कांद्याची चटणी
बरेचदा एखादी बोअरिंग भाजी असेल तर किंवा भाजी करायचा कंटाळा आला तर अगदी घरातल्याच साहित्यात होणारी ही झणझणीत कांद्याची चटणी.
साहित्य:
चार मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून, दोन मोठे चमचे तेल, चिमूटभर हिंग, एक लहान चमचा जिरे, एक लहान चमचा मोहरी, अर्धा चमचा हळद, पाच सहा पाकळ्या लसूण ठेचून, लाल तिखट किंवा घाटी काळा मसाला दीड मोठे चमचे, शेंगदाण्याचा जाडसर कूट दोन मोठे चमचे आणि चवीनुसार मीठ.
कृती:
कढईत तेल तापवून घ्या. त्यात हिंग, जिरे आणि मोहरी घाला. मोहरी तडतडली की त्यात ठेचलेला लसूण घाला. आता यात चिरलेले कांदे घाला व चांगले परतून घ्या. कांदा मऊसर परतला की त्यात हळद घाला. आता यात लाल तिखट किंवा घाटी काळा मसाला टाका व चवीनुसार मीठ टाका. शेवटी शेंगदाण्याचा कूट टाकून चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्या.
झाली कांद्याची चटणी तयार.
टिपा:
ही चटणी जरा कोरडी असते.
लाल तिखट किंवा घाटी काळा मसाल्या ऐवजी हिरवी मिरची वाटून टाकू शकता.
ही चटणी भाकरीबरोबर जास्त चांगली लागते.
मस्त.
मस्त.
जबरी लागत असणार..करून बघते
जबरी लागत असणार..करून बघते
आम्ही यांतच फोडणीत कढीपत्ता व
आम्ही यांतच फोडणीत कढीपत्ता व कांदा भाजला की टोमॅटो घालून चटणी करतो. तीही मस्त खमंग असते. भाकरीबरोबर विशेष आवडते.
आता एकदा नुसत्या कांद्याची करून पाहिन.
छान आणि सोपी दिसतेय रेसिपी..
छान आणि सोपी दिसतेय रेसिपी..
सही!
सही!
मस्त! आम्ही "कान्द्याच कल्स "
मस्त! आम्ही "कान्द्याच कल्स " म्हणतो याला.
मस्त दिसते आहे. नक्की करुन
मस्त दिसते आहे. नक्की करुन बघणार.
भरत, केया, माझेमन, अ'निरु'द्ध
भरत, केया, माझेमन, अ'निरु'द्ध, स्वाती_आंबोळे, प्राजक्ता, अमितव धन्यवाद.
मस्त वाटतेय.
मस्त वाटतेय.
सोपी वाटतेय. करुन बघेन
सोपी वाटतेय. करुन बघेन
मस्तच वाटतेय... करुन बघीन
मस्तच वाटतेय... करुन बघीन नक्की... सातारी म्हाद्या आठवला उगाचच हे वाचून ...
घटक पदार्थ पाहता नक्कीच
घटक पदार्थ पाहता नक्कीच चांगली लागत असेल..
छान
छान
देवकी, कविन, मनी, ऋन्मेssष,
देवकी, कविन, मनी, ऋन्मेssष, sparkle धन्यवाद
@ मनीमोहोर,
ही चटणी साताऱ्याकडचीच आहे.
ह्यात शेंगदाण्याचा कूट आणखी वाढवला आणि पाणी घातले की झाला म्हाद्या.
पण ह्या चटणीत पाणी घालत नाही.
आमच्याकडे पण अशीच करतात
आमच्याकडे पण अशीच करतात कांद्याची चटणी. काही तरी वेगळे किंवा थोडे पुरवणी म्हणून
Mast . Karun baghin. Best
Mast . Karun baghin. Best wishes for award. I will add a bit of dahi to soften the taste. Not to the whole pot. Only on my plate.
काय चमचमीत दिसत आहे. करून
काय चमचमीत दिसत आहे. करून बघेन. आता घाटी काळा मसाला आणणे भाग
नॉर्मल काळा मसाला चालेल का?
ही अशी कांद्याची चटणी मला खूप
ही अशी कांद्याची चटणी मला खूप आवडते. आम्ही काळा मसाला नाही घालत, फक्त लाल तिखट घालतो, आणि बहूतेक लसूण नसतो. रसाच्या जेवणाबरोबर अशी कांद्याची चटणी बर्याचदा करतात आमच्या गावाकडे इतर कोणत्याही भाजीऐवजी.
कितीतरी दिवसांत केली नाहीये मी. आज करेन मी. काळा घाटी मसाला म्हणजे नेमका कोणता मसाला? माझ्याकडे आईने दिलेला घरचा गोडा मसाला आणि काळा मसाला आहे. एका काकीने दिलेला तिच्या घरचा काळा मसाला आहे. (हे सगळे मराठवाड्यातल्या घरांमध्ये बनणारे मसाले), शिवाय विकतचा कोल्हापुरी आणि मालवणी मसाला आहे. या सगळ्यांपैकी कोणता मसाला घालावा?
वा, मस्त.
वा, मस्त.
झकास. ऋतुराज, पुढच्या वेळी
झकास. ऋतुराज, पुढच्या वेळी तुमच्याकडून गोड पदार्थ रेसिपी हवी आहे.
आमच्याकडे ह्याच वेरिएशन करतात
आमच्याकडे ह्याच वेरिएशन करतात. कच्चा कांदा, लाल तिखट आणि लसूण आधी खलबत्त्यात अदरकच्च वाटून मग तव्यावर तेल घालून खमंग परततात. झाली चटणी. तुमचं वेरिएशन पण करून पाहीन.
अमा, थॅन्क्स. येस. दही घालून
अमा, थॅन्क्स. येस. दही घालून खातात काहीजण.
aashu29, चालेल. लाल तिखट सुद्धा चालेल. ही चटणी जरा तिखट असते. पण चवीनुसार तिखट घालता येईल.
अल्पना,
काळा घाटी मसाला म्हणजे नेमका कोणता मसाला?>>>>
यात सगळे गरम मसाले आणि इतर मसाले (जायफळ, जावेत्री, चक्रीफुल, हिंग, दगडफुल इत्यादी) तसेच धने, हळकुंड सुंठ इत्यादी मसाले व बेडगी, शंकेश्वरी, काश्मिरी मिरच्या तेलात भाजून एकत्र कुटतात. हा मसाला असाच वापरतात. ह्याला आम्ही लाल तिखट म्हणतो. आता यातच तेलात शिजवलेला कांदा (बारीक चिरून) व लसूण मिसळतात व ह्याला काळा मसाला म्हणतात.
वरील लाल तिखट मसाल्याचे प्रत्येकाचे वेगवेगळे वेरियेशन असू शकतात.
धन्यवाद, हरपा आणि Bhakti Salunke
खोबरं असतं का मसाल्यात?
खोबरं असतं का मसाल्यात? आमच्याकडच्या काळ्या मसाल्यात वरच्या पदार्थांशिवाय भाजलेलं खोबरं ही असतं.
हो अल्पना. सॉरी लिहायचं राहील
हो अल्पना. सॉरी लिहायचं राहील.
सुके खोबरे काप करून तेलात परतून घेतो त्यातच तेल टाकून कांदा लसूण शिजवून घ्यायचा.
ऋतुराज, पाककृतीमधे समाविष्ट
ऋतुराज, पाककृतीमधे समाविष्ट करा जेणेकरून भविष्यात रेसिपी वाचताना परिपूर्ण रेसिपी मिळेल..
सोपी आणि छान रेसिपी.
सोपी आणि छान रेसिपी.
सातारी म्हाद्या आठवला उगाचच हे वाचून ... +१
पण त्यात मुख्य घटक शेंगदाण्याचा कूट असतो.
मस्त दिसतोय फोटो.. मी करते
मस्त दिसतोय फोटो.. मी करते अशी सेम चटणी कधी कधी.. मस्त लागते.
मस्त आहे की.
मस्त आहे की.
म्हाद्या विषयी देखील लिहायचं मनावर घे गणेशोत्सव संपला की.
आज केली मी लसूण आणि काळा
आज केली मी लसूण आणि काळा मसाला घालून. या पद्धतीने जास्त चांगली लागते ही चटणी.
काल करून बघितली ही चटणी.
काल करून बघितली ही चटणी. माझ्या परीने तिखट केली होती, पण अजून तिखट केली तर जास्त मजा येईल. घरच्यांना खूप आवडली.
Pages