पेटता रान सारे ....

Submitted by द्वैत on 19 September, 2024 - 10:23

दिशा पेटती पेटता रान सारे
उडे धूळ वाऱ्यावरी पांढरी
गळू लागता दूर आकाश तारे
कसा सापडावा किनारा तरी

कुणी राख केली कुणाच्या घराची
कसा दोष देऊ कुणाला इथे
उरी दाबला खोल आकांत सारा
तरी थंड भीती मनाला डसे

नको हाक मारू कुणाला अवेळी
कुणाला नको दाखवू आरसे
नको माग घेऊ कुणाचा कुठेही
नको नाचवू पावलांचे ठसे

द्वैत

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह..!!

वा!

मला का कोण जाणे, 9-11चं दृश्य आलं डोळ्यांसमोर!

वा!

मला इथे कॅलिफोर्नियात लागणारे वणवे डोळ्यासमोर आले.