर्षे पूर्ण होण्या आधी घेतले असले तर २० वर्षे पूर्ण झाल्यानंतर किंवा....
५० वर्षे पूर्ण होण्याआधी घेतले असले तर ५० वर्षे पूर्ण झाल्यानंतर, OCI Renew करणे गरजेचे आहे.
.... Part-B
१. हा नियम पहिल्यापासूनच आहे पण त्याची अंमलबजावणी होत नव्हती.
२. भारतात Immigration Officer ला विचारले असता, कशाला आजून पैशे खर्च करताय? असे उत्तर ३/४ वर्षांपूर्वी मिळाले होते.
३. अजूनही भारतात Immigration Officer ने या डिसेंबर मधे अडवले नाही..
४. ज्या लोकाना विमानतळावरून परत पाठवले गेले , त्याना विमान कंपन्यानी परत पाठवले (असावे).
५. सध्या हा नियम १ जून २०२० पर्यंत शिथील करण्यात आलेला आहे अशी बातमी वाचली (पण पुन्हा हा प्रश्न येणारच आहे).
६. OCI चा गोंधळ नको म्हणून On -Arrival Visa Online घ्यायला किमान ४ Business days द्यावे लागतात.
७. OCI Renew साठी Online Site आहे, पण ती नीट चालत नाही... (गेल्या ४ वर्षात ३/४ प्रयत्न करून सोडुन दिले आहेत).
OCI Renewal..
१. Part-A, Photo/Image Upload, Part-B अश्या तीन Steps आहेत.
२. प्रयत्न सुरू करण्यापूर्वी आपल्या घरातल्या सगळ्यांचे पासपोर्ट, सगळ्यांचे OCI, आणि सगळ्यांचे जुने भारतीय पासपोर्ट हाताशी ठेवा.
३. Part-A केव्हाही भरता येतो. तो भरल्यानंतर मिळालेला Temporary ID जपून ठेवा.
४. Photo/Image Upload इथे सगळ्यात मोठी गोची आहे. Photo/Image वर बरेच नियम आहेत. (Pizel size, aspect Ration, file size) इत्यादी. हे सगळे करूनही जवळपास २ तास घालवले तरी Photo/Image Upload होत नव्हती. याच कारणासाठी मी प्रयत्न सोडला होता.
५. सगळे काही ठिक असूनही, Submit केले तर पुन्हा Photo/Image Upload पान परत येते, आणि एकही Error message दाखवला जात नाही (तुम्ही गाढव आहात, तुमचा Photo चुकीचा आहे, फालतूगिरी करू नका, आम्ही झोपलो आहोत असले काहीही नाही).
६. Internet वर बर्‍याच लोकांनी प्रश्न विचारले आहेत, पण कोणत्याही साईटवर त्याचे नीट उत्तर नाही.
७. एका ठिकाणी उत्तर मिळाले.. ( भारतात Business Hours असतील तेव्हाच Photo/Image Upload करता येते)...
८. आज इथे अमेरिकेत पहाटे ५:५० ला Photo/Image Upload झाली.
९. Part-B आज सुरू केला आहे. ८ वाजता प्रयत्न केला पण पुर्ण झाला नाही. कदाचित भारतात Business Hours असतील तेव्हाच होणार असेल. उद्या पहाटे परत करून बघणार आहे.
....
....
Internet वर अशी साईट (फक्त Business Hours मधे चालणारी) बघितली नव्हती.. ..
आणि असली तरी 'We are sleeping , come tomorrow,' किंवा 'कल आना' असा Message द्यायला काय होते कळत नाही....
असो.. 'मेरा भारत महान..' असल्याने पुढे प्रयत्न करण्यात येतील...
...
याचा कुणाला उपयोग झाला तर झाला म्हणुन लिहीले आहे.. आणि तुम्हाला काही आतल्या गोटातून माहिती मिळाली असेल तर मला सांगा म्हणजे माझाही त्रास / त्रागा कमी होईल...
Submitted by सुनिधी on 6 January, 2020 - 13:16
मी मागच्या वर्षात दोन वेळा हे उद्योग केले होते. आता मागच्या १-२ महिन्यांत प्रोसेस पुन्हा बदलली आहे. मेधा म्हणते तसे आता सुरूवातीलाच ओरिजिनल ओसीआय पाठवावे लागते. पूर्वी अ‍ॅप्लाय करताना फक्त कॉपीज पाठवून अगदी नंतर ओरिजिनल पाठवावे लागे व त्यानंतर दोन आठवड्यात नवीन ओसीआय येत होते. माझा दोन्ही वेळचा अनुभव असा होता की ही प्रोसेस किचकट आहे पण सीकेजीएस शी संपर्क करून सर्व शंकांबद्दल कन्फर्म माहिती काढून केले की व्यवस्थित होते. सीकेजीएसचे मेल ला उत्तरे देण्याबद्दल आणि फोनवरही माहिती देण्याबद्दल अनुभव चांगले आहेत.
https://www.in.ckgs.us/resources/pdf/Press%20Release%20OCI%20Reissuance.pdf
https://boi.gov.in/content/overseas-citizen-india-oci-cardholder
या पानावर नोट सेक्शन मधला १ बघा.
OCI card holders shall now be given Immigration clearance on the strength of their valid forign passport and OCI Registration Certificate (OCI booklet, popularly known as OCI card).

दर वेळी पासपोर्ट बदलला म्हनुन re-issue ची गरज नाही. (exception 20 and 50 age)

भारतीय पासपोर्ट सरेंडर केला तरी, तो पासपोर्ट लागतो? <<< नाही...
पण विचारलेले प्रश्न इतके संदिग्ध आहेत, की कळत नाही.... उदा...
Did you have Dual Nationality...?
इथे Except India विचारलेले नाही. त्यामुळे मी आधी हो म्हटले.. म्हणुन पासपोर्ट नंबर विचारला.... मी घाबरून जाऊन जुना पासपोर्ट शोधला.
नंतर मी विचार करून 'नाही' म्हणालो..

एका ठिकाणी OCI Reference No. विचारला (तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा)... आता OCI Reference No. कुठे सापडला नाही.
(12 Alpha Numeric) मग मी File No. वापरला... जो १२ अक्षरांचा होता...

असल्या भानगडी बर्‍याच आहेत.. त्यामुळे गोंधळ उडतो...

चला... आता १ भाग पूर्ण झाला....
आता in.ckgs.us वर इतर मारामारी करू...
अर्ज Online भरा. मग एक Web Reference दिला जाईल.. तो जपून ठेवा.
आता बर्‍याच गोष्टी छापुन ठेवायला लागतील...
१. म्हणजे Affidavit in Lieu of Originals.. हे नोटरी समोर सही करून घ्यायचे आहे.. त्यात US passport copy पाठवतो/ते असे म्हटले आहे.
२. २ फोटो
३. Address Proof म्हणुन Driving License ची कॉपी.
४. CKGS ने दिलेला Payment Receipt Number/Web reference No
५. मनिऑर्डर/ बँकर चेक...
६. Fedex Label... कागद पाठवताना Fedex पाकिटावर लावायचे आहे.
७. CKGS label ... कागद पाठवताना Fedex label वर लावायचे आहे.
शिवाय...
१. OCI Renew चा छापील अर्ज सही करून..
२. OCI चे पहिले आणि शेवटचे पान कॉपी आणि सही करून.
३. Passport ची कॉपी सही करून..
४. Original OCI हे ही पाठवायचे आहे...

यात Copy केलेल्या सगळ्या कागदांवर Self Attestation म्हणून सह्या करायच्या आहेत..
Fedex ची दोन लेबल सोडता बाकी सगळे Fedex पकिटात भरून Fedex वाल्याकडून लेबलं लाउन पाठवण्याचा विचार आहे..

Submitted by परदेसाई on 7 January, 2020 - 16:23

मॅरेज सर्टिफिकेटही असेल लिस्ट मधे <<< ते फक्त भारतीय नवरा , अभारतीय बायको किंवा अभारतीय नवरा भारतीय बायको यांच्या साठी आहे..

मनिऑर्डर साठी... Cox & Kings Global Services USA LLC असा Recipient असणे आवश्यक...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

स्वाती पत्त्यामधल्या फील्ड्स ची ऑर्डर बदलून बघ. मला नक्की आठवत नाही पण कुठल्या तरी सरकारी वेब साईट वर हा प्रॉब्लेम आला होता नि उलट सुलट काँबो केल्यावर गेला होता.

थॅंक्स अमित आणि असामी.
लॅपटॉप पुन्हा सुरु केला आणि मग फॉर्ममधे पत्ता भरताना घर नं +स्ट्रीट एका लाईनवर, गावाचे नाव एका लाईनवर आणि स्टेट+ झीप केला लाईनवर केले. सेव आणि कंटिन्यू केल्यावर 'समथिंग वेंट राँग' असा मेसेज आला मग परत लॅपटॉप सुरु करुन सगळ्या स्टेप्स. या वेळी सेव आणि एक्झिट केले तर पहिला टप्पा पार पडला. हुश्श!

आमचे फॉर्म भरुन आणि फोटो, सही, डॉक्युमेंट लोड करुन झाले.
आता पुढली अडचण - vfs global वरती ऑनलाएन फी भरणे आणि कुरीयरने फॉर्म पाठवणे हे करण्यासाठी जे अकौंट सेटअप करायचे आहे तिथे पासवर्ड सेटअप करताना प्रॉब्लेम येतोय.
https://row4.vfsglobal.com/IHCUSPostalAppointment/Account/RegisterUser?q...
हिच साईट वापरायची आहे ना?
तिथे नाव, फोन नं, इमेल दिल्यावर जेव्हा पासवर्ड देवून पुन्हा पासवर्ड एंटर करायचा तर आधीचा पासवर्ड मधली कॅरॅक्टर्स आपोआप वाढत जातात आणि पुढे काही करताच येत नाही.

स्वातीताई, आत्ताच नवऱ्याने निहीतचं application submit केलंय विना झंझट. तुला माहिती हवी असेल तर वीकेंडपर्यंत देऊ शकते मी.

थँक्स रीया!
ऑनलाईन अ‍ॅप्लीकेशनची अ‍ॅक्नॉलेजमेंट आली. आमचे गाडे ऑनलाईन फीला अडले . आता आम्ही ते ऑनलाईन फी भरायचे कँसल केले. गावातल्या दुकानात मनी ऑर्डर घेवू आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे शिकागोला प्रिटेड फॉर्म + डॉक्यूमेंट्स मेल करु.

कॅरेक्टर वाढत गेली तरी त्याकडे दुर्लक्ष करुन आपला पासवर्ड वन कॅरेक्टर अ‍ॅट अ टाईम संथपणे टंकून सबमिटचं बटणंं क्लिक करता येतंय का?
आयसीआयसीआय पण काय तरी सिक्युरिटी फीचर म्हणून असा पासवर्ड वाढवून दाखवते. अर्थात आयसीआयसीआय टाईप करताना रीअल टाईम वाढवत नाही. त्यामुळे तिकडे त्रास होत नाही.
ते करुन किंवा ब्राऊजर, मशीन इ. बदलून बघू शकता.
मनीऑर्डर सोपं असेल तर ते उत्तमच.

भारतीय वेब साईट्स सिक्युरिटीबद्दल एव्हढ्या जागरुक असतात कि त्या हव्यासामधे साईट वापरताच येत नाही अशा क्षुल्लक गोष्टींकडे ते लक्षच देत नाहित. ना रहेगा बास न बजेगी बासुरी Happy

भारतीय वेब साईट्स सिक्युरिटीबद्दल एव्हढ्या जागरुक असतात कि त्या हव्यासामधे साईट वापरताच येत नाही अशा क्षुल्लक गोष्टींकडे ते लक्षच देत नाहित>>> दुकानात सगळ्यात दुर्लक्षित करण्यासारखी वस्तु म्हणजे गिर्हाइक हे तत्व तन्तोतत पाळतात... विनासायास सगळ घडल तर कस्टमरला सान्गायला किस्से कसे असतिल? आम्ही "ओसीआय" काढल पटकन काम झाल!! छ्या! यात काय मज्जा?

त्या हव्यासामधे साईट वापरताच येत नाही अशा क्षुल्लक गोष्टींकडे ते लक्षच देत नाहित. >> Lol अगदी! ओटीपी हा आणखी एक असाच अब्युझ आहे.

ओटीपी हा आणखी एक असाच अब्युझ आहे >>> +१ टोटल छळवाद. मला मागे बहुधा मुंबई विमानतळावर हा एक अनुभव आला होता. वायफाय साठी ओटीपी पाठवला. आणि माझ्याकडे यूएस नंबरचा फोन - एअरोप्लेन मोड वर टाकलेला. बेसिकली त्याचसाठी मला विमानतळावरचं वायफाय हवं होतं. आता ओटीपी कसा रिसीव्ह करायचा? डेडलॉक! प्रत्येक गोष्टीसाठी कशाला ओटीपी लागतात??

आता येतो ओटीपी ना? पूर्वी भारतीय मोबाईल नं नसेल तर प्रॉब्लेम यायचा. आता येतो का लक्षात नाही. बंगलोर विमानतळावर एक डेस्क असे तेथे जाउन सांगितले की ते चालू करून देत Happy

बंगलोर विमानतळावर एक डेस्क असे तेथे जाउन सांगितले की ते चालू करून देत Happy >> मुंबईअलाही आहे. मलाही रमड चाच अनुभव आला होता. ती बाई म्हणालेली कि आम्ही ह्या कामासाठी एक वेगळा फोनच ठेवलाय म्हणे. आता टी मोबाईल मुळे हा प्रॉब्लेम माझा तरी गेलाय.

उद्या आपल्या सगळ्यांची वर्णी देशद्रोह्यांमधे लागणार आहे Wink

पुढच्या वेळी शोधतेच हा डेस्क का वेगळा फोन जे काय आहे ते Happy

उद्या आपल्या सगळ्यांची वर्णी देशद्रोह्यांमधे लागणार आहे >>> Lol

आम्ही ह्या कामासाठी एक वेगळा फोनच ठेवलाय म्हणे >>> Happy एक फोन. मग तो सांभाळायला अगम्य युनिफॉर्म घातलेला एक निर्विकार माणूस. तो तशाच इतर कर्मचार्‍यांशी टाइमपास करत बसणार. त्याचे लक्ष वेधून घेउन कोड मागायचे. त्यापेक्षा ओटीपीची गरजच काढावी असे नाही Happy

जगातील सर्व विमानतळांवर कसलीही माहिती न देता वाय फाय वर जाता येते - काही ठिकाणी काहीच विचारत नाहीत, तर काही ठिकाणी विचारतात पण न देताही पुढे जाऊ देतात. मग आपल्याकडे का इतके टाइट? मुंबई तर लष्करी विमानतळही नाही पुण्यासारखा. आणि असता तरी तेथील सेन्सिटिव्ह वापराचे वाय फाय तेच पब्लिक वाय फाय असायला हवे असे थोडेच आहे Happy इतर ठिकाणीही त्या त्या विमानतळांचे अंतर्गत कामकाज त्याच पब्लिक वाय फाय वर नक्कीच चालत नसेल.

अगदी! आणि ते नॉन इंडियन नंबर ला otp टेक्स्ट पाठवतच नाहीत!!!

रिटर्न घेणारा दारावर आला की तो पार्सल बरोबर ओटी-पी चं तीर्थ पिऊन जातो. एटीएम मध्ये, आता नक्की आठवत नाही कशासाठी, पण काहीतरी करायचं असलं की otp लागतो. Icici फिजिकल कार्ड वरचे ग्रिड विचारते, परत ओटीपी. ते ही एकवेळ ठीकच. पण एका लॉगिन सेशन मध्ये चार जणांना पैसे पाठवायचे तर चार वेळा ओटीपी!!! बरं सेशन टाईम आऊट १२० सेकंद. ओटिपी ही टाईम आऊट होतो. आणि लॉगिन करताना कधीच otp विचारत नाहीत.

अरे नेहेमी पेक्षा वेगळ्या आयपी वरून लॉगिन केलं तर लॉगिन करतानाच एकदा विचारा. मग त्या सेशन पुरता त्याला त्रासातून मुक्त करा.

येथे ओटीपी भेटेल >>> Lol जर माझा अंदाज बरोबर असेल तर तिथे काहीच लिहीलेलं नसणार. इतक्या सहज ते आपल्यासाठी गोष्टी सोप्या करतील होय? Proud

आणि तिथे काय लिहिलेलं असतं? >>> इथे ओटीपी विचारू नये, आम्हाला इतर कामधंदे आहेत..
किंवा,
ओटीपी हवा असल्यास आम्ही पाठवलेला ओटीपी सांगा, मगच आम्ही नवीन ओटीपी देऊ..

ते ही एकवेळ ठीकच. पण एका लॉगिन सेशन मध्ये चार जणांना पैसे पाठवायचे तर चार वेळा ओटीपी!! >> अरे ते तुझे पैसे तुझाकडचे राहावेत म्हणून बापडे प्रयत्न करतात तर तुझे आपले भलतेच Wink

पोस्टातून मनीऑर्डर घेवून वीएफएस ग्लोबलला युपीएस ने गुरुवारी पाठवलेले दोघांचे अर्ज-कागदपत्र शुक्रवारी शिकागोत सुखरुप पोहोचले. नवर्‍याला त्यांच्याकडून इमेलने फी मिळाल्याची रिसीट आणि अ‍ॅक्नॉलेजमेंटची इमेल आली. उत्साहाने माझी इमेल चेक केली तर अजून तरी काही नाही. नवरा धीर देतोय सोमवारी येइल इमेल म्हणून.

Lol एकाला मेल पाठवली म्हणजे तो दुसऱ्याला सांगेलच असा देसी विचार करून दोन पोस्ट आल्या तरी एकच पोच पाठवली असेल. चक्रमपणा असा थोडीच जाणारे!

काल मला अक्नॉलेजमेंटची मेल आली. त्याशिवाय अजून एक मेल आली फोटो मिसिंग म्हणून. त्यांना फोटो पसंत पडला नाहीये असे दिसतेय. त्यांनी लिंक दिली आहे फोटो लोड करायला. आता पुन्हा फॉर्म प्रिंट करुन पाठवायला लागेल का ते कळले नाही. आणि रिटर्न शिपिंग लेबल हवे आहे. त्यासाठी पण एक लिंक दिली आहे. पूर्तता करायला २० दिवसांची मुदत दिली आहे. आज नवरा प्रयत्न करेल .

नवीन पासपोर्ट आला म्हणून ओसीआय अपडेट करायला गेलो. ( हो माझाच मूर्खपणा आहे हे त्रिवार मान्य आहे. टीपीकल देशी जनतेसारखे - गरज लागेल तेंव्हा बघू करायला हवे होते). त्यातले नमुने
१. प्री रेक मधे फोटो नि साईन ह्याम्च्या इमेज चा आकार नि साईझ दिली आहे. मी सगळे त्याप्रमाणे बनवले नि अपलोड केले, तिथे क्रॉप म्हणून ऑप्शन येतो. का ते माहित नाही. त्यावर क्लिक केले कि तो अपलोड केलेल्या फोटो मधला काही भाग बाजूल दाखवतो. आपण खूश. मग सबमीट केले कि एरर येते कि फोटो साईझ १ एम्बी हवी. ( आधी च्या प्री रेक हा आकडा वेगळा आहे. फाईल साईझ ९०० केबी वगैरे होती). मग झटापट केली नि सोडून दिले. परत नवीन सेशन सुरू करून प्रयत्न केला पण एक रँडम ५ मे बी ची इमेज टाकली. ह्यावेळी सांगितले कि ५०० केबी ची फाईल हवी. मग परत तिसरा प्रयत्न केला ज्यात ५०० केबी च्या खालच्या फाईल्स ठेवल्या (माझा फोटो आतापर्यंत अफूच्या डोळीतला तस्कर स्टाईल मधे दिसत होता Wink ) . ईट वर्क्ड.
२. पुढे एक प्रश्नावली आली. ह्यात मोबाईल नंबर, घरचा नंबर , ऑफीस अ‍ॅड्रेस, ऑक्युपेशन मँडेटरी आहे. का ? बिजनेस करत असाल तर ओसीआय देत नाहीत का ?
३. पुढच्या पानावरचा पहिला प्रश्न - घरात इतर कोणी ओसी आयला अप्लाय केले आहे का ? हो उत्तर दिले तर माहीती विचारतात जी नवीन अ‍ॅप्लीकेशनच्याच एव्हढी आहे. का ? ऑसी आय नंबर वरून सिस्टीम मधे शोधली तर ऑदीट ट्रिगर होईल का ? आणी मूळात ह्याचा मी माझ्या ऑसीआय मधे पासपोर्ट नं अपडेट करण्याशी काय संबंध आहे ?
४. शेवटचा प्रश्ना - भारतात कोणी नातेवाईक आहेत का ? हो असेल तर नाव गाव टाका. पत्ता लिहितो तिथे फक्त अक्षरे टाकता येतात. आकडे नाही. भारतात पिन कोड येऊन शंभरच्या वर्षे झाली आहेत ना ? मरु दे. नाही टाकला पिन कोड नि केले सबमिट.

आता वाट पाहायची !

असामी Happy

एक गोष्ट मानायला हवी. ते अध्यात्मिक लोकांत जसं प्रत्येकाला येणारी अनुभूती वेगळी असते, तसं भारतीय सरकारी खात्यात सुद्धा प्रत्येकाला येणारा अनुभव युनिक असतो. एकाच्या अनुभवाचा दुसर्याला उपयोग होत नाही Happy

Lol
सॉरी असामी, तुझं फ्रस्ट्रेशन वाक्यावाक्यातून दिसतंय - हे 'अती झालं आणि हसू आलं' क्याटेगरीतलं आलेलं हसू आहे!

तसं भारतीय सरकारी खात्यात सुद्धा प्रत्येकाला येणारा अनुभव युनिक असतो. एकाच्या अनुभवाचा दुसर्याला उपयोग होत नाही >>> Lol ग्राहकाभिमुख अनुभव वगैरे यालाच म्हणतात.

मलाही बरीच खटपट करावी लागली होती हे आठवते. त्या सगळ्या मॅडनेसच्या मागे काही तरी मेथड आहे असेही तेव्हा लक्षात आले. पण ती तुम्ही सगळे सबमिट केल्यावरच जाणवते Happy ती सुरूवातीला तर सोडाच पण सबमिट करेपर्यंत पब्लिकच्या लक्षात येऊ द्यायची नाही असे डिझाइन आहे. नाहीतर उठसूठ सगळे ओसीआय अपडेट करत सुटतील असा काहीतरी कयास असेल.

एकाच्या अनुभवाचा दुसर्याला उपयोग होत नाही >> Lol

हे 'अती झालं आणि हसू आलं' क्याटेगरीतलं आलेलं हसू आहे! >> I know.

पण ती तुम्ही सगळे सबमिट केल्यावरच जाणवते >> ही सगळी माया आहे नि ह्या भौतिक गोष्टींमधून बाहेर पडा असा तो आध्यात्मिक संदेश आहे. रौरव नरक असेल तर त्यात भारतीय सरकारी वेबसाईट्स वर फॉर्म भरणे हि शिक्क्षा सर्वात हायेस्ट श्रेणीची असणार ह्यात मला शंकाच नाही. तो कोण डांटे त्याला माहित हे असते तर डाटेंज हेल चे वेगळेच चित्र आज प्रसिद्ध असते - पहिली लेव्हल म्हणून आयसीआयसी मधे लॉगीन नि सातवी म्हणून काँसुलेट च्या वेब्साईट्स वापरणे Happy

Pages