चटण्या - कांद्याची चटणी - ऋतुराज.

Submitted by ऋतुराज. on 16 September, 2024 - 10:36

कांद्याची चटणी

बरेचदा एखादी बोअरिंग भाजी असेल तर किंवा भाजी करायचा कंटाळा आला तर अगदी घरातल्याच साहित्यात होणारी ही झणझणीत कांद्याची चटणी.

साहित्य:
चार मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून, दोन मोठे चमचे तेल, चिमूटभर हिंग, एक लहान चमचा जिरे, एक लहान चमचा मोहरी, अर्धा चमचा हळद, पाच सहा पाकळ्या लसूण ठेचून, लाल तिखट किंवा घाटी काळा मसाला दीड मोठे चमचे, शेंगदाण्याचा जाडसर कूट दोन मोठे चमचे आणि चवीनुसार मीठ.

कृती:
कढईत तेल तापवून घ्या. त्यात हिंग, जिरे आणि मोहरी घाला. मोहरी तडतडली की त्यात ठेचलेला लसूण घाला. आता यात चिरलेले कांदे घाला व चांगले परतून घ्या. कांदा मऊसर परतला की त्यात हळद घाला. आता यात लाल तिखट किंवा घाटी काळा मसाला टाका व चवीनुसार मीठ टाका. शेवटी शेंगदाण्याचा कूट टाकून चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्या.
झाली कांद्याची चटणी तयार.

टिपा:
ही चटणी जरा कोरडी असते.
लाल तिखट किंवा घाटी काळा मसाल्या ऐवजी हिरवी मिरची वाटून टाकू शकता.
ही चटणी भाकरीबरोबर जास्त चांगली लागते.

Onion Chatani.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अल्पना, सहेली धन्यवाद.
हो, ही जरा तिखट चांगली लागते.
झकासराव,
इथे नसेल तर नक्की लिहीन म्हाद्या रेसिपी.

अभिनंदन...
हि पहिल्या दुसऱ्या नंबरात येईल असे वाटलेलेच.

अभिनंदन

म्हाद्या लिहायचं मनावर घे मित्रा

खूप खूप धन्यवाद.
माझ्या साध्या चटणीच्या रेसीपिला मतं दिलेल्या सर्वांचे आभार.
पहिला नंबर आल्याचं पाहून फारच भारी वाटतं आहे.
आपला सर्वांचा लोभ आहे. तो असाच राहू द्या.

Pages