Submitted by वृंदा on 17 September, 2024 - 16:41
कषाय
हे पेय म्हणजे अमृतच. चहा ला एक सुंदर पर्याय. भरपूर शक्ती देणारे.तरतरी आणणारे. खूप पूर्वी हा शब्द मी गोंदावलेकर महाराजांच्या एका पुस्तकात वाचलेला. मग एकदा रूचकर मेजवानी म्ध्ये एक व्हिडीओ पाहीलेला.कोकण,गोवा, कारवार ला अनेक घरी करतात. उन्हाळ्यात उष्णता कमी कलणारा तर पावसाळ्या सर्दी खोकल्याला आराम पडण्याकरता बहुगुणी.
साहित्य- 100 ग्लॅम धणे, 50 ग्रॅम.जिरे, 25 ग्रॅम बडिशेप, साखर ,दूध ,पाणी
कृती- धणे जिरे,बडिशेप एक एक करून तव्यावर भाजून घेणे. थंड झाल्यावर मिक्सरवर बारीक पूड तयार करणे. चहासाठी जसे आधण ठेवतो तसे ठेवणे. चवीपुरती साखर घालणे. मग एक- दीड चमचा वरील साहित्याची पूड घालणे.थोड्यावेळाने दूध घालून चांगले उकळवणे.कपात गाळून घेणे आणि गाणी ऐकता ऐकता किंवा पेपर वाचता वाचता गरमगरम वाफाळता ह्या वेगळ्या चहाचा आस्वाद घेणे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
नकक्रुक
नक्की करुन बघणार.
छान! करून बघीन मी.
छान! करून बघीन मी.
मस्त आहे.बऱ्याच ठिकाणी हल्ली
मस्त आहे.बऱ्याच ठिकाणी हल्ली चहा लाच कषाय म्हणतात.यातली साखर टाळून मीठ घालून घरी बनवतो आम्ही, सर्दी खोकल्यात.
छान आहे. करून पाहीन
छान आहे. करून पाहीन
कषायपेय चहाला म्हणतात. चॉकलेटी रंगाला वा काढा यासाठीही कषाय शब्द वापरतात बहुतेक.
छान आहे.
छान आहे.
फायनल प्रॉडक्टचा फोटो राहिला
फायनल प्रॉडक्टचा फोटो राहिला.
छान असतो हा कषाय. वृंदा, इथे
छान असतो हा कषाय. वृंदा, इथे लिहिलेत ते बरे झाले.
आम्ही गेल्या वर्षभरापासून हा कषाय सकाळच्या दुसर्या चहास पर्याय म्हणून घेत आहोत. दूध न घालताही चालतो.
तब्येत फरक वगैरे तितकंसं समजत नाहीये पण तेव्हाची चहा तल्लफ कमी झाली.
छान आहे.
छान आहे.
मस्त वेगळं आहे हे. एकदा करुन
मस्त वेगळं आहे हे. एकदा करुन पहाणार.