प्रकाशचित्रांचा झब्बू ५ - फिटनेसचे सवंगडी

Submitted by संयोजक on 16 September, 2024 - 03:10

मायबोली गणेशोत्सव २०२४ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू.

फिटनेस.... तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय. याच्यासाठी कुणी डाएट करतात, कुणी व्यायाम, कुणी नियमित एखादा मैदानी खेळ खेळतात तर कुणी रोजच्या रोज ठराविक अंतर चालून येतात तर कुणी हे सगळे थोडेथोडे करतात.
फिटनेस राखायच्या या प्रयत्नात जे जे आपल्याला मदत करतात ते सगळे फिटनेसचे सवंगडी.
आठवा आता तुमच्या फिटनेसचा प्रवास आणि येऊद्या खुप सारी छायाचित्रे Happy

तुम्हाला तुमच्याकडे असलेली, या विषयाबद्दलची जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे. प्रकाशचित्रे कशी द्यायची याची माहिती येथे मिळेल. - https://www.maayboli.com/node/1556
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Thanks mru. Weight training is major part of fitness. Esp in older adults. You should be able to pick up a little grand child.

Screenshot_20240918_161948_Gallery.jpg
नवीन.. आजच आली..

अमा फोटो अवली आलाय Happy
आशू, तुमच्या खेकडा फोटोला झब्बू आहेत माझ्याकडे बरेच...

तूर्तास हे फिटनेसचे माझे आणि एकमेकांचे सवंगडी..
उलटे लटकायची ट्रेनिंग देताना.. आणि वारसा पुढे नेताना..

IMG_20240918_213526.jpg

अमा, सामो, मृ, ऋ ची आणि आशुचीपिलवंडे, चिन्मयीची लेक सगळेच फोटो गोड आहेत.

हे माझे जिम, प्लॅनेट फिटनेस - मी फोटोत नाही. ते रॅन्डम लोक आहेत.एक दिवसाआड किंवा आठवड्यातून तीन दिवस तरी जाते .
IMG-20240916-WA0000.jpg

हा माझा कुत्रा - कोकोनट. याच्या सोबत उरलेले तीन दिवस नदीकाठचा ट्रेल करते. फार अवघड नाही पण अधुनमधून उंचसखल, दगडाच्या कपारी व पायऱ्या असलेला आहे. ओढ्याचा आवाज येतो, पाण्याच्या आवाजाने मनःस्वास्थ्य चांगले रहाते. निसर्गाच्या सान्निध्यात गेल्याशिवाय शांत वाटत नाही. माझा आणि कोकोनटचा me-time आहे, तो उगाच उड्या मारून दाखवतो आणि 'कशी उंच मारली उडी' या भावाने माझ्याकडे अभिमानाने बघतो. एके दिवशी आम्हाला तेथे फुलपाखरू दिसले आणि तो आणि मी बघत बसलो. कधीकधी हरणे दिसतात. ते कोकोनट कडे व हा त्यांच्याकडे आणि मी ह्या सगळ्यांकडे बघत बसते. आल्यावर आम्ही दोघे दीड अंडं मी आणि अर्धे कोकोनट, व एक सफरचंद खातो. त्यात दोन तुकडे देते, तो मागतोच. मी शबरी आणि तो राम असतो, त्याला सोडून काहीही खाताच येत नाही. संध्याकाळी पुन्हा घराजवळ छोटी चक्कर मारून येतो. अतीच झालं 'कुत्रं-कुत्रं' पण हे असेच आहे.
IMG-20240916-WA0001.jpg
ह्या फोटोत झूम केल्यास हरीण दिसेल.
IMG-20240501-WA0003(1).jpg

हा ओढा. ओढ लागली आहे ह्या ओढ्याची. Happy
याशिवाय मी दही, ताक, कोशिंबीरी, कच्च्या भाज्या, खजूर भरपूर खाते. काहीही असो कमीच खाते. मॉडरेशन हाच फिटनेस मित्र आहे.

मी चुकून तीन फोटो दिले पण पुन्हा टाकणार नाही. आहे हे राहू देतेय, समजून घ्या. Happy

This is protein powder two spoons twice a day. Kidney sane prescribed by doctor. Veg. Available in india

वा! काय लवचिकता आहे (रियल) ऋन्मेष मधे! कीप इट अप.
मुलांच्या अर्धी लवचिकता तरी आपल्यात असावी एवढीच इच्छा आहे Happy

अस्मिता, डोळ्यांना गारवा लाभला. हा असा ट्रेल फीटनेस साठी लाभणे, ही सुध्दा १ प्रकार ची श्रीमंतीच.
दोघे दीड अंडं मी आणि अर्धे कोकोनट, व एक सफरचंद खातो.>>> तू जोक केला नसलास तरी मला हसू आले ह्या वाक्या वर Wink

मृणाली मॅट मस्त. मलाही घ्यायची आहे ह्यावेळेस नवी. एक तर जुनी धुवू ही शकत नाही..

या धाग्यावर फिटनेसचे सवंगडी म्हणून खाण्याचे पदार्थ टाकता येतील हे लक्षात नव्हते आले....

माझे सवंगडी, फळे आणि सॅलड्स

303B9B6C-B663-4A43-BD38-BB3F2AF9F38D.jpegc6c3d44f-d5b3-4a85-86fc-5880001899ef.jpgIMG-0413.JPG

फिटनेसचा खरा सवंगडी - दृढ निश्चय!
आजपर्यंतच्या छोट्याश्या कारकिर्दीत तीन वेळा हातपाय मोडून छोटे मोठे प्लास्टर चढवलेत. पण प्रत्येक दुर्घटनेनंतर उत्साह मात्र तितकाच.
या फोटोच्या काळात खरे माझाही आजार पीकवर होता आणि माझीही तब्येत फार खालावली होती. पण याची (खरे तर दोन्ही पोरांची) एनर्जी बघून मलाही ऊर्जा मिळायची.

IMG_20240918_213440.jpg

Pages